काल म्हणे व्हॅलेंटाईन डे होता. मला माझा 'बर्थ डे' लक्षात नाही रहात तर असले कसले कसले 'डेज' काय लक्षात रहाणार? इतर सामान्य दिवसांप्रमाणेच मी निवांतपणे घरी आलो. पण निवांतपणा घरी येण्यापर्यंतच्या वाटचालीतंच! घरी आल्यावर मात्र धाबं दणाललं! एक तर रविवार होता हे तरी कुठे माझ्या डोक्यात! आमच्या 'सौ' घरीच होत्या. मी सवयीप्रमाणे येताना खिशात 'चपटी' घेऊन आलो. पुढच्या संकटाची मला काय कल्पना!
घराच्या दारातंच आमच्या 'सौ'नी आमचं सुहास्य वदनाने स्वागत केलं. दार बंद केल्या केल्या तिने मला मिठीच मारली. मी अक्षरशः गुदमरून गेलो. शरिराने आणि मनाने ही! असले धक्के पचवायची सवयच नव्हती ना! तिनी मला मिठी मारली आणि चित्कारली; "हॅप्पी व्हॅलेंटाईन डे". मी पण कसंबसं "सेम टू यू" म्हणून माझी सुटका करून घेतली. पण एवध्यात विजेचा झटका बसावा तशी ती माझ्यापासून दूर झाली. मी मला बसलेल्या धक्क्यातून सावरत स्वयंपाकघरात गेलो. खिशातली 'चपटी' काढून टेबलवर ठेवली आणि पुढच्या तयारीला लागलो. पाच मिनीटं झाली... दहा झाली... पंधराही झाली... पण 'ती' मात्र गायबंच! मी अस्वस्थ झालो. तिला शोधायला म्हणून बेडरूममधे गेलो तर बाईसाहेब 'भाऊसाहेबांची बखर' वाचत होत्या. मला 'कार्यक्रम' सुरू करण्याआधीच चक्कर आली. 'बँकींग अँड फायनान्स'मधल्या तज्ञ (अर्थातंच इतर सगळ्यात अज्ञ) आमच्या 'सौ' भाऊसाहेबांची बखर वाचतायंत? 'जैसे भडभुंजे लाह्या भाजिताती; किंवा विद्युल्लतापात होतो तैसा धमाका जाहाला;' हे जर तिनी वाचलं तर तिला त्यातलं काय कळेल? तिला ना भडभुंजा माहित ना लाह्या! विद्युल्लता ती समजू शकेल; पण तिला पात कुठून आली? तिला फक्त कांद्याची पात माहिती!
मी चक्रावून गेलो. नक्कीच तिला माझ्या मदतीची गरज असणार हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे आपल्या ज्ञानाची क्षितीजं रुंदावण्यासाठी जरी तिनी बखर हाती घेतली असेल तरीही मजकूर समजावून देण्यासाठी तिला माझी गरज असणार आणि 'डोक्यावर परिणाम' होऊन काहीतरी करायचं म्हणून तिने ते पुस्तक हातात घेतलं असलं तरीही ते भरकटलेलं डोकं जागेवर आणण्यासाठी; म्हणजे दोन्ही शक्यतांमधे सत्य एकंच होतं. 'तिला माझी गरज होती!' ही काळाची गरज ओळखून मी तिच्याजवळ गेलो. तिच्या केसातून हलकेच हात फिरवला. (तिला तिच्या लांबसडक केसाचा प्रचंड अभिमान आहे. तिचं डोकं फिरल्यावर तिच्या केसांचं कौतूक केलं की अर्ध्याहून अधिक काम फत्ते होतं ही अनुभवाची शिकवण!) पण तिने हातातलं पुस्तक टाकून दिलं आणि दुसर्या हाताने माझा हात झिडकारला. झुरळ झटकावं तसा!
"जा तिकडे. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये." इति सौ.
मी कशातरी मिन्नतवार्या केल्या. दाराशी अनपेक्षितपणे 'प्रेमळ' स्वागत करणार्या बायकोचा पापड मोडला कशामुळे हेच मला कळेना.
"तुझ्या खिशात कायाय?"
"म्हणजे काय बालकानू?" (आम्ही प्रेमाने एकमेकांना बालक म्हणतो.)
"आपलं नेहेमीचंच..."
"आज पण?"
मी गोंधळलो. 'आज पण' म्हणजे काय? आज काय विशेष आहे? मी डोकं खाजवायला लागलो. आज काय तिचा वाढदिवस... लग्नाचा वाढदिवस...आहे काय आज? माझंच डोकं भणभणलं.
"बलकानू आज पण म्हणजे?"
पराभव तर पत्करायचा नव्हता. पण बायकोचा राग तर काढला पाहिजे. माझा एक केविलवाणा प्रयत्न.
"गप्प रहा. आज कायाय?"
"तू सांग"
"मी मगाशीच सांगितलंय. तरीही तुझ्या लक्शात नाही ना?"
माझ्या डोक्यात ट्यूब पेटली.
"आज व्हॅलेंटाईन डे. आय लव यू अ लॉट बालक"
आता शब्दांचे खेळ करणं हा डाव्या हातचा मळ.
"एवढंच? माझं गिफ्ट कुठाय?"
डोक्याला मुंग्या... पण 'माघारी वळणे नाही मराठी शील!
"गिफ्ट? हे काय तुझ्या समोर उभ आहे. या पेक्षा कुठलं मोठं गिफ्ट तुला हवंय?"
"ते तर आहेच आयुष्यभर पुरलेलं. पण तुला आठवतय? मुंबईला असताना तू पहाटे दादरच्या मार्केटमधे जाऊन गुलाबाची फुलं घेऊन सकाळी सात वाजता माझ्या घरी आला होतास. एक वर्ष राधाकृष्णाची मूर्ती; एकदा एलेफंटाची ट्रिप आणि एकदा छानसं ग्रिटिंग...
बायकोनी बाऊन्सर टाकला आणि मे बधीर... खरं तर तेव्हा तोंडावर आलं होतं सांगायचं की तेव्हा लग्न व्हायचं होतं. पण त्यामुळे अजून आगीत तेल... शब्द आतल्या आत गिळले. पण उत्तर काय द्यायचं? मी शांतपणे ओठावर बोट ठेऊन गप्प बसण्याची खूण करून आतमधे गेलो. कदाचित ती या आशेवर असेल की यानी आठवणीने काहीतरी गिफ्त आणलं असेल आणि उत्कंठा ताणण्यासाठी 'रोमँटिकपणे' मुद्दाम उशीर करत असेल. काय असेल ते असो! मी निवांत आत गेलो. पेग भरला. फुटाणे खिशात टाकले. द्राक्षाचा घड हातात घेतला आणि परत आलो. ग्लास टेबलवर ठेवला आणि लॅपटॉप चालू केला.
"बालक्स काय करतोयस तू?"
"तुझं गिफ्ट"
"लॅपटॉपमधे?"
"येस"
आता गोंधळण्याची पाळी तिच्यावर होती. मी लॅपटॉप चालू केला.
"बालकानू ऐक; या माझ्या तुझ्याबद्दलच्या भावना..."
मी गाणं सुरू केलं. आमच्याकडे गाणं ऐकणं हा एक कार्यक्रम असतो. बँकांचे नफे- तोटे आणि शेअरबाजारातले चढ-उतार यामधे सदैव पैशात लोळणार्या माझ्या बायकोला प्रत्येक गाण्याचा; म्हणजे त्यातल्या शब्दांचा आणि स्वरांचा अर्थ समजावून द्यावा लागतो.
तर आमचा 'व्हॅलेंटाईन डे स्पेशल' कार्यक्रम सुरू झाला. सतारीचे सूर छेडले गेले आणि
"फिर छिडी रात बात फूलों की..." सुरू झालं.
मी अर्थातच अर्थ समजावून देत होतो. बायको खूश होत होती. तिचा राग निवळला. मला मिठीत घेऊन तिने माझा एक गोड पापा घेतला. नंतर अनपेक्षितपणे ती उठली. परत ते गाणं लावलं आणि ते ऐकता ऐकता काही तरी लिहून घ्यायला लागली. मी विचारलं तर मला गप्प बसण्याची खूण केली. मी निर्धास्त होतो. बायकोचा राग गेला होता. मी अंगावर चादर ओढून झोपी गेलो.ल
अचानक पक्क्न पेकाटात लाथ बसली आणि मी जागा झालो. समोर आमच्या 'सौ' उभ्या! अतिशय तिरसटलेल्या स्वरात त्या उद्गारल्या;
"हॅप्पी व्हॅलेंटाईन डे काय? आप का साथ साथ फूलोंका आणि आप की बात बात फूलों की काय?"
'सौं'नी तिरस्काराने एक कागद माझ्यासमोर फेकला. त्यावर लिहिलेलं होतं...
'रात है या बरात फूलों की'
'शाम फूलों की रात फूलों की'
'आप का साथ साथ फूलों का'
'आप की बात बात फूलों की'
'रोज निकलेगी बात फूलों की'
माझं वाचून होतय ना होतय तोच सौ फुत्कारल्या;
"तुझे शब्दांचे खेळ मला नवीन नाही राहिले. एकंच मला सांग; तुझं हे फूल मराठी, हिंदी की इंग्लिश?
मी अवाकच!
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!!!
असाही एक 'व्हॅलेंटाईन डे'
Submitted by tilakshree on 15 February, 2010 - 07:45
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
(No subject)
सही रे !
सही रे !
बाकी लवकर ट्युब पेट्ली तर
बाकी लवकर ट्युब पेट्ली तर बायको कसली
(No subject)
तुझं हे फूल मराठी, हिंदी की
तुझं हे फूल मराठी, हिंदी की इंग्लिश>>>>>
(No subject)
मस्त आहे...
मस्त आहे...:-)
ROFL .. . खरं तर तेव्हा
ROFL .. .
खरं तर तेव्हा तोंडावर आलं होतं सांगायचं की तेव्हा लग्न व्हायचं होतं.>> इस बात पे जित लिया
(No subject)
मस्त!!
(No subject)
(No subject)
मस्तच..
मस्तच..
मस्त लिहिलंय!
मजा आली.
मजा आली.
(No subject)
(No subject)
लयच भारी....... काही गोष्टि
लयच भारी....... काही गोष्टि प्रातिनिधीक
आम्च्या सौ. ला एके काळी व्ही डे ला लॅपटॉप (मांडीवर?) घेवून दिला. त्या नंतर माझ्यापेक्षा त्या मठठ्याची काळजी तीने अधिक घेतली होती.. जरा काही बोट उमटल त्याच्यावर तरी माझ्याकडे बोटं करायची. काळाच्या ओघात (काळ हे सर्वावर औषध असतं अगदी पटलं) आमच्या २ वर्षाच्या छकुलीने त्या लॅपटॉप च्या एक एक कीज मोडल्या किव्वा उचकटल्या, ईतक्या की आता तो तीचा खेळण्याचा लॅपटॉप झाला आहे अन त्यावर तीचे आवडते व्हिडीओ तीच लावून बघते - एका वेळी स्पेस बार, आल्ट, शिफ्ट, एन्टर असले भन्नाट की बदडून ती हवे ते व्हिडीओ लावते... मी त्याचा नाद सोडून दिला आहे.
पण सौ. ला किती कौतूक...... पुन्हा नविन लॅपटॉप आलाच (आणावा लागला).
लाड नक्की कुणाचे पुरवले जात आहेत हेच अलिकडे ऊमजेनासे झालेय..... पुढील व्हीडेज ना बार्बीज आणीन म्हणतोय
(खेळण्यातल्या)
मस्त
मस्त
आमच्या सौंनी यंदा
आमच्या सौंनी यंदा प्रेमदिनानिमित्त पुस्तके खरेदीकरुन माझा खिसा रिकामा केला. बाकी टिळकश्री तुमचा खणखणीत षटकार. नेहमीप्रमाणे मजा आली वाचताना. योग, बार्बीजची तयारी आत्तापासुनच करा.
मजा आली
मजा आली
(No subject)
मी कशातरी मिन्नतवार्या
मी कशातरी मिन्नतवार्या केल्या. दाराशी अनपेक्षितपणे 'प्रेमळ' स्वागत करणार्या बायकोचा पापड मोडला कशामुळे हेच मला कळेना.
वाचायला जरा उशीरच झाला.
पण लेख म्हणाल, तर फर्मास!!!
लेख छान जमला आहे .पु.ले.शु.
लेख छान जमला आहे .पु.ले.शु.