खरच स्वातंत्र्याच मोल आपण जाणतो का?

Submitted by नरेन on 15 August, 2009 - 07:10

आज ६३ वा स्वातंत्र्य दिवस.

भारतीयांसाठी अभिमानचा दिवस, याच दिवसा करिता भारतीयांनी शेकडो वर्षे स्वप्न पाहिलीत. प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य घोषित होतांनाही भारताने खुप काही भोगल. भारत एक संघ रहावा म्हणुन खुप अडचणीना तोंड द्यावे लागले. त्यात झालेल्या काही चुकांचे परिणाम आज ही भारताला भोगावे लागत आहे.
परंतु त्याची जाणिव आजच्या जनतेला व शासनकर्त्यांना खरच आहे का?

ज्या स्वातंत्र्य विरांनी आहुती दिली, ज्यानी अतोनात हाल सोसुन स्वातंत्र्य मिळवुन दिले. अशा त्या महान स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातला भारत हाच आहे का?

आज ही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला ध्वजवंदनास न जाता सुट्टी एंजॉय करणारे (सुज्ञ ?)नागरीक आहेत. किती जणांना राष्ट्रगित पाठ आहे.( जरा थांबा मनातल्या मनात राष्ट्रगित म्हणुन बघा.) आज सुध्दा बरेच महाभाग राष्ट्रगित चालु असतांना गप्प असतात. आज आपण याचे भान ठेवुन वागतो का? आज ही आमचे सैनिक सिमेवर डोळ्यात तेल घालुन, जिवाची पर्वा न करता देशाचे रखण करीत आहेत. याची जाणिव आम्हाला आहे. किती (सुज्ञ ?)नागरीक मतदान करतात? ज्याला मत देतो तो त्या लायकिचा आहे का? हे आपण तपासुन मत दान करतो?

खरच स्वातंत्र्याच मोल आपण जाणतो का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पष्टपणे सांगायचं तर नाही!
आणि तेवढी आपली लायकीसुद्धा नाही.
भारताला स्वातंत्र्य देण्याची घाई करू नका. ते लोक ५० वर्षांतच त्याची वाट लाऊन टाकतील, असं विन्स्टन चर्चिल म्हणाला होता. त्याचे हे उदगार खुळेपणाचे आणि अहंकाराचे प्रतिक होते, पण दाखवलेच की नाही आमच्या लोकांनी खरे करून? Happy

थांबा योगेश प्रभुणे. हे असे म्हणणे आज तरी बरोबर नाही. आज फक्त चांगले काय घडले भारतात ते बघावे. उदा. संगणक क्षेत्रातील प्रगति, अवकाश याने, सुविधा, आर्थिक परिस्थितीत सुधारणा, वाढता यशस्वी जागतिक व्यापार इ.
येथे येणार्‍या बर्‍याच लोकांच्या मते तर भारतात आता सर्वत्र आबादी आबाद आहे, सर्व कसे उत्तम आहे, कुठेहि सुधारणा करायला वाव नाही. कुणिहि भारताला नावे ठेवली की ते खवळून उठतात. म्हणजे देशप्रेम, अस्मिता मोठ्या प्रमाणात वाढताहेत. त्याचीच गरज जास्त आहे. बाकी आपो आप येईल.

माझी भाषा, माझा देश या ऐवजी सर्व भारत माझाच, मी कुठेहि जाऊन राहीन, सर्वांना समजेल अशीच भाषा बोलीन असे वातावरण वाढले आहे. त्यालाच अखंड भारत म्हणायचे ना?

उगीचच पाश्चात्यांशी तुलना करण्यात अर्थ नाही. आपली संस्कृतीच वेगळी. आपण ती पाळूनच आपले जीवन जगले पाहिजे.

झक्की,
शरद जोशींनी शेतकरी चळवळीच्या जोमाच्या काळात म्हटले होते, की येथे इंडिया आणि भारत असे दोन देश नांदताहेत. मला ते पटतंय. तुम्ही म्हणता ती प्रगती इंडियाची झालीय. उमेश कोठीकर यांच्या 'हे स्वातंत्र्य देवते' या कवितेला मी कवितेनेच जो प्रतिसाद दिला तो येथील विषयाशी सुसंगत ठरेल म्हणून इथेही पोस्टवतो.

सैनिकही नसतील जितके लढाईवर गेले
तितके शेतकरी येथे नुस्ते जीव देत मेले

जुने मालक गेले अन नवे मालक आले
२५ कोटी गुलाम आता सव्वाशे कोटी झाले.

महिलांना पबमध्ये दारू पिऊंदेत खुशाल
जागोजागी खैरलांजी, तय्यार हाये मशाल

नऊ वर्षाच्या मुलीवर म्हणे बलात्कार झाला
ही तर कालची बातमी, जरा नवं काही बोला

कळलंच नाही स्वातंत्र्य कधी आलं गेलं
कुपोषणानं काल तिकडे नवं पोर मेलं

झेंड्याला सलाम कर! सांगताय खरं देवा
बाटली देतो म्हनालात ते ध्यानात मातुर ठेवा

स्वातंत्र्याचं मोल..? इथे पडलीये कुणाला?
आज देखिल यातील किती वाक्य तशीच लागू पडतात पहा (क्रांतीवीर चित्रपट- १९९४, शेवटचे दृष्य! नाना पाटेकर चे फेमस संवाद!):
http://www.youtube.com/watch?v=u-DNavQ5l9w&feature=related

संताप, दु:ख्ख, चीड, शरम, अशा अनेक भावना एकत्र उफाळून येतात.

२६/११, शेतकर्र्यांच्या आत्महत्त्या, पर्यावरणाबद्दल ऊदासीनता, प्रांत, भाषा, जात यात "बाटलेला" समाज, स्वहीत, मान, मरातब, बँक बॅलंस पलिकडे दुसरे काहीही न पाहणारी अंधांची स्पर्धा, आपलीच प्राचीन संस्कृती अन श्रध्धास्थानांची केलेली थट्टा, अन २१ व्या शतकात अजूनही अन्न, वस्त्र, निवारा, या मुलभूत गरजांचा अभाव, अन कीडा मुंगी इतकीही प्रत्त्येक माणसाच्या जीवाला नसलेली किम्मत........... यादी न संपणारी आहे!

आम्ही फक्त जगतोय.. आलो आणि गेलो, कुठे काय फरक पडणार आहे?

तेव्हा "मोल" कुणी कुणाचे कशाचे करायचे आधी हे ठरवायला आम्ही भारतीय आपसातच डोकेफोड करू (आम्ही त्यावरही एकमत होवू शकत नाही, हे आमच्या प्रखर बुध्धीमत्तेचं लक्षण समजावं) अन त्यातच संपू. चुकून (?) एखादे परकीय आक्रमण झालेच तर संपूर्ण कायापालट व्हायची शक्यता आहे पण तोपर्यंत, हे असेच.

ता.क: स्वातंत्र्यदीनाच्या मुहुर्तावर शाहरुख ला अमेरिकेत सुरक्षा तपासणीत चक्क दोन तास "ठेवले" (this news was made breaking news on our tv.. expect more Barkha Dutt BS debtae crap stuff to follow on this......... ) हा योगायोगच म्हणायचा. हा पहा त्यावरील उत्कृष्ट लेख. शेवटचा परिच्छेद पुरा बोलका आहे: (सलमान इतका सुशिक्षीत कधी पासून झाला म्हणे?)
http://blogs.timesofindia.indiatimes.com/onefortheroad/entry/don-t-make-...

शाहरुख खान आणि इतर बॉलिवुडियनानी ठरवले आहे म्हणे यापुढे ' स्टेट्स्'ला कद्धी म्हणून कद्धी जायचे नाही. आणि ते अमेरिकन प्रेसिडेण्टचे घरही उन्हात बांधायचे ठरवले आहे म्हणे. दाऊदच्या पार्ट्यात नाचणार्या माकडानी स्वाभिमानाच्या गोष्टी कराव्यात म्हणजे टू मच होतेय हां.....

खरच स्वातंत्र्याच मोल आपण जाणतो का?
--- दुर्देवाने नाही.

आज शाहरुखला तब्बल ६६ मिनटे थांबवल्याचा अपमान वाटला. या आधी आपले केंद्रिय रक्षा मंत्री त्यांच्या अमेरिका दौर्‍यात याच दिव्यातून गेलेले आहेत... फार कशाला काही आठवड्यांपुर्वी भारताच्या माजी राष्ट्रपतींना दिल्ली मधेच विमान प्रवासा आधी तपासाला सामोरे जावे लागले होते.

किती जणांना राष्ट्रगित पाठ आहे.( जरा थांबा मनातल्या मनात राष्ट्रगित म्हणुन बघा.)
---- भाग्यविधाता, अधिनायक हे जॉर्ज पाचव्यासाठी म्हटले आहे हे कितपत खरे आहे?

१९११ मधे ब्रिटनचा राजा जॉर्ज - पाचवा याचे भारतात आगमन होणे आणि सर्वात प्रथम हे गीत कलकत्ता अधिवषनात गायले जाणे (त्याच दिवशी राजाच्या आगमाना बद्दल स्वागत पर ठराव संम्मत झाला होता) हा दिवस एकच. त्यामुळे असा एक मतप्रवाह आहे की हे गीत टागोरांनी राजाच्या स्वागता साठीच लिहीले (म्हणुन भाग्य विधाता, अधिनायक हे शब्द) असावे. खरे काय आहे ?
http://en.wikipedia.org/wiki/Indian_National_Anthem

सगळ्यांच्याच उत्तम प्रतिक्रिया येत आहेत. धन्यवाद!

खरच स्वातंत्र्याच मोल आपण जाणतो का?

हा प्रश्न नकारार्थी मुळीच नाही. प्रत्येक गोष्टीचे फायदे- तोटे असतात. तसेच सद्उपयोग- गैर उपयोग होतात. तसेच काही स्वातंत्र्या बाबत आहे असे मला वाटते. म्हणुन हा प्रयत्न!

विप्रा- वो सुबह कभी तो आयेगी.>>>>> नक्कीच
झक्की, योगेश, योग, रॉबीनहुड, उदय, मर्‍हाटमोळी, विप्रा सर्वांचेच विचार महत्वाचे आहेत.

स्वातंत्र्याचे मोल जाणण्यासाठि आपल्य़ाला स्वातंत्र्य कसे मिळाले ह्याचा खरा इतिहास माहित पाहिजे, जो आपल्यापर्यंत आलेलाच नाहि, प्रथम त्याचा शोध महत्त्वाचा आहे, पण त्यासाठी तेवढा वेळ देण्याची तयारी आहे कुणाची?

खरे तर हा बी.बी. नित्यनियमाने पावसाळ्यात उगवणार्‍या .. प्रमाणे काही ठराविक दिवशी सुरु होणार्‍या बी.बी. सारखा वाटतो. असो पण त्या निमित्ताने ३-४ दिवसांपुर्वी गजालीवर कुणी मायबोली कराने पोस्ट्लेली एक कविता जी आता वाहुन गेली आहे. ती पुन्हा इथे post करतो. इथे ती वाहुन जाणार नाही.
***************
१५ ऑगस्ट ना..!
***************
१५ ऑगस्ट ना मित्रा.
आनंदाने भरून आलाय ऊर.
पण घरीच सुट्टी एन्जॉय करूया
झेंडावंदनाचं ठिकाण आहे दूर..

१५ ऑगस्ट ना मित्रा,
सांग भारतात स्टेट्स आहेत किती ?
असतील पंचवीस तीस.
आपल्याला स्टेट्स म्हणजे यु.एस. एवढंच माहिती..!

१५ ऑगस्ट ना मित्रा,
सांग वंदे मातरम कुणी बरं लिहिलंय ?
कुणी लिहिलंय ते ठाऊक नाही
पण ए. आर. रेहमानने काय गायलंय !
पण सोड ना हे प्रश्न
यांची आता काय गरज !
"कौन बनेगा करोडपती" संपून
झालेत बरेच दिवस !

१५ ऑगस्ट ना ,
मग आश्वासनं आणि स्वप्नं विका.
ठाऊक आहे उद्याच पडणार
त्यांचा रंग फ़िका..!

१५ ऑगस्ट ना ,
मग म्हण "विविधतेत एकता".
वर्षभर मग हवी तेवढी
चिखलफ़ेक करू शकता..!

१५ ऑगस्ट ना ,
"मेरा भारत महान" जगाला ओरडून सांग .
उद्या लावायचीय व्हिसासाठी,
अमेरिकन वकिलातीसमोर रांग.

१५ ऑगस्ट ना ,
चल इतिहास आणि संस्कृतीवरची धूळ एका दिवसापुरती झटकूया .
आणि चटावरच्या श्राद्धासारखे
सत्कार समारंभ उरकूया .
काळजी करू नकोस,
असंच करत करतच या देशाने गाठलीय साठी.
छापील भाषण मात्र जपून ठेव,
पुढच्या १५ ऑगस्ट्साठी..!

खरे तर हा बी.बी. नित्यनियमाने पावसाळ्यात उगवणार्‍या .. प्रमाणे काही ठराविक दिवशी सुरु होणार्‍या बी.बी. सारखा वाटतो. >>>>>>>>>>>>>

सतिष,
या विषया वरील बीबी अजुन कुठे असल्यास कळवावे. म्हणजेच तेव्हढीच ज्ञानात भर पडेल.

आणि ईतर काही फडतुस बीबी वाचुन आणि त्यावर त्यापेक्षाही फडतुस प्रतिक्रिया देणार्‍यांना हा बीबी पावसाळ्यात उगवणार्‍या... सारखाच वाटेल यात काडीची ही शंका नाही. परंतु १५ ऑगष्ट सारखे दिवस काही नुसते ऐंजॉयमेन्ट साठी नसतातच. त्या निमीत्त आत्मचिंतण व्हावे व त्यातुन झालेल्या चर्चेतुन आपण काही चांगल्या गोष्टी आचरणात आणु शकलो तर खरोखर स्वतःचा व देशात सुधारणा होऊन वाईट प्रवृतींचा नाश होऊ शकतो. परंतु ते ही काहींना बघवत नाही. म्हणुन घाण करण्याचे काम करतात. आणि मग ते लपविण्या साठी कोठुन तरी कॉपी- पेष्ट करुन देश प्रेम दाखविन्याचा किविलवाणा प्रयत्न करातात.

.

<<चांगल्या गोष्टी आचरणात आणु शकलो तर खरोखर स्वतःचा व देशात सुधारणा होऊन >>

पण आता आणखी सुधारणा होण्यासारखे काय आहे भारतात?

बहुतेक लोक श्रीमंत, हुषार झाले आहेत. अगदी मोलकरणी सुद्धा स्कूटरवरून हिंडतात, मोबाईल फोन वापरतात. बर्‍याच लोकांजवळ चारचाकी गाड्या आल्या. जवळपास सर्व लोक इंग्रजी बोलतात. मोठमोठी सिनेप्लेक्स, डिपार्टमेंट स्टोअर्स झाली आहेत. बॉलिवूड तर सर्व जगात प्रसिद्ध झाले. भारतीय सिनेमाला अनेक ऑस्कर्स मिळाली. सिनेमात चुंबन दृश्ये येऊ लागली. हिंदी सिनेमात इंग्रजी गाणी, इंग्रजी ट्यून्स येत आहेत. लोक अगदी अमेरिकन लोकांसारखे नाचतात. कमी कपड्यातल्या बायकांचे फोटो सर्रास इकडे तिकडे दिसू लागले आहेत. टेलिव्हिजनवर सा रे ग म, हिंदीतले, मराठीतले, मोठ्यांचे, लहान मुलांचे सगळे कार्यक्रम तुफान चालतात.

आमच्या वेळेला भारतात दारूबंदी होती. आता सर्वत्र हवी तेव्हढी दारू मिळते. अगदी रेव्ह पार्ट्या पण होतात.

इतके हल्ले झाले अतिरेकी लोकांचे, पण लोकांचे नेहेमीचे जीवन सुखात चालू आहे. उगाच इतर देशांसारखा सुरक्षिततेचा बाऊ नाही. क्रिकेट नि बॉलीवूड यांच्यात मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होते. इतक्या मोठ्या प्रमाणात की शेतकरी मंत्री सुद्धा त्यात भाग घेवू लागले. नट नट्या लोकसभेत, राजसभेत येऊ लागले.

लोकांनी जुनाट हिंदू धर्मातले संध्या, वटपौर्णिमा, उपवास इ. जुनाट प्रकार बंद केले. ब्राह्मणांच्या घरी सुद्धा राजरोस दारू नि मांसाहार होतो. गणपति उत्सव सुद्धा दारू पिऊन धिंगाणा घालण्यासाठी जास्त करून साजरा होतो, त्यात गणपतीचे काही महत्व नसते, ते सगळे जुनाट विचारांच्या लोकांचे काम. त्याला आता आधुनिक केले आहे.

बाकी सगळे, म्हणजे स्वच्छता, नियम, कायदा, सुरक्षितता वगैरे उगाच पाश्चात्यांचे फॅड आहे. आपली भारतीय संस्कृतीच उच्च आहे, फक्त ती जशी आहे तशी जुनाट पद्धतीने आचरण्यात आणण्यापेक्षा आपण त्याचे आधुनिकीकरण करत आहोत, नि त्यात आपण केव्हढी प्रगति केली आहे पहा ना!

जे भारताला नावे ठेवतात त्यांचाच दोष आहे, त्यांना मुळी समजतच नाही, महत्वाचे काय ते.

Happy Light 1

माझ्या मते फक्त पहिले कडवे राष्ट्रगीत म्हणून ठरवले होते.
बाकीचे आहे, पण ते राष्ट्रगीतात धरत नाहीत. कुणाला घटना माहित असेल तर सांगा.

ते सिन्धु नसून सिंध आहे. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. पण पुढ्च्या कडव्यांत कुठे सिंधु नदीचा उल्लेख आहे का?

