लव्ह यु~~

Submitted by ऋयाम on 25 October, 2010 - 11:09

"अरे.. मला निघायला हवं.. ", तो म्हटला.
"अरे! थांब की. जाशील सकाळी." आम्ही.
"नाही रे... खरंच जायला हवं.."
"अरे, काय एवढं त्यात? उद्या सकाळी बोल की. उद्याही सुट्टीच आहे ना? रविवार सकाळ मस्तपैकी!! म्हणुन सांगतोय, आत्ता फोन करुन सांग.. 'मित्रांबरोबर आहे. उद्या सकाळी बोलुया निवांत..' "
"नाही रे, चिडेल."
"पण म्हणजे तु... तु असा पिक्चर अर्धवट सोडुन जाणार? इतक्या वर्षांची ही परंपरा.. सगळं सगळं तोडुन मोडुन जाणार?? " कोणीतरी डोळ्यात पाणी आणत.... "त्या करिश्मेला आणि रविनेला दुष्ट क्राईममास्टर गोगोनं पळवुन नेलंय. आणि त्यांच्या सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नाहीये आणि तु?? तु आम्हाला मधेच सोडुन निघालाय्स?"
"ती चिडेल रे..."
"हे बघ..... तु जा. तुला कोणीही अडवणार नाही. पण तु माझं ते वाक्य आठव... " मी म्हटलं.
"कोणतं?"
"आठव ते वाक्य. 'हे दिवस..' "
"हो हो.. आठवलं. 'हे दिवस परत येणार नाहीत..'
"नुसतं वाक्य आठवुन काही होणार नाही. त्यावर विचार कर.."..........
.... त्यानं माझ्याकडं बघितलं.. मग उरलेल्यांकडं बघितलं.
"बर!" तो म्हटला. आलोच फोन करुन २ मिनिटात.. पॉज करुन ठेवा!
आम्ही टाळ्या दिल्या! शिट्ट्या वाजवल्या! त्याची वाट बघत लोळत राहिलो...
२ मिनिटात तो आला. पिक्चर चालु झाला. गळ्यात गळे घालुन आम्ही पिक्चर बघु लागलो..
करिश्मेला आणि रविनेला क्राईम मास्टर गोगोच्या दुष्ट तावडीतुन सोडवुन हिरोंनी बाजी मारली. दोघीही 'खान'दानी इष्टवर मिळवुन, वर इष्टेट मिळवुन आपापल्या घरी निघाल्या आणि पिक्चर संपला.
"चला. मी निघतो." तो.
"अरे? रहा की.. सकाळी जा..."
"नाही. ती चिडेल रे..."
"अरे मगाशी फोनवर सांगितलंस ना? परत काय तेच? मगाशी काय सांगितलंस? "
" सांगितलं की जेवण व्हायचंय, जेवुन घरी येतो आणि बोलतो. चला, बाय.. " आणि तो निघुन गेला. आम्ही बघतच राहिलो...

******************************************

"लग्नानंतर सगळ्या मित्रांचं असंच होतं. पण माझं नाही होणार " काही दिवसांपुर्वी 'तो'च म्हणत होता, "म्हणजे आपला तो 'हा..' अरे काय तो बायकोशिवाय कुठे जातच नाही?! कंपनीमधे असतो तेवढा वेळच काय तो एकटा. बाकी सगळीकडे दोघं. त्या ओरकुट आणि फेसबुक प्रोफाईलवरही आपापला फोटो लावावा की नाही? तिथेही दोघांचे फोटो. म्हणजे आम्हाला कसं कळणार? यांपैकी नक्की कोण ऑनलाईन आहे??
परवा पोपट झाला रे... मी काहीतरी आपलं आचरट बोललो आणि तिकडुन -->
" 'इइ.. अरे मी 'ती' बोलतीये... 'तो' आंघोळीला गेलाय..' तो लॉगाऊट न करता गेला म्हणुन मी वापरतीये...
थांब लॉगाऊट करते आणि मग कंटीन्यु करु. म्हणजे, कंटीन्यु नको करायला... चल... बा~य.. "
..."बघ! तु असा नको होऊस." आम्ही म्हटलं होतं त्याला.
"नाही रे. माझं नाही होणार.." तो.
"आपण 'ह्याला' कसं 'बॅक टु नॉर्मल' आणायचं?" मी म्हटलं होतं, "एकदा आणुया आपल्या इथं आणि बुकलुन काढुया. म्हणजे परत 'माणसात' येईल."
"अरे. आपल्या इथे यायला तो मर्द कुठे राहिलाय आता? एकटा येईल तर खरा ना??!! बायकोशिवाय कुठेच जात नाही 'हा' ... " तो म्हटला होता आणि आम्ही सगळे हसुन हसुन लोळलो होतो.

