रुटीन

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

नविन वर्ष, नविन महिना, नविन दिवस
म्हणायच आपलं नविन म्हणून
पण आहे सगळे नेहमीचेच
रुटीन कामाचे रात्र अन् दिवस

रोज सकाळी हापिसात पोचायची नेहमीचीच घाई
हापिसात गेल्यावर नेहमीचीच कामाची यादी
आजचं काम उद्यावर ढकलू म्हटलं तर
उद्याच्या कामांची दुसरीच यादी

मीटींग्ज कॉन्फ़रन्सेस अन मुलाखती
यांची न संपणारी नाजूक नाती
दुसर्‍यांचा मूड सांभाळत सांभाळत
आपणच करायच्या या सगळ्या कवायती

बॉसच्या अपेक्षा आणि ज्युनिअर्स च्या आकांक्षा
फायनांस च्या धमक्या आणि एच आर च्या नियमावल्या
या सगळ्या गलबल्यामध्ये हरवल्या आहेत
स्वत:ने ठरवलेल्या स्वत:च्या इच्छा

अशा या रहाटगाडग्यातून
बाहेर पडावेसे वाटत आहे
त्याचाच प्लॅन ठरवण्यासाठी
एक मीटींग शेड्युल केली आहे

मात्र या मीटींग मध्ये
इतर कुणाचाही सहभाग नसेल
मी आणि माझ्या इच्छा
यांचाच फक्त अंतर्भाव असेल

विषय: 

अरुण राव अगदी मनातलं बोललात बघा!!!
पर्फेक्ट जमलंय!

मस्तच रे अरुण..... मान गये

छान जमली आहे बरं कविता...:)

अरूण, अगदी खरय बाबा!! पटेश एकदम! मस्तच जमलय Happy

अरूण, छानच रे!!

"दुसर्‍यांचा मूड सांभाळत सांभाळत
आपणच करायच्या या सगळ्या कवायती" एकदम पटलं आणि फक्त ऑफिसमधे नाही, हे तर सगळीकडेच,

अरुणराव सही जमंलय. सुट्टी घेवुन भटकुन या कुठेतरी. भलताच कंटाळलेला दिसत आहेस.