मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरेखा मध्येच ओरडली ते एडिट केलं का कारण ब्रेकनंतर काही दाखवलं नाही.
>>सुरेखा ला वाटतेय ती सिनियर आहे तर सर्वांनी रिस्पेक्त ठेवला पाहिजे, ती बोलताना सर्वांनी शांतपणे ऐकले पाहिजे...

सुरेखाचा आवाज सॉलिड आहे सगळ्यांच्या वरताण करून ओर्डता येतं तिला. तिने मस्त उपयोग केला पाहिजे त्याचा Happy तिच्या पोटेन्शियल आहे गेम मधे पुढे जायचे पण असं वाटतं की थोडी इमोशनल पण असावी आणि डावपेच वगैरे अजून तरी करताना दिसत नाहीये.
स्नेहा खरंच फुसका बार निघणार की काय असं वाटू लागलं आहे. आविष्कार सोबत काही कन्फ्रन्टेशन किंवा तो ते सेकंड चान्स वगैरे म्हणत होता तसले काही क्लिक झाले तर मात्र टीआरपी खेचेल.
जय आणि उत्कर्ष मधे कोण कुणाला खेळवतंय हे अजून क्लियर नाही वाटत. उत्कर्ष पण स्मार्ट वाटतो. दोघेही दोन्ही बाजूंना गुंडाळण्याचा प्रयत्न करतायत.
महेश नी बाकि कुणाला काही का म्हणेना पण गायत्रीला बुगुबुगु म्हटल्याचा मला फार आनंद झाला Happy

>>की मला वाटलं सांगतील नंतर पण तिला काहीच नाही दिलं. नुसतं पान फाडून बाहेर आली ती.
तेच की!! निदान तिथे ठेवलेले केक/पेस्ट्रीज/कोल्ड्रींक्स वगैरे तरी द्यायचे Wink

आता मांजरेकर बघू कुणाकुणाची शाळा घेतायत आज चावडीवर!!

मांजरेकर मागच्या आठवड्यात थकलेले वाटत होते खूप, आजच्या भागाच्या प्रोमोमध्ये तरी बरे वाटले. एक आठवड्यात लुक्स मध्येही बराच बदल केलाय की.
प्रीमियर एपिसोड बराच आधी रेकॉर्ड होतो का?

बिग बॉस कधी पाहीन असं वाटलं नव्हतं, पण एका जवळच्या नातेवाईकांनी जेवायला बोलवलं होत. डिनरला उशीर (9.15 वाजले) म्हणुन सगळे भरभर आवरताहेत असं वाटलं, पण सगळं टेबलवर ठेऊन पहिलं सरविंग होईपर्यंत बिग बॉस चालु झालं आणि त्यांच्या गप्पाच थांबल्या. घरातले चारही सिनियर सिटीझन्स फक्त कंटेस्टंट्स बद्दल आपापसात बोलत राहिले. डिनर, डेझर्ट आणि नन्तर मॅनर्स म्हणुन बसुन राहिलो तर पहिला एपिसोड पुर्ण पाहिला गेला.
गायत्री दातार आणि तृप्ती देसाई सोडता मी बाकी कोणालाही ओळखलं नाही, पण तरीही हा सिझन पाहुया अस ठरवलं. पण पहिले 3 दिवस पाहिल्यावर give up केलं. अशक्य कचकच करतात. भांडण आणि जोरात आवाज हे माझ्यासाठी करमणूक नाहीच. फार त्रास होतो.
ती कोणी मीरा फारच अग्रेसिव्ह वाटली म्हणुन तिला गुगल केलं तर ती फक्त 22 वर्षांची आहे. ती किमान तिशीची दिसते. आणि तिचं अग्रेशन आणि कपटी स्वभाव पहाता एवढं कमी वय धक्कादायक वाटलं. मी आणि माझ्या मैत्रिणी 22 व्या वर्षी किती निरागस आणि naive होतो.

