झी-मराठी : येऊ कशी तशी मी नांदायला

Submitted by DJ...... on 5 February, 2021 - 01:08

झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..! Proud

मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्‍याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)

तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. Uhoh ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.

सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्‍या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्‍याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.

नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.

नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.

असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.

त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्‍या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते Proud . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात Proud . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं. Bw

खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्‍याचाही हात आहे.

दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून Uhoh ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.

स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं Biggrin ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. Proud

अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण ते सूट होत नाहीत ना.. तायडी अन् मोहित दोघेपण कसे मराठी ना.. शिवाय मोहित कसं तायडीला हवं नको ते बघतो. रॉकी अन् मोमो एकमेकांना शोभून दिसतात Bw

रॉकी अन् मोमो एकमेकांना शोभून दिसतात >>>>