अजून अंधार पडायला खूपच वेळ होता पण उन्हं कलायला लागली होतीच. तशात थंडीचे दिवस म्हणजे अंधार लवकर आणि हवेतला गारठा वाढत जाणारा... टेकून बसल्यामुळं आणि हवेतल्या गारव्यामुळं तिला हलकीशी डुलकी लागलीच.
तेवढ्यात हळूवार पण अगदी ताकदीने मारलेल्या दोन तीन लाथा तिच्या पोटात बसल्या. दुर्लक्ष करावं असं वाटता वाटता अजून एक लाथ बसली आणि आता हे टाळणे शक्य नाही हे समजून तिने डोळे उघडले. समोरच, तो हसत हसत मस्त पहुडला होता मांडीत. तिला एकदम हसूच आलं. एवढंसं कार्टं पण बरोब्बर सगळं मनासारखं करून घेतं... एकदम लबाड पण गोड आहे. कायम हिच्याच कडेवर. तिने सारखं याच्याशी खेळायचं. मस्ती करायची... तिलाही ते खेळणं आवडलंच होतं.
तो यायच्या आधी तिला एकटीला खूप कंटाळा यायचा.
आत्ता सुद्धा जवळ एक चांदी पडली होती... तीच पकडायचा प्रयत्न चालला होता त्याचा. ते जमत नव्हतं... म्हणूनच मग त्या लाथा आणि ढुशा. मस्त वार्याच्या झुळकीमुळे छान वाटत होतं. तिने त्याला थोडं घट्ट जवळ ओढून घेतलं. टोपडं नीट केलं. पण सराईतासारखी तिची नजर आजूबाजूला भिरभिरतच होती. वेळ चुकवून चालत नाही हे तिला माहित होतं... शिवाय आत्ताशी कुठे चालू होत होता तिचा दिवस. अजून आख्खी संध्याकाळ जायची आहे.
तशात, एकदम बाजूला वेगाने पळणार्या गाड्या मंदावल्या... त्यासरशी ती उठलीच... सिग्नल पिवळा... ती भक्ष्यावर झडप घालताना शेवटच्या क्षणी संपूर्ण अंग ताठ करणार्या वाघासारखी पूर्ण फोकस्ड... पुढच्या सगळ्या अॅक्शन्स ठरलेल्या... किती वेळात सिग्नल लाल होणार... गाड्या थांबे थांबे पर्यंत किती सेकंद लागणार... सगळं सरावाचं...
सिग्नल लाल... तिने पूर्ण ताकदीने त्याच्या ढुंगणावर चिमटा काढला... तो कळवळला... आकांत सुरू...
त्याला काखेला मारून ती पहिल्याच गाडीसमोर तोंड वेंगाडून हात पसरून उभी राहिली...
(No subject)
नाही... ही लघुकथा आहे... खुद
नाही... ही लघुकथा आहे...
खुद के साथ बातां... हाय राम.
अर्र्र्र अगदीच माठ आहे म्हणजे
अर्र्र्र अगदीच माठ आहे म्हणजे मी
हाहाहा!!! आता प्रायश्चित्त
हाहाहा!!! आता प्रायश्चित्त म्हणून कथा आवडली असं म्हणा बरं ...
सिग्नलवरच्या भिकारी बायकांच
सिग्नलवरच्या भिकारी बायकांच जीवनाचा एक पैलु थोडक्यात पण ताकतीने मांडलाय .
जबरदस्त. परंतु फारच लवकर
जबरदस्त. परंतु फारच लवकर संपवली कथा.
लवकर.....? गुर्हाळापेक्षा
लवकर.....? गुर्हाळापेक्षा आवडलं थोडक्यात...
ललित वाटतय हे तर...
ललित वाटतय हे तर...
ह्म्म्म...
ह्म्म्म...
मला कथाविषय मुळीच आवडत नाही.
मला कथाविषय मुळीच आवडत नाही.
पण माझ्या आवडण्या न आवडण्याने वस्तुस्थिती बदलत नाही.
बिकादादा मस्त ! थोडक्या
बिकादादा मस्त ! थोडक्या शब्दात काळजाला हात घालणारी कथा .....
हम्म्म... सद्यपरिस्थिती
हम्म्म... सद्यपरिस्थिती
विशालदा ला १००% मोदक.
(No subject)
हम्म्म्म.. बिचारी..
हम्म्म्म.. बिचारी..
बिचारं बाळ
बिचारं बाळ
छान ....
छान ....
छान आहे...
छान आहे...
चित्र छान उभ केल आहे.
चित्र छान उभ केल आहे.