नवी मालिका - रंग माझा वेगळा!!

Submitted by मोरपिस on 3 November, 2019 - 05:05

हल्ली माणसं आंतरिक सौन्दर्यापेक्षा बाहेरील वरवरच्या सौन्दर्याकडे आकर्षित होतात. सावळा-गोरा असा भेद करू लागतात. जर एखादी व्यक्ती इतरांपेक्षा रूप-रंगानं थोडी कमी असली पण त्या व्यक्तीचं आंतरिक मन अतिशय निर्मळ असलं तरीसुद्धा त्या व्यक्तीला समाजात तुच्छतेने वागवलं जातं. बाहेरून दिसणाऱ्या सौन्दर्यापेक्षा मनाचं सौन्दर्य अधिक श्रेष्ठ असतंं अशा आशयाची 'स्टार प्रवाह' वाहिनीवर 'रंग माझा वेगळा' या नावाची मालिका काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे.

या! चर्चा करू या!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मलापण आवडली अरुंधती. तिचे सासरे पवित्र रिश्ता मध्ये अर्चनाचे वडील होते.विमल ,आजी , आजोबा सर्वांचे काम छान आहे.मुले अगदीच चम्या चमी आहेत हे पटले.त्यात एक पुनर्वसू पंतसचिव Uhoh त्याची हिरवीण तर अगदीच फालतू. मला अजिबात नाही आवडली.दुसऱ्या मुलाची बायको अंकिता आवडली मात्र

काल यातला एक तुकडा पाहिला. कोणीतरी सौंदर्या बाई (ही हिरॉइन मराठी सिरीज मधे खाष्ट रोल्स मधे असते) आपल्या मुलीला की सुनेला प्रोत्साहन देउन एक "कार्तिकी फूड्स" नावाचा उद्योग सुरू करायला मदत करते. त्याचे उद्घाटन का काय होते.

विविध टीव्ही चॅनेल्स वर ही बातमी देतात असे दाखवले आहे. किती मोठा उद्योग आहे माहीत नाही. एकतर सुरूवात केली आहे. आपल्या आजूबाजूला असे फूडशी संबंधित उद्योग सुरू होतात त्याच्या अशा कोण बातम्या देते टीव्हीवर वेगवेगळ्या चॅनेल्स वर? तुपारे मधला जयदीप इथे डॉक्टर आहे असे दिसते. त्याला युएसला जायचे आहे. बाकी स्टोरी माहीत नाही. एकूण त्याची बायको ही फूड वाली असावी. एक खत्रुट वाटणारी आणखी एक हिरॉइन आहे - बहुधा प्रेमाचा त्रिकोण वगैरे.

Aptly, या बातमी देणार्‍या एका न्यूज चॅनेल चे नाव "बी एस न्यूज" दाखवले आहे Happy

"फ्रेण्ड्स" मधे मोनिका स्वप्नरंजन करत असते की तिच्या "शेफ" म्हणून कामगिरीबद्दल पेपर मधे फ्रंट पेज वर छापून येइल. तेव्हा चॅण्डलर तिला "You really live in your own world" म्हणतो ते आठवले.

मी पण ही मालिका गेल्या आठवड्यापासून पाहतोय.
कार्तिक (डॉ) आणि दीपिका ( डाएट फूड्स) हे पतीपत्नी. सौंदर्या (हर्षदा खानविलकर) कार्तिकची आई. आधी सून न आवडणारी. पण आता पश्चात्ताप झालेली. या दोघांना दोन एकसारख्या नसलेल्या जुळ्या मुली आहेत. कार्तिकी आणि दीपिका. त्या एकेका पालकाकडे आहेत.
आता एकट्या झालेल्या कार्तिक च्या मागे कोणीतरी बाई आहे. नाव अमराठी (आएशा?)आहे. तिला कार्तिकच्या भावाच्या बायकोची साथ आहे.

दीपा केटरिंगचा उद्योग करत असावी. पण तिच्या घरी तूप नव्हतं.

झी मराठीनंतर स्टार प्रवाहच्या बघावं त्या मालिकेत एक तर फूड रिलेटेड उद्योग किंवा नायिका महासुगरण , सुगृहिणी.

