"रंगीबेरंगी" या विभागात नवीन पान कसे घ्यावे?

Submitted by मदत_समिती on 19 June, 2009 - 18:56

मायबोलीवरील "रंगीबेरंगी" या विभागात स्वतःचे पान नाममात्र वार्षिक शुल्क / वर्गणी भरून सदस्यांना घेता येते. या पानाद्वारे सदस्यांना स्वतःची हक्काची जागा मिळते जिथे ते वेगवेगळ्या प्रकारचे लेखन प्रकाशित करू शकतात. याची अप्रत्यक्षपणे मायबोलीवरील होतकरू व हौशी लेखकांनाही मदत होते.

रंगीबेरंगीवर नवीन पान विकत घेण्यासाठी सदस्यांनी इथे भेट द्यावी.

I want to be a member of 'रंगीबेरंगी' what is the procedure?

मदत समिती, आज मी रंगिबेरंगी पानाची खरेदी केली आहे.
इन्व्हॉईस आला आहे मला. रंगिबेरंगी पान वापरासाठी कधीपर्यंत उपलब्ध होईल सांगू शकाल का?

दक्षिणा, साधारण चार पाच दिवसात पान व्हावे तयार.
मी प्रशासकांना विचारून खात्रीशीर कालावधी कळवतो.

, मायबोली वर मी नवीन आहे, रंगीबेरंगी मधे पान का घ्यावे, त्यामुळे लेखकाचा काय फायदा आहे. माफी असावी पन मला सुरुवात करायची आहे. कुठुन करावी कळत नाही.

>>रंगीबेरंगी घेण्याचा नेमका फायदा काय? >> +१

लेखनाच्या हक्काबद्दल असू शकेल का हे पान?? म्हणजे खुल्या विभागात लिहिले तर माबोचा हक्क आणि पान विकत घेऊन लिहिले तर लेखकाचा असं आहे का?

मलाही याविषयी अजून माहिती हवी आहे.

मायबोली वर नवीन लेखन कसे करावे ? सदस्याच्या नावाखाली " नवीन लेखन करा " यावर टिचकी मारली , तर गुलमोहर च्या धाग्यांची यादीच फक्त दिसते. नवीन लेखन कसे करावे याबाबत सविस्तर कोणी लिहील काय व मला मार्गदर्शन करील काय ? मला वव्यनि केला तरी चालेल.

सोनेरी पहाट सोनेरी माती.... मंद वारा गुणगुणत जाई.....
अश्याच धुंद पहाटे.....हळूच पांघरावे धुके..........
दवबिंदू झेलतील शब्द.......आणि पान पान होईल मुके...........

छोटासा प्रयत्न...धन्यवाद

तुम्ही अजून कुठल्याही ग्रूपचे सभासद झाला नाहीत. https://www.maayboli.com/hitguj/index.html इथे ग्रूपची यादी आहे. त्यातल्या एखाद्या ग्रूपचे सभासद झालात तर त्या ग्रूपमधे लिहण्याचा पर्याय दिसू लागेल.

माझे रंगीबेरंगी पान होते. आहेही. तिथले लिखाण तसेच आहे पण मला आता रंगीबेरंगी मधे नवीन लेखन करता येत नाही.
याचे काही कारण आहे का? रंगीबेरंगी संबंधी नियम बदलले आहेत का?