'मिसळ' गटग...

Submitted by MallinathK on 7 December, 2009 - 01:40

४/१२/०९ वेळ. दु. २:४५

जेवण करुन ऑफिसला परतन्यासाठी पार्कींग मधुन गाडी काढत होतो तेवढ्यात दक्शेचा SMS आला. "Please chk ur mail and reply urgently. Also gv me jui's no if u have" ही दक्शेची स्टाईल... आधी मेल पाठवायचं नि नंतर SMS, किंवा फोन करुन सांगायचं कि रिप्लाय दे. ऑफिस मध्ये जाउन मेल पाहीला तर गटग चा होता. तारीख ६/१२ वेळ स. ९.०० मला जमण्या सारखं होतं म्हणुन हो म्हणुन रिप्लाय दिला. गटग ला येण्या जोगे मंडळी मध्ये योगेश, समिर(द रिटर्न ओफ गजनी), मंजु, स्मि, दक्स, देसाई नि मी एवढेच दिसले .

५/१२/०९ वेळ. स. ७.३०

"आज तारीख किती ? " इति मी.
"का? " माझी बायको.
"६ तारखेला सकाळी ९ वाजता, दक्शे, समिर, योगेश वगैरे आम्ही सगळे भेटनार आहोत."
"आज अजुन ५ तारीख आहे, जाल एकटेच."
"अओ... आज ५च आहे का? बरं झालं सांगितलंस नाही तर गेलो अस्तो."

५/१२/०९ वेळ. स. ९.०५

"हॅलो, कुठे आहेस रे ?"....इति मी.
"हॅलो,..... हा मल्ल्या बोल रे" .. योगेश.
"अरे आहेस कुठे तु ?"
"काही नाही रे इथंच घरी आहे..."
"ऑ... अरे येणार नाहीस का ? मी इथं संजीवनी जवळ आहे. कोणीच दिसत नाहीयत इथे. कुठं आहेत सगळे ?" Uhoh
"अरे मल्ल्या वेडा आहेस का ? दक्शे नं ६ तारखेला भेटायचं म्हंटलय ना ?"
"मग, आज ६च आहे ना ?"
"अरे ६ रविवारी आहे. आज शनिवार आहे."
"..."
"थांब मी दक्शेला फोन करतो. ......काय ते विचारतो नि तुला कळवतो."
"हं..."
.
.
.
.
.
"हॅलो, मल्ल्या अरे लेका उद्या आहे गटग. दक्शेला बोल्लो मी, तो मल्ल्या आजच येउन बसलाय तिथं संजीवनी जवळ, तर ती म्हणते मल्ल्या यप्पड आहे..."
"......" आणी माझं हसु अनावर झालं नि मी जोरात हसलो....
"हसतोयस कशाला ? तु खोटं बोल्लास का ? खरं सांग तु आला नाहीस ना.. ?"
"हो रे, मी घरीच आहे. असंच खेचायची हुक्की आली म्हणुन फोन केलेला."
"अरे लेका ती दक्शे कसली उचकलीय तुझ्यावर, म्हणे त्याला मेल सुद्धा निट बघता येत नाही का वगैरे वगैरे.."
":हाहा: थांब जरा तिची ही फिरकी घेतो..."
"बघ बाबा.."
"चल, बाय. उद्या भेटु."

"हॅलो दक्शे.... " ... मी.
"हॅलो, मल्ल्या यप्पड. गटग आज कुठंय.... उद्या आहे... तुला मेल निट वाचता येत नाही का... ?" Angry इति दक्शे.
"ए.... आज ६ तारीख म्हणुन मी आलो." :निरागस आवाजात बोलनारा बाहुला:
"बिचारा, एवढ्या सकाळ सकाळी उठुन आलास... "
"ए... बिचारा विचारा म्हणायचं नाही..."
"असं का आवाज येतोय ? काही खातोयस का?"
"हो. आलोय असाही म्हणुन म्हंटलं मिसळ खाउन घेउत."
.
.

मग इकडंचं तिकडचं बोलणं झालं. पण तिला शेवटी मलाच सांगावं लागलं की मी घरीच आहे आणी शाबुदाणा खिचडी खातोय. ती पुन्हा उचकली. आणि कदाचीत तो राग तिने ती लाटत असलेल्या चपाती वर काढला.. Proud कारण फोन ठेवता ठेवता ओरडली... ".... मल्ल्या फोन ठेव आता. माझी शेवटची चपाती गोल होत नाहीय..." Angry

६/१२/०९ वेळ स. ९.१०

"च्यायला मंजेला तर दमच नाहीय. फोन वर फोन करतेय उगाच. अन त्यात हे ट्राफिक. Angry ".... घरातुन ८.४५ ल निघुन सुद्धा हि बोंब. लवकर निघालो होतो, पण ब्रेम्हण चौकात ट्राफिक जाम. आणि कारण हि कळेना ! मग एक एक करुन हाप प्यांट वाले लेबल लावुन पळनारे येताना दिसु लागले. मग कळ्ळे की आज मॅरेथॉन आहे. या मॅरेथॉन स्पर्धकांना आजच का पळायचं होतं ? तेही मी जायच्या रुटलाच. इकडं मंजु फोन वर फोन करत होती. कसा बसा ९.३० पर्यंत नळ स्टॉप गाठला. हिचं फोन करणं काही थांबायला तयार नाही. हिची जरा खेचुत म्हणत गाडी साईडला घेतली नि कॉल उचल्ला.

"हॅलो... मल्ल्या कुठं आहेस?"....इति मंजु.
"..... The number you are trying to reach is either switched off or moved out of coverage area. Please try a....." इति मी....
"... टुँSSSSSक टुँSSSSSक "
माझं वाक्य पुर्ण व्ह्ययच्या आतच मंजेनं चक्क फोन ठेवलाच. Laugh.gif

कसं बसं हसु आवरत तिला पुन्हा ट्राय करनार इतक्यात तिचाच फोन आला परत. यावेळेस मात्र निट बोल्लो. आणि येतो म्हणत कॉल ठेवला. उशीर झाल्याने आधीच दक्श, योगेश, समिर - द गजनी रिटर्न (कारण टकलावर केस आलेत आता), विवेक देसाई, नि मंजे आले होते. देसाई नि मंजे ना मी प्रथमच भेटत होतो. ओळख पाळख करुन घेतली. सगळ्यांना मंजे चा किस्सा सांगितला... तिचा चेहरा बघनेबल झालेला तेव्हा....

समिरशी मी खुप दिवसांनि भेटत होतो. मला उशीर झाला म्हणुन माझ्यावर उचकल्यावर मी सांगीतले "अरे ते माथेरान स्पर्धे मुळे सगळी कडे ट्राफिक जाम झालंय. त्याला मी काय करनार ?". माझं बोलणं संपायच्या आधीच सगळे जोरात हसायला लागले. नंतर मंजेनं सांगीतलं की मी मॅरेथॉन च्या ऐवजी मी माथेरान बोल्लो म्हणुन. Uhoh तेव्हा माझा चेहरा बघनेबल झालेला.

सगळे गप्पा मारत मारत भागवत मिसळ गाड्यावर येउन पोचलो. जिथं आम्ही मिसळ गटगची सांगता मिसळ खाउन करनार होतो.

६/१२/०९ वेळ. स. ९.३५

"अहो, ६ मिसळ द्या." इति योगेश.
"हिहिहि.. (खरंच, अस्संच हसला तो) संपली.." ...मिसळ गाडी मालक.
"संपली... ?"
"संपली... ? कशी काय संपली ? योग्या तु काल सांगीतलं नव्हतंस का? " दक्शेचा आवाज मध्येच चढला.
झालं, पुन्हा गोची झाली. रोज १०.३० ला संपनारी मिसळ आज ९.३५ लाच संपली. Uhoh यावर दक्शे नी योगेश ची चर्चा ! नंतर शेवटी दुसरी कडे जायचं नि मिसळ खायचं ठरलं. दक्शेला भुक अनावर होत होती अन ती वेगवेगळी कारणं सांगत होती (पैकी काही... मी सकाळी नाष्टा न करता आले... काल रात्री मी कमी जेवलेय... परवा दिवसभर उपवास झाला होता.). शेवटी फायनली 'समुद्र'ला जायचं ठरलं. ६ माणसं, ३ गाड्या. योगेश, मी नि समीर ड्रायव्हर !

