वृत्तांत : बारा-फिली ए वे ए ठि - २५ सप्टेंबर २०१०

Submitted by वैद्यबुवा on 28 September, 2010 - 09:31

माझी तर एवेएठि च्या आधी पासून तारंबळ ऊडाली होती. झक्कींची खास योजना होती २५ तारखेला बारा हून फिली ला जाताना वाटेत सुमा फुड्स मधून उकडीचे मोदक घ्यायचे. मुख्य म्हणजे कोणी विचारलं तर त्यांना " फचिन आणि टण्या ह्यांच्याकरता मुली सांगून आल्या आहेत आणि त्यांना भेटून आपण पुढे प्रस्थान करणार आहोत" असं ते सांगणार होते. कोणाला आजिबात काहीच सांगू नका असा दम पण भरला मला. आता घ्या! मी आपलं ह्या कार्यक्रमामुळे उशीर होईल म्हणुन हळूच पोस्टींमधून , जरा लवकरच निघूयात का असं आडून आडून सुचवत होतो.
नंतर एकदा सगळी बाराकर मंडळी गाडीत बसल्यावर, झक्कींएवजी विकुंनी सॉल्लिड बॅटिंग केली. विकुंची खासियत म्हणजे अगदी गंभीर चेहर्यानी ते प्रचंड विनोदी बोलतात, त्यामुळे आणखीनच हसायला येतं. त्यांनी केलेलं मैत्रेयी च्या ड्रायविंगचे वर्णन ऐकून तर मी खाली आडवा पडायचा बाकी राहिलो.
"अहो, मी असा हार्ट अटॅक यायचा बाकी राहिलो बघा!", " असे आम्ही सिग्नल ला असताना गाडी उजवीकडे होती आणि सिग्नल पडल्यावर एकदम अशी गाडी डावीकडे घेऊन टाकली त्यांनी"
"ती रस्त्याच्या पिवळी लाईन म्हणजे, उगाच काहीतरी आपली मारून ठेवली आहे असं त्यांना वाटतं"
मुख्य म्हणजे मैत्रेयी स्वतःच त्यांच्या ह्या सगळ्या वक्तव्यावर फुल्ल टू हसत होती.
गाडीत बसल्या बसल्या मला पहिला प्रश्न " तुम्ही ड्रायविंग नीट येतं म्हणुन करता की उगाच आपलं गंमत म्हणुन आज व्हॅन वगैरे चालवायला घेतेलीये?"
मी म्हंटलं अहो तसा पुष्कळ आहे ड्रायविंगचा अनुभव मला तर म्हणतात " आमच्या जीवाशी खेळ करु नका कृपया" अगदी गंभीरपणे. मी त्याना आश्वासन दिलं की माझ्या मायबोलीवरच्या पोस्टी बघून तुम्ही माझ्या ड्रायविंग बद्दल निष्कर्ष काढू नका, तुम्हाला नीट घेऊन जाईन मी.
मग गॅस(पेट्रोल) भरायला थांबलो तेव्हा, गाडीच्या मागच्या चाकातली हवा एकदमच कमी आहे असं गॅस अटेंडंटानी निर्देशनास आणून दिलं. मी ही बातमी जाहीर केल्यावर सरवात मागच्या शिटावर बसलेल्या सगळ्या महिलांना (स्वाती, मैत्रेयी आणि सायो) मी त्यांना उद्देशून मुद्दामच हे म्हणतोय असं वाटलं. पण परत एकदा आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्या स्वतःच "सगळेच टायरं चेक करुन घ्या", " तरी मेलं आज कमी खाललं", " आता इथून पुढे कशी काय जायची ही गाडी" असा कल्लोळ सुरु केला आणि हसुन हसुन पुरेवाट झाली.
मला बाकी डायवर माणसाला पार भंडावून सोडलं सगळ्यांनी एक एक सुचना देऊन. गाडीत पण शोनूचं घर येऊस्तोवर यथेच्य चेष्टा, मस्करी सुरु होती. तीचं घर यायच्या आधी वॅली फोर्ज नावाच्या एका सुंदर पार्कातून जावे लागते. कंट्री साईड इतकी सुंदर होती की स्वातीनी शंका बोलून दाखवली की शोनू "आमिष" आहे की काय, गुलदस्त्यात?" पण मग सगळ्यांचे एकमत ती आमिष नसून "सामिष" आहे असं झालं. पुढे थोड्याच अंतरवर आम्ही एक वळण घेतलं आणि गराज सेल असलेल्या घरासमोर येऊन उभं राहिलो. तिथे बर्याच अमेरिकन लोकांची गर्दी बघून " मायबोली वर बर्याच अभारतीय अमेरिकन लोकांनी सुद्धा खुप आयड्या घेतल्यात असाव्यात" अशी शंका काढत गाडीतून उतरायच्या बेतात असतानाच ते घर तिचं नाही असं कोणाच्या तरी लक्षात आलं.

शोनू कडे आम्ही सरवात उशीरा पोहोचलो! दारात स्वागताला "मृ" उभी ठाकली होती. आता गेल्यावर नितीन, रॉणी, असाम्या आणि मुख्य म्हणजे "अमृता-किरण" दिसले. परवा रात्री पर्यंत दुख्खाच्या निळ्या बाहुल्या टाकत एवेएठि ला यायला जमणार नाही ह्याचा शोक करत अमृता इथे पोस्टी डकवत होती, तेव्हाच अंदाज आला होता की हे येतील बहुतेक. मग एकदाचा टण्या दिसला! आधी पाहिलेल्या फोटोंपेक्षा खुपच वेगळा, जास्त सुढृढ वाटला. मै म्हणते तशी मिशी चिकटवल्या सारखी वाटत होती. थोडक्यात "कारा" वगैरे न वाटता, अपनी धून मे मस्त माणूस वाटला.
तिकडे किचनात जोरदार तयारी सुरु असल्याची दिसत होती, शोनू, लालू ह्यांचे मासे फ्राय करणे सुरु होते. थोडं इकडे तिकडे गप्पा होत असताना, ग्रिंच म्हणजे श्री शोनूनी आम्हाला बार ची वाट दाखवली. किंगफिशर, सॅरनॅकचा पहिला राऊंड झाला. श्री (श्री शोनू) नी भाईंना सरप्राईज देत शिद्धी सिंगल मॉल्ट "ग्लेनफिडीच" काढली तेव्हा भाईंच्या डोळ्यातले आर्त भाव मी ह्या माझ्या ढापण्या डोळ्यांनी पाहिले अन मी पावन झालो. बारा च्या बशीचा मी एकलाच डायवर असल्यामुळे मला ते पेय लांबूनच बघावं लागलं. दुखः अनावर होऊन मी घरात असलेल्या डझनभर बाथ्रुमांपैकी एका मध्ये घुसून रडून घेतलं. पुढे असं बाथरुम सापडुन रडायची वेळ बर्याच लोकांवर का आली हे आता हळू हळू कळेलच.

गप्पांचा नुसता धो धो पाऊस सुरु होता. जेवणाच्या आधीच इतकं खाणं झालं की काय विचारू नका. मग शोनूची बाग बघायला सगळी फौज निघाली. दाराच्या बाहेरच कुठल्याशा छान झाडाची फुलं फुकट आहेत (शोनू बिचारी चांगली आहे) तोडून भाई आणि अजून कोणी तरी खिशात घातले. हे डिसीकर आणि फिलीकर लोकांची घरं म्हणजे आम्हा जर्शीकरांकरता "जहां दूर तक नजर जाती है वहां तक का सारा इलाका हमारा है" अशीच वाटतात. झालं, पुढची गप्पांची मैफिल तिथेच बागेतल्या गवतावरच जमली. तिथे ही आयड्यांपासून ते माबो वरच्या एकेक भन्नाट कथांबद्दल गप्पांच्या फैरी झडल्या. झक्की आणि नितीन नी त्यांना मिळालेल्या ट्रॅफिक तिकीटांच्या गमतीदार किस्से सांगितले.
टण्यावर १७व्यांदा तो मेट्रन असल्याचा आळ घेतला गेला आणि शेवटी एक मेट्रन टण्या आणि एक मेट्रन सिंड्रेला आहे अशी मांडवली करणेत आली. अजून बर्याच चर्चा झाल्या. एका गमतीदार कथे बद्दल चर्चा सुरु असताना झक्कींनी पुर्ण विषय जाणून घेता "त्यात काय, मी सुद्धा सायकल वर टांग मारुन टेकडीवर जायचो...." अशी सुरवात केली आणि मग पुढे अशीच विधानं अनावधानाने करत ते पांढ्र्या शाईत किती खोलवर बुडाले होते ह्याचा त्यांना आजिबात अंदाज नव्हता. आमची मात्र हसता हसता पुरेवाट होत होती. ह्या सत्रात झक्की आणि नितीन (श्री रुनी पॉटर)नी जोरदार बॅटिंग केली. असाम्या आडवा तिडवा बॅटिंग जरी करत नसला तरी खुपच उतकृष्ट शीट अँकर आहे असे मी नमुद करु ईच्छितो. कुठलीही चर्चा असो तो सिंगल, डबल, मधेच एखादा रिवर्स स्वीप चौकार असं करत ती पुढे नेण्यात पटाईत आहे. त्याचं हे कौशल्य
वाढीस लागून बहरायचे कारण त्याचा स्वतःचा मायबोलीचा प्रचंड अभ्यास आहे की हवा हवाई शी त्याची मैत्री ह्याचा सुगावा अद्याप कोणाला लागलेला नाही. एका वाक्यात टोले हाणायला द इनफेमस फळ्ळी पटाईत आहेच पण मृ नी मात्र तलवार अगदी म्यानच केल्याचे भासत होते. तिनी बॅटिंग न करता ह्या वेळी प्रेक्षक बनून बाकीच्यांच्या बॅटिंगचा आनंद पुरेपूर लुटायचं ठरवलं होतं बहुतेक. मैत्रेयी नॉन स्टॉप एक एक भन्नाट कथा आणि आयड्यांचे विषय एकदम शिताफीने काढत चर्चा एकदम फ्रेश ठेवत होती, मदतीला सायो, सिंड्रेला, अमृता आणि पन्ना होत्याच. ह्या सगळ्या आक्कांचा मायबोलीचा अभ्यास प्रचंड आहे! ३-३, ४-४ वर्षांपुर्वी येऊन गेलेल्या कथा आणि आयड्यांची नावं त्यांची खासियत वगैरे त्या क्षणाचा विलंब न करता धडधडा सांगतात. गवतावर बसून सुद्धा एक किंगफिशरचा राऊंड झाला पण बारा बशीकर आक्कांनी लगेच डोळे गरागरा फिरवत "कितवी हो बुवा ही" असे टोले हाणत, गिल्टी फिलींग देत माझ्या बियरचं पार गोमुत्र करुन टाकलं.
येवढी बडबड करुन सगळ्यांना परत भुका लागल्या आणि मोर्चा परत घराकडे निघाला.
जेवणाची तर बहार होती अक्षरशः परत तुडूंब खाललं. मला तर सगळं खाऊन बघता नाही आलं पण तरी बिर्यानी, चिंबोर्या, भेद्राचं लोणचं, फ्राय मासे, उकडीचे मोदक (तुप टाकून) आणि श्रीखंड (पाव किलो तरी) खाललं! जेवता जेवता माझा कंपू वेगळा झाला. मी आपलं विकु, फचिन आणि नितीन जवळ सोफ्यांवर जाऊन बसलो तर तिथे विकु, फचिनला डुक्करांच्या फ्युचर्स बद्दल समजून सांगत होते. मी ही मग थोडे धडे घेतले. जेवताना तिकडे गॅस शेगडी पाशी साहित्यिक चर्चेला उधाण आलं होतं, टण्या, बाई (स्वाती), लालू, शोनू मुद्दे मांडत होते, बाकी सगळे ऐकत होते. मी आणि नितीन (दोघं डायव्र मानसं) एका कोपर्यात चिंबोर्या लढवत ... आपलं खात होतो.

जेवणं झाली, सगळे मस्त दिवाणखान्यात विसावले अन गाण्याचा कार्यक्रम सुरु झाला. बाईंनी बरीच गाणी म्हंटली, मुख्य म्हणजे त्यांच्या आवडत्या चाचांचे "नेणा ठग लेंगे" म्हंट्ल्या. पबलीक चेष्टे मध्ये " आता झक्की विचारतील की ह्या नैना कोण आहेत" असं म्हणत असतानाच इतका वेळ अगदी शांत बसलेला किरण उत्तरला " त्या नैना म्हणजे ज्यांचे लेंगे ठगले गेले आहेत त्या" अन जो हशा पिकला!! अबाबाबाबा.... इथेच पहिल्यांदा हमसाहमशी कसं हसतात ह्याचा प्रत्यय सगळ्यांना आणून देत मृ हसत सुटली. म्हणजे बघा, सगळे हसत असताना ती ही हसत होती पण आवाज आजिबात येत नव्हता! सगळे हसायचे थांबले आणि तिची इतका वेळ खाली असलेली मान वर करुन आभाळा कडे बघत तिनी इतका वेळ पोटात दर सेकंदाला मोठ्ठं होणार्‍या घोंघावत्या हास्याला वाट करुन दिली!!! पबलीक नुसतं हे बघुनच हसता हसता आडवं झालं. कुठून तरी माग " माझ्यातला/ली मी" कशी शोधावा/वी चा विषय निघाला आणि पन्नानी मोठ्ठी यादी वाचून दाखवली, नेमकं काय काय करावं लागतं आपला भुतकाळ सगळा आपल्या डोळ्यासमोर अस्सा चित्रपटा सारखा झळकण्याकरता ह्याची यादी. खुपच इमोशनल झाली ती हे सांगताना!
इकडे मी आणि असाम्या फुल्ल बुचकाळ्यात! ३-४ बियर किंवा एखादा कडक पेयाचा ग्लास घेतला तर आपलाच काय पण समोर आलेल्या कुठल्याही माणसाचा भुतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही एका झटक्यात झळकवू शकतो ह्याची तिला आजिबात कल्पना नाहीये ह्याच्यावर आमचं एकमत झालं (तसं आम्ही बोलून ही दाखवलं).
बाई, एकदम श्येंटर लाच बसल्या होत्या त्यामुळे नुसती फर्माईश आली की त्या गाणं म्हणत होत्या. शोनूच्या आईंकडून भजन किंवा भक्तीपर गाण्याची फर्माईश होताच ते पण सादर केलं गेलं आणि झक्कींना सुद्धा दाद दिल्याशिवाय राहवलं नाही. मी आणि फचिन नी पण पबलीक जरा सुस्तावलय बघून प्रत्येकी एक गाणी म्हणून घेतली. बुवा गातोय तर मला काय प्रश्न आहे असं म्हणुन फचिन पण स्वतःहून गाणं म्हणायला तयार झाला अशी माझी पक्की खात्री आहे.
ह्या वेळी नेमकं माझ्या गाण्याला लागता लागता, सायोचा डोळा फचिनच्या गाण्याला लागला. चला सुटलो!
एकदा फचिनचं आणि सिंड्रेलाचं भांडण होतय की काय असं वाटत होतं आणि सिंड्रेला एकदम उठून लालू आणि पन्ना समोर जाऊन अचानक , मायबोलीवरचं "को त बो" भाग तिच्या किती डोक्यात जातो हे तावातावानी सांगायला लागली. मला वाटलं "जुंपली वाटते" आणि कुठेही खुर्ची न सापडल्यामुळे मी बसलो होतो तो स्टुल काढून मध्यभागी ठेवला. नंतर कळलं की ती बहुतेक "वेंट" करत होती.
इथून पुढे चहाची सांगता झाली आणि कार्यक्रम आवरत आल्याच्या खुणा दिसायला लागल्या. Sad

मंडळींनी आपापल्याला हवं त्या खाद्य पदार्थाच्या पिशव्या बांधून घेतल्या. मायबोलीच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसा निमीत्त मस्त केक कापला गेला. अगदी पोत्यात गहु बसवायला कसं आपण पोतं गदागदा साईडनी हलवतो, तसं शरीर हलवून जागा करावी लागली पोटात, केक खाण्याकरता. घराच्या बाहेर येऊन मग गृप फोटो झाले. तिथेही धमाल सुरु होतीच. सगळी मंडळी गाडीत जाऊन बसूपर्यंत पण परत दंगा झाला. झक्कींना मान देण्याकरता सगळ्यात आधी गाडीत चढू दिले गेले खरं पण त्यांच्या मागच्या शीटावर जायला मधल्या सीट खालचे लिवर ओढून ते पाडावं लागतं. ते लिवर कोणी तरी ओढलं आणि बिचारे झक्की सीट चा भार पाठीवर पडुन बदक्क्न वाकले! हशा!!!
सगळे एकदाचे गाडीत बसले पण गाडी नेमकी उतारावर लावलेली होती आणि आता रिवर्स मध्ये चढ चढायचा होता. मी रिवर्स गियर टाकून गाडीचं गॅस पेडल एकदम तळाला टेकवलं तरी गाडी नुसती घों घों करत जागेवरच उभी! हे बघून नितीन आणि असाम्या गाडी पुढून ढकलायला लागले आणि मी ष्टेरिंग वर हापसे मारायला लागलो अन तिकडे मृ ची हास्य शिट्टी उडाली!! ह्यावेळेस इतकी जोरदार उडाली की ती डायरेक गवतावर बसूनच ओक्साबोक्शी हसायला लागली!
Rofl हा खरा किलायमॅक्स होता अख्ख्या कार्यक्रमाचा!!
विकुंनी बहुतेक माझ्या ड्रायविंगला टरकूनच फचिन बरोबर न्यु यॉर्क मार्गे घरी जातो असं म्हंटले. (ते जर्सीत राहतात तरी)
परतीच्या प्रवसात पण परत सगळ्याच विषयांची उजळणी दिली गेली. मैत्रेयी नी बोलता बोलता जाचक आणि खटकणार्‍या वाटणार्‍या आयड्या एका रात्रीत एकदम डोक्यावरुन पदर घेऊन वडाची पुजा वगैरे करायला कशा काय उतरतात ह्य बद्दल आश्चर्य व्यक्त केलं. असल्या आयड्या नक्की बायपोलर असतील असं म्हणुन सगळ्यांनी माना डोलवल्या खर्‍या पण नंतर तिनी जर्सीत दुर्गा मंदिरा जवळून गाडी जात असताना " आम्ही इथे नेहमीच येतो, अगदी नियमीतपणे" असं म्हणुन सगळ्यांना धक्काच दिला Uhoh . मैत्रेयी गुलदस्त्यात बायपोलर आहे की काय अशी शंका बाकी सगळ्यांच्या डोक्यात चमकून गेली. सरतेशेवटी पुढचं गटग कधी करायचं ह्याच्यावर चर्चा करुन आम्ही एक मेकांचा निरोप घेतला.
नेहमी सारखं हे पण गटग दणक्यात पार पडलं! शोनू आणि श्रीच्या आदरातिथ्याबद्द्ल काय बोलावं? डि सी गटग वृत्तांतात स्वातीनी लिहीलं होतं तेच मी परत लिहीन. अगदी घरचं कार्य असल्यासारखं ही मंडळी ए वे ए ठ्या पार पाडतात. निघताना अनन्यानी पण मला किंचीत हिरमुसलं होऊन " Why are you leaving? Do you have to go" विचारलं आणि तिच्या आई वडिलांनी तर आम्हाला भारवून टाकलं होतच पण तिनी एकदम खिशातच घातलं! Happy

गुलमोहर: 

बुवा लाजिवलंत.

सगळे मायबोलीकर उत्साहाने यायला तयार झाले, सगळ्यांनी किती काय काय प्रकार करून आणलेत. इथे आल्यावर सुद्धा वाढा काढायला मदत केलीत म्हणून कार्य संपन्न झाले!

बुवा तुम्ही मनातून चांगले लिहिले आहे कारण तुम्ही मनातून एक चांगले व्यक्ती असावात असा माझा अंदाज आहे.

अरे हे "बायपोलर" म्हणजे काय बुवा?
चान्गला लिहीलाय वृत्तान्त, नजरेसमोर (कधी न बघितलेल्या आयड्यान्चे देखिल) चित्र उभे रहाते आहे

बुवा छानच वृ! Lol

मै, दुर्गा मंदिरात तू नेहमी जागराला जातेस हे ऐकून तर तुझं मन फक्त सुंदरच नाही तर कित्ती निर्मळ आणी प्रेमळ आहे, ह्याचीच प्रचिती येते हो Wink

पन्ना Lol , माझी श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयावर आपल्याशी एकदा चर्चा करावयाची आहे, मला तुमचा मो नं द्या बै Happy

सर्वांचीच मनं किती सुंदर आहेत! मला भरून आलं आहे. मी गुपचुप रडून येते.
बुवा..... अरेच्चा! तुमचा नंबर आहेच माझ्याकडे! Proud

जोक्स अपार्ट, छान लिहिलाय वृत्तांत. Happy

मस्त वृत्तांत! अगदी डोळ्यांसमोर घडतंय एवेएठि असं वाटलं! Happy

Lol आयला प्रतिक्रियांमध्ये पण दंगा सुरु केलात!
जितकं आठवलं तितकं लिहीलं, आधी "समरी" मोड मधे होतो पण इतक्या गमतीदार गोष्टी राहिल्या असत्या म्हणुन सविस्तर लिहीलं. थोडं विस्कळीत आहे पण आता गोड मानून घ्या!
लिंब्या, बायपोलर डिसॉर्डर हा एक आजार आहे. गुगल मारून बघ.

लिंबु, एक सल्ला: थोडे दिवस माबोवर न येता आजाराबद्दल समजून घे. इथे कोणते आयडी त्यात बसणारे वाटतात ह्यावर खोल अभ्यास कर. Wink

मस्त वृत्तांत Happy मी फक्त अमृता आणि किरणला भेटलेय शिपा आणि वविला. बाकीचे लोक्स कधी देशात याल तेव्हा भेटायला आवडेल.

भारी वृत्तांत. बारा गटगचे ऑफिशिअल वृत्तांतकर होऊन जा तुम्ही आता.

थोडं कणखर खंबीर व्हा बायांनो. असं सारखं सारखं रडून कसं चालेल. Proud

बुवा, झकास लिहिलात हो वृत्तांत ! मजा आली.

तेवढं ते मृच्या हसण्याबद्दल डीटेलवार नसतं लिहिलं तरी चाललं असतं. इतके गडबडा लोळून हसणारे लोक मला कुकु वाटतात. Proud

Pages