मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जयबरोबर गायत्री अगदीच ठमाकाकू वाटते, बोलतेही तशीच. जमवायची असेल तर जय मीरा जोडी तरी जमवा. मीरा बरीच बरी आहे तिच्यापेक्षा. जय मीरा फार आवडतात असं नाही, पण जय गायत्री फार ऑड.

अविष्कार मीनलबरोबर नाही बघवत, गेममधे. तोही नाहीच आवडत. मीनल आवडते मधेच मला.

सोनालीबद्द्ल सध्या काही सांगता येणार नाही पण भांडणात पुढे असली तरी इंम्प्रेसिव्ह वाटते.

शिवलीला आजारी असल्याने काही काळ ट्रीटमेंटसाठी बाहेर गेलीय, वोटींग लाईन्स बंद आहेत.

शिवलीला आहे म्हणून बाकीच्यांना बरं आहे. तीच जाईल असं वाटून सुटलेत सगळे.

"मराठी प्रेक्षकांना टेस्ट नाही". - गायत्री
‘हल्ली एक मालिका करून लोक स्वतःला सुपरस्टार समजतात' हा गायत्रीचा स्वतःलाच टोमणा होता का?

स्नेहा आविष्कार बद्दल बोलताना प्रचंड रागाने (तिरस्काराने) बोलते. एकतर खरंच भूतकाळात प्रचंड त्रास दिला असेल त्याने तिला किंवा आता तो खऱ्या गोष्टी बाहेर काढेल याची भीती वाटते आहे तिला.
अर्थात, मी हे फक्त वीकेंड एपिसोड बघून वाटले ते लिहिले.

>>मग बिबॉसने त्यालाच विनर घोषित करायला सांगितले, आणि अशी टीम ए जिंकली

तस झाल असेल तर आता मजा आहे..... प्रोमोमध्ये जय आणि गायत्री गाडीवर बसलेले दिसले त्यामुळे आता ते दोघेच कॅप्टन्सीवर दावा सांगतील आणि अश्यात जर कॅप्टन निवडायचा अधिकार टीम बी ला दिला तर जय आणि गायत्री टीम बी ला कसे पटवतायत बघायचे Wink
मीनल आणि जयची खुन्नस आहे आणि सोनाली आणि गायत्रीची खुन्नस आहे..... त्यामुळे त्या मागे हटण्याची शक्यता कमी!
विशाल जयला निवडणार नाही आणि विकास गायत्रीचे सध्या जे खटके उडातायत ते बघता तो गायत्रीला निवडणार नाही...... सुरेखाताई ज्याला निवडतील त्याच्या विरुद्ध माणसाला अविष्कारने निवडावे आणि टीम बी ने या लोकांची मजा बघत बसावी.
अर्थात बिग बॉसने त्यांना कॅप्टन निवडण्याचा चॉईस दिला तर..... पण मागच्या सीझन्सचा अनुभव बघता बहुदा बिग बॉस तसेच करतील असे वाटतेय.

आज विशाल -विकास आणि मिनल रॉक्ड :टाळ्या:
जय आणि गुबगुबीत टॉर्चर करून थकले पण विशाल विकास हलले नाहीत , विशालने विकासलाही प्रोटेक्ट केलं , मिनलने आवाज बसे पर्यन्त त्यांना सपोर्ट् केलं
विशाल फिजिकली जास्तं स्ट्राँग असला तरी विकास मुद्दे मांडण्यात , स्टँड घेण्यात जास्तं स्मार्ट आहे !
सुरेखामुळे टिम बी हरणार , एक तर तिला टॉर्चर टास्क जमल नाही वर दुसर्‍या टिमला टॉर्चर करताना काय टाकयचं नाही यावर दादागिरी, ऐकतायेत कशाला लोक हिचं ?
गायत्रीने अनॉयिंग पर्सनॅलिटीची हाइट केली आहे, स्किल्स काहीच नाहीत, पर्सनॅलिटीही नाही आणि अवाजही किती अनॉयिंग !
स्नेहानेही आज वुमन कार्ड खेळून आणि अविष्कार वर पर्सनल रिमार्क्स मारून भरपूर व्हर्चुअल जोडे खाल्ले आहेत आज सोशल मिडियावर .
बघु म.मां कोणाची शाळा घेतात यावेळी !

मागच्या वेळी weekend चा एपिसोड खूप छान झाला.... अगदी प्रेक्षकांच्या मनाप्रमाणे.... गेल्या 2 seasons सारखी partiality नाही झाली....जर weekend चे episodes असेच entertaining आणि निराश न करणारे असतील तर सगळे आतुरतेने वाट बघतील weekend ची....
Btw काल तो जय मीनलला दातांवरुन चिडवत होता... किती cheap वाटले ते... फक्त task चांगले करून जिंकता येत नाही प्रेक्षकांचं मनही जिंकावं लागतं इतकी बेसिक गोष्ट कळत नाही का यांना?

अरे त्या जय ला सांगा कोणी हा स्प्लिटविला नाही आहे, फ़क्त टास्क जिंकून विजेता होता येत नाही. जय पूर्णपणे लॉस्ट झाला आहे. जर कोणी स्प्लिटविला बघितलं असेल तर आठवा, जय ने कसे त्या गॅरी ला manupulate करून केविन कडून डंप करून घेतले होते. ते पण आधीच सर्वांसमोर सांगून.

मला गायत्री आजिबात आवडत नाही पण टास्क छान खेळली. पण हे टिम A वाले ना टास्क चे अगग्रेशन तसेच पुढे चालू ठेवतात.

जर कोणी स्प्लिटविला बघितलं असेल तर आठवा, जय ने कसे त्या गॅरी ला manupulate करून केविन कडून डंप करून घेतले होते. ते पण आधीच सर्वांसमोर सांगून.
<<
अ‍ॅक्चुअली दॅट वॉज स्मार्ट ऑफ जय पण ते खूपच स्क्रिप्टेड वाटलं !
बूमबाम गँगला बरेच फेवर्स मिळाले पण कॅट्विन गँग इतकी अनॉयिंग होती कि पब्लिकने अ‍ॅक्सेप्ट केलं Happy

मीरा ला महेश सरांनी गपगार केल्याने ती टॉर्चर करण्यात भाग घेत नाहिये. नाहीतर तिने मस्त त्रास दिला असता. मग त्रास देणारे दिसतात कोण? जय आणि गायत्री आणि तृप्ती ताई. बाकी उत्कर्ष / मीरा/ स्नेहा/ दादुस तर गप्पच आहेत. मिराने आधीच माघार घेतली आहे मला जे पटेल ते करेन अस सांगून.बाकीच्यांना आपल्या टीमने टॉर्चर करायचं आहे हे तरी माहिती आहे की नाही असे वागताहेत.मग जे सहभाग घेणार त्यांनाच लोकं नाव ठेवणार

गायत्री आणि मीरा प्रेक्षकांना टॉर्चर करताहेत. त्या दिसल्या की टीव्ही म्यूट करावा लागतोय. त्यात एकच वाक्य आवाज वाढवत चार पाच वेळा किंचाळतात.

स्नेहाला गेल्या वेळचा नेहाचा दरवाजा धक्का सीन रिक्रिएट करायचा होता वाटतं. त्यावेळी धक्का मारणाऱ्याना ( अभिजीत?)बोलणी बसली होती त्यामुळे विकासालाही त्यांचं टेन्शन आल्यासारखं दिसलं.

स्नेहा अविष्कारला टोमणे मारायची किंवा त्याला वाईट दाखवायची संधीच शोधत असते असं दिसतं.

गायत्रीला गेम सुधारावाच लागेल आणि जयला सोडून विकासचा ग्रुप तिने जॉईन करावा.
वोटिंग सुरू झाल्यानंतर ती सुरुवातीला 3 नंबरवर होती पण नंतर घसरत 5 नंवर आली आहे.
वोटिंग आता बंद आहे.
पण अगदीच कच्चा लिंबू खेळाडू बाहेर गेले आणि एकदा रिअल नॉमिनेशन चा गेम आला आणि जर ही जय,मीरा,विशाल, विकास,मिनल यांच्यासोबत नॉमिनेशन मध्ये आली तर मात्र बाहेर जाईल.
इरिटेट करत आहे.असे प्लेअर्स बिबॉसच्या घरात नाही रहात,हिला माहित नाही का.

काल सोनालीने काहीही सहभाग न घेणे फार खटकलं. तिचा आवाज आणि अग्रेशन वापरायचे होते की. चांगले इरिटेट केले असते तिने मीरा- गायत्रीला. नंतर विशाल तिला तसं म्हटलाही, नॉमिनेटेड नाहीस म्हणाजे खेळायचे नाही असे नसते. अक्षय पण काहीही चमक दाखवलेली नाही अजूनही.

आज विशाल -विकास आणि मिनल रॉक्ड :टाळ्या: >>> अगदी अगदी.

मीनलने बोलण्यात एकटीने कसली टफ दिली. जय अतिरेकी वाटला. गायत्री डोक्यात जातेच. बुगुबुगु म्हटल्यापासून किरकिर करतेय, सतत बोलण्यात पुढे. मारे चुकीच्या वस्तु फवारणी करायला आली, बिग बॉस ना सांगायला लागलं.

सुरेखाताईंनी गिव अप करायची काही गरज नव्हती, मग कशाला आधी आम्ही करतो म्हणाल्या. सोनाली छान खेळत होती.

विकास डोळे बंद करून बसला, विशालने जास्त सहन केलं आणि त्याला कवरही छान केलं.

सुरेखामुळे टिम बी हरणार , एक तर तिला टॉर्चर टास्क जमल नाही वर दुसर्‍या टिमला टॉर्चर करताना काय टाकयचं नाही यावर दादागिरी, ऐकतायेत कशाला लोक हिचं ? >>> खरं आहे. मिरचीचे पाणी आयडिया छान पण त्रास होऊ शकेल हे मला मान्य पण करायला हरकत नाही, हवं तर bb सांगायला येतील चुकीचे असेल तर. सुरेखाताईंना समोरची टीम जिंकायला हवी आहे.

विशाल फिजिकली जास्तं स्ट्राँग असला तरी विकास मुद्दे मांडण्यात , स्टँड घेण्यात जास्तं स्मार्ट आहे ! >>> अगदी अगदी.

आविष्कार बोअर आहे मात्र.

गायत्रीला गेम सुधारावाच लागेल आणि जयला सोडून विकासचा ग्रुप तिने जॉईन करावा.
वोटिंग सुरू झाल्यानंतर ती सुरुवातीला 3 नंबरवर होती पण नंतर घसरत 5 नंवर आली आहे. >>> भारी.

वोटिंग आता नसलं तरी मला मिनलला vote दिल्याचा अजिबात पश्चाताप होत नाही.

टॉर्चर टास्क हिंदीवाल्यानीच करावा. बसलेल्यांच्या ब्यागा बाहेर काढणे, ट्रीमरने शेव्ह करणे, मसाले ओतणे. स्वामी ओमने तर त्याची सुसु टाकली होती. Lol गेला बिचारा.

विशाल आवडायला लागलाय. मस्त केला काल टास्क. सोनाली ला छान समजावलं काल...तिचा आवाज येत नाहिये म्हणुन..
विकास ला पण समजावलं की कचर्‍याच्या बॅग सोडुन दे..नको ताणुन धरु....
असाच खेळत राहिला तर जाइल पुढे.
विकास पण मस्त मुद्दे मांडतो...काल दादुस आणि देसाई ला मस्त उचकवलं त्याने की " आता घराला सिनिअर कॅप्ट्न हवा आहे. त्यामुळे तुमचा ग्रुप जिंकला तर तुम्ही दोघे होउ शकता. ई ई...."
मीनल पण आवडते आहे. एकटी भिडते सगळ्यांना...कोणी सोबत असो नसो....
सुरेखा ताईंच बिंग बाहेर येइल वीकेंड ला....एक तर आधी बसण्याचा हट्ट धरला...आणि आता आता मिरची पाणी नको, मसाले नको...उगीच सल्ले देत आहेत. अर्थात मीनल ऐकत नसते त्यांचं....
आज काय राडा आहे बघु.
मीरा-गायत्री आणि आता त्यांच्या जोडीला स्नेहा पण वैताग आणत आहेत..त्या जिंकाव्या असे वाटत नाहिये सध्यातरी.
अविष्कार ला घालवा आता...काहिहि करत नाहिये....स्नेहा सोबत काही कंटेंट पण देत नाहिये...आणि तो आजुबाजुला असुन नसुन स्नेहा ला पण काही फरक पडत नाही.
जय मीरा, गायत्री सोबत असल्याने आवडेनासा झालाय आता.
उत्कर्ष सेफ खेळत आहे...

आविष्कार फार रिपल्सिव आहे, आळशी कामचुकार तर आहेच पण नुसते त्याला बघून तो स्लायमी स्लीझी मनुष्य असल्याचं फीलिंग येतं.
सुरेखा मधे मला पोटेन्श्य्यल वाटायचं पण आता ती फार कंटाळलेली, कशातच इंटरेस्ट नसलेली अशी वाटायला लागली आहे. काहीच पटत नाही तिला.
अपेक्षेप्रमाणे सगळीकडे विशाल विकास चे सपोर्टर्स वाढलेले दिसतात. विशाल तर वोटिंग मधे टॉप होता. अंजू, तू मागे म्हटली होतीस ना जय शिव सारखा वाटत नाही, तर त्याची नव्हे तर विशल ची कंपॅरिजन होते आहे शिव शी. फक्त विदर्भी ऐवजी कोल्हापुरी शिव Happy
आज बराच राडा होऊन टास्क सोडून दिले वाटते टीम बी ने? प्रोमो मधे जय आणि गायत्री कॅड्प्टनशिप चे दावेदार आणि विशाल एकाच वेळी दोघांनाही नडणार असे दिसले.

