आरश्यासमोर फोटो
फोटोत आरसा
आरश्यासमोर दुसरा आरसा
मग आरश्यात आरसा
आरश्यात फोटो
फोटोत आरसा... अनंत आरसे अनंत फोटो
'पोटापाण्यापलिकडे सध्या काय करतो?'
पोटापाण्यासाठी नाटक करणारा मित्र विचारतो.
कविता करतो
आणि फाडून खाऊन टाकतो
शाईमुळे चव चांगली लागते.
या ढंगाची असेल तर
दुपारच्या चहासोबत
त्या ढंगाची असेल तर
रात्री झोपायच्या आधी
कधी चांगली वाटलीच तर
तंबाखू गुंडाळायला
मी अशा पथ्याच्या वेळा पण सांगतो.
मग तो निघून जातो.
मग मलाच माझी लाज वाटते, अशा प्रिटेंशियस वागण्याबद्दल.
मग मी ही कविता पण फाडून टाकतो.
आणि नवी कविता लिहितो, ही कविता का फाडली ते लिहिण्यासाठी...
पुन्हा आरसा
आरश्यासमोर फोटो
फोटोत आरसा
आरश्यासमोर दुसरा आरसा
मग आरश्यात आरसा
आरश्यात फोटो
फोटोत आरसा... अनंत आरसे अनंत फोटो
एक दगड आरश्यावर एक दगड डोक्यावर!
बस्स!
मग आरसा फुटतो, डोकंही फुटतं.
मग फुटक्या डोक्यात.. फुटक्या काचा.... पुन्हा तेच....
गरगरतंय आता.. थांबवा कुणीतरी....
--
निखिल
जमलिये
जमलिये
गरगरतंय आता.. थांबवा
गरगरतंय आता.. थांबवा कुणीतरी....
अगदी योग्य.
चांगली व्यक्त झालेय..
चांगली व्यक्त झालेय..
(No subject)
गरगरतंय आता.. थांबवा
गरगरतंय आता.. थांबवा कुणीतरी...
उचंबळून येणार्या काव्यस्फूर्तीला आता उमासे?
मस्त
मस्त
निखिल, वा छान मस्त... इत्यादी
निखिल,
वा छान मस्त...
इत्यादी इत्यादी बुळबुळीत प्रतिक्रियांच्या पलिकडे आवडली.
अरूण कोलटकरांची आठवण येणं अपरीहार्य आहे.
>>'पोटापाण्यापलिकडे सध्या काय करतो?'
पोटापाण्यासाठी नाटक करणारा मित्र विचारतो.<<
यावर खूप हसले. खूप काही आठवलं.
कविता करून कागद फाडून खाण्याचे दिवस खरं यंजॉय करण्याचे दिवस रे...
कविता करतो आणि फाडून खाऊन
कविता करतो
आणि फाडून खाऊन टाकतो
शाईमुळे चव चांगली लागते.
छान! छान! छान!!!
सही रे दोस्त!!!!एकदम भारी!!!
सही रे दोस्त!!!!एकदम भारी!!!
निधप, अनुमोदन! निखिल, हाण
निधप, अनुमोदन!
निखिल,
हाण च्या मारी!
आरशा समोर कोण उभं र्हातंय कशाला?
अन् ज्यांना जमत नाय तेच शिकवतात..
थांबवा म्हटलं की दुसर्यालाच थांबवतात.
चलता है भिडू..
झक्कास कविता.
फाडायची, खायची, अन् पुन्हा ल्ह्यायची
मस्त, मस्त, मस्त.
तु नकोस थांबू मित्रा, येऊ दे अजुन कविता!
मग फुटक्या डोक्यात.. फुटक्या
मग फुटक्या डोक्यात.. फुटक्या काचा....
!!!
काय लोक्स खैरेला खणून काढताय
काय लोक्स खैरेला खणून काढताय काय?
आवडली.
आवडली.
नी, चांगल्या गोष्टी खणायलाच
नी, चांगल्या गोष्टी खणायलाच हव्यात!
आवडली.
छान कविता.
छान कविता.
मग फुटक्या डोक्यात.. फुटक्या
मग फुटक्या डोक्यात.. फुटक्या काचा....>>
हे आवडलं.
आवडली, कारण लागली.
आवडली, कारण लागली.
प्रतिक्रिया द्यायला योग्य धार
प्रतिक्रिया द्यायला योग्य धार असलेला कोणताच शब्द सापडत नाहिये.. आवडली हे सांगणे न लगे..
आगावाला अनुमोदन... ही लागली!
आगावाला अनुमोदन... ही लागली!