नेव्हर गिव्ह अप भाग - १

Submitted by आवळा on 19 April, 2010 - 00:42

मित्रांनो..
शिर्षक .. काय असावे याचा विचार करत होतो खुप वेळेपासुन, पण नीट काही सुचले नाही.. म्हनुन
"नेव्हर गिव्ह अप" असे दिले आहे..

प्रत्येकाचे आयुष्य.. कोणत्या ना कोणत्या जाणत्या/अजाणत्या क्षणी एक वळण घेते, तो सावध असेल त्या वळणावर तर ठीक, पण नसेल तर काय होते हे ते वळण घेतल्यावर समजते...

ईंजिनीयरींग कॉलेज चे दिवस, अतिशय मोहक, थ्रिलींग, एकमेकाची टांग खेचने, लेक्टर्स बंक करणे,आवडत्या यंग लेडिज प्रोफेसर च्या विषयाचा पीएल च्या आधी अभ्यास करणे आणी त्यांना डाऊट विचारायला मुद्दामुन जायचे Wink ई. ई... ,

आमच्या कॉलेजचा एक वॉचमैन होता "लाखन सिंग" त्याला खऊट टकलु ऊप प्राचार्यांनी ऑर्डर दिलेल्या...
सकाळी ८ नंतर कुणालाही गेट मधुन प्रवेश नाही.. तो वॉचमैन फार खडुस होता, आणी त्या येड्या प्रा. ची आज्ञा तो एक प्रामाणीक कुत्रा असल्यासारख्या पाळायचा, मग काय जाम वाट लागायची, सकाळी ८ वा. कॉलेज ला पोहचायचे म्हणजे स. ६ ला ऊठलेच पाहीजे आणी सगळे ऊरकून ७:०५ ची लोकल पकडायलाच लागायची.. Sad
नुसते डोके फिरायचे .. पण फर्स्ट यियर विद्यार्थी म्हणून निमुटपणे सहन केले काही दिवस.
मग शैतानी डोक्यानी काम करायला सुरु केले... त्यामागे कारण ही तसेच, च्या मारी त्या लाखन सिंग ने एकदा ८:०५ ला पोहचलो .. म्हनून आत नाही सोडले.. लोकल लेट होती म्हनुन त्याला हजार विनवन्या केल्या त्यानी ऐकले नाही... आणी त्यानी त्या टकलु हैवाना सांगितले आम्ही आत यायचा प्रयत्न करतोय म्हनून..
टकलु हैवान वर्गात घेउन गेला.. सगळ्यासमोर यथेछ अपमान केला असे त्यांना (प्रा. आणी लाखनसिंगला) वाटले.. Happy पण शेवटी तो माझ्या चेहर्यावरच्या शांत भावमुद्रा पाहुन म्हणाला जा ईथुन आता. आणी रिसेस मधे परत या
वर्गातुन जाताना.. कंपुतील काही विद्यार्थांच्या चेहर्यावर चिंतेचे आणी अपमानीत असल्याचे भाव होते.. मी नेहमी प्रमाने
निवांत होतो (असले १००० अपमानाचे सीन्स पचवलेले ई. ८ वी. पासुन.. , सुरुवातीला थोडे वाईट वाट्ले पण पुन्हा झाली सवय --> मला नाही मास्तर ला अपमान करण्याची .. तो खुप प्रयत्न करुन नवीन नवीन आयाडिया काढायचा अपमान कसा करावा याचा.. कदाचीत पी.एच.डि. पण करेल पण पाषाणाला पाझर कधी फुटणार... हा हा हा ) असो जाताना वर्गातील विद्यार्थ्या ना एक डोळा मारुन निघालो.. Wink
त्यातच एक स्वताला सुंदर समजणारी आणी शुर्पणखाला लाजवेल असे रूप असणारी बेकार अभ्यासु पोरगी बोंबलली "How shameless" .. मनामधे एक आनंदाची लहर आली.. (आपल्या कर्तबगारीवर कुणी तरी पाठ थोपटल्या सारखे वाटले म्हनुन तिला पण एक छान स्माईल दिली आणी तिला thanks असे म्हनुन
गेलो ) ...
असो रिसेस म्हनजे पण एक शिक्षा, रिसेस टाइम होता १२:३० ते १:१५
आणी १;१५ नंतर कूनी कॅन्टिन मधे दिसले की त्याला तो टकलु आणी त्याचा एक मुछ्ड मित्र(कलीग) येऊन भाषन पाजवायचा.. (ते भाषन एकण्यापेक्षा भारत पाक सीमे वर गोळ्या खालेल्या बर्या असे वाटायचे)

