अजून एक हातोडा..:)

Submitted by देवा on 11 January, 2008 - 00:12

मूळ गाणे..:)
केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा

तुझ्यासारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातूनी तारिसी मानवा

वेडा होऊन भक्तीसाठी, गोपगड्यांसह यमुनाकाठी
नंदा घरच्या गाई हाकिसी गोकुळी माधवा

वीर धनूर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती
रथ हाकुनिया पांडवांचा पळविसी कौरवा
------------------------------------
बकनरा भैरवा का रे येतोस तू आडवा

बळी अम्हाला तूच द्यावा तुला कुठुन हा मिळतो मेवा
वेळोवेळी संकटातूनी तारिसी दानवा

बोट उचलसि ओव्हरकाठी कुठली कसरत करण्यासाठी
आल्या आल्या परत धाडिसी राहुला सौरवा

अरे पूर्ण तू करता साठी, तुझी बुद्धी का होई नाठी
ह्यास कुणीतरी जा रे घेऊन डॉक्टरा दाखवा

(मिल्या, आण तो हातोडा परत..:) )

गुलमोहर: 

देवा 'हा हातोडाही' खतरीच हाणलाहेस बघ.

चिडलाय चिडलाय वाईट्ट चिडलाय हा... चालु दे... मस्त.

अजून एक झकास विडंबन. अजून ४-५ झाले तर तुम्हाला एक अल्बम काढता येइल!

आहे तयार..:) पण त्यात माकडाचा संदर्भ असल्याने पोस्टत नाहिये.. :ड

मस्तच देवदत्ता.. आवडेश..

<<बोट उचलसि ओव्हरकाठी कुठली कसरत करण्यासाठी>> Lol Lol