भेट ...तुझी माझी

Submitted by ishandpande on 17 August, 2009 - 12:13

आठवण
आठवतो का ग , तुला आपण भेटायचो तो वड,
रात्रीच्या वेळी लागायचा ,त्यावर चांदण्याचा घड ..

आठवतं का गं तुला, आपण पाहिलेलं ते वादळ ,
तुला दृष्ट लागू नये म्हणून मी घातलेलं काजळ..

आठवतो का तुला ,आपण पाहिलेला संततधार पाऊस,
मी शिंकताच तू म्हणालीस "आता icecream नको खाऊस"..

आठवतं का तुला ,ते आपलं गर्द वन राईतून फिरणं,
ठेच लागताच सावरून ,एकमेकांकडे बघणं ..

आठवते का तुला, आपली नदीकाठची भेट ,
मी स्पर्श करताच ,तू निघूनच गेलीस थेट ..

आठवतं का तुला, त्या भरतीला चौपाटीवर गेलो होतो फिरायला ,
एकच कणीस दोघात खाताना सुद्धा कुणीच नवता बघायला ..

आठवतो का तुला ,तो थंडीतला कटिंग चहा ,
आणि तेव्हा तू हट्ट करायचीस की फक्त माझ्याकडेच पहा ..

आठवतं का तुला माझ्या , जख्मेतल रक्त ,
मी तेव्हा म्हणायचो ,की दाढी करताना लागलंय फक्त ..

आठवते का तुला, मी भेट दिलेली ती छत्री ,
आणि आता म्हणतेस "किती निर्मळ होती आपली मैत्री "

आठवतं का तुला भेटायला ,आलो होतो तुझ्या घरी ,
अन बघतो तर तिथे चालली तुझ्या मंगळागौरीची तयारी ..

आठवतं तुझे बाबा म्हणाले,"हा तिचा जवळचा मित्र "
कसनुसा हसून मी प्रथमच दारूत बुडवली आख्खी रात्र ..

आठवले कसे नाही तुला ,ते वर्षानुवर्षाचे नाते ,
क्षणाध्रात मोडलेस तू जणू काही गवताचे पाते ..
..
..
..
..
आठवतो का गं तुला आपण भेटायचो तो वड ,
कुत्सितपणे चंद्र म्हणाला ,आता इथेच बसून रड ...............................

गुलमोहर: 

छान!

आठवतो का गं तुला आपण भेटायचो तो वड ,
कुत्सितपणे चंद्र म्हणाला ,आता इथेच बसून रड ...............................

वाह एकदम सही कविता, खुप आतून आल्यासारखी..............