समुद्रला गेलो, तिथं वेटींग. दक्शेला दम कुठं निघतोय.. Proud चला ड्रायव्हर्स 'स्विकार'ला ! मला नि समिर ला ऑप्शनच नव्हता गप गाडी चालवन्या खेरीज... आणी देसाईंनाही ! मग कडमडत तिथं पोहचलो तर ते बंद... तिथं थांबुन या 'गटग'च्या मॅनेजरच्या नावाचा उद्धार केला. तेव्हा दक्शे नि योगेश, मॅनेजरपद एक्मेकांवर ढकलुन मोकळे. Uhoh शेवटी 'काटा किर्रर्र..' ला जायचं ठरलं. मग काय.... ड्रायव्हर्स.....

६/१२/०९ वेळ. स. १०.१०

'काटा किर्रर्र..' ला सुद्धा वेटींग. (तसं दक्शे म्हणतच होती की दुसरी कडे जाउ ! पण...) फायनली इथंच वेटायचं फायनल झालं. दरम्यान मंजेचं स्मीला फोन करायचं चालुच होतं. आणि स्मी काही फोन उचलत नव्हती. "महाराजांचा घोडाच अजुन उठला नसेल अजुन, जाउ दे.. !"....इति समीर. तिचा फोन आल्यावर कळ्ळं कि तिही मॅरेथॉन च्या ट्राफिक मध्ये अडकलेली नी आता संजीवनी समोर उभी आहे. पुन्हा तिला काट्याजवळ बोलवलं. ति आल्यावर उभ्या उभ्याच गप्पा रंगवुन झाल्या. स्मि ने तिच्या मुलीला सोबत आणलं होतं. तिच्या काही कामाचं निमित्त सांगुन तिने लवकरच कल्टी मारली. तब्बल २५ मी. वेटुन १०.३५ ला आमचा नंबर आला. एकाच टेबल वर ६ जण अ‍ॅड्जस्ट होउन मिसळ खायला सुरवात केली. दक्शेनं 'Before' म्हणत मिसळ खाण्या पुर्वीचे चेहरे मोबाईल मध्ये टिपुन घेतले (खाल्ल्यावर तिची स्वतःचीच स्थिती अशी झाली होती की ति 'After' चेहरे टिपुन घ्यायची विसरली :फिदी:) भुक भुक म्हणुन भुकनारी दक्शेनं चक्क दोन() पाव खाल्ले. मिसळ वर मस्तपैकी मठ्ट्याची चव तर मस्तच !!! अम्म्म्म्म्म्म्म !!! आहाहा.... सकाळ पासुन झालेली भटकंती सार्थकी लागली म्हणत बाहेर पडलो. बिल मात्र योगेश ने दिलं. आमच्या कढुन कॉन्ट्री ही घेतली नाही. Proud (पुढच्या वेळेस योगेशला बोलवायला विसरु नका रे !!! Wink )

मग थोडं पुढच्या भेटीचं ठरवायचं ठरलं. पण ट्रेक नि ट्रिप या पैकी नक्की काय ते फायनल होईना. लेडीजची स्पेशल रिक्वेस्ट ग्रुहीत धरत मी ट्रिप काढावी असा प्रस्ताव मांडला. मला नि समिरला ट्रेकला जायचं होतं (म्हंजे आहे). स्पॉट फायनली फायनल झालेत. पण दिवस नाही :(. मग पुढच्या भेटीचं आश्वासन देत आम्ही एक्मेकांना निरोपलो.

गुलमोहर: 

मल्ल्या लै भारी लिवलया Proud
मी मिसल सगळ Sad

माझी शेवटची चपाती गोल होत नाहीय >> Lol Lol
समिर(द रिटर्न ओफ गजनी), >> Rofl Rofl

किमान ते 'बिफोर'चे फोटो तरी टाका की रे...
लले... 'Before' चे फोटो दक्शेने अजुन मलाच नाही पाठवले Sad
तिने पाठवले की पाठवतो. Happy (असंही ती पाठवेलच म्हणा !)

होय गजनी ला मिसळ खाताना पहायचे आहे
अरे आता तो गजनी नाय राहीला... तो द रिटर्न ऑफ गजनी (केस रिटर्न आलेत ना Wink ) Proud

मल्ल्या,
धमाल लिहिलंस. Happy
मल्ल्या, तू सारखा 'बायकोला शाळेत सोडले' असे सांगत होतास, पण ती तिथे शिकवायला जाते, हे स्प्ष्ट करत जा. उगाच लोकांचा गैरसमज व्हायचा. शाळकरी पोरीशी लग्न केलं, असं म्हणायला कमी करायचे नाहीत. (तसं बघायला गेलं तर बायको कितीही वय झालं तरी शाळकरी पोरीसारखीच वागते म्हणा. हा सार्वत्रिक अनुभव आहे. :डोमा:)

तसं बघायला गेलं तर बायको कितीही वय झालं तरी शाळकरी पोरीसारखीच वागते म्हणा.
योग्या.... Lol
वैनिंना तुझी हि प्रतिक्रिया वाचु देउ नकोस रे बाबा.... नाहीतर तुझा पोरगा करुन त्या मास्तरीणबाई सारखं वागतील (हातात वेताची छडी घेउन Wink )

मग थोडं पुढच्या भेटीचं ठरवायचं ठरलं. पण ट्रेक नि ट्रिप या पैकी नक्की काय ते फायनल होईना. लेडीजची स्पेशल रिक्वेस्ट ग्रुहीत धरत मी ट्रिप काढावी असा प्रस्ताव मांडला. मला नि समिरला ट्रेकला जायचं होतं (म्हंजे आहे). स्पॉट फायनली फायनल झालेत. पण दिवस नाही>>>>>>>>>>>>>>>

हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ.................

तुमच काही ठरलच तर मला फोन करा Proud

दक्षे मला नाय ना बोलवलस तु?? :रागः

चांगल लिवलस.

या मॅरेथॉन स्पर्धकांना आजच का पळायचं होतं ? तेही मी जायच्या रुटलाच. >>> काय माणुस आहे रे हा Lol
मल्ली जबरदस्त लिहिलयस रे .

मल्ली, त्वाडा जवाब नही.
मला सोलापुरला बोलावुन तु पुण्यात असतोस कायरे ?
अर्थात मी सोलापुरला अजुन गेलोच नाहीय.

तुम्हाला मिसळीशिवाय काही दिसत नाही का ?
जयश्रीची मिसळ खायला वेगळं गटगं करूया रे>>>>> वेगळ खायला

द्कशे मिसळ खाते ति खाते तिही सप्पक !!!! तरिही बघनेबल चेहरा होतो तिचा....:फिदी:

>>तुम्हाला मिसळीशिवाय काही दिसत नाही का ? >>
look who's talking.... Uhoh
स्वत: (फक्त) दिड तास ऊशिरा उगवून, मोजून साडेसहा मिनिटं गप्पा मारून,
मिसळ न खाता जाणारे विचारायलेत.... Proud

अबे माथेरान मधे अडकलेले मी , मग पौड रोड वरुन एवढ्या लांबुन आले त्याच काहीच नाही Proud
वेगळ खाय्ला म्हणजे लेकीला घेऊन आल तरी तिला ही काहीतरी खाता येइल ना मग साडेसहा मिनीटात नाही निघाव लागणार Proud

मल्लिनाथा...
'विनय देसाई' तुला कुठे भेटले?...
'मॅराथॉन' (तुझ्या भाषेत 'माथेरान') धावायला आलेले का?...
कारण, मला न भेटताच निघुन गेले, म्हणुन चौकशी करतोय...

Pages