माझी बायको

Submitted by मालकंस on 2 September, 2009 - 03:23

नमस्कार,
माझी बायको मेष राशीचि, तशी जरा फटकळच, तरी कीरानावाला ते भाजिवाली सगळेच वर्षानुवर्षापासुन बांधलेले, कस काय जमतं कळेना ? अधे मधे माझ्यासकट सगळ्यानाच दटावत असते ती, तरि माणसं तुटत नाही. तिच्यातिल एक गोष्ट मात्र मला पटत नाही आणी माझी तिला, ती गोष्ट म्हणजे ती गाडी फार वेगात पळविते, यावरुन मी तिला सारखा रागावतो पण सुधारणा झाली नाहि. आणि एक दोनदा धडकलीसुद्धा, लागलेलं एक दिवसापुरतं लपविता आलं, पण दुस-या दिवशि ते बाहेर पडलचं. तिच्या इतर मैत्रिणींच्या सुद्धा ह्याच कथा. गाडी सुसाट चालवितात, आणी मध्येच कुणी आलं, की मग सुचत नाही याना, काय करावे ते, धडकतात मग जाउन. आता ती गारोदर आहे, म्हणुन सध्या तिच्या पिकप आणी ड्राप ची जबाबदारि मी घेतलि. मागे बसुन सारखी बडबड चालु असते, गाडी किति हळू चालवीता, ते बघा सायकलवाले पुढे चाललेत, वैगरे वैगरे. मी लक्ष न देता माझ्याच गतिने चालु ठेवतो. आणि या राशिच्या बायकाना फार बडबडलागते, आणी मला काही ते जमेना. आता माझ्या ऑफीस मध्य एक नविन मुलगी कामाला लागली, ती पण मेष, सारखं बोलनं चालुच. ती आल्यापासुन मला हिची ऑफिसमध्ये सारखी आठवण येते, त्या बडबडी मुळे. मि हीला म्हटलं "अग, एक नवीन मुलगी कामाला लागलि, माझ्या शेजारिच बसते, मेष राशिचि आहे, आणी सारखी बोलत असते, त्या मूळे आजकाल मला तूझी सारखी आठ्वण येते ऑफिसात"

हि लगेच पचकली, " हो का, म्हणजे आता तीची आठवण येते की काय? माझं बोलनं ऐकुन, हां ............."

म्हटलं धन्य तू............

माझं असं निरिक्षंण आहे, मुलि आणि बायका जरा सुसाटच चालवितात गाड्या, नाही का ?

आणी त्यातल्या त्यात, मेष राशिच्या जरा जास्तच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या निरीक्षणाबद्दल तुम्हाला ऑस्कर अ‍ॅवॉर्ड देण्यात यावं असा मी प्रस्ताव इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलकडे पाठवून देते.

इन्टरेस्टिंग, इथे त्यात त्याच लोकांच्या पाचकळ पोस्ट आणि तीच तीच त्यांची पुन्हा पुन्हा मांडलेली मते वाचून वाचून कंटाळा आला होता. त्याव्र नवीन विषयाची सुखद झुळूक. लिखते रहो भैय्या ..

वॉट्स यॉर राशी च्या प्रमोशन साठी हा बीबी काढला असेल का Wink

मी भारतीय मेष...
आणि विंग्रजी सॅजी...

तुमच्या राशी कोणत्या...??