भाषनचे टिपिकल कंन्टेन्ट्स...
Q:-what the hell you are doing here..
Ans : - Sir, just not feeling well.. so thought of taking a tea in canteen..
Q:- what's wrong
Ans:- Sir.. having a headache..
Q:- Do you have a head, you stupid.. go to your class, did your parents send you to college for bunking lectures and doing timepass in canteen...
Ans: Sorry sir.. won't do next time..
Q:- Give me your roll number.. I will see in your term work..
Ans:-- (खाली तोंड करून) sir.. I am soryyyyyy , if it happens again you can fail me in term work.. and I will not blame you for that
Sir I am really studying hard. and just for your information.. I am staying in hostel... my parents are living 500km away from Mumbai in a small town , and I miss them so much as this is the first time I left house so feeling home seek, and you know sir... I don't like this canteen food at all.. my mom cooks best food..and I miss it badly (असला पाणी लावला त्याहो, हो आमच्या कॉलेजला होस्टेल नव्हते.. म्हनुन बाहेर गावावरुन मुंबईत शिकायला येणार्यांपैकी वर्गात मी एकटाच बाकी सगळे लोकल.. )

Q:-(मास्तर २-४ मी. विचार करुन) ok.. go back to your class, I am proud of you, that you came to such a big city from a small town..
Ans:- Thank you sir.. I will tell my parents about you that we have a teacher who really looks after students and gives them personal attention ...

Q: ( टकलु मास्तर आजुनच पाघळला Happy ) ok boy.. go back to your class and work hard.. our college has a good reputation of having brilliant students
Ans: Sure sir, I will work hard and if I have any questions regarding engg. drawing subject should I ask you???

मास्तर : why not.. don't be shy .. my boy Happy
Ans: Sure sir.. I will go for the class .. Rekha mam is teaching C.. and I don't want to miss that lecture (मनातल्या मनात "च्या मायला तुझ्या.. तुझी शंभरी भरली तरी का त्रास देतोय हरामखोर")

असे अनेक किस्से..

पण त्या दिवशीच्या लोकल लेट झालेल्या किस्स्याने डोकेच फिरले..(मनाशी ठरवले.. त्या टकलुला , त्या वॉचमैन ला आणी "shameless" म्हणालेल्या शुर्पणखाला चांगला धडा शिकवला पाहीजे.. )
आमच्या कंपु मधील.. काही जनांनी शरणागती पत्कारली.. म्हणाले.. उद्या पासुन थोड्या वेळ आधीची लोकल पकडुयात(I give up to this system).. मी आणी आजुन एक मित्र अजिबात शरणागती पत्करणारे नव्हतो.. Happy

आपला एकच फंडा.. "जहाँ सब रास्ते.. बंद हुये दिखते है. वहाँ मन की आंखौ से देखो एक रास्ता तो जरूर मिलेगा"

कॉलेजच्या बाहेर असलेल्या हॉटेल मधे बसुन शैतानी डोक्यात चक्र फिरत होते... की नक्की काय करावे आणी
ह्या आपल्या स्वातंत्र्या आड येणार्या मर्कटांना धडा शिकवावा...
१-२ दिवस असेच विचार करण्यात गेले.. आणी एके दिवशी सकाळी ६ ला. जाग आल्या आल्या.. कोणा एका हिंदी चित्रपटात(बहुतेक सौदागर) असलेला डायलॉग आठवला "दो दोस्त जब दुश्मन बन जाते है तो बहोत खतरनाक हो जाते है क्युंकी वोह एक दुसरे की कमजोरी जानते है" .. Happy