सुरेखाचा आवाज सॉलिड आहे सगळ्यांच्या वरताण करून ओर्डता येतं तिला. तिने मस्त उपयोग केला पाहिजे त्याचा Happy तिच्या पोटेन्शियल आहे गेम मधे पुढे जायचे पण असं वाटतं की थोडी इमोशनल पण असावी आणि डावपेच वगैरे अजून तरी करताना दिसत नाहीये.
<<<
+१
सगळे गप्प झाले एकदम Happy
मागच्या २ सिझन मधे आलेल्या सिनियर्स उषा नाडकर्णी आणि किशोरी सारखी नाहीये, स्मार्ट वाटतीये एकदम !
इमेज कॉन्शस असावी थोडी पण काल ती जेंव्हा अविष्कार -स्नेहा बद्दल डिस्कस नको करायला, त्यांचा वैयक्तिक प्रश्नं आहे म्हंटली, दॅट वॉज व्हेरी मॅच्युअर अँड ग्रेसफुल टु से !

>>थोडी इमोशनल पण असावी
उत्कर्षला त्यांनी त्या डान्सच्या टास्कला इतकी मदत करुनही त्याने सहविजेती म्हणून मीराचे नाव घेतल्यावर त्या एकदम नाराज दिसतच होत्या!!

हो. सुरेखा मस्त.
उना सारखी थकेली काकू वाटत नाही. छान मैत्रीण वाटते सगळ्यांची.
नऊवार ते शाॅर्टस् ...कुठलेही कपडे मस्त कॅरी करते. हसरी खेळकर वाटते.

स्नेहा पण आवडली. दादुसच्या सिलेक्शनच्या वेळेस टास्क बाद झाला तरी होऊदे पण एकमत नाही तर नाही हा स्टॅन्ड तिनंच घेतला होता.

मीरा, उत्क्या आणि गायत्रीचं तोंड बघण्यासारखं झालं होतं आज. गार वाटलं.

ममांनी आज नेहमीप्रमाणे करेक्ट शाळा घेतली!!
विकासला जवळजवळ अनुल्लेखाने मारले..... गायत्रीला जागे करायचा प्रयत्न केला पण तिचे परत ये रे माझ्या मागल्या...... ब्रेकमध्ये मीराने पढवलेलेच ती बोलली की निर्णय माझे असतात वगैरे!!
उत्कर्षचे बिंग त्याच्याच कंपूवाल्यांकडून फोडून घेतले.... जयचे विकासविरुद्धचे प्लॅनिंग प्लॉटींग उघडे पाडले...... inactive लोकांना सावध केले!!
मला सगळे मीराला वर्स्ट मालकीण बनवतील असे वाटलेले पण पब्लिकने मीराचा धसका घेतलेला दिसतोय.
दोनच गोष्टी फारश्या पटल्या नाहीत त्याम्हणजे दादूसला फारच डोक्यावर घेतले म्हणजे तो टास्क चांगला खेळला पण त्याशिवाय बाकी असे काय केले?
आणि अविष्कारला बॉडीशेमिंग करायला नको होते.

अविष्कारला बॉडीशेमिंग करायला नको होते. >> + 100% सहमत. मलाही ते पटलं नाही

ममा आणि BB टीम बहुतेक इथल्या comments वाचत असावेत. उत्कर्ष आणि मीराची चांगली शाळा घेतली, उत्कर्ष आहेच डबल ढोलकी खरा ...मीरा atleast जशी आहे तशी प्रेझेंट होते, आत एक बाहेर दुसरं असंतरी वागत नाही.
पण सगळ्यात आवडलं मला ते गायत्रीला बुगू बुगू म्हटलं ते, ती फार बेरकी आहे. मला अजिबात आवडत नाही ती.
विकासबद्दल काहीच का बोलले नाहीत पण ते ? टोटल अनुल्लेख ?
स्नेहा चांगली आहे, ती आणि सुरेखा ताई दोघी genuine वाटतात मला.
Overall चांगलंच झापलं सगळ्यांना, hopefully सगळे जागे होतील, नाहीतर पुढल्या आठवड्यात शिवलीला ताईंचा नंबर लागेल बहुदा !

सर्व नीट वाचायचे आहे वाचायाचं आहे अजून. उत्कर्ष सर्वांचे ऐकत असेल तर पहिल्या सीझनमध्ये स्मिताही ऐकायची तिच्या grp चे ते आठवलं. स्मिताला बऱ्याच जणांनी underestimate केलेलं, पण तिने दाखवून दिलं, तसं होऊ शकतं.

एकंदरीत मीरा फायनलमध्ये असेल अस वाटतंय.