कार्तिकी मला आवडते. हखाच्या साडया आणि दागिने. बाकी सगळा प्रकार अ आणि अ आहे. एका डॉचा स्वतःच्या मूल जन्माला घालण्याच्या शक्यतेबाबत कोणी गैरसमज करून देऊ शकतो हेच हास्यास्पद आहे आणि हे अचाट प्रकरण गेली दोन वर्ष तरी चालू आहे. असल्या महामूर्ख डॉच्या मागे तीन मुली आहेत. श्वेताला तो आधी आवडत असतो पण आता बहुतेक ती त्याच्या मागे नाही. नावं ठेवावी तेव्हडी कमीच.

आपल्या आजूबाजूला असे फूडशी संबंधित उद्योग सुरू होतात त्याच्या अशा कोण बातम्या देते टीव्हीवर वेगवेगळ्या चॅनेल्स वर? >>>>>>> कारण ती सौंदर्या इनामदारची सून असते म्हणून. तिचाही ' सौंदर्या कॉस्मेटिक्स" नावाचा बिझनेस चालू होता.

श्वेताला तो आधी आवडत असतो पण आता बहुतेक ती त्याच्या मागे नाही. >>>>>>> तिने त्याच्या भावाशी लग्न केलय.

भयंकर मालिका आहे. काही दिवस पळवत पाहिली होती. नायिका खुप काळी म्हणून तिची सासु दुस्वास करते व मग प्रेम करते. पण मुळ नायिका झालेली मुलगी काळी नसल्याने तिला मेकप फासुन काळी दाखवले आहे व तिच्या मेकपच्या काळ्या शेड चक्क कमीजास्त असतात. आता हॉटस्टार नाहीये म्हणून आपोआप सुटका झाली. बाकी कथेबद्दल लिहायचीही गरज नाही इतकी तीचतीच आहे.

श्वेताने भावाशी लग्न केल्यानंतर सुद्धा बहुतेक ती त्याच्या मागे होती, किंबहुना भावाशी लग्न करण्याचे कारणच ते होते असे वाटते. काळ्या शेड चक्क कमी जास्त Lol त्या आयेशाला काय मिळणारे काय माहिती या डॉक्टरशी लग्न करून.

श्वेताने भावाशी लग्न केल्यानंतर सुद्धा बहुतेक ती त्याच्या मागे होती, किंबहुना भावाशी लग्न करण्याचे कारणच ते होते असे वाटते. >>>>>>>> आईचा बिजनेस या भावाला मिळणार असतो म्हणून ती ह्यच्याशी लग्न करते.

मालिका बघू नका, पण अधूनमधून हर्षदा च्या साड्या आणि ज्वेलरी नक्की बघा. ती मस्त कॅरी करते तिचा लुक.
शी सीम्स टु बी गुड ऍक्ट्रेस, फक्त जाड आहे म्हणून तिला खूप तरुण पणी सासू चा रोल करावा लागला.

Star plus आणि प्रवाह साटंलोटं खेळतायत. इकडचा माल तिकडे, तिकडचा माल इकडे. असलीच हिंदी सिरियल चालू होतेय. अगदी तश्शीच. गोर्या पोरीला काळा मेकप करून काळी करून. ओरिजिनल काळी मुलगी का कास्ट करत नाहीत? लाज वाटते की कमीपणा वाटतो? सात फेरे मधे सलोनी होतीच की खरंच सावळी. ती सिरियल तर चांगली चालली होती.

असलीच हिंदी सिरियल चालू होतेय. अगदी तश्शीच. >>>>>>>> ऑ? ह्या सिरियलचा रिमेक आला होता ना स्टार भारतवर ' कार्तिक-पूर्णिमा' नावाने? मग पुन्हा रिमेक कशाला?

ओरिजिनल काळी मुलगी का कास्ट करत नाहीत? लाज वाटते की कमीपणा वाटतो? सात फेरे मधे सलोनी होतीच की खरंच सावळी. ती सिरियल तर चांगली चालली होती. >>> अगदी अगदी. मी सिरियल रंग माझा च्या fb पेजवर लिहिलेलं, सावळी मुलगी का नाही घेतली. सलोनी म्हणून राजश्री ठाकूर वैद्य किती चपखल होती आणि अभिनय उत्तम.

Pages