कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळ यांच्यातर्फे दिवाळी अंक विक्री

कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळ आणि मायबोली.कॉम यानी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

ctmm.jpg
diwali_ank_2011.jpg

अंकविक्रीच्या फायद्याचा काही भाग कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळाला मिळणार आहे.

वाचकांना अंकाची निवड करणे सोपे जावे म्हणून पूर्वनियोजित संच आणि जास्त निवडीसाठी सुटे संच अशा दोन्ही पद्धतीने अंक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उपलब्ध संच आणि सुटे अंक यांचे हवे तसे एकत्रीकरणही करण्याचीही सुविधा आहे. तुम्ही विकत घेतलेल्या अंकांच्या संख्येप्रमाणे विशेष सवलतही उपलब्ध आहे.

३ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत ९% सूट

६ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत १८ % सूट

१६ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत २७ % सूट

अधिक माहिती
१. अंकांची किंमत अमेरिकन डॉलर्समधे असली तरी भारताबाहेर कुठुनही मागणी नोंदवता येईल. तसेच भारतातूनही हे अंक मागवता येतील. भारतातल्या डिलीव्हरीसाठी खास सवलत. तुमचा भारतातला पत्ता नोंदवला की ही सवलत दिसेल.
२. अंक पुण्याहून एअरमेल ने पाठवले जातील. त्याचा पोस्टेजखर्च वेगळा नाही. जगभर कुठेही त्याच किमतींत अंक उपलब्ध आहेत. एअरमेल व्यतिरिक्त अधिक जलद अंक हवे असतील (कुरीअर) तर जास्त आकार पडेल.
३. अंकांच्या संख्येप्रमाणे आणि जसे ते प्रकाशित होतात त्याप्रमाणे अंक वेगवेगळ्या संचात पाठवले जातील. सगळे अंक एकत्र येतीलच असे नाही.
४. आजकाल बरेच अंक हे दिवाळीच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रकाशित होत नसल्यामुळे अंक दिवाळीनंतरच पाठवले जातील. अंक पाठवल्यापासून ३-४ आठवड्यात तुमच्या घरी पोहोचतील.

--> या दुव्यावर खरेदीकरता जा

Buy Diwali Ank Online

Buy 3 or more ank and get a discount of 9% over regular price.

Buy 6 or more ank and get a discount of 18% over regular price.

Buy 2 or more predefined sets and get 18% discount off regular price.

Buy 16 or more ank and get a discount of 27% over regular price.

प्रकार: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: