श्रीगणपत्यथर्वशीर्ष.

Submitted by संयोजक on 18 August, 2009 - 19:51

श्रीगणेशाय नमः |
शांतिमंत्र

ओम् भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्रा: |
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनुभि: |
व्यशेम देवहितं यदायु: ||
ओम् शांति: शान्ति: शान्ति: ||

स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: |
स्वस्ति नः पूषा विश्ववेदा: |
स्वस्त नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||
ओम् शांति: शान्ति: शान्ति: ||

ओम् तन्मामवतु
तद्वक्तारमवतु
अवतु माम्
अवतु वक्तारम्
ओम् शांति: शान्ति: शान्ति: ||

हे देवांनो, आम्ही आमच्या कानांनी कल्याणमय वचने ऐकावीत, आम्ही आमच्या डोळ्यांनी शुभ दृष्ये पहावीत. ( कल्याणमय वचने कानावर पडावी, शुभ दृष्ये डोळ्यांनी दिसावीत). तुम्ही पूजनीय आहात. आम्हाला दिलेले आयुष्य उत्तम प्रकृतिने भोगून आमच्याकडून तुमची स्तुति होवो. भाग्यवान् इंद्र आमचे पोषण करो. सर्व जाणणारा पूषा आमचे पोषण करो. ज्याला कोणी अडवत नाही असा तार्क्ष्य आमचे पोषण करो. बृहस्पति आमचे पोषण करो.
तो माझे रक्षण करो, तो बोलणार्‍याचे रक्षण करो.

उपनिषद.

हरि ओम् नमस्ते गणपतये ||
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि | त्वमेव केवलं कर्ताSसि | त्वमेव केवलं धर्ताSसि | त्वमेव केवलं हर्ताSसि ||
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि | त्वं साक्षादात्माSसि नित्यं ||१||

गणपतीला नमन. तूच वेदातील तत्वज्ञान आहेस, तू कर्ता आहेस, रक्षणकर्ता आहेस, आणि जग नष्ट करणारा आहेस. तूच हे सर्व ब्रह्म आहेस. तूच परमात्मा आहेस.

स्वरूप तत्व

ऋतं वच्मि | सत्यं वच्मि || २||
अव त्वं माम् | अव वक्तारं, अव श्रोतारं | अव दातारं | अव धातारं | अवानूचामवशिष्यं ||
अव पश्चात्तात् | अव पुरस्तात् | अवोत्तरात्तात् | अव दक्षिणात्तात् |
अव चोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् | सर्वतो मां पाहि पाहि समंतात् || ३ ||

मी योग्य व सत्य वचन करीन. तू माझे रक्षण कर. तू बोलणार्‍याचे रक्षण कर. तू ऐकणार्‍याचे रक्षण कर. तू देणार्‍याचे रक्षण कर. तू घेणार्‍याचे रक्षण कर. तू गुरूंचे रक्षण कर, तू शिष्यांचे रक्षण कर.
तू माझे पश्चिमेकडून (येणार्‍या संकटांचे) रक्षण कर. पूर्वेकडून रक्षण कर. उत्तरेकडून रक्षण कर. दक्षिणेकडून रक्षण कर. उर्ध्व दिशेकडून रक्षण कर नि अधर (म्हणजे खालील) दिशेकडून रक्षण कर.
माझे सर्व बाजूंनी रक्षण कर.

त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः | त्वं आनंदमयस्त्वं ब्रह्ममयः ||
त्व सच्च्दानंदाद्द्वितीयोSसि |
त्वं प्रत्यक्षं ब्रह्माSसि | त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोSसि || ४||

तू सर्व शब्द, मन, आहेस. तू सत्यमय, आनंदमय व ब्रह्यमय आहेस. तू अद्वैत जगाचे सार आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस.

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते | सर्वं जगदिदं त्वत्तस्थिष्ठति | सर्वं जगदिद त्वयि लयमेष्यति |
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति | त्वं भूमिरापोSनलोSनिलो नभः |
त्वं चत्वारि वाक्पदानि || ५ ||

हे सर्व जग तुझ्यापासून निर्माण झाले. हे सर्व जग तुझ्यामुळे चालते, हे सर्व जग तुझ्यातच नष्ट होते. हे सर्व जग सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. तू भूमि, जल, अग्नि, वायू व आकाश आहेस.

त्वं गुणत्रयातीतः त्वमवस्थात्रयातीतः | त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीत:
त्वं मूलाधारस्थितोSसि नित्यम् ||
त्वं शक्तित्रयातीतः | त्वां योगिनो ध्यायंति नित्यम् |
तवं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रूद्रं त्वमिंद्रं त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यं त्वं चंद्रमास्त्वं भूर्भुवःस्वरोम् ||

तू तीन गुणांच्या (स्त्व, रज, तम) यापलीकडील आहेस. थोड्क्यात, तुझे वर्णन करणे देह, काल, अवस्था (जागृति, निद्रा, स्वप्न) यांच्यापलीकडे आहे. योगी लोक सतत तुझेच ध्यान करतात. ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नि, वायु, सूर्य, चंद्र व भू, भुवः स्वः हे तिन्ही लोक तुझ्यात सामावलेले आहेत.

(मनुष्य प्रथम भूमीवर जगतो. मृत्यूनंतर आत्मा भुवः लोकात जातो, तिथून जसजसा तो पवित्र होत जातो, तसतसा तसतसा तो स्वः मः जनः तपः लोकांतून शेवटी सत्य लोकात जातो. पैकी पहिल्या तीन लोकात श्रीगणेशाचे वर्चस्व आत्म्यावर असते.)

गणेश मंत्र

गणादिं पूवमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम् | अनुस्वारः परतरः अर्धेंदुलसितम् | तारेण रुद्धम् |
एतत्तव मनुस्वरूपम् | गकारः पूर्वरूपम् | अकारो मध्यमरूपम् | अनुस्वारश्चान्त्यरूपम्|
बिंदुरुत्तररूपम् | नादः संधानम् || संहितासंधि: | सैषा गणेशविद्या ||
गणकऋषि: | निचृद्गायत्रीच्छंदः | गणपतिर्देवता || ओम् गं गणपतये नमः ||७||

गं या अक्षरात व ओम् या अक्षरात श्रीगणेश सामावलेले आहेत. सर्व विद्यांचे मूळ तेच आहे.
या मंत्राचा कर्ता गणक ऋषी, छंद ( काव्यातील meter) 'निचृद्गायत्री', देवता गणपति. गं अक्षराला वंदन करून मी गणपतीला वंदन करतो.
(ओम् नि गं ही गणेशविद्येची वैदिक रूपे आहेत.)

गणेश गायत्री

एकदंताय विद्महे, वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दंति: प्रचोदयात् || ८ ||
श्रीगणेश हा एकद राक्षसाचा अंत करणारा तसेच वाईट लोकांचा नाश करणारा आहे. तो आम्हाला उत्साहवर्धक असो.

गणेश रूप

एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् |
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं ||
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्
रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपूजितम् ||

हे आपल्या माहितीचे श्रीगणेशाचे रूप - एक दात, चार हात, हातात पाश व अंकुश, सोंड, आशीर्वाद देणारा हात, उंदीर हे वाहन, लाल रंग, मोठे पोट, सुपासारखे कान, लाल वस्त्रे नेसलेला, लाल रंगाचे गंध लावलेला, लाल फुलांनी ज्याची पूजा केली आहे असे हे श्रीगणेशाचे स्वरूप आहे.

भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् |
आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते: पुरुषात्परम् ||
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः || ९ ||

तो भक्तांवर दया करतो, सर्व जगाचे निर्माण त्याने केले आहे, तो आपल्या मार्गावर स्थिर आहे. सृष्टीच्या सुरुवातीला प्रकृति व पुरुष त्यानेच निर्माण केले.

असे चिंतन जो नेहेमी करतो, तो सर्व योग्यांपेक्षा श्रेष्ठ आहे.

अष्ट नाम गणपति
नमो व्रातपतये, नमो गणपतये, नम: प्रथमपतये, नमस्तेSस्तु लंबोदरायैकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः || १० ||

ही गणपतीची आठ नावे: व्रातपति, गणपति, प्रथमपति, लंबोदर, एकदंत, विघ्ननाशिन्, शिवसूत, वरदमूर्ति.
यांना पुनः पुनः नमस्कार असो.

काही लोक इथेच पाठ संपवतात. यानंतर हे अथर्वशीर्ष म्हणण्याचे फायदे (फलश्रुति) वर्णन केले आहेत.

फलश्रुति

एतदर्थवशीर्षं योSधीते | स ब्रह्मभूयाय कल्पते | स सर्वतः सुखमेधते | स सर्वविघ्नैर्नबाध्यते |
स पंचमहापापात्प्रमुच्यते |
सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति | प्रतरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति ||
सायंप्रातः प्रयुंजानोSपापो भवति | सर्वत्राधीयानोSपविघ्नो भवति ||
धर्ममर्थं कामं मोक्षं च विंदति|
या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो (वाचन, मनन, चिंतन) तो ब्रह्माच्या योग्यतेचा होतो.
त्याला सर्व बाजूंनी सुख मिळते. त्याला विघ्नांची बाधा होत नाही, पाच महापापांपासून त्याची सुटका होते.
जो संध्याकाळी अध्यन करतो, त्याने दिवसा केलेली पापे नाहीशी होतात. जो सकाळी अध्ययन करतो, त्याने रात्री केलेली पापे नाहीशी होतात. सकाळ संध्याकाळ अध्ययन करणारा निष्पाप होतो. सर्व ठिकाणी जप करणार्‍याची सर्व विघ्ने नाहीशी होतात. त्याला धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे सर्व प्राप्त होतात.

इदमथर्वशीर्षंमशिष्याय न देयम् | यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति |
सहस्रावर्तनात् यं यं काममधीते, तं तमनेन साधयेत् || ११ ||

हे अथर्वशीर्ष 'अशिष्याला' देऊ नये. अशिष्य म्हणजे ज्याची लायकी नाही असा. (ज्याची श्रद्धा नाही असे लोक). जर कुणी मोहामुळे (पैशासाठी) देईल, तो महापापी होईल.
एक हजार वेळा जो याचे अध्ययन करेल त्याची जी जी इच्छा असेल ती ती यामुळे पूर्ण होईल.

अनेन गणपतिमभिषिंचति स वाग्मी भवती
चतुर्थ्यामनश्नं जपति स विद्यावान् भवति|
स यशोवान् भवति ||
इत्यर्थवण्वाक्यम् |
ब्रह्माद्याचरणं विद्यान्नबिभेति कदाचनेति || १२ ||

या मंत्राने जो गणपतीवर अभिषेक करेल, तो उत्तम वक्ता होतो. जो चतुर्थीच्या दिवशी उपाशी पोटी जप करेल तो विद्यावान होईल. तो यशस्वी होईल. असे अथर्व ऋषींनी सांगितले आहे. त्याचे नेहेमी चांगले आचरण होईल, व तो कधीहि कशालाहि घाबरणार नाही.

यो दुर्वांकुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति| यो लाजैर्यजति स मेधावान् भवति|
यो मोदकसह्स्रेण यजति स वांछितफलमवाप्नोति
यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते || १३ ||

जो दुर्वांनी पूजा करेल, तो कुबेरासारखा श्रीमंत होईल. जो लाह्यांनी पूजा करेल, तो बुद्धिमान होईल. जो एक हजार मोदकांचा नैवेद्य दाखवेल त्याला इछित फळ मिळेल. जो तूप व समिधा यांनी पूजा करेल त्याला सर्व काही मिळेल. त्याला सर्व काही मिळेल.

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति
सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति
महाविघ्नात्प्रमुच्यते महादोषात्प्रमुच्यते महापापात्प्रमुच्यते |
स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति|
य एवं वेद इत्युपनिषद् || १४ ||

जर आठ योग्य शिष्यांना हे कुणि शिकवले तर तो सूर्याहून श्रेष्ठ होतो. सूर्यग्रहणात, महानदीत (म्हणजे गंगा वगैरेसारखी नदी) किंवा मूर्तीजवळ जर याचा जप केला तर या मंत्राचे सर्व फायदे मिळतील. मोठ्या संकटांतून, मोठ्या दोषांपासून, मोठ्या पापांपासून सुटका होईल. त्याला सर्व ज्ञान प्राप्त होते. हेच वेद, हेच उपनिषद.

शांतिमंत्र

ओम् सहनाववतु | सहनौ भुनक्तु | सहवीर्यं करवावहै ||
तेजस्वीनावधितमस्तु | मा विद्विषावहै ||

आपल्या दोघांचे (गुरू व शिष्य) यांचे रक्षण होवो. आपण एकत्र याचे सेवन (वाचन, श्रवण, मनन, ) करू. आपल्या दोघांच्या प्रयत्नांनी आपली आपले अध्ययन अधिक तेजस्वी (प्रभावी) होवो. आपल्याला कुणाबद्दलहि द्वेष असू नये.

शांतिमंत्र

ओम् भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्रा: |
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनुभि: |
व्यशेम देवहितं यदायु: ||
ओम् शांति: शान्ति: शान्ति: ||

स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: |
स्वस्ति नः पूषा विश्ववेदा: |
स्वस्त नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||
ओम् शांति: शान्ति: शान्ति: ||

ओम् तन्मा अवतु
तद्वक्तारमवतु
अवतु माम्
अवतु वक्तारम्
ओम् शांति: शान्ति: शान्ति: ||

(याचा अर्थ वर दिलाच आहे.)

श्रीगणेशार्पणमस्तु ||

विषय: