चक्र/वर्तुळ भाग ३

Submitted by कविन on 25 December, 2009 - 02:06

 http://www.maayboli.com/node/4994 चक्र/वर्तुळ भाग १
http://www.maayboli.com/node/5680 चक्र/वर्तुळ भाग २

------------------------------------

"Passengers your attention please....."
"यात्रीओसे निवेदन है..."
"प्रवाशांनी कृपया इथे ..."
अस तीन भाषांतुन ओरडत निवेदिका, गाड्या आज पण लेट असल्याच अनाउंस करत होती.....आणि मी वेडया सारखी स्मी ची वाट बघत उभी होते.."

आत्त्ताच ह्या स्मी चा फोन बंद पडयला हवाय...?

नशीब लागला एकदाचा..हॅलो...

"स्मि.. कुठे आहेस?

"गाड्या लेट आहेत... ऐकु येत नाहीये मोठ्याने बोल्..."

"काय माहीत.. फास्ट ट्रॅकला काहीतरी लोचा झालाय यार... तू ये लवकर. लेडिज स्पेशल ने जाऊयात. नको.. नको डोंबिवली नको ती कोपर पासुन भरुन येईल आज. लवकर ये घोडे..मी ब्रीज वर उभी आहे ३-४ च्या मधे"

"डोळे कसली बंद करत्येस स्मि... फालतु गिरी नको... चल गर्दी बघ खाली, उतर भर भर लेडीज अनाऊंस केलेय..."

"स्मि इथे एक मुलुंड आहे, घाटकोपर शिफ्टिंग आहे दादरला विंडो.... इथेच ये.. आज माझे पाय खुSSप दुखतायत" "नशीब मुलुंड सिट मिळाली ते"

"कशाने काय दुखतायत? वेंधळी कुठली सॅट-संडे ला ट्रेक ला गेलेलो ना येडचाप. ट्रेक गृपचा सहावा बर्थ्डे होता. काय धम्माल केली म्हणुन सांगु..."

"आय्य आय्य .. जरा देखके जाओ ना आगे,धक्का देके चलते है.. हम भी रोज ट्रॅव्हल करते है.. हा हा तुममे तमीज है ना तो रखो तुम्हारे पास.. हमे मत सिखाओ कैसे खडा रहनेका ते..."

"अरे काय सोड ना स्मि? कशी बोलतेय ती बया? फालतुगिरी नुसती..!"

"आज च्यायला घरी आईची पण किटकिट चालु होती... फाSSलतु....."

"काही विचारु नकोस काय झाल घरी म्हणुन...? नेहमीचच्...मी ट्रेक ला गेले ना.."

"काय तर म्हणे..मनेSS...पुढच्या आठवड्यात जोश्यांकडची बघायला येतायत.. आता थोडे दिवस तरी ट्रेक बीक पुरे...हात पाय मोडुन बसाल नाहीतर चेहरा काळवंडून घ्याल उगाचच..." इति मातोश्री

"च्यायला या आईच पण फालतुच टेंशन असत हा...पुढच्या आठवड्यात येणारेत तर येऊदेत की..आता त्यासाठी मी काय मखरात गौर होऊन बसायच आत्तापासुन..."

"हसतेस काय? आ... तुझ बर आहे च्यायला कॉलेजमधेच झाल तुमच ढँन टॅन्..आम्ही ना घर के ना घाट के.. ना लव मॅरेज जमत ना अ‍ॅरेंज वाले कांदे पोहे पटत.. सगळा लफडाच साला फालतुगिरी नुसती.."

"आई ग्ग! आज जाम म्हणजे सॉल्लेड दुखतय अंग.. सगळ रॅपलिंग येतय बाहेर. हे हात बघ ..ग्लोव्हज विसरले न्यायला.. हे बघ कसे झालेत ते..."

"हम्म.. पण धम्माल केली एकदम फालतु च्यायला तुला सांगते.. एक नविन बकरा आलेला ह्यावेळी गृप मधे "धनेश" गुज्जु. आयला काय खेचलाय ना बास रे बास नुसत "धनेस्स धनेस्स स्नेक खायेगा.." म्हणुन हात धुवुन मागे लागलो त्याच्या"

"रॅपलिंग करताना काय तंतरलेय त्याची...अर्ध्यावर तसाच बसुन राहीला..म्हणे मी नाही येणार खाली तसाच वर चढु काय?.. आणि आमचा गृप माहीतेय ना तुला कसला अवलिया आहे म्हणे चढ तू वर आम्ही जातो खाली जेवायला..ये एकटाच मग.."