******************************************

काल रात्री मी फेसबुकावर काहीतरी स्टेटस मेसेज टाकला: -
"काहीतरी फारच निरर्थक मेसेज होता..."
एक मिंटात अपडेट : - 'तो' लाईक्स युअर स्टेटस! थम्सप!
क्षणात दुसरी अपडेट : - 'तो' ची 'ती' लाईक्स युअर स्टेटस! थम्सप!
आणि माझा ताबा सुटला.
डायरेक्ट फोन उचलला. 'त्याचा' नंबर फिरवला, "अरे ए... त्या 'ह्याला' शिव्या घालत होतास आणि हे काय चालवलयस? आठवडा झाला फिरकला नाहीयेस. एक फोन पण नाही! आणि फेसबुकावर पण काय मुहुर्त लावुन बसता दोघं? मग 'एक दोन तीन' करुन 'स्टेटस लाईक' करता? छ्या..... तुझ्याकडुन ही अपेक्षा नव्हती रे.. " मी.
"अरे नाही. मुद्दाम ठरवुन नाही.. ते आपोआपच...", तो. "मीही तोच विचार करतोय की दोघांच्या मनात एकाच वेळी एकच विचार कसा काय..."
"प्लीज... आता काही बोलु नकोस...", मी. "आणि फोनचं काय? झालाय ना करुन? "
"हो हो. आजकाल रोज रात्री रिपोर्टिंग असतं. " तो. "न चुकता.."
"बर बर.."
"छान बोलायचं रोज. मस्त वाटतं.. सवयच लागलीये आता..." तो.
"रोज बोलतोस? किती मिनिटं? "
"३ तास." तो.
"माझाच चेहेरा बघण्यासारखा झाला. "काय बोलता एवढं?" मी.
"काही नाही रे असंच जनरल.."
"आईच्या फोनवर सव्वा मिनीट बोलत नाहीस तो..'
"तिचं वेगळं पडतं रे... ती नुसतं विचारते 'जेवलास का?'"
"आणि 'ती' ? "
"असतात आमचे बरेच वेगवेगळे विषय असतात. पण ते सोड.." तो.
"बर बर.." सावरत मी म्हटलं, "आता आज जेवायचं काय? मॅक? "
"नको. ती म्हटलीये हेल्दी खात जा.."
"बर. मग गवत?"
"अरे वा! मस्त जोक मारलास." तो. "ऐक, असं कर. १५ मिनीटांनी भेटुया.. तुमच्या घराजवळ येतो. ओके? "
"बर ये. वाट पाहतो... बाय बाय... " मी म्हटलं.
अगं आई गं! अजुन आठवतंय, 'त्यानं' फोन ठेवला आणि ठेवता ठेवता म्हटला, "ओके. बाय बाय, लव्ह यु~~"

* सत्यकथेवर आधारित.
* दोन्ही भाब्यांनो... माफ करा हो~~ m__( )__m घरात घ्या कधी आलो तर Wink

गुलमोहर: 

Lol मस्त!

शुद्धलेखन सुधारायला हवंय.. ह्या लेखातले बरेच 'उ'कार दीर्घ हवेत>>>> आता मंजूडी म्हणालीये म्हणून मी चुका काढत नाही. Wink
तुझी इथे लिहून स्वतःला बजावायची प्रॅक्टिस चालू आहे वाटतं? Wink

मंजूडी, सायो,
आभार सांगितल्याबद्दल. Happy तू, करू, बघू वगैरे ना? करतो दुरुस्त.

धन्यवाद सर्वांना! आभार वाचल्याबद्दल!

@ऋयाम.

Pages