सेंट्रल, वेस्टर्न आणि आपण

Submitted by nikhil_jv on 12 July, 2010 - 07:07

सकाळचे वाजले की मी घरुन ऑफिसला जाण्यासाठी निघतो. बरोबर ८.१५ मिनिटांनी मी पनवेल स्टेशनवर पोहोचतो. तेव्हा तिथे एक गाडी सुटण्याच्या तयारीत असते. आणि दुसरी गाडी येण्याच्या तयारीत. एंडिकेटरवर ८.२४ च्या सी. एस. टी लोकलची खूण...

थोडा अव़काश असल्यामुळे मी स्टेशनवर 'तिची' वाट पाहत असतो... घड्याळात ८.१७ मिनिटे होतात...बरोबर याच वेळेला तिचे आगमन होते...ती लांबुन दिसली की माझ्या चेहर्‍यावर हासु येत. पण ती हासत नाही..अजुन तशी ओळख नाही ना. बरोबर ठरल्यावेळत ८.२४ला गाडी सुटते..........मी कुर्ल्याला उतरतो तिला सी. एस. टीला जायचे असते.

९.१० मिनिटे कुर्ला स्टेशन....एंडीकेटरवर ९.१० मिनिटाच्या सी. एस. टी लोकलची खूण..मी उतरुन मेन लाईनच्या प्लॅटफार्म वर येतो......एंडीकेटर ९.०६ मिनिटाची सी.एस्.टी. लोकलची खूण असते...घड्याळ्यात ९.१५ झालेले असतात्..तेवढ्यावेळेत हार्बर लाईन वरुन एक गाडी जाऊन दुसर्‍या गाडीची अनाउंसमेन्ट चालु असते. घड्याळ्यात ९.२० होतात. तेव्हा ९.०६ मिनिटाच्या लोकलचे आगमन्..

९.३२ मिनिटे मी दादर स्टेशन...
९.२५ मिनिटांची गोरेगांव येण्याचे संकेत ऐकु येतात. त्या लोकलचा फायदा नाही म्हणून मी आरामात जातो..कारण ती लोकल अंधेरीला थांबत नाही..पुढे घड्याळ्यात ९.३६ मिनिटे होतात... तेव्हा ९.२८ मिनिटांच्या अंधेरी लोकलचे दादर स्टेशनवर आगमन. पुढे याच गाडीला अंधेरीजवळ सिग्नल ठरलेला...तिथे ती ७-८ मिनिटे तरी थांबणार्..बरोबर १०.०५ मिनिटांनी अंधेरी स्टेशन..

पुढे बसस्टॉपवर मी लेट आल्यामुळे सतत विचारणा. मी कारण देताच.."अरे तुझ्या 'तीच' रोजचेच असते" माझा समजावण्याचा केविलवाणा पयत्न त्यावर त्यांचे हसुन स्वागत..पण त्यांची मेजॉरीटी जास्त त्यामुळे माझी हार ठरलेली..

संभ्रमात पडलात????????
अहो 'ती' म्हणजे कोणी मुलगी नाही..'हार्बर लोकल' आहे.

लोक सतत तिला डागण्या देत असतात. पण मला आजतागायत हार्बर लाईन मुळे कधी उशीर झाला नाही..पण मेन लाईन आणि वेस्टर्न लाईनचे असे टाईमटेबल रोजच पहायला मिळते.
उलट हार्बर लाईनचा प्रवास सुसह्य वाटतो. नवी मुंबईतील मोठी आणि स्वच्छ स्टेशन्स्...प्लॅटफॉर्मवर दोन्ही बाजुला उतरण्याची सोय्..आणि तुलनेने कमी गर्दी..हार्बर लाईनच्या गाड्याही मला तुलनेने वेळेवर येताना दिसतात.
आता फास्ट लोकलचे कारण द्याल तर सिग्नल घेत घेत धावणार्‍या फास्ट लोकलपेक्षा विना अडथळा धावणारी स्लो लोकल चांगलीच की...तरीही लोकांना हार्बर लोकलची चीड का??? हे एक कोडेच आहे.
हार्बर लोकलचा प्रवास म्हणजे जणू दिव्यच्..असे वर्षानुवर्षे लोकांच्या मनात घर करुन बसले आहे. आणि लोकांनी त्याची धास्तीच घेतली आहे.

मी खूप वेळा असे पेपरमधे वाचतो. मुख्यत्वे पावसाळ्यात. 'वेस्टर्न लाईनच्या लोकल लेट आहेत्'..'मेन लाईनच्या लोकल रखडत रखडत चालल्या आहेत' आणि 'हार्बर लाईन तर कधीच कोलमडून पडली आहे'. पण मला ते कोलमडणे कसे दिसले नाही? किंवा दरवेळेला मी पोहोचल्यानंतरच ती कोलमडते का?? उलट पावसाळ्यात हार्बर लाईनच्या गाड्या मेन लाईन आणी वेस्टर्नलाईनच्या तुलनेत बर्‍यापैकी धावतात्..पण लोकांच्या मनात अस का कोरल जात ते मला अजुन कळलेल नाही..

मला टीका करायची नसुन हेच सांगायचे आहे की वेस्टर्न, मेन लाईन पेक्षा हार्बर लाईनचा प्रवास खूप सुसह्य आहे. पण असे असूनही हार्बर लाईनची थट्टा का होते ते मला कळत नाही म्हणूनच हा खटाटोप.

गुलमोहर: 

तुम्हाला किती दिवस झाले हो ..
हार्बर लाईन ने प्रवास करुन
१ किंवा २ महिनेच झालेत का?? आणी मुंबई मधे नवीन आहात का???

आताची सद्य परिस्थीती माहीत नाही हो..
पण मी नेरूळ मधे ४ वर्ष आणी टिळक नगर/ चेंबुर येथे १.५ वर्ष अशी काढ्ली आहेत
(२००२-२००७)
पावसाळ्यात सगळयात जास्त वैताग हार्बर लाईन नी दिला..

ह्म्म पण एक गोष्ट सगळ्यात छान होती हार्बर लाईन ची ती म्हणजे तुम्ही म्हणटल्या प्रमाणे
नवी मुंबई येथील स्टेशन्स.. आणी स्वछ ऊपहारग्रूहे

बाकी पुढील आयुष्यातील लोकल प्रवासासाठी शुभेछा Happy

किशोर१६८४,
सर्वप्रथम मी मुंबईचा असून..माझा जन्म इथेच झालाय.
मी गेली तीन वर्षे हार्बर लाईनने प्रवास करतोय्...
या ३ वर्षात मला हार्बर सेवेचा आलेख उंचावलेला आणि मेन आणि वेस्टर्नच्या सेवेचा आलेख खाली आलेला दिसला.
तुम्ही ज्या वर्षात प्रवास केला तेव्हाची स्थिती तशी होती हे मी देखील मान्य करतो. पण आता हार्बर लाईनने कात टाकलीये हेच मला सांगायचे होते.

पुण्यात येउन जरा पीएम्टी ने प्रवास करा मग तुम्हाला वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर सगळ्याच लायनी भारी आणि सगळ्याच लोकल्स एकदम वक्तशीर वाटायला लागतील Wink

निखिल, छान लिहिलेस...
हार्बरला सगळे शिव्या देतात याचे कारण खुप जुने आहे. हार्बर तेव्हा खरेच गचाळ होती. काही वर्षांपुर्वी सेंट्रल व वेस्टर्नचे सेवेतुन काढुन टाकलेले डब्बे हारबर्च्या नशिबी येत. मी १९९२ साली जेव्हा पहिल्यांदा हार्बरच्या गाडीत चढले तेव्हा मला 'सांस्कृतिक' धक्का बसला. इतकी गचाळ, कच-याने भरलेली, सगळ्या खिडक्यांच्या काचा आणि पॅनेल्स् फुटलेली गाडी मी वेस्टर्नवर कधीच पाहिली नव्हती. तेव्हा हार्बरचा मार्ग हा झोपडपट्टीतुन जात असे. गाडी जात असताना हात लांबवुन सहजपणे एखाद्या झोपडीतल्या किचनमधला पेला उचलता येईल असे वाटे आणि याला साजेसाच वेगही असे गाडीचा. झोपड्यांमधली मुले रांगत रांगत रुळांवर येत असे कित्येक मोटरमन्स मुलाखतीत सांगत, त्यांना ह्यामुळे बीपी, हार्टट्रबल व. त्रास होत असे.

पण हे आता खुप जुने झाले आहे. हार्बर गेल्या ६-८ वर्षात खुप सुधारली. रेल्वेलाईनच्या दोन्ही बाजुला कुंपण घातल्यामुळे झोपड्या खुप दुर गेल्या, गाडीचा स्पीड वाढला, चांगले डब्बे आले. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे गाड्या कायम वेळेवर आणि कधीकधी वेळेआधी असतात. माझी गाडी कित्येकदा वेळेआधी येऊन जायची आणि त्यामुळे चुकायची. नेरुळला उतरताना गाडी कायम दोन मिनिटे आधी पोचलेली असायची. आणि स्टेशनांबद्दल तर बोलायलाच नको. इतकी स्वच्छ स्टेशने आता फक्त मोनोरेलचीच असतील.. मुंबईतली रेल्वेस्टॅशनांबद्दल ही आशा ठेवायलाच नको. नव्या मुंबईचे प्लॅटफॉर्म्स आजही रोज सकाळसंध्याकाळ दोनदा पाणी टाकुन धुतले जातात... कचराकुंड्या लगेच दिसतील अशा ठेवलेल्या आहेत. प्लॅटफॉर्मवर लोकांना बसायला धडधाकट बाकडी आहेत.

फक्त वाईट इतकेच की दिवसेदिवस गर्दी तुफान वाढतेय.. गेल्या दिड वर्षात मला ऑफिससाठी रेल्वे प्रवास करावा लागत नाहीये हे माझे नशीब. नाहीतर ह्या गर्दीत माझी धडगत नसती.. Happy

साधना, मला पण हाच संदेश द्यायचा होता की हार्बर लाईनचा गाड्या वेळेवर असतात. तो संदेश तुझ्या पोस्टमुळे आणखीनच गडद झाला आहे त्याबद्दल तुझे मनःपुर्वक धन्यवाद

स्वरुप, तुझ्या पोस्टवरुन पीएमटीचा प्रवास खूपच त्रासदायक असल्याच जाणवतये.

खवचट, बर्‍याच जणांची ही धावपळ नित्याची आहे

मला सहसा कधी हार्बर लाईनने प्रवास करण्याची वेळ येत नाही. मोस्टली कंपनीची गाडी असते (फुकट) :-P. पण महिन्यातून एकदा दादरला फेरी होते.. आयडीयलला , तेव्हा मात्र लोकल ट्रेननेच जातो. गेली चार वर्षे हा उपक्रम आहे माझा. पण मला देखील कधीही त्रास असा झाला नाही. त्याआधीची परिस्थिती काय होती माहीत नाही. Happy

मीदेखील हार्बर लाइनने प्रवास करतो. पावसाळ्यातील १-२ दिवस वगळता कधी त्रास झाला नाही. पण रविवारच्या मेगाब्लॉकचा नक्कीच राग येतो. गेली कित्येक वर्ष ते चालू आहे.