Submitted by lookformanish on 21 January, 2008 - 04:34
पहिला पाऊस, पहिली सर
सोबत ती ही असावी
चिंब बाहूंच्या कवेत शिरण्या
मुंगीस जागा नसावी ॥ १ ॥
त्या रोमांचित धुंध क्षणी
मज विसर जगाचा पडावा
कडाडणारी मेघगर्जना
पण 'असर' तिचा ही न व्हावा ॥२॥
मिठीत माझ्या कळी उमलू दे
फुलू दे आणिक बहरू दे
मजसाठी सुख-स्वप्नांची दुनिया
तिच्या गालिची खळी असू दे ॥३॥
अखेर, तिजभोवतीच्या बाहूंची
अलगद मिठी सुटावी
जरी विभक्त होतील शरीरे
मनं मात्र ती गुंतून राहावी ॥४॥
गुलमोहर:
शेअर करा
खूप सुन्दर
अखेर, तिजभोवतीच्या बाहूंची
अलगद मिठी सुटावी
जरी विभक्त होतील शरीरे
मनं मात्र ती गुंतून राहावी
खूप खूप सुन्दर
प्रेमात हे
प्रेमात हे असच ह्वयच ना
तुझि मिटी कधिच सु टु न ये