हा डायलॉग का/कुठुन आठवला कळाले नाही.. पण नक्कीच याच्या मागे काहीतरी कारण आहे .. हे तास सुरू असताना विचार आला.. आणी चक्क चेहर्यावर एक मंद असुरी हास्य झळकले.. (आणी मनातल्या मनात .. विचार केला .. "शुर्पनखा तु तो गयी कामसे" हॅ हॅ हॅ हॅ .. "और अब तेरा क्या होगा लाखन सिंग" हॅ हॅ हॅ हॅ ) Happy

तेवढ्यात एक खडु गालावर येऊन जोरात लागला... बिनु मॅथ्यु नावाच्या प्रोफेसर ने तो मारलेला.. त्या मास्तर नेम एकदम अचुक...
आणी पुन्हा एकदा अपमानास्पद संवाद सुरु झाला Happy हॅ हॅ हॅ

Teacher: hey you .. the guy on last banch .. stand up ..
me: गुपचुप खाली मान टाकुन ऊभा..

Teacher: why are you laughing.. do you think there is comedy going on here? or is it like a circus show and you are enjoying a joker ?
me: No sir... I was thinking of something else.. and was not paying attention to what you are teaching.

Teacher: Ohhh ho ho ho.. See everyone look at his face.. this guy is doing a day dreaming now...
are you in love with someone? and dreaming about her.
Me: No sir.. (whole class was looking at me)

Teacher: what's your problem? you are not paying attention to my class?
me: Sir .. you know my thoughts were paying attention to what you were teaching but all of sudden my mind moved to some different sort of things..
(every one in the class is laughing at me now and I felt a little relaxed now Happy )

Teacher : And may we know what was that thought?
Me: sir I am sorry sir.. I will not do it again..

Teacher: See you guys are grown up now.. you will have to be responsible and learn to live a good lifestyle.. and behave yourself.. it is very very important for your future.. etc etc.... (असे काय काय फंडे मारले. आणी शेवटी मला म्हणाला.. "Kishor.. if you are not going to tell us what you were thinking.. you better go out of the class and stand out.." (च्या मारी ह्याला काय सांगनार काय विचार करत होतो हा विचार मनात आला आणी चेहर्यावर परत तो डायलॉग आणी स्मित झळकले .. अबाबा काय हे मास्तर आजुन तापला...
मी बाजुला बसलेल्या एका मित्राला सुचना केली मला बाहेर जायचे आहे डेस्क वरुन सरक..
थेट मास्तरच्या समोर गेलो.. आणी म्हणालो..
Me: sorry sir.. its personal.. I will go out and stand, but will try to listen and understand what you are teaching.. hope you don't have any problems with it(अगदी निरागस चेहरा करुन बोललो) ... Sir just a request while standing out if I feel thirsty can I drink water from fountain?
मास्तरचा चेहरा परत काळानिळा झाला असे मला वाटले. व मी थेट वर्गाच्या बाहेर Happy

बाहेर आल्या आल्या डोक्यात आपला अपमान वगैरे झाला आहे.. याची खंत बिल्कुल वाटली नाही..
५ मि. गेले आणी ते मुछ्ड ध्यान आले..

मुछ्ड: why you are standing outside
मी: sir.. I was thinking of something else and that thought made me laugh and sir felt something offensive about that and he sent me out of the lecture room, but sir now I am paying attention to what he is teaching from outside.. but you know sir it;s very hard to hear what he is saying .. isn't it sir???

मुछ्ड: you stupid, shameless boy.. don't you feel sorry about it?
मी: Sir, I said sorry, but sir is not understanding.. what I should do (निरागस चेहरा करुन बोललो)
and I also told him.. I will not do it again.. sir I feel everyone should have a second chance to correct mistakes.. but Binu sir doesn't seems to be that kind of person.. I know he is strict and
disciplined and wants us to grow like a good professionals when we will be out of this college..
(च्या मारी हा फंडा मारला आणी मुछ्ड पाघळला)

मुछ्ड: OK come with me...
मी: Thank you so much sir..

मुछ्ड: ok ok .. .. Binu sir (knocking the door of classroom) ..
बीनु: Yes. sir. how can I help you..

मुछ्ड: Binu. I feel this guy should be inside the class not outside the class..
बीनु: But sir he was doing mischievous things in the class

मुछ्ड: I know, and this innocent guy(मनातल्या मनात हॅ हॅ हॅ) feels sorry about it.. (kishor you go ahead and seat at your place) ... Binu.. you might want to change your attitude.. if it's his 1st mistake just warn them and if they do it again and then punish them whatever the way you want...
बीनु: Sure sir.. thanks!

बीनु ची नौकरी त्याच्या हातात म्हनुन त्यांने निमुटपने सहन केल Happy

परत वर्गात घुसतांना शुर्पनखेला एक स्मित्त दिले .. (का कोण जाणे डेस्क वर परत जातांना शुर्पनखे नी माझ्या
कडे बघितले आणी ती पण हसली(असुरेपणाने कदाचीत))

=========================================================================
असो.. शेवटी तो क्षण आलाच ज्याची मी आतुरतेणे वाट बघत होतो..

प्रैक्टिकल्स .. ईथे ठरवले.. शुर्पणखाशी मैत्री करायची.. वर्गातील काही स्त्रीलंपट विद्यार्थी आधिच घोळ घालुन होतेच.. .. त्यातल्या एकाला गाठले आणी.. मैत्री सुरु केली.. आमच्या कंपुला काही कळेना..
हा एका खेड्यागावातुन आलेला पोरगा ज्याला आत्ताच कळाले की ब्रेक अप / पॅच अप / बॉय फ्रेंड- गर्ल फ्रेंड काय असतात.. आणी हा असा अचानक त्या गँग मधे काय करतोय, बिचारा शुर्पनखे वरती फिदा झाला असावा
(ती फिदा होण्यासारखी नव्हती तर फिदी फिदी हसण्यासारखी होती आणी कदाचित आजुनही असेल Happy )

मुलींशी मैत्री करायची ती पण आयुष्यात सर्व प्रथम ... Sad हे केवढे अवघड असते Sad .. आणी त्यातल्या त्यात.. जर तिचा तुमच्या मधे जर असले भन्नाट सीन येऊन गेले असतील तर ... झालेच )
पण काही ना काही करावेच लागनार.. म्हनुन मी.. प्रैक्टिल्स च्या एका लॅब असिस्टंट(सतिश) ला पकडले.. तो .. मराठ्वाड्याचा निघाला.. (हानतिज्या आयला ) मग काय जाम गट्टी.. त्याला जरा व्यवस्थित मराठ्वाड्याचा
भाषेत सांगितले.. "काय राव .. आपण ईकडे शिक्षण घ्यायला आलो. आणी गावातले पडल्यामुळे ही शहरातील कार्टी नीट बोलत नाही"... त्याच्या अंतकरणातला मराठवाडा जाग्रुत झाला.. आणी .म्हणाला बोल ना राव काय मदत करु.. मी म्हणालो काही पण कर पण ह्या सगळ्यांसमोर मी निरागस/ हुशार/ होतकरु मुलगा आहे हे सिध्द केले पाहीजे म्हणजे नीट मैत्री होईल सर्वांशी.... काय म्हणता द्या टाळी.. Happy

असो, एक प्लैन बनवायचे चाललेले डोक्यात .. सतिश केमिस्ट्री चा लॅब असिस्टंट होता.. आणी त्या विषयाचा मास्तर बिहारी बाबु (प्रो. सिंग) सनकी होता.. कुणी विकली असाईनमेंट नाही केली की, त्याची वर्गातुन हकालपट्टी नक्की...
मग काय प्लैन आखावा हेच कळेना.. शेवटी शैतानी डोके.. जाग्रुत झाले..

आयडीया..आयडीया..आयडीया.... हॅ हॅ हॅ परत ते असुरी हास्य मनातल्या मनात.. Happy

प्रैक्टिकलला २ दिवस बाकी असतांना सतिशला भेटलो.. आणी त्याला रचलेला .. प्लैन सांगितला..

क्रमशः ..........................................................

मित्रांनो.. ईथे काही offensive कॉमेंट लिहिण्यापुर्वी .. पुढील भाग नक्की वाचावा तो मी लवकरच प्रकाशित करेल.. हा भाग १ - फक्त एक चतुर्थांश आहे . Happy

गुलमोहर: 

हाहा...तशी ३ वर्षे झालीत इं.कॉलेज मधुन पास आउट होऊन्..पण हे वाचताना कॉलेजची सगळी धमाल मस्ती आणि उपदव्यापी मित्र आठवले Happy
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.