नान तियेन बौद्ध मंदिर

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

आज इथुन जवळच असलेल्या नान तियेन बौद्ध मंदिराला भेट दिली.
http://www.nantien.org.au/en/index.asp

अतिशय स्वच्छ अन सुंदर असे मंदिर, पॅगोडा अन परिसर्...मन एकदम प्रसन्न झाले!

आज तिथे काही विशेष उत्सव होता. त्यात आम्ही गेल्यानंतर आम्हाला मुख्य मंदिरात (बुद्धांच्या ५ प्रतिमांच्या पुढे) बसवण्यात आले. जवळपास ५०० पेक्षा जास्त भक्त होते. मग सर्वांना प्रसाद म्हणुन शुद्ध शाकाहारी जेवणाचे पॅक देण्यात आहे. (हे पाहुण मागचा एक ऑस्ट्रेलियन आश्चर्यचकित झाला!) (ते जेवण शाकाहारे होते, ह्यावर विष्वास बसत नाही. कारण अशी एक भाजी देतात कि जी चिकण वाटते, अन दुसती असते ती बीफ सारखी दिसते. पण बौद्ध लोक शाकाहारी असल्याने ते मान्य करावे लागते! आम्ही चौकशी केल्यावर ते पुर्ण शाकाहारी असल्याचे सांगितले गेल.) मुख्य अन सहाय्यक १४ गुरुंना खास मेनु असलेले भोजणाची ताटे वाढणे हा एक उत्सवच. पारंपारिक वेशभुषेतील सेवेकरी मुली, स्रिया एकामागोमाग एक चालत येउन एक एक पक्वान घेउण रांगेत येउण गुरुंना वाढतात! अगदी सुंदर प्रकार होता. पण व्हिडीओ ला मनाई असल्याने ते रेकॉर्ड करता आले नाही. मग त्या सर्वांनी मिळुण प्रार्थना केली. चायनीज भाषेत. (तिथे एक निवेदक इंग्रजीत माहीती देइ, पण तो फक्त आता प्रार्थना होइल, आता गुरु बोलतीत, आता सिडनी प्रांताचे अध्यक्ष बोलतील असे च सांगे. प्रत्यक्ष गुरु, अध्यक्ष अन प्रार्थना सगळे चिनी भाषेत च होई. असो.) मग सर्वांनी तो प्रसाद खायचा..अन प्रसाद खाणे चालु असताना, सांस्कृतीक कार्यक्रम सुरु केले. म्हंजे, गायण, नृत्य, नाटक्.असे..अन १ तास झाल्यावरही सांस्कृतीक कार्यक्रम पुढे सुरु राहणार असे समजले....मग तिथुन उठुण आम्ही पुढे कियामा बीच वर गेलो.

http://www.kiama.com.au/

कियामा ला ब्लो होल नावाचा एक टुरिस्ट पॉईट आहे. समुद्राच्या पाण्याने घर्षण होउन डोंगरा/ खडकां मध्ये पोकळी निर्माण झाली. अन ती थोडे अंतर आत जाउन खडकांच्या मध्ये उघडते. त्यामुळे तिथे खडकालाच एक मोठे छिद्र पडले आहे अन तिथुन समुद्राचे पाणी हवेच्या जोराने वर उसळी घेते आहे, असे वाटते. जाम मजा येते....जोरदार लाटा आल्या कि पाण्याचे फवारे/ तुषार अंगावर येतात! Happy

फोटो...लवकरच!

प्रकार: