गुरुपौर्णीमा ! (आमच्या वार्ताहराकडून)

Submitted by कवठीचाफा on 18 July, 2008 - 09:40

************ काल्पनीक*********************
आणि समस्त गुरुपरीवाराची माफी मागुन !

गुरुपौर्णीमेच्या मुहुर्तावर आम्ही आमच्या (डोंबल्याच्या)वार्ताहराला सकाळी सकाळी बाहेर पिटाळले. निदान या वेळी तरी जरा जास्त माल मसाला आणावा म्हणुन. त्याच्याकडून आलेल्या माहीतीच्या आधारावर पुढील प्रकाशन करण्यात येत आहे. यात कुणाच्या भावना दुखवल्या गेल्यास आमच्या वार्ताहराचे काहीही दुखावण्यास आपणांस पुर्ण मुभा देण्यात येत आहे.

१} आजुबाजुचे वातावरण आगदी वाढदिवसासारखे सजवले गेल्याचे पाहुन आमच्या वार्ताहराने तेथे( कसाबसा) प्रवेश मिळवलाच. लालचुटूक रंगाचे बदामाच्या आकाराचे फ़ुगे, लालभडक गुलाब अशी सामग्री दिसल्यावर त्याचा जरा भ्रमनिरास झाला. पण एकंदरीत वातावरण पार्टीसारखे दिसल्याने तो तिथेच रेंगाळत राहीला. कारण आमच्या भत्त्यातुन दुपारचे किंवा कुठलेच जेवण मिळणे शक्य नसल्याने आमच्या वार्ताहराने अश्या पार्टीत जाणे आमच्या धोरणात बसते. तेथे रेंगाळत असताना कानी आलेले काही संवाद :

"हे बेब्स व्हॉट्स अप ?"
"जस्ट कुल मॅन, गुरु यायच्या आत सगळी तयारी पुर्ण करायचीये आणि तु आत्ता उगवतोयस?" एक गोड आवाज किणकिणला.
" जस्ट चिल यार रात्री जी.एफ़. बरोबरची पार्टी जोरदार रंगली. घरी यायला उशीर झाला त्यात आमचे पॉप्स माहीतायत तुला राडा केला भर रात्री. मग सकाळी उठायला उशीर. तरी फ़क्त दोन वाजता आलो होतो."
" उफ़्फ़स हे पॅरेंट्स ना खुप हॅरीश करतात यार"
हा संवाद कदाचीत आणखी रंगला असता पण तेव्हड्यात एक व्यक्ती तेथे लगबगीने आली. `व्यक्ती'च, का ? कारण ती वस्तु जवळ येईपर्यंत नेमके ते स्त्रिलिंगी आहे की पुल्लींगी की दोन्हीमधेले कुणीच नाही हे आमच्या वार्ताहराला कळलेच नव्हते. आल्या आल्या त्या व्यक्तीने ठणाणा सुरु केला.
"हेऽऽय बडी अजुन गुरु रिच नाही झाला?" आवाजावरुन तरी ती वस्तु पुल्लिंगी असावी असा प्रथमीक अंदाज व्यक्त केला गेला आहे.
" नो मॅन आजुन नाही आला सकाळी ११ ला टच होतो म्हणुन म्हणाला होता, नाउ इट्स १२ ओ क्लॉक यारऽऽऽऽ
" ही इज बिझी यार कोणी आले असेल कंसल्ट साठी "
'हेऽऽय लुक , गुरु इज हियर"
हे वाक्य ऐकल्यानंतर आमच्या वार्ताहराने धडपडून दाराकडे पाहीले तेथुन एक झकपक पोषाखातला चेहरा तुळतुळीत घासुन आलेला तरुण नजरेत आला. आजुबाजुच्या तरुण वर्गाचा त्याच्याभोवती गराडा पडला. स्वभावाप्रमाणे आमचा वार्ताहर तिथपर्यंत पोहोचला नाही. कानावर पडलेले आमच्या पर्यंत पोहोचवणे हेच त्याचे काम.
आणि कोरस मधे ऐकु आलेले त्याचे त्या दुपारचे शेवटचे वाक्य होते,
" हॅप्पी गुरुपौर्णीमा लव्हगुरु" यानंतर बराच वेळ आमचा वार्ताहर सिझोफ़्रोनियाचा अटॅक आल्याप्रमाणे वागत होता असे समजते.

२} दुपारच्या अनुभवानंतर थोडा विरंगुळा म्हणुन आमचा वार्ताहर एका पक्ष कार्यालयात डोकावला. तेथे ऐकु आलेले खडाजंगी संवाद ऐकुन त्याने तेथे जरा थांबण्याचा निर्णय घेतला.

"आणखी किती दिवस तुम्ही मंत्रीपदाची खुर्ची उबवणार आहात? " एक असंतुष्ट आत्मा असावा.
" बरोबर आहे, मलई खायची संधी आम्हालाही द्या. आमच्या सहकार्यावरच तुमचे मंत्रीपद आहे. नायतर आजुनही डीपॉझीट जप्त करुन घेत राहीला असता" अनुमोदनाचा स्वर टीपेला गेलेला.
" ह्ये बाकी झ्याक चाललया तुमचं, साखर तुमीच खायाची आनी चिपाडं आमच्या गळ्यात" आणखी एक जाडाभरडा आवाज.
"आमच्या जिवावर उड्या मारुन आता आम्हालाच बाजुला सारता काय ?"
"दोन दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार करा म्हणावं पक्षश्रेष्ठींना नायतर आमाला बी दुसरे लोक हायत"
" कालच विरोधी पक्षनेत्यांकडून मोठी ऑफ़र आलीय"
"व्हय मी बी व्हतो थितं आता गप गुमान आमच्यातल्या कुनालातरी मंत्री बनायचा चानस द्या नायतर सगळे कार्यकर्ते घेउन आम्ही पक्षांतर करतो".

(सं)वादाची वाढती पट्टी आणि भाषामाधुर्य ऐकुन आमचा वार्ताहर जे सापडतील ते अवयव (स्वतःचे) जमा करुन तेथुन धुम पळाला. अधिक चौकशी करता ज्या व्यक्ती बद्दल इतकी स्तुतीपर शब्दसुमने उधळली जात होती ती व्यक्ती म्हणजे तेथे हजर असलेल्या तमाम मंडळींची राजकीय गुरु होती असे कळते.

३} गुरुपुजेचा हा अनोखा प्रकार पाहील्यावर दुपारचा अनुभव पुन्हा येण्याची शक्यता गृहीत धरुन त्या ठीकाणापासुन शक्य तितक्या दुर जाण्याच्या प्रयत्नात आमचा वार्ताहर एका भल्या प्रशस्त मंडपात शिरला. तेथील गर्दीतुन वाट काढत त्याने पुढील माहीती गोळा करण्याचा प्रयत्न केला.

"अरे देवाऽऽ महाराज आजुन आले नाहीत? आमच्या यांना आर्ध्या तासात येते म्हणुन सांगुन आलेय"
"हो ना ! या मेल्या म्हातार्‍यांना घरात कुणी विचारत नसेल म्हणुन येउन बसल्यात दुपार पासुन, तेवढाच सुनांना निवांतपणा "
" बाकी महाराजांची कृपा, म्हणुन आज येतेय हो सुखासुखी इथे. नाहीतर यांना जेलमधे डबा द्यायला जायला लागले असते."
" आग्गो बाई, काय म्हणताय ताई तुम्ही ?"
"नाहीतर काय ? आमचे हेऽऽ, सरकारी ऑफ़ीसर ना ! वरची कमाई घेतल्याशीवाय कधी कुठले काम केले नाही. आजकाल रहावेच लागते कीनई असे ?"
" म्हणजे काय असे सगळीकडेच चालते हल्ली, मग पुढे काय ? "
" पुढे ? यांची चौकशी करायला कमीटी नेमली हो, यांच्या कुणा सहकार्‍याच्या पोटात दुखले असेल. "
"आग्गो बाई हो का ?"
मग सांगते काय ? स्वतःला नाही खायला जमत म्हणुन दुसर्‍याचे भले बघवले नसणार एखाद्याला. हे घरभर पोलीस हो , मी तडक महाजांचा धावा केला, त्यांच्या फ़ोटोला नमस्कार करुन म्हणाले आता तुम्हीच हो तारणारे यातुन. आणि चमत्कार बघा, आलेल्या कमीटीतले सगळे सदस्य यांनी दिलेली चिरीमीरी घेउन यांना क्लिन चिट देउन मोकळे की हो झाले."
" बघा, महाराजांची कृपा दुसरे काय?"
" म्हणुनच महारांच्या चरणावर वहायला सोन्याच्या खडावा आणल्यात करुन आजच्या मुहुर्तावर"
" प्रचिती हो प्रचिती दुसरे काय, आता आमचेच बघा ना ! आमची एकुलती एक मुलगी, लाडाकोडाने वाढवलेली. आता मुलं म्हंटली की थोडी मोकळीच असतात हो आजकालची. त्यातुन आमचे मुलगी म्हणजे रत्न हो एकदम, सात की आठ जण म्हणे तिच्या प्रेमात पडलेले. आणि आमची लेक कधी एका दगडावर पाय ठेवेल तर ना! सगळ्यांना होकार देउन मोकळी झाली. आगदी खोडकर बघा, आता तरुणपणी नाही मजा करायची तर कधी? आगदी पार्ट्या, पिकनिक्स सगळं करुन झालं. कधी कधी दोन दोन दिवस घरी फ़ीरकायची नाही. आता आजकाल यात काही गैर आहे का ? पण तीला बघायला आलेल्या मुलाच्या आईचे कान कुणितरी भरले. ती बया सरळ सांगुन मोकळी तुमच्या मुलीचे चालचलन काही ठीक नाही, मी आपली महाराजांना साकडे घातले. हो ! आहो मुलगा एन. आर. आय. मिळतात का आजकाल अशी स्थळे पटकन?"
अरे देवाऽऽ मग?"
"आहो सांगते काय ! तर मी असे महाराजांना साकडे घातले आणि तिकडे मुलाच्या घरच्या मंडळींना मुलाचे तिकडे कुणा गोर्‍या मुलीशी लफ़डे असल्याचे कळले, झक्कत घेतली सुन करुन माझ्या मुलीला. आता ते दोघे राजा राणी असतात तिकडे बाहेर देशात, सगळी महाराजांचीच कृपा हो !"

" अय्याऽऽऽऽ महाराज आले वाटतं चला बाई लवकर दर्शनाला जायला हवे, आज यांना क्लिन चीट मिळाल्याबद्दल पार्टी ठेवलीये, ओली. तुम्ही पण यायचं बरं का! "

इस्पितळात भरती केलेल्या आमच्या वार्ताहराकडून बर्‍याच मुश्कीलीने मिळालेली माहीती प्रसिध्दीस देत आहोत.

ता. क. सिझोफ़्रोनीयाचा तिव्र झटका आल्याने अती दक्षता विभागात (मेंटल हॉस्पिटल) असलेल्या आमच्या वार्ताहराने आमचीही खेटराने पुजा बांधण्याचा संकल्प सोडल्याची ताजी बातमी हाती आली आहे. याचे कारण आम्ही त्याचे व्यावसाईक गुरु असल्याचे त्याने सांगीतले आहे.

गुलमोहर: 

चाफ्या Happy
जम रहेला हय Happy
चालू दे रे Happy

मित्र म्हणुन सांगतो लिखाण बंद कर. गुरु रागावलेत तुझ्यावर.

चाफ्फ्या, वरील ३ प्रकारांमध्ये गुरूपौर्णिमा समारंभ कसा साजरा केला गेला ते सुध्दा खुसखुशीत शैलीत दिले असतेस तर अजून मजा आली असती. उदा. त्या लव्हगुरुंनी काय संदेश दिला, काय गुरुदक्षिणा घेतली इ. मधून गुरु व शिष्य दोन्ही बाजूनी लिहिता आले असते. अर्थात हे सगळे खूप मोठे लिखाण झाले असते पण मग अशा वेळी एकच प्रकार घ्यायचा.
मला स्वतःला एक ओळसुध्दा लिहीता येत नाही आणि तुला शिकवतेय. बघ झाले कि नाही मी पण ४थ्या प्रकारची गुरू (लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण) Proud

आयला लई भारी........ एवढे दिवस वाचले नव्हते म्हणुन लई पश्चाताप झाला.

अरे हे पण मस्त. मी कसे मिसले हे??