सु (?) संवाद...... कवी आणि नवकवी

Submitted by कौतुक शिरोडकर on 6 December, 2009 - 03:17

(माझ्या मुलाचा आवडता कार्यक्रम म्हणजे नवकवीचा प्रवेश. 'पप्पा, तुम्हीपण असं लिहून पाठवा, म्हणजे ते लोक आपल्याला बोलवतील. मग मला सुनीलकाकांना भेटता येईल.' माझ्यासारख्याला त्याने अशी चावी द्यायला नको होती. पुढे जे आहे ते असल्या चावीचं फलित आहे. बघा, झेपतय का ते ? )

(एक विचारात पडलेला कवी. हातात वही व पेन. पेनाने डोके खाजवत शुन्यात नजर लावून येरझारा मारतोय.)

नवकवी : (प्रवेशून) हे काय, आज माझ्याआधी बकरा हजर
कोंबड्याच्या कानात घड्याळाचा गजर
कवी : (नवकवीला पहाताच) सापडली...सापडली...
नवकवी : हा तर मेला आंधळा दिसतोय
बेधडक माझा लिगंबदल करतोय.
सापडली नाही... सापडला.........
अहो, वाटत नसलो तरी मी पुरूष आहे.
नवकाव्याचा एवरीडे उरूस आहे
कवी : सापडली म्हणजे मला कविता सापडली हो.
कैवल्याचे मुर्त चांदणॆ
पदरावरती कोरीव लेणे
उंबरठ्याला तुझी पैंजणे
सुरेल जाहले माझे गाणे
नवकवी : अहो, तुम्ही कवी आहात, रात्रीचे रवी आहात
की शिळ्या पदार्थांच्या चवी आहात ?
कवी : मित्रा, मी फ़क्त कवी आहे
नवकवी : आणि मी नवकवी आहे. घ्याना....
कवी : (दचकून) काय ?
नवकवी : ऐकून घ्याना.. माझी कविता
घरचे कावळे उडून गेले
चिमण्यासाठी रडून गेले
चालता घोडे अडून गेले
बिळात उंदीर दडून गेले
आंबे बागेत सडून गेले
नको नको ते घडून गेले
आकाशातून पडून गेले
सारे चांदणे झडून गेले
काही जण इकडून गेले
बाकी सगळे तिकडून गेले
कवी : ही कविता होती ? कावळे, चिमण्या, उंदीर, घोडे वगैरे...तुमचं घरगुती प्राणीसंग्रहालय आहे
का ?
नवकवी : सर्वसमावेशक नवकविता होती. आंबे, आकाश, चांदणेही होते. आता दुसरी ऐका.
आयजीच्या जीवावर बायजी उदार
अपक्षांच्या टेकूवर आघाडीची मदार
निवडणूक येता नेते होती लाचार
नटनट्या जमवून करतात प्रचार
गेंड्यांची कातडी, वर खादी उधार
तोंडी लावायला थोरांचा उद्धार
खुर्चीपुरता करती लोकांचा विचार
सगळे मिळून घालती देशाचं अचार
कशी वाटली ? सध्याच्या राजकारणावर होती.
कवी : याला कविता म्हणतात ? अरे, कविता कशी असावी ?
कौमुदीसम मोहना अशी हासली
तुषारासम थिरकून गेली ती
मनीय देह जणू वसंतसेना
शिशिरास बहरवून गेली ती
रोमरोमात भिनला सुगंध असा
वरून प्राजक्तापरी गेली ती
नककांती शृंगार साजरा
सात प्रीतीच्या भिजवून गेली ती
याला कविता म्हणतात
नवकवी : शब्दबंबाळ. शब्दबंबाळ..नुसता शब्दांचा सोस.
प्रेम, उपमा अलंकारांचा केवढा ओवरडोस
तुम्ही कवि स्वप्नातून बाहेर कधी येणार ?
तुमच्या कविता सांगा, कधी प्रॆक्टीकल होणार ?
ही ऐका.
सुख म्हणजे मराठी माणुस.
आपल्या आपल्यात राहणारा
स्वत:पुरता जगून स्वत:पुरता पाहणारा
दु:ख म्हणजे भैया
आपल्या लोकांना धरणारा
स्वत:बरोबर आणखी शंभर भैय्यांना आणणारा
सुख म्हणजे मराठी माणुस.
जवळ जवळ असूनही
जरा जवळ न येणारा
दु:ख म्हणजे भैया
नको नको म्हणताना
चोहीकडून गुरफ़टणारा
सुख म्हणजे मराठी माणुस.
कायम दूर राहणारा
पार्ले, गोरेगाव सोडून
विरार, डोंबिवलीला धावणारा
दु:ख म्हणजे भैया
दुरून घरात येणारा
घरच्यांना बाहेर काढून
स्वत:चं बस्तान मांडणारा
कवी : बस.. कविता कशाला म्हणतात तुम्हाला काय माहीत ?
नवकवी : कवी म्हणवता स्वत:ला आणि नवकविता कळत नाहीत ?
कवी : हे फ़ार अती होतय... कवितेच्या नावावर तुम्ही काहीही खपवताय.
ट ला ट जुळवून कविता बनवताय.
नवकवी : अरे वा! तुम्हाला पण जमलं, पण तुम्ही तरी सांगा, वेगळं काय करताय,
'अरे'च्या मागे कशाला कारे चिटकवताय ?
कवी : कविता म्हटली की त्यात रस हवा, रुपक हवं.
नवकवी : गमक नसलं तरी, त्यात पर्फ़ेक्ट यमक हवं.
कवी : कवितेला लय हवी, ताल हवा, चाल हवी
नवकवी : उद्या म्हणाल, रानातल्या घोड्याला पण नाल हवी.
कवी : यात आता हा घोडा कुठे मध्येच आणलात ?
नवकवी : तुम्ही नाही का कवितेत जुनाच मसाला घातलात.
कवी : हे बघा, तुम्ही कवितेचा दर्जा घसरवताय.
नवकवी : हे बघा, तुम्ही नस्त्या अफवा पसरवताय.
कवी : तुम्ही लोक म्हणजे साहित्यातले अतिरेकी आहात.
नवकवी : माहीत नसेल तर सांगतो, तुम्ही आमच्यापैकी आहात.
कवी : साहीत्यसंमेलनात तुम्हाला कोणी विचारत नाही ?
नवकवी : म्हणून तर संमेलनात सगळ्या खुर्च्या भरत नाही.
कवी : तुमच्या नवकवितेला काही भविष्य तरी आहे का ?
नवकवी : सकाळचा पहिला चहा अजून उकळतोय, पाहीलात का ?
.
..
...
....
.....

(हे असचं चालत राहणार. याला अंत आहे का ? )

गुलमोहर: 

jabardastt....

Lol
मस्त !!

कौ-मुदीसम मोहना अशी हासली
तु-षारासम थिरकून गेली ती
क-मनीय देह जणू वसंतसेना
शि-शिरास बहरवून गेली ती
रो-मरोमात भिनला सुगंध असा
ड-वरून प्राजक्तापरी गेली ती
क-नककांती शृंगार साजरा
र-सात प्रीतीच्या भिजवून गेली ती

व्वा!!

शरद

मस्त ! Lol

शब्दांना घेऊन कवे
फक्त त्यालाच त्याच्या शब्दांचा विचित्र अर्थ गवे
तो न- वकवि.

>>>>कौमुदीसम मोहना अशी हासली
तुषारासम थिरकून गेली ती
कमनीय देह जणू वसंतसेना
शिशिरास बहरवून गेली ती
रोमरोमात भिनला सुगंध असा
डवरून प्राजक्तापरी गेली ती
कनककांती शृंगार साजरा
रसात प्रीतीच्या भिजवून गेली ती
याला कविता म्हणतात

वाह वाह Happy
-------------------
>>>दु:ख म्हणजे भैया
आपल्या लोकांना धरणारा
स्वत:बरोबर आणखी शंभर भैय्यांना आणणारा
सुख म्हणजे मराठी माणुस.
जवळ जवळ असूनही
जरा जवळ न येणारा

हाहाहा

मजा आली.