झक्की,
तुमची तिरझे तिर खरच आवडलेत. उपदेश करणार्‍या वक्त्यापेक्षा / लेखकापेक्षा चिमटे काढणारा वक्त्या / लेखका चे बोल लोकांना लवकर पटतात. त्यावर थोडी चर्चा म्हणुन-
सुखवस्तुचा वापर म्हणजे सुखी का? मग अंबानी बंधु का भांडतात. काही कमी पडले का त्यांना? सुखवस्तुचा वापर करुन कोणी स्वतःला सुखी समजत असेल, असे नाही मला वाटत. माणसाने हे मिळवुन किंवा मिळवण्यासाठी स्वतःचे स्वास्थ्य घालवले. त्याला कुंटुबियाना साठी बोलायला वेळ नाही या धावपळी च्या जिवनात. परदेशात जाऊन प्रगती करणार्‍यानी स्वतःचे आई वडील सोडले, नातेवाईक विसरले खरच ते सुखी झाले का?
सिनेमातील जिवन पध्दती म्हणजे स्वातंत्र्य का?
अगदी रेव्ह पार्ट्या पण होतात.>>>> म्हणजे स्वातंत्र्य का?
आपली भारतीय संस्कृतीच उच्च आहे, फक्त ती जशी आहे तशी जुनाट पद्धतीने आचरण्यात आणण्यापेक्षा आपण त्याचे आधुनिकीकरण करत आहोत, नि त्यात आपण केव्हढी प्रगति केली आहे पहा ना! >>>>
हेच आपल्या स्वातंत्राचे फलीत? स्वातंत्र नावावर आपला स्वैराचार हेच तुम्हाला दर्शवायचे आहे ना?
म्हणुनच ही चर्चा होणे गरजेचे आहे. ही चर्चा म्हणजे<< हा बी.बी. नित्यनियमाने पावसाळ्यात उगवणार्‍या .. प्रमाणे काही ठराविक दिवशी सुरु होणार्‍या बी.बी. सारखा असे ही काहींना वाटते.परंतु अशा आपल्या जिवनशैली मुळे आपण आपल्या जिवनावर सुखवस्तु व पाश्चात्य कल्चर यांना हावी करुन घेतल आहे. ही सुध्दा एक प्रकारची गुलामगिरी नव्हे तर काय?

तसेच स्वातंत्र्याचा गैरअर्थ काढुन आज अतिरेकी / नक्षलवाद्यानी उच्छाद मांडलाय. आधी खलिस्थान आणि आता स्वतंत्र काश्मिर आणि नक्षली राज्ये.

स्वातंत्र्याचा नावाखाली प्रत्येकाने स्वत:चा स्वार्थच साधन्याचा प्रयत्न चालवलाय.

>>>>> खरच स्वातंत्र्याच मोल आपण जाणतो का?
नाही!
ठामपणे नाही!
अन कोणीच जाणत नाही! वेळेस माझ्यासहित!
मूळात "स्वातन्त्र्य म्हणजे काय" कशा कशाचे स्वातन्त्र्य, कुणापासून आदी अनेक प्रश्न आम्हाला पडतच नाहीत! आडातच नाही तर पोहोर्‍यात कुठून येणार?
स्वातन्त्र्याच्या कल्पनेबाबत आम्ही ठाऽऽर अडाणी आहोत असे माझे मत
स्वातन्त्र्य काय अस्ते, कशाशी खातात अन ते टिकवायचे-जोपासायचे कसे याबाबत आम्ही पुर्णतः अनभिज्ञ आहोत!
बरेचदा आम्ही व्यक्तिस्वातन्त्र्यातच वहात गेलेलो अस्तो
पन्धरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी आम्हाला देशाच्या स्वातन्त्र्याची आठवण होते पण ती तेवढ्यापुरतीच, सामुहीक जबाबदारी घेण्याआड आमचे व्यक्तिस्वातन्त्र्य येते!
कृति स्वातन्त्र्याच्या आमच्या कल्पना सम्प/मोर्चे/बन्द इतपतच मर्यादित रहातात.
सरकारी अनुदाने अन खिरापती यात आम्ही आमच्या स्वातन्त्र्याचा परमोच्च आनन्द साजरा करतो अन सरकारी सवलती/अनुदाने/खिरापती मिळाली नाहीत तर आणि तरच आमचा जीव तगमगतो.

वरील प्रत्येक वाक्यागणिक शेकड्यान्नी उदाहरणे लिहिता येतिल, विस्तारभयास्तव आज इतकेच! Happy
आम्हाला स्वातन्त्र्याची अक्कल नाही हेच खरे! Happy