महाराष्ट्र मंडळ लॉस एंजल्स यांच्यातर्फे दिवाळी अंक विक्री

महाराष्ट्र मंडळ लॉस एंजल्स आणि मायबोली.कॉम यानी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

diwali_ank2008.jpg
अंकविक्रीच्या फायद्याचा काही भाग लॉस एंजल्स महाराष्ट्र मंडळाला मिळणार आहे.

वाचकांना अंकाची निवड करणे सोपे जावे म्हणून पूर्वनियोजित संच आणि जास्त निवडीसाठी सुटे संच अशा दोन्ही पद्धतीने अंक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उपलब्ध संच आणि सुटे अंक यांचे हवे तसे एकत्रीकरणही करण्याचीही सुविधा आहे. तुम्ही विकत घेतलेल्या अंकांच्या संख्येप्रमाणे विशेष सवलतही उपलब्ध आहे.

३ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत १३.५% सूट

६ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत २२.५% सूट

१६ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत ३०% सूट

या early bird सवलतीची मुदत २१ ऑक्टोबर, २००८ पर्यंत वाढवली आहे.

अधिक माहितीसाठी या दुव्यावर (link) जा.
१. अंकांची किंमत अमेरिकन डॉलर्समधे असली तरी भारताबाहेर कुठुनही मागणी नोंदवता येईल.
२. अंक पुण्याहून एअरमेल ने पाठवले जातील. त्याचा पोस्टेजखर्च वेगळा नाही. जगभर कुठेही त्याच किमतींत अंक उपलब्ध आहेत. एअरमेल व्यतिरिक्त अधिक जलद अंक हवे असतील (कुरीअर) तर जास्त आकार पडेल.

विषय: 
प्रकार: 
प्रांत/गाव: