आईचा पंजाबी ड्रेस

Submitted by Anaghavn on 18 June, 2008 - 02:46

लहानपणी एकदा आम्ही trip ला निघालो होतो. आमची family, आणि मावशी ची family. त्यावेळी (१९८३/८४) च्या सुमारास,औरन्गाबाद ला "पन्जाबी सुट" ची concept--लग्न झालेल्या बायकांसाठी-म्हणजे एकदम दुर्मिळच. त्यातल्या त्यात मराठी कुटुंबासाठी तर नक्कीच. लोक अगदी वळुन वळुन बघायचे.
ट्रिप ला जाताना आई आणि मावशीने पन्जाबी ड्रेस घातला होत..बापरे आता कसं होणार? लोक बघतील आईकडे. आम्ही जिथे रहायचो, तो भाग म्हणजे तर अगदी जुन्या वळणाचा. आम्ही पहील्या मजल्यावर रहायचो.खाली घरमालक आणि अजुन एक भाडेकरु.
त्यांची मुलं, आणि आजुबाजुच्या घरांमधली काहि मंडळी--या सर्वांपासुन आईला कसं वाचवाव? हा विचार माझ्या मनात येउन मी सारखी अस्वस्थ होत होते.शेवटी घराबाहेर पडण्याची वेळ आली. मी पटकन खाली गेले, Gate च्य इथे उभी राहीले. आई आणि दादा (माझे वडील) कुलुप लावुन येत होते. आम्ही trip ला चाललो आहोत ही कुणकुण एव्हाना सगळ्यांना लागलीच होती.सहज म्हणुन बाहेर आल्या होत्या बायका. आईला पन्जाबी द्रेस्स मध्ये पाहुन अनेक भुवया उंचावल्या.मी धास्तावले.बापरे लोक आता बोलणार काहितरी आई बद्दल. माझे अनेक सवंगडी आंगणात येउन उभे राहीले. आणि आईकडे बघु लागले.त्यांचा तरी काय दोष? त्यांनी कधी अशी पन्जाबी ड्रेस घातलेली "आई" पाहीलीच नव्हती--न स्वत:ची, ना दुसर्‍यांची.
मी पटकन मोठ्या शिताफ़ीने अमच्या आंगणाच दार लावुन घेतलं. पण त्यातही काही कार्टी Gate च्या दंड्यावर ऊभी राहीली, काही भिंतीवर उभी राहुन बघु लागली. खुप राग आला होता.
त्यानंतर आमची trip सम्पवुन आम्ही रत्री घरी परतलो.
सगळे जण तो प्रसंग विसरुन गेले असतिल. या छोट्या गोष्टीला इतकं काय महत्व असणार?
पण मला वाटतं, लोक काय म्हणतील या मनातल्या विचारातलं मुळ तिथेच कुठेतरी आहे.

गुलमोहर: 

लोक काय म्हणतील या मनातल्या विचारातलं मुळ तिथेच कुठेतरी आहे.>>>
पण आपण एवढा बाऊ करावाच का म्हणतो मी? लोक काय बोलण्यापुरते असतात... त्यांच ते कामच असत..

"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

--लोक काय बोलण्यापुरते असतात... त्यांच ते कामच असत.----
अनुमोदन.
पण कधी कधी लोक बोलून विसरुन जातात पण ज्याला बोललेले असते त्याच्या मनावरील जखमा भरायला वेळ लागतो.

पण कधी कधी लोक बोलून विसरुन जातात पण ज्याला बोललेले असते त्याच्या मनावरील जखमा भरायला वेळ लागतो.
>> १००% सहमत , कधी कधी त्या बोलणार्‍यांना हे ही कळत नाही की आपण जे काही बोललोय त्याचा ह्यांना त्रास होतोय Sad
ह्याच बाबतीत नाही , अजुन अश्या बर्‍याच गोष्टी असतात ..
****************************
Happy Blush Proud Lol Biggrin Rofl

दिपू, अरे कळलं तरी ते मान्य करतीलच असे नाहीत. आता वरच्या उदाहरणात जर लोकांनी पंजाबी ड्रेस घालण्यावर अगदी वाईट प्रकारे टीका केली असती व घालणार्‍या व्यक्तीचे frustration त्यांना जाणवलेही असते तरी कुणी "मग त्यांनी तो ड्रेस घालावाच का? मग आम्ही बोललो तर आमचा काय दोष?" असेही म्हणणारे लोक भेटू शकले असते.

व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्ती प्रमाणे दुसर्‍यासाठीची sensitivity सुध्दा व्यक्तीप्रमाणे कमी जास्त असते.

.

पण कधी कधी लोक बोलून विसरुन जातात पण ज्याला बोललेले असते त्याच्या मनावरील जखमा भरायला वेळ लागतो.>>> म्हणूनच म्हणतोय मी की लोक काय म्हणतात/ बोलतात ह्यावर आपण किती लक्ष देतो त्यावर त्याची दाहकता अवलंबून आहे! ह्याच बाबतीत नाही , अजुन अश्या बर्‍याच गोष्टी असतात ..<< Wink

>>ती नेहमी खुप डार्क कलर्स घालायची जे तिला अज्जिबात चांगले दिअसायचे नाही , पण तिचा कन्सेप्ट क्लियर होता , मला आवडतात हे रंग मी घालणार . लोकांचे तोंड बंद Biggrin
मी स्वतः थोडा डार्क शर्ट घालायचा असेल तर १० वेळा विचार करतो>> अहो बरोबरच आहे त्या क्लासमेटच!! कारण जर एका डार्क शर्टावरून तुम्ही आम्ही धा वेळा इचार कराया लागलो तर कस व्हायच?? Wink

बादवे 18 June, 2008 >> नंतर कोण पहिले प्रतिसाद टाकतोय ह्याचा (आपण) विचारच करीत होतो नाही का? Wink

त. टी.
लागल्यास दिवे घेणे! माझ्या ते नावातच आहेत!! Wink
ही वैयक्तिक टीका नाही! मी टीका करीत नाही टीक्का खातो! Biggrin

"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

कुलदिप,
तुमच्या बोलण्याला अनुमोदन.
मला ते कळंत होतंच. पण वळायला आत्ता आत्ता लागलयं. शेवटी काही गोष्टी अंगी मुरायला कधी कधी वेळ लागतो.
------
सगळ्या प्रतिक्रिया मी आज पाहील्या.
छान वाटतंय.
अनघा

हल्लीं पंजाबी ड्रेस व 'गाऊन' वापरणं खेड्यापाड्यातसुद्धां व सर्व वयोगटात इतकं रुळलं आहे कीं तुम्हाला अभिमानच वाटायला हवा तुमच्या आई काळाच्या इतक्या पुढे होत्या याचं ! [ आयुष्याची ८०-८५ वर्षं नऊवारी नेसणार्‍या माझ्या आईचा नुकताच शंभरावा वाढदिवस साधेपणाने साजरा झाला; गेलीं १५ वर्षं - त्यातली कांहीं वर्षं मुंबईतल्या चाळीत- ती फक्त 'गाऊन'च वापरते व इतराना पंजाबी ड्रेस व 'गाऊन' वापरायचा सल्ला पण देते ! Wink ]