अतिरिक्त चरबीची गाठ

Submitted by योडी on 18 December, 2009 - 00:42

माझ्या आईला पाठीवर एक गाठ आलीय. जे.जे. ला चेक केलं. डॉक्टरने सांगितलं की ती चरबीची गाठ आहे. ऑपरेट करायची गरज नाहीय. चाळीशीनंतर येतात अश्या गाठी. काही उपाय माहीती आहेत का कोणाला ती गाठ जाण्यासाठी? शेकवलं की तात्पुरती जाते आणि नंतर परत दिसते ती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चरबीची गाठ म्हणजे लायपोमा आहे का? त्याला काही उपाय नाही. तसेच ठेवणे. त्रासाचे असेल, कुरुपता असेल ( म्हणजे दर्शनी भागावर असेल) तर सर्जरी. दुसरा पर्याय नाही.

माझ्या बाबांनी अश्या गाठीचं ऑपरेशन केलं होतं. त्यांना कपाळावर होती. २ वर्षांनी पुन्हा आली. मूळ जागेच्या शेजारीच. निरुपद्रवी असते. भिऊ नका.

mala pan hoti mi operation kele ani tata hospital madhe check karun getli.
aata parat thodi thodi diste.

माझ्या काखेत शेंगदाणा एवढी गाठ जाणवतेय हात लावल्यावर थोडी दुखतेय . १महिन्या आधी माज सिजर झालय .. ... फॅमिली dr ला दाखवलं त्यांनी अँटिायोटिक्स दिलेत ५ दिवस घेयला सांगितलय .. पण मला खूप टेन्शन आलंय

डॉक्टरने सांगितलं की ती चरबीची गाठ आहे.... माझ्याही नवऱ्याला आहेत अशा 2 गाठी.पण दिसत नाहीत. Doctor कडून तपासून घेतले आहे.मेदाच्या गाठी म्हणूनच सांगितलंय.

स्वनिक, तुमची गाठ दुखत आहे, म्हणजे काही सिरियस प्रॉब्लेम नसावा.तरीही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या.अजिबात भिऊ नका.
असे छातीपासून ते पाठीपर्यंत माझे अंग कडक झाले होते आणि गाठी सदृश वाटत होते.साधारण 3 महिने अंगावर हे दुखणे काढले.तेव्हा डॉक्टरने जे मला सांगितले आहे तेच लिहिले आहे.