स्थळ - तुमच्या आमच्या शेजारीच (कदाचित)
वेळ - कोणतीही वाईट
(अण्णा तणतणतच घरात शिरले आणि दारातून किंचाळले.)
अण्णा - नानाssssssssssssssss
नाना - (आतूनच- बहुधा गॅलरीतून त्याच पट्टीत) अण्णाssssssssssssssss
अण्णा - (चपापून पट्टी खाली आणत ) नाना ssssssss
नाना - (अण्णांच्या पट्टीत) अण्णा ssssssss
अण्णा - (फारच नरमाईने ) नाना
नाना - (समोर दाखल होत) बोला अण्णा
अण्णा - (काकु़ळतीस येऊन दोन्ही हातांनी हातवारे करत) अरे.... हे.... हे..... हे..... काय चाललय काय तुझं ?
नाना - (स्वतःकडे पहात गंभीरपणे) याला देह म्हणतात, तोच दोन पायांवर चाललाय.
अण्णा - नान्या, शुंभा काय ऐकतोय मी हे ?
नाना - (खेकसून) ओ अण्णा .... कोणी ऐकलय ?
अण्णा - (दचकून) मी...
नाना - मग मला का विचारताय ? तुम्हीच सांगा काय ऐकलय ते ?
अण्णा - ठिक आहे. मीच सांगतो. हे बघ नाना, आज आपल्याला फार गंभीर विषयावर बोलायचय.
नाना - (लाजून) ऑण्णा.... ऑम्ही नॉय जॉ....
अण्णा - (गोंधळून) कॉय झॉल ?
नाना - मॉला नॉय एवढ्यात लॉग्न कॉरायच.... आता माझ वयच काय ?
अण्णा - (चिडून) मुर्ख, गाढव, बेअक्कल...
नाना - (ओरडून) कोण ?
अण्णा - (खालच्या पट्टीत) मीच.
नाना - तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स सॉल्लिड आहे अण्णा.
अण्णा - नान्या.... नान्या... अरे तिशीला पोहोचलास तू. तुझ्याबरोबरीची पोरं आता पोरं फिरवताहेत आणि तू मात्र अजूनही...
नाना - (हुरळत) पोरी फिरवतोय.
अण्णा - डोंबल माझं..... हे बघ नाना, विषय लग्नाचा नाही.
नाना - आयचा घो, नेम चुकला. अण्णा, हेच तुमचं चुकतं. जेव्हा जे विषय अजेंड्यावर घ्यायला हवेत तेव्हा ते तुम्ही घेत नाही.
अण्णा - प्रिय नान्या, तू गाडलेले झेंडेच कायम माझ्या अजेंड्यावर असतात रे. तू पुरवलेले विषय इतके महान असतात की बाकीचे विषय त्याच्यासमोर एकदम किरकोळ वाटतात बघ.
नाना - असं म्हणताय ? बोला अण्णा, कोणत्या विषयावर बोलायचय ? म्हणाल त्या विषयावर बोलायची तयारी आहे आपली. राजकारण, समाजकारण, विनाकारण...
अण्णा- (त्याला थांबवत) नान्या... नान्या.. अरे, तू म्हणे चोर्या करतोस ?
नाना - (बाह्या वर करत ) तिच्या तर... कोण म्हणालं ?
अण्णा - ते महत्त्वाचं नाही. तू म्हणे येता-जाता, जाता-येता मुलींची छेड काढतोस ?
नाना - (शर्टाची वरची दोन बटनं उघडत) कोण म्हणालं ?
अण्णा - ते महत्त्वाचं नाही. तू म्हणे परप्रांतियांना मारतोस ?
नाना - (फुरफुरत) कोण... कोण म्हणालं ?
अण्णा - ते महत्त्वाचं नाही. तू म्हणे...
नाना - (फुरफुरणं वाढवतं) अण्णा, मी काय म्हणे ते सोडा... तुम्हाला कोण म्हणालं ते सांगा. आता तर तेच जास्त महत्त्वाचं आहे.
अण्णा- का ? का ?
नाना - कोण तो काका तिच्या मारी त्याच्या....
अण्णा - (खुणांनी समजावत) काका नाही रे नान्या. का.. प्रश्नचिन्ह, का.. प्रश्नचिन्ह
नाना - अण्णा, तुम्ही अशा वेड्यावाकड्या खुणा करू नका. सांगून ठेवता. आमचा चिन्हांचा अभ्यास वेगळाच आहे. तो कांडी लावणारा काका कोण ते आधी सांगा.
अण्णा - नाना, ते महत्त्वाचं नाही. मुद्दा हा आहे की मागच्या आठवड्यात माझ्या पाकीटातून पाचशेची नोट गायब झाली.
नाना - काय सांगताय ?
अण्णा - गेल्या सोमवारी पुन्हा दोन नोटा गेल्या. काल दिडशे रुपये गायब. हे सगळं तुझचं काम.
नाना - (ओरडून ) अण्णा... हे असले आरोप सहन होणार नाहीत. सांगून ठेवतो. असली शे-दिडशेची चिल्लर मी चोरत नाही. आईने घेतले असतील.
अण्णा - हो... ? (विचारात) जुनी सवय.
नाना - गेले दोन दिवस ब्युटी पार्लरच्या फेर्या मारतेय ती.
अण्णा - काय सांगतोस काय ? पण तसं काही जाणवलं नाही रे मला.
नाना - कस जाणवेल ? मॉडल जुनं झालय. आता कितीही रिनोवेशनचा खर्च केला तरी ओरिजिनल स्ट्रक्चरमध्ये फरक तो काय पडणार ?
अण्णा - खरय रे... पण नाना, मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की तू पैसे चोरतोस.
नाना - (गहिवरून) अण्णा, तुम्ही माझ्यावर आरोप करताय ? स्वतःच्या कुलदिपकावर आरोप करताय ? या घराण्याच्या एकुलत्या एक, एकमेव वंशजावर आरोप करताय?
अण्णा - (भावनावश होऊन) तस नाही रे... पण करतोय हे खरय.