गायत्री आणि जय ला या शनिवारी मांजरेकर ने काहितरी सणसणीत बोलुन शांत करावं. मग पुढचा कोण स्पर्धक आहे आता शिव्या द्यायला ते पब्लिक ला समजेल. जय/ गायत्री आणि मिरा तिघांनी शांत रहावे.मिनल आणि विकास चांगलें खेळत आहेत

शीवलीलाला काय झाले? बरी तर दिसते. तिची बाहेरची प्रतिमा अजून खराब होऊ नये म्हणून तिचा स्क्रिन टाईम कमी केलाय का?

पराग ने एका बिग बॉस ग्रूप वर लिहिल आहे गेम मध्ये काहीही स्क्रिप्टेड नसतं . सगळ्याच वागण उत्फुर्त असतं. फक्त आधी सगळ्यांची शाळा घेऊन सांगतात. सगळे टास्क जीव तोडून करायचे तरच टिकणार/ टिकवणार आणि गेम मध्ये सतत दिसायला पण पाहिजे. स्वतःला सतत फोकस मध्ये ठेवायला शिकलं पाहिजे. तसही आतल्या स्पर्धकाना बाहेर लोकं त्यांना काय ट्रोल करतात ते अजिबात च कळत नाही नाहीतर आतले स्पर्धक त्याप्रमाणे सावधपणे खेळतील पण तस होत नाहीं त्यामुळे ते फक्त जीव तोडून टास्क करत असतात.फक्त स्पर्धकांच्या जवळच्या नातेवाईकांना मात्र त्यांच्या वरची टीका वाचुंन खुप त्रास होतो जसा त्याच्या आईला झाला होता. त्याच्या आईला खूप मानसिक त्रास झाला अस त्याचं म्हणण

मैत्रेयी हो.

विशालमध्ये शिव सारखा स्पार्क दिसतो अस तू, डीजे आणि अजून कोणीतरी लिहिल्यासारखं वाटतं, तसंच पब्लिकला वाटत असेल तर good.

मलाही तो टास्कपासून आवडायला लागलाय.

विकासही आवडू लागलाय, आधी अजिबात आवडला नव्हता.

तो विशाल सांगली का साताऱ्याच्या आहे बहुतेक, अर्थात कोल्हापूर जवळ म्हणा तिथून.

जय गायत्रीला जर वाटलं, शिव वीणासारखी आपली जोडी जमवूया तर ते work out होईल असं वाटत नाहीये.

चॅनेल fb वरच्या कमेंट्स वगैरे अजून वाचल्या नाहीत.

तो पराग कान्हेरे अजूनही बिबॉस बिबॉस खेळत आहे.
पण आज त्याने अस काहीतरी अपडेट केल आहे,ते पाहता खरच अस असत का,असा प्रश्न पडतो.
तो म्हणतो की या सिझनमधल्या स्पर्धकांना त्यांच्या मेंटॉर्सनी सॉलिड पढवून पाठवले आहे आणि त्यासाठी प्रचंड फी घेतली आहे.
आता परागचा इशारा गेल्या दोन सिझनमधल्या काही स्पर्धकांकडे आहे का,म्हणजे ते फी चार्ज करतात का?
नवीन स्पर्धक मार्गदर्शनासाठी माजी स्पर्धकांना फोन करताय किंवा सल्ला घेतात.पण त्याची फी घेतली जाते का?
मग ज्या माजी स्पर्धकांची बिबॉसमध्ये वट असेल,त्यांच्या वशिल्याचे तट्टू पुढे जातात का.हा का य बडबड करत आहे आणि याला काय माहिती?

घेत असतील मेंटॉर्स कडून मार्गदर्शन तरी काय फरक पडतो ? त्या परागला हाकलल्यापासून ‘आंबट द्राक्षे‘ झालय त्याच्यासाठी बिगबॉस Happy
शिवानी, स्नेहा मेघाच्या मैत्रीणी असून काही पॉझिटिव प्रभाव नाही पडला त्यांचा !
जय बिबॉ ओटीटी विनर दिव्या अगरवालचा मित्रं आहे, दोघांची स्पिल्ट्सविला विनर बॅक्ग्राउंड आहे .
मिनल शिव ठाकरेची मैत्रीण आहे , बहुतेक ते एकाच सिझनला होते रोडीजच्या , ती मात्रं छान खेळतेय !

Pages