बर्फ, डोंगर, स्किईंग..

Submitted by लालू on 2 September, 2009 - 22:46

rp3.jpg

नावः राहुल
वय: ६ वर्षं, ६ महिने
माध्यम: जलरंग

हिरवे डोंगर आपल्या जवळ आहेत. त्यांच्या मधून तळे दिसत आहे. त्यावर एक पूल आहे. बर्फाळ डोंगर खूप लांब आहेत. डाव्या बाजूच्या डोंगरावर स्की रिझॉर्ट आहे. तिथपासून दुसर्‍या डोंगरावर स्किईन्गसाठी जायला केबल कार दिसत आहेत. दुसर्‍या डोंगरावर काही लोक स्कीईन्ग करत आहेत. आकाशात एक पक्षी आणि सूर्य आहे. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रावल्या, लेका कल्पनाशक्ती काय भारी, स्की अन हिरवे डोंगर एकाच चित्रात. Happy

स्की चे डोंगर एकदम मस्तच. एकुनच सही काढलयं चित्र.

हिरव्या डोंगरांचे, आकाशाचे टेक्स्चर सहीये आणि ...बर्फाच्या डोंगरांचे टेक्स्चर खासच..ते डोंगर कागद सोडून काढलेत असे वाटते !पक्षी कागद सोडून काढलाय्...म्हणजे विशेषच ! Happy

लालू, ते आकाश एकदम भारीच रंगवलंय. वय वर्ष सहाच्या मानाने त्याला चांगली जाण दिसतेय. बाकी हिरवे डोंगर आणि स्कीईंगची आयडीया लय भारी आहे.. Happy

धन्यवाद. इथे चित्रे दिलेल्या सगळ्या छोट्या चित्रकारांचेही आभार. त्यांच्यापासून स्फूर्ती मिळाली, मी नुसते 'चित्र काढ' म्हणून मागे लागून काही झाले नसते. Happy

हिरवे डोंगर आणि आकाश आधी काढले होते, मग ते वाळल्यावर दुसर्‍या दिवशी त्यावरच बाकीचे सगळे काढले आहे, जागा सोडून नाही. बर्फाचा पांढरा रंग जिथे विरळ आहे तिथे खालचा निळा रंग दिसतोय, म्हणून ते टेक्स्चर तसे दिसते आहे. Happy

छान.
मुलांच जग किती निर्मळ असतं. स्नो स्की करताना हिरवे डोंगर असले की स्कीईंगनंतर तेथे बागडायच. अस असेल तर कोणत्याही सिझनचा कंटाळा येणार नाही.