नाना - मग करा. पण याला जबाबदार मी नाही.
अण्णा - नान्या, चोर तो चोर आणि वर.... वर काय रे ?
नाना - शिरजोर अण्णा. कारण हे सगंळ तुमच्यामुळे घडलय.
अण्णा - माझ्यामुळे ?... माझ्यामुळे ? ... मी सांगितल तुला चोर्या कर म्हणून.
नाना - आठवा... आठवा....
अण्णा - नान्या, पहिला, दुसरा सोडून डायरेक्ट आठवा कोण रे ?
नाना - आईच्यान, तुमचा पण सगळा प्रोब्लेमच आहे. आठवा म्हणजे आठवण करा तुम्ही मला काय बोल्ला होता ते.
अण्णा - मी बोल्लो होतो... कधी, कुठे, काय?
नाना - थोरामोठ्यांचा आदर्श समोर ठेव... तुम्हीच बोल्ला होता ना... काय तर... रामकृष्णाचा आदर्श ठेव..बोल्ला होता का नाय ?
अण्णा - बोल्लो होतो. बोल्लो होतो. त्याच इथे काय ?
नाना- त्यावेळेस सौजन्य सप्ताहात तुम्ही तसं म्हटलं आणि मी ठरवलं, यावेळेस अण्णांच ऐकावं. रामाचा आदर्श समोर ठेवला मी. पण तुमच्याकडे आईशिवाय दुसरं झेंगट नाही आणि जवळपास वनवासाला जाण्यासाठी एकही जंगल उरलेलं नाही. म्हणून राम कॅन्सल करावा लागला. पण पितृआज्ञा म्हणून मग कृष्णाला पकडलं. टिव्हीवर कलर बघता ना ?
अण्णा - नान्या, आपल्याकडे कलर टिव्हीच आहे.
नाना - आईच्यान... अण्णा, टिव्हीवर कलर चॅनल बघत जा. त्यातूनच मी कृष्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. कृष्ण दह्या दुधाची चोरी करायचे. घरात आणि घराबाहेर गवळणींकडे पण.
अण्णा - अरे, मग दह्या दुधाची चोरी करायची.
नाना - स्वतःला काय गवळी समजताय ? तुमची काय डेरी आहे ? नुसतीच ढेरी आहे. इथे आरेची अर्धा लिटरची थैली दोन वेळच्या चहाला पुरत नाही. त्यात काय चोरी करणार ?
अण्णा - म्हणून पैसे चोरतोस ?
नाना- कसं आहे अण्णा, एकदा आदर्श ठेवला म्हणजे ठेवला. म्हणून कॅश चोरतो आणि बारमध्ये जातो.
अण्णा - काय ? बारमध्ये ?
नाना - मिल्क बारमध्ये. दुध प्यायला.
अण्णा - पाचशे रुपयांच ?
नाना - मलईसकट असतं ते. शिवाय सोबत बाकी पेंद्या वगैरे असतात ना.
अण्णा - अरे देवा, नशीब शेजार्यांकडे जात नाहीस त्यांची मडकी फोडायला. पण नान्या, पोरींची छेड का काढतोस ?
नाना - अण्णा, छेड काढत नाही. छेडतो.
अण्णा - तेच ते.
नाना - नाही अण्णा नाही. छेड काढण्याची कामे मवाल्यांची. दुधवाल्यांची नाही. आम्ही फक्त छेडतो.
अण्णा - एवढ्या जणींना ? परबीणीची कुंदा, पटेलणीची चंदा, कुडाळकरणीची मंदा, नांदोस्करांची नंदा.....
नाना - आईच्यान अण्णा, तुमचं नेटवर्क एकदम स्ट्राँग म्हणायच. एवढ्या सगळ्या तुमच्या रेंजमध्ये...
अण्णा - गाढवा, त्या सगळ्या तुझ्या आईकडे चकाट्या पिटायला येतात तेव्हा त्यांच्या चहाचं मीच बघतो. पण मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की तू परप्रांतियांना मारतोस ?
नाना - आदर्श नाना आदर्श.
अण्णा - यात कसला आदर्श ? कृष्ण स्वतःच यादव. युपीचा. मग ते तर तुझे भाऊबंद झाले ना ?
नाना - अण्णा, इतिहासाचा विपर्यास करू नका. भगवदगीतेत कृष्णाने स्पष्ट सांगितलय. कोणी कोणाचं नसतं. शिवाय मथुरेतून गोकुळात येऊन शानपत्ती करणार्या सगळ्यांनाच कृष्णाने ढगात पाठवलं. मी तर फक्त त्यांना पळवतोय.
अण्णा - कर्म माझं.
नाना - पण अण्णा, मुद्दा आता तो नाही. वेगळाच आहे.
अण्णा - तो आणि कोणता रे ?
नाना - आईला एकूण चार भाऊ. त्यातला नेमका कंस कोणता ??????
(No subject)
कुठल्या कुठे हो अण्णा???????
कुठल्या कुठे हो अण्णा???????
(No subject)
(No subject)
कौत्या, अरे अगदी डोळ्या समोर
मस्त, मस्त. भरत जाधव आणि
मस्त, मस्त.
भरत जाधव आणि पंढरीनाथ कांबळे. हसा चकटफु
आईला एकूण चार भाऊ. त्यातला
आईला एकूण चार भाऊ. त्यातला नेमका कंस कोणता ??????
>>>>
मस्त मस्त
मस्त मस्त मस्त...
माहाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये मस्त सूट झालं असतं हे नाटूकलं..
नाना - आईला एकूण चार भाऊ.
नाना - आईला एकूण चार भाऊ. त्यातला नेमका कंस कोणता ?????? >>>
('अण्णा' आणि 'नाना' वाचून मला
('अण्णा' आणि 'नाना' वाचून मला आधी वाटलं दोन पेन्शनर चाळकरी किंवा शेजारी यांचा संवाद असेल.)
का? का? , आठवा , कलर
कॉमेडी एक्सप्रेस मधे पण चपखल बसेल हे...
मित्रा... धमाल रे....
मित्रा... धमाल रे....

(No subject)
मस्त!!
मस्त!!
नाना - आईला एकूण चार भाऊ.
नाना - आईला एकूण चार भाऊ. त्यातला नेमका कंस कोणता ??????

तुमचे शब्द वाचतानाच कलाकाराचि
तुमचे शब्द वाचतानाच कलाकाराचि अॅक्शन डोळ्यासमोर येते. मनापासुन दाद.
मस्त!!!! कॉमेडी एक्सप्रेस मधे
मस्त!!!!
कॉमेडी एक्सप्रेस मधे पण चपखल बसेल हे... >>>१००%
(No subject)
काय हे, कौतुक?... धम्मालै!
काय हे, कौतुक?... धम्मालै!
(No subject)
अशक्य
अशक्य
कौतुक.. आजच्या दिवसाची
कौतुक.. आजच्या दिवसाची सुरुवात एकदम झकास झाली

सही!
सही!
(No subject)
भले बहाद्दर
भले बहाद्दर
(No subject)
हाहाहाहाहाहा गडबडाग लोलले :)
हाहाहाहाहाहा गडबडाग लोलले

(No subject)
कौतूक... तुझं हे लेखन आज
कौतूक...
तुझं हे लेखन आज वाचनात आलं... मस्त मजा आली...
टीव्ही वर पाठवलेलंस का?, हे स्कीट...
कौशि..
कौशि..

मस्तच. गणपतीत बसवू का ?
मस्तच.
गणपतीत बसवू का ?
Pages