महेश नी बाकि कुणाला काही का म्हणेना पण गायत्रीला बुगुबुगु म्हटल्याचा मला फार आनंद झाला >>> हाहाहा लय भारी लिहिलं मैत्रेयी, बघायला हवं.

इमेज कॉन्शस असावी थोडी पण काल ती जेंव्हा अविष्कार -स्नेहा बद्दल डिस्कस नको करायला, त्यांचा वैयक्तिक प्रश्नं आहे म्हंटली, दॅट वॉज व्हेरी मॅच्युअर अँड ग्रेसफुल टु से ! >>> वाह, छान कमेंट.

छान लिहिताय सर्वजण, मी न बघता वाचायला येते. विकेंड डाव बघायचा प्रयत्न करेन.

फायनली, बिबॉने स्नेहा आणि आविष्कारकडून हवा तो कण्टेण्ट काढून घेतला. बेस्ट/ वर्स्ट स्माईलीज टास्कसमध्ये हे दोघे इनडायरेक्टली का होईना बोलले एकमेकान्शी. बिबॉ एकतर त्यान्च्यात जोरदार भाण्डण तरी लावून देतील किव्वा पॅचअप घडवून आणतील. सिद्दार्थ शुक्ला आणि रश्मी देसाईच अस झाल होत. आले होते ब्रेकअप करुन पण मित्र म्हणून पॅचअप झाले होते दोघान्चे. स्नेहा आविष्कार पोळया करायला शिकवते म्हणे.

अविष्कारला बॉडीशेमिंग करायला नको होते. >> सहमत

काल दादूसने केलेला कलिन्गगडाचा केक छान होता.

जय आणि विशालला चान्गल झापल ममाने सतत उघडेबम्ब राहण्यावरुन.

बादवे, ममा आज फिजीकली विक वाटले.

मला सगळे मीराला वर्स्ट मालकीण बनवतील असे वाटलेले पण पब्लिकने मीराचा धसका घेतलेला दिसतोय. >>>>>>>> हो ना. बिचारी शिवलीला.

सगळ्यांची शाळा मस्त घेतली काल मांजरेकरांनी .
गायत्री ला बोललेले बघून सगळ्यात भारी वाटलं.
मीरा च्या सारख्या कटकट करण्यावर पण बेस्ट बोलले.

सोनाली चा आवाज एकदम फळ्यावर कर्कटक ओढल्यासारखा येतो राव. काल तृप्ती शी भांडताना अतीच चढला होता. तृप्ती चा टोन पण डोक्यात जातो.
पीठ काढायचं विसरलं हे दोघींनी अतीच ताणलं. काहीही कारण नव्हतं.किचन मध्ये स्वयंपाक करताना भांडण करणे ही बिबॉ मधली सगळ्यात वाईट गोष्ट वाटते मला.
स्नेहा काल बरोबर बोलत होती की स्वयंपाक करताना शांत , हॅपी राहून झाला पाहिजे.
स्नेहा खूप जास्त डिसेंट आहे. बिबॉ मध्ये फार टिकेल असं वाटतं नाहीये. टास्क कशी करते ते बघू. मेघा सारखी ती अजिबात नाहीये. मेघा जशास तसे वागणारी होती. ही फारच सज्जन वाटते.
उत्कर्ष ची ढोलकी बाहेर काढली तर मजा आली एकदम.
आज तृप्ती आणि शिवलिली वाजणार आहे

आज स्नेहा छान दिसत होती, तिचा वाइन कलर ड्रेस आणि मेन म्हणजे मेकप एकदम क्लास झाला होता , लिपस्टिक शेड साठी १०० पैकी १०० मार्क्स !
बाकी मुलींचे ड्रेसेस आवडले नाहीत, मीराने घातलेला किम कार्डेशिअन इन्स्पायर्ड स्किन कलरचा स्किन टाइट ड्रेस अजिबात नाही आवडला, तशा ड्रेसवर मेकप ड्रामॅटिक आणि स्लिक हेअर असेल तर चालून जातं, नाहीतर एलदम डल !
विशाल आणि जय दोघही शेरवानी मधे छान दिसत होते !
असो, तर पहिला विकेंडचा वार मांजरेकरांनी एकदम फेअर आणि बर्‍यापैकी मुद्देसुद केला.
गायत्रीला दिलेली समज सर्वात बेस्ट Proud
फक्तं दादुसचं जरा जास्तं कौतुक आणि मीराला जरा जास्तं क्रिटिसाइझ केलं!
उत्कर्षची एकदम स्ट्रॅटेजीच उघड केली, बघुया आता विशाल पेटतोय का !
अविष्कार मुलींना काय म्हंटला दाखवलं नाही का ? मला तरी दिसल नाही एपिसोड्स मधे.
मांजरेकर अविष्कारला म्हंटले कि तुमचं पर्सनल लाइफ इथे नको, पण मग बोलावलय कशाला बिगबॉसने दोघांना एकाच सिझन मधे Wink ?
स्नेहानी बाकी आठवडा भर काही न करता बरच फुटेज घेतलं आज !

मला एक कळलं नाही की ममा स्पर्धकांच्या व्यूहरचनांबद्दल खुली चर्चा का करतात? त्या तर असणारच आहेत ना?

मीरा टफ फाईट देणारी वाटते. डोक्यानंही खेळते पण ती अती प्रॅक्टीकल आणि कपटी असल्याने लोकांना आवडणार नाही. तिथे शिव सारखा भाबडेपणा किंवा मेघा दाखवायची तशी माया आणि जिव्हाळा पण लागतो.

>>तिथे शिव सारखा भाबडेपणा किंवा मेघा दाखवायची तशी माया आणि जिव्हाळा पण लागतो.

एक्झॅक्टली!!!
कनिंग आणि फक्त गेम एके गेम करणारे लोक पुढेपर्यंत जातात पण जिंकत नाहीत.
आता परफॉर्मन्स आणि इमोशनल टच याचा परफेक्ट बॅलन्स कोण साधतय ते बघायच..... too early to say anything!!

>>तिथे शिव सारखा भाबडेपणा किंवा मेघा दाखवायची तशी माया आणि जिव्हाळा पण लागतो.
एक्झॅक्टली!!!
कनिंग आणि फक्त गेम एके गेम करणारे लोक पुढेपर्यंत जातात पण जिंकत नाहीत.
आता परफॉर्मन्स आणि इमोशनल टच याचा परफेक्ट बॅलन्स कोण साधतय ते बघायच..... too early to say anything!!
<<
Hmm खरय .. बाकी स्ट्रॅटेजी ओपन करूनही समहाऊ विशाल काही पेटल्या सारखा दिसला नाही, थंडच होता.. त्याला नक्की समजलं कि नाही कोणास ठाऊक कि वाट बघतोय मौकेपे छका मारनेका ?
मेघा -सई -पुष्कर- आस्ताद वगैरे विकेंडच्या वार मधे म.मां समोरच रिअ‍ॅक्ट करायला सुरवात करायच्या असं काही समजल्यावर ! तिथेच खुन्नस-राडा चालु करायचे पब्लिक !
त्या मानानी जयने योग्य तो मेसेज घेतला आणि डॅमेज कंट्रोल सुरु केलं , जयने लगेच विशालला मस्का मारायला सुरवात केली त्याची तारीफ करून !
विशाल बोलण्यात अजुन तरी शार्प दिसत नाहीये, बेस्ट सेवक अ‍ॅवॉर्ड मिळाल्यावरही काहीतरी विचित्रच कि चूकीचं बोलत होता ‘यात माझे मोठेपणा(!) दिसतो ‘ वगैरे !

गुबुगुबुचा बावळटपणा त्यांच्याच ग्रुपला नडला. दादूसचं कौतुक केलं ते बरं झालं. विकासाला पार अनुल्लेखाने मारला. मिराला ठेवतील शेवटपर्यंत पण जिंकेल असं वाटत नाही. जय विशालपण जातील शेवटपर्यंत.

स्नेहाचा ड्रेस मस्तच होता. प्लेन साडीचा असा ड्रेस शिवला तर असं विचारचक्र लगेच डोक्यात सुरु झालं. असो.
तृप्तीचा टोन डोक्यात जातो. सोनालीपण भाकरी बनवून देते हे तसं नाही बोलली जशी ती महेशला सांगत होती. आपला घरात एक वेगळाच डबा असतो छोटा पसरट अशा थोडया पिठासाठी त्यामुळे ते लक्षात नाही ठेवावं लागत पण तिथे रोज वेगळं पीठ बाजूला ठेवणं कोणीही विसरू शकतं. मुलं करू शकतात तर मुली का नाही हे मलाही खटकलं. सिनियर आणि वयाचा मुद्दा तिथे कसा लागू होतो जर सगळे खेळायला आले आहेत. सुरेखा वरून मारायची भाषा करत होती आणि म्हणे संस्कार.
व्युहरचना सांगितली कारण बहुतेक नॉमिनेशनबद्दल बोललेलं चालत नाही आणि ते विशालला काम असेल विशेतः शक्तीचं तेव्हा वापरूनही घेतात.
गायत्रीला पिन मारल्यावर तिने बावळटसारखं सगळंच सांगून टाकलं तेही सविस्तर Lol जय खरा डबल ढोलकी आहे पण महेश काहीच बोलला नाही त्याला, आज बघू बोलतो का. दादूसला कौतुक करून बेसावध ठेवतील आणि एक दिवस अचानक काढून टाकतील.

कालचा वीकेन्ड चा डाव मस्त झाला. ते कपडे न्यायचे विसरलात का रे हे ऐकून फिस्सकन हसायला आलं Happy
येस्स स्नेहाचा ड्रेस मस्त होता. जय, उत्कर्ष, विशाल,अक्षय, बहुतेक सगळे मेन वेल ड्रेस्ड होते (आविष्कार सोडून). मीनल चा जरा झगर मगर होता. सोनाली ने काय घातलेय दिसतच नव्हते.गायत्रीचा काल बरा होता जरा चक्क. पण मीरा अशी काय बोर, शेपर्स घालून वर ड्रेस घालायला विसरली असं वाटलं Happy
ममांनी डबल ढोलकी आणि विशाल ला बाहेर ठेवण्याचा डाव हे मुद्दाम अजून डिव्हाइड करायला सांगितलं की काय असं वाटलं. विशाल ची पूल मधे लाइफ गार्ड गिरी वरून टिंगल केली ते पण भारी Happy तो पिठाचा इश्यू किती किरकोळ होता पण उगीच लांब ताणला गेला. सोनाली आवडतच नाहीये मला अजिबात. तृप्ती ला फार काही बोलले नाहीत ममा. पण त्यांनीही उगीच ताणले होते.
ते आविष्कार ने काय मुलींना म्हटले ते समजले नाही मला.

कालच्या भागात अजून एक मजेशीर प्रसंग घडला. मांज्याने आल्या आल्या जे काय दादूसचं कौतुक करायला सुरुवात केली आणि त्यावरून मिराला झापलं ते बघून बाकीच्यांची जरा तंतरली. नंतर मांज्याने घरातल्यांना प्रश्न विचारला की कोणाला वाटतंय दादूस जिंकला त्यांनी हात वर करा. तेव्हा बहुतेक सगळ्यांनी हात वर केला. जयने तेव्हा हात वर न्हवता केला. ही गोष्ट उत्कर्षच्या लक्षात आली. तेव्हा त्याने जयकडे एक ओझरती नजर टाकून अरे हात वर कर नाहीतर हा मांज्या तुझीपण शाळा घेईल असा काहीसा मूक संवाद साधला आणि त्यानंतर जयने हात वर केला. Lol

मीनल चांगली वाटत आहे... पण तीची मराठी अजिबातच चांगली नाही..... 'सजा दे ' वगैरे....जयची पण तीच कथा आहे... ती हिंदी मिश्रित मराठी मला बिलकुलच आवडली नाही.... मराठी bigg boss मध्ये आस्ताद, नेहा सारखे मराठी बोलणारे असतील तर बघायला, ऐकायला जास्त मजा येते...

सोशल मिडियावर विशाल आणि शिवची तुलना करत आहेत.काहींना विशाल शिवसारखा वाटत आहे तर काहींना शिवपेक्षा हुशार वाटत आहे.
तोच शिवसारखा विनर होईल अस वाटत आहे.
शिवच टास्कमध्ये बौध्दिक योगदान कमी होत,फिजिकल टास्क छान करायचा,पण लवकरच घरातल्या सगळ्यांनाच लवकरच आपलस करण्यात यशस्वी झाला होता.आणि अर्थातच वीणासोबत लव्हस्टोरीपण दिली बिबॉसला.
लव्हस्टोरीच बाजुला ठेवल तर विशालमध्ये अजून असा जिंकण्यासारखा स्पार्क दिसत नाही अजूनतरी.

Pages