"त्याला येवह्ढ सांगतोय येड्या पाय परपेंडिक्युलर ठेवायचे चिकटवुन, हातातल्या दोर्‍याला ढील द्यायची हळु हळू .. आणि मॅड कॅप पडेल कसा तो इतक नीट बांधलेल असत की दोन्ही हात सोडुन लटकलो तरी खाली नाही पडणार.."

"स्मि पण च्यायला माझी पण तंतरलेली एक क्षण असला वारा सुटलेला ना मला धीरच होत नव्हता थोडावेळ ढील द्यायचा.. आणि वरन हे पंटर लोक म्हणे आता नाही उतरलिस तर दोरच कापु वरुन म्हणुन पिडत होते"

"पण धम्माल आली यार कधी नव्हे ते ताईंच्या घरी आम्ही जमतो ना तिथे कोबी नी फरसबीची भाजी खाल्ली वेड्यासारखी.. घरी कधी बघत पण नाही मी ह्या भाज्या"

"आज माहितेय मी गजर लावुन लवकर उठले, ट्रॅकची बॅग रिकामी केली कपडे मशीनला लावले, सॉक्स धुतले... आई हळुच बघत होती..तिला समजतो असा मस्का लावलेला.. पण काय यार ट्रेक ला गेले तर काय चिडायच त्यात.."

"पुढच्या आठवड्यात दिपु माहितेय ना आमच्या गृपची तिचा साखरपुडा आहे पराग बरोबर तोही आमच्याच गृपचा. त्यामुळे आई अजुन चिडलेय्..म्हणे करा लोकांचेच साखरपुडे अटेंड करा..स्वतःच्या लग्नाच बघु नका नी आईच्या मनासारख वागु नका.."

"इरिटेटिंग रे.. काय सारख फिरुन फिरुन माझ्या लग्नावर यायचं"

"ए थांब बीप वाजतेय समस बघते कोणाचा आहे ते.."

"हे बघ सुन्याचा समस तुझी स्कुटी घेऊन जातोय वर शिव्या घातल्यान म्हणे पेट्रोल भराव लागेल आधी.."
"अग अशी बघतेस काय? जवळपास आमच्या सगळ्यांच्या स्कुटी/बाईक्स आहेत. प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या गाडीची चावी पण आहे. ज्याची फ्री असेल गाडी त्याची गाडी घेऊन निघायच्...मातोश्रींना नाही माहीत हे उद्योग्..सालंच काढतील माझी...ती मारत नाही ग पण बोलत नाही आणि मला तेच आवडत नाही...भांड्..रागव नी मोकळी हो ना हे काय बोलायच नाही म्हणजे.."

"आमच्या अड्ड्यावर भेटतो ना संध्याकाळचे किंवा शनिवारचे ते सुद्धा आवडत नाही तिला. चांगली देवळाच्या बाहेरची जागा आहे. तरी म्हणे कोणी बघितल तर विपर्यास करायच ...लग्न ठरायचय तुझ..तिच तिच रेकॉर्ड लावते"

"आय नो यार तिला काळजी वाटते माझी..आय लव हर टु.. बघु आज तिच्यासाठी एक सरप्राईझ ठेवुन आलेय.."

"चल बाय माटुंगा गेल, तू नीघ संध्याकाळी भेट मी ६.०३ कल्याणला असेन..."

------------------------------------------------
"शेखर...अरे ऐकतोयस ना..? पेपर ठेव बघु बाजुला.."

"हम्म बोला... अस मोघम नको बोलुस्..लक्ष दे मी काय म्हणतेय त्याकडे.."

"मला खुप काळजी वाटते रे मनुची..."

"का काय का? लहान नाही समजतय म्हणुन तर काळजी  वाटते.."

"२८ म्हणजे आता ह्या वर्षी तरी जमायलाच हव ना तिच लग्न्..परवा दिप्तीचा साखरपुडा आहे"

"हिच्यापेक्षा लहान मुलींची लग्न ठरतात होतात नी त्यांचे आईवडील नातवंड पण खेळवतात.."

"होईल होईल काय? कोण घोड्यावरुन येणारे का न्यायला राजकुमार? प्रयत्न नकोत करायला?"

