टाटा नॅनो

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
<1’

best.jpgटाटानी लाखाची कार आणली. आत्ता रहेजा, हिरानंदानी,
लोखंडवाला ही मंडळी जोपर्यंत हजारात पार्कींग नाही देत
तो पर्यंत आपल्याला बसच्या रांगेत उभ रहाव लागणारच

प्रकार: 

मस्त रे.
बरोबर आहे तुझ
गाडी एक लाखाची आणि पार्किन्ग एक लाखाच मग कस परवडेल बरं Happy
ह्यावरुनच एक बातमी वाचली होती ती आठवली.
टाटा च्या एक लाखाच्या कार मुळे वाहतुकीबाबत मुख्यमंत्री चिंतेत.
ही हास्यास्पद बातमी आहे कारण ही कार येणार येणार अस मागचे २-३ वर्ष तरी नक्की चालल होत.
तेब्व्हापासुनच जर प्लॅनिंग केले असत तर आज चिंतीत व्हाव लागल असत का??

आहे की तुझ्याकडचे पार्कींग

वस्तु स्वस्त समस्त जमउनि
बनवीली लाखाचि कार टाटानि
चालवावयासि नव्हति
आम्हासि सायकल म्हणुनि

अगदी खरे आहे. तसंच तर सगळ्यादूर भारतात वाहनांचा किती तो सुळसुळाट आहे. सध्याची गरज पण किती ती असावी. कधी कधी घरांत माणसे ३ व वाहने ४. आता तर ह्या नैनो मुळे दुचाकी च नाही तर चारचाकी वाहने पण घरोघरी अशाच संख्येत वाढणार...गाडीची हौस तर फिटणार पण बाकी संकटे गंभीर आहेत..

दीपिका जोशी 'संध्या'