निरोप समारंभ

Submitted by आर्च on 12 January, 2010 - 21:48

" ज्युलीचा कर्फ्यू रात्री अकराचा होता. त्याप्रमाणे तिला तिच्या घरी सोडलं. माझा कर्फ्यू रात्री बाराचा. त्यामुळे खरं तर घरी जायला पाहिजे होतं. मनात विचार आला जरा मित्रांबरोबर टाईम पास करावा बर्‍याच दिवसात त्यांच्याबरोबर वेळ मिळालाच नाही. घरी जायला उशीर झाला तरी किल्ली आहेच. मांजराच्या पावलांनीही घरात जायची गरज नाही. मॉम आणि डॅड जन्मतःच पूर्ण बहिरे असल्यामुळे त्यांना आवाजावरून वगैरे पत्ता लागायचा प्रश्णच येणार नाही. त्यामुळे मी रॉबर्टकडे सगळे मित्र जमलेले कळल्यामुळे त्याच्या घरी गेलो. मस्तीत आणि गप्पात वेळेच भान राहिलं नाही आणि घरी पोहोचायला रात्रीचे दोन वाचले. शीळ घालत घराच दार उघडून माझ्या खोलीत आलो. मॉम, डॅड्ला जाग यायच कारणच न्हवत. खोलित आल्यावर दिवा लावला आणि पहातो तो मॉम माझ्या बिछान्यात झोपलेली. झालं I was grounded for next two months" जॉन आईच्या फ्युनरलच्या युलजित बोलत होता. तोंडाने बोलत होता आणि हाताने साईन लँग्वेज चालू होती. जास्त करून काँग्रीगेशनमधले लोक बधीर होते. आईच्या आठवणी सांगत होता. त्यानंतर त्याचा मोठ भाऊ बोलला आणि शेवटी त्यांच्या पॅस्टरने इतका सुंदर निरोप दिला न जॉनच्या आईला. वातावरणात दु:खाचे उमाळे न्हवते की उसासे न्हवते. मेरीच्या आयुष्याचा आढावा घेतला, तिच्या सोबत घालवलेल्या क्षणांच्या सगळ्यांनी आठवणी काढल्या आणि तिच्या आयुष्याच सेलिब्रेशन साजरं केलं. मेरी वयाची ८१ वर्ष मनापासून जगली आणि त्याचा आनंद देतच जगाचा निरोप घेतला.

जॉन माझा डिरेक्टर. दोनच दिवसापूर्वी त्याच्या वडिलांना बाहेरून आल्यावर त्याची आई बेडरुममध्ये कोलॅप्स झालेली दिसली, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवलं पण ब्रेन डेड समल्यावर घरातल्या सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला लाईफ सपोर्ट काढून टाकायचा. वडिलांच सहकार्य महत्वाच होतं. ६५ वर्षांच सह्जीवन होतं न.

फ्युनरलच्या दुसर्‍या दिवशी जॉन कामावर हजर. अ‍ॅक्सेप्टन्स अवघड असतं पण.........

गेल्यावर्षी रोझीची ९० वर्षाची आई, नेसा, गेली. रोझी आफ्रिकन अमेरीकन. चार वर्ष आई पूर्ण अलझाईमरची पेशंट होती त्यामुळे नर्सींग होममध्ये होती. रोझी ऑफीसला यायच्या आधी नेहेमी तिला भेटून यायची आणि ऑफिसनंतर तिची एक चक्कर आईकडे असायचीच. मला सांगायची, "आई कपडे आणि केसाच्या बाबतीत इतकी नीटनेटकी असायची न, त्यामुळे सकाळी येताना तिचे केस विंचरून येते आणि तिचे कपडे चेक करते आणि रात्री तिला नाईट क्लोज घालून घरी जाते. आपण असं रोज गेलं न की नर्सींगहोमवालेपण नीट लक्ष ठेवतात ग तिच्यावर". नेसाच्या फ्युनरलच्यावेळीसुध्दा तिच्या लाईफ्च सेलिब्रेशन होतं आणि अगदी इनहिबिशन न ठेवता पॅस्टरच्या निरोपसमारंभाच्या भाषणात आलेले नेसाचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक त्याला व्होकल साथ देत होते. सगळं काँग्रिगेशन निटनेटके फॉर्मल कपडे घालून आलं होतं. हा त्यांचा नेसाला शेवटचा निरोप होता न. नेसाच्या आयुष्याच्या मेमरीज इतक्या सुंदर शब्दात तिच्या मुलींनी आणि नातवंडांनी पॅम्फ्लेटमध्ये दिल्या होत्या न की मलासुध्दा वाटल माझी किती दिवसांची ओळख होती तिच्याशी. मी अजूनही जपून ठेवलं आहे ते.

दोन्ही वेळचे निरोपसमारंभ पाहून मनात आलं..

वासांसि जीर्णानी यथा विहाय
नवानि ग्रुण्हाति नरोSपराणि |
तथ शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देही |

ह्या श्लोकाचा मतितार्थ त्यांना गीता माहित नसूनपण समजला होता.

गुलमोहर: 

आर्च!! मन भरून आलं.. आपल्यात ही असा निरोप समारंभ व्हायला हवा नै?? आपल्याकडच्या निरोप समांभाला थोडं भेसूर,गूढ स्वरूप येतं नै?? मी तर त्या भीतीपायी आजपर्यन्त एक ही अटेण्ड नाही केला.. माझ्या आईदादांचा ही नाही.. म्हणून मीही तू जसा वर्णन केलास ना तसा निरोप दिला त्यांना,'मनातल्या मनात' आणी मनात त्यांच्या आठवणी जपून ठेवल्यात व्हर्चुअल पॅम्फ्लेट मधे..

कठीण आहे असा निरोप देणं. पण माझ्या अगदी जवळच्या नातेवाईकाला तिच्या मुलींनी अगदी शांतपणे निरोप दिला होता. त्या cancer ने गेल्या. त्यांच्या मुलींनी डोळ्यात एक टीपुसही येऊ दिला नाही. पण ईतर जवळच्या नातेवाईकाना उदा. बहिणी अश्रु आवरत नव्हते.

खरच ग वर्षू. माझे आई आणि बाबा गेले तेंव्हा मी इथे होते. माझी आई आम्हाला खूपदा सांगायची, " मी माझं जीवन भरून जगले आहे. धड्धाकट असताना देवानं न्याव हीच प्रार्थना आहे. कोणतीही दिनचर्या किंवा व्यवहार मी गेले म्हणून बदलायचे नाहीत. माझ्या जाण्यामुळे कशात अडचण आली तर मला वाईट वाटेल." श्राध्द वगैरेवर तिचा विश्वास नव्हता. त्यामुळे आम्ही तिचं म्हणणं पूर्ण जपलं. जास्त परत कधीतरी.

वत्सला, तुलापण लिहीन काही. धन्यवाद.

छानच लिहिलं आहेस ग.
मी माझ्या एका कलिगच्या फ्युनरलला असाच अनुभव घेतला. ती कॅन्सरने गेली ५२ वय Sad
आणि एक मला आवडलेली गोष्ट, आम्ही सर्वानी तिच्या family साठी contribution जमा केले.
तिच्या फॅमिलीने ते सर्व तिच्या स्म्रुतीसाठी कॅन्सर हॉस्पिटलला देणगी द्यायला सांगितले.
तिचं जगणं, आजार आणि अपरिहार्य म्रुत्यु स्विकारणं पाहून मलाही वाटायचं - न वाचता हिला गीता समजली.

उत्तम लेख. खरा निरोप देण्यात वरषे जातात. पण ह्या रिच्युअल्स ने एक क्लोजर मिळते.

माझं जीवन भरून जगले आहे. धड्धाकट असताना देवानं न्याव हीच प्रार्थना आहे. कोणतीही दिनचर्या किंवा व्यवहार मी गेले म्हणून बदलायचे नाहीत. माझ्या जाण्यामुळे कशात अडचण आली तर मला वाईट वाटेल." श्राध्द वगैरेवर तिचा विश्वास नव्हता. त्यामुळे आम्ही तिचं म्हणणं पूर्ण जपलं.> अगदी अगदी.

अजून लिहीत जा की.

संयतपणे निरोप देणं मागे राहिलेल्यांसाठी कठीण असलं तरी गेलेल्यांसाठी पुढचा प्रवास सोपा करत असेल का असं वाटून गेलं. लेख आवडला आर्च !

आर्च लेख आवडला.
मी परवा असाच एक निरोपसमारंभ अटेंड केला होता. मधोमध कॅस़केड त्याच्या आजुबाजुने फुले -बुके वर एका मोठ्या स्क्रिनवर तिचे लहानपणापासुनचे फोटोजचे स्लाइड शो. तिथे असे वाट्लेच नाहि की हि शोक सभा आहे. एकदम वेगळा अनुभव.

सॅम,

वासांसि जीर्णानी यथा विहाय
नवानि ग्रुण्हाति नरोSपराणि |
तथ शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देही |

ज्या प्रकारे माणूस जुने वस्त्र त्याग करून नवे वस्त्र परिधान करतो,
त्याच प्रमाणे तो जुने (जीर्ण झालेले) शरीर त्याग करून नवे देह प्राप्त करतो.
शरीर हे अमर नाही, त्यातला आत्म्या अमर अविनाशी आहे ... (गीता)

छान लिहिलय आर्च. मलाही इथली ही प्रथा आवडते. अर्थात इथे प्रत्यक्ष मृत्यूची घटना आणि व्युविंग/फ्युनरल यात २-३ दिवसांचा अवधी असतो. जवळच्या माणसांना शोक करायला खाजगीत वेळ मिळतो. आपल्याकडे असे काही शक्य नसते.

छान लिहिलं आहेस.

आमच्या शेजारच्या अजोबांना अनेक विधींनी ग्रासलं आहे. आजीबाई भेटल्या की अर्थातच अजोबांच्या तब्येतीची बोलणी होतात. सहसा दोघे अगदी आनंदी असतात आणि आजरपणाचा बाऊ करत नाहीत. एक दिवस बोलता बोलता एकदम म्हणाल्या, आता मी फक्त त्याच्या शांत वेदनारहीत मरणासाठी प्रार्थना करु शकते. डोळ्यात पाणी नव्हते, अगदी शांततेत बोलत होत्या. मलाच इतके ढवळले पोटात Sad दोघांनी अर्थातच अंतिम संस्काराची सर्व तजवीज करुन मुला/नातवांना सांगुन ठेवली आहे.

जोडप्याची नावं फ्रँक-मरी आहेत Happy

हैतीच्या भूकंपात तसेच सुनामीमध्ये जे एकदम खूप लोक वारले त्यांना कोणत्याही रिच्युअलशिवाय, तसेच
प्रॉपर इ॑क्विपमेन्ट चा अभाव व बॉडी खराब होतील म्हणून शॅलो ग्रेव्ह्ज, मास ग्रेव्ह्ज मध्ये गड्बडीत दफन केले गेले आहे. अगदी बुल्डोझर ने बॉड्या उचलून! याचे मला अतिशय वाईट वाटते आहे. आजच्या आपल्या रात्रीच्या प्रेयर्स मध्ये क्रुपया त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल याचा समावेश करा. त्यांना आपल्या प्रेमाची व सहानुभूतीची गरज आहे. असे संसार व जीवनातून अकाली गेलेल्यांचे आत्मे कधी मोक्ष पावतील? आपणच त्यांना सन्मनाने त्यांना पुढील प्रवासासाठी निरोप देउ या.

अगदी मिशनरी वाट्ले का? तर क्षमस्व.

अश्विनी अगदी. रोज टिव्हिवर बघुन जीव तुटतो. शेवटी त्यांची काय चुक होति म्हणुन त्यांना असे मरण यावे? फारच विदारक.