"आपण बघतोय काय? त्याने काय होणार नुसत?"

"कुठे जमवलयस का?... नाही... "
"कांदेपोहे....प्रोग्रॅम आवडत नाही"
"मेळ्याव्यात काय जायच म्हणे भाजी खरेदीला गेल्यासारख.."

"मला पटतय रे..मलाही नव्हत आवडत कांदे पोहे वगैरे पण आपल्यावेळीही होता का ऑप्शन.."

"भाषा बघ एकदा तिची..गोखल्यांच्या घरी फिट बसते का? आ...सांग ना"

"माझा फक्त तिच्या ट्रेकला कट्ट्याला विरोध दिसतो त्यामागची काळजी नाही दिसत कोणाला..."

"आता आली घरी की तुच सांग तिला समजावुन..." "कितीही मी मला तिच्या जागी ठेवल तरी नाही जमत आता मला हे...."

चल तिचा खण आवरते जरा.... नुसता पसारा करुन गेलेय सकाळी..चार कपडे काय धुवायला टाकले मशिन मधे झाली हिची काम..."

"प्रिय मॉम्स,
मला माहित होत तू माझा खण आवरायला घेणार ते.. ममा मला तुझी काळजी कळते ग्...ठिक आहे मलाही लग्न करायचय पण म्हणुन ते जमत नाही तोपर्यंत सुतक असल्यासारखच का वागायचं. जमेल की जमायच तेव्हा..तू म्हणतेस तेही बरोबर आहे माझ मी जमवल नाहीये आणि दाखवायची पद्धत आवडत नाहीये. तरी सध्या काही पर्याय देखील दिसत नाहिये दुसरा..सो चील मॉम्स्...तू म्हणशील तशी मी वागेन बस्स्..खुष्..पण प्लीज माझ्याशी अबोला नको धरुस्....यु मीन अ लॉट टु मी...लव्ह यु ममा..
मनु"

"शेखर...शेखर्...हाका मारता मारता ..खणाच्या वर ठेवलेल पत्र हातात धरुन मी नुसतीच भीजवत राहीले स्वतःला.. "
 
नविन पिढी..अवतार वेगळा भासला तरी अंतरंग तसाच आहे म्हणायचा..माझाही चष्मा बदलायला हवा आता...गेल्यवेळी आईची मदत लागली हे चक्र/वर्तुळ समजावुन घ्यायला.. आता ही मुलगीच आई झाली माझी... ह्याला उत्तर लिहायलाच हव. ऑफिसमधे तिचा फोन सायलेंट वर असतो म्हणजे कॉल करुन उपयोग नाही.... 

लॉग्ड इन करुन मी इमेल टाईप करायला सुरुवात केली....

email.png

प्रिय बिट्टू,

तुला आठवतं तू १३-१४ वर्षाची असताना आपण असेच "अबोला"धरायचो. तुला बिट्टो म्हंटलेल नाही आवडायच्...बाळा तेव्हा तुझी आजी म्हणजे माझी आई आली होती माझ्या मदतीला धावुन..
मधे काही काळ गेला अ‍ॅडजस्ट होण्यात ...मग माझा हात फ्रॅक्चर झाला...त्यानंतरच तुझ गॅदरिंग मधे केलेल भाषण्..अजुन आठवतय मला सगळ..

पण तू ग्रॅज्युएशन पुर्ण केलस, पोस्ट ग्रॅज्युएशन केलस्...मग नोकरी....त्यातच तुझे ट्रेक्स्...तुझा कट्टा...
आणि एकेक करुन तुझ्या गृप मधल्या मुलिंची लग्न ठरण्..त्यांच आई होण्...आणि तुझ वरवरन बेफिकीरी दाखवण्..हे सगळच बाळा कुठेतरी आत मला दुखवुन जायच्...जात...त्यातुनच मग तुझ्यावर चिडण होतं

वाटत्...इतकी हुषार माझी लेक्..इतकी गोड ...मग तिचच का सगळ्यांसारख सगळ मार्गी लागत नाही

अर्थात लग्न होण म्हणजे आयुष्य मार्गी लागण नव्हे हे खर असल तरी "आईच्या" मनाला चारचौघींप्रमाणे आपल्याही लेकीच व्हाव अस मनातुन वाटतच असत ग..

असो काल मी तुझ्यावर रागावले...तू माझ्याकरता म्हणुन २ घास खाऊन झोपलीस्...आज पण थोडी गुश्श्यात गेलीस्...वाटल पुन्हा एकदा माझ्या आईने याव नी मला पुन्हा एकदा कुशीत घेऊन हे सार संपवाव पुन्हा सार हसतं खेळतं व्हाव...

अर्थात आज आई नाही येऊ शकत्...पण ते गाण तू म्हणायचीस ना लहानपणी रेडिओवर लागल की...
"आई व्हावी मुलगी माझी ...मी आईची व्हावे आई..."

"खरच बाळा आज तुच माझी आई झालीस..."

"लव्ह यु बेटा....लव्ह यु ऑलव्हेज इन एनी सर्कम्स्टंसेस ऑफ लाईफ.."

टेक केअर..

तुझी

ममा म्हणुन की तुझी लेक म्हणु?
 ---------
इमेल सेंट केल आणि मी तशीच बसुन राहीले...
 
 
 
 
 

गुलमोहर: 

अगदी सुरेख
पहिला भाग खूप आधी वाचला होता
दुसरा भाग विसरला कधीतरी
आज हा भाग वाचला आणि परत सुरुवातिपासुन वाचुन काढलं
अगदीच मस्त लिहिलयं
४था भाग लवकर टाका Happy

धन्स स्मि, चिमुरी Happy

@चिमुरी -- जेव्हा जेव्हा मला निमा आणि मनु भेटतात ना तेव्हा तेव्हा मी त्यांना तुमच्या भेटीला घेऊन येतेच ग Happy

Happy ठीक आहे
यावेळेस त्यांना म्हणावं लवकर या तुमच्या भेटीला, म्हणजे मग तुम्हीही त्यांना आमच्या भेटीला लवकर आणु शकाल Happy

छान आहे Happy ,सुरुवात आवडली...
पण मला वाटत पत्र, इमेल पेक्षा थेट संवाद कधीही चांगला.. आई-वडिलांना आपल्या मुलांशी बोलायला इमेल लिहाव लागतय हे थोड वेगळ वाटल..

पण मला वाटत पत्र, इमेल पेक्षा थेट संवाद कधीही चांगला>> अगदी खरय केद्या. प्रत्येक घरी अस होतच अस नाही ना.. सगळ्यांनाच नाही जमत. अर्थात अजिबात संवाद नसण्यापेक्षा इमेल तर इमेल, पत्र तर पत्र पण संवाद मात्र हवा Happy

उत्तम मालिका, आई मुलीच्या नात्यातले भावबंध हळूवारपणे आलेत अगदी.

अवांतरः मानसी 'गोखले' की 'कुलकर्णी' ? Happy

अतिशय नाजून नातं आहे हे. हजारो वळणे येतात, या नात्यामध्ये चढ उतारही खूप असतात.
छान लिहिले आहेस.

धन्यवाद सगळ्यांनी आवर्जुन आवडल्याचे सांगितल्याबद्दल Happy

ह्यातले निमा, शेखर निमाची आई, मनु मला बर्‍याच वळणावर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या नावाने भेटत गेले

कधी "मनु" मी होते कधी मी "निमा" होते तर कधी कुणा "मनु विषयीची तक्रार करणार्‍या मैत्रिणीला समजावणारी मी निमाची आईही होते"

भाग ३ मधली मनु अशीच एका ठिकाणी माझ्या भेटीला आली. मी फक्त तिला इथे माझ्या लेखणीतुन मांडायचा प्रयत्न केला.तिच्या आईची काळजी, घालमेल वगैरे वगैरे हे थोड माझ्या आईच्या घालमेलीतुन आलेल थोड मी स्वतः आई असल्याने आलेल अस आहे.

माझ्या स्वतःवरुन आणि माझ्या आई वरुन देखील मला एक कळल मुलगी असो की मुलगा त्याच वेळच्यावेळी सगळ व्हाव अशी स्वप्न आई बघतेच बघते. ती तितकीच अस्वस्थ होते.

कवे, ही देखिल छानच!!
२८ पर्यंत लग्न न जमलेली माझीही एक मैत्रीण आहे, आणि अस सुतक त्यांच्याहीकडे असतं!! ती पार कंटाळुन गेल्येय. आणि असा कुठलाही संवाद्पण तिकडे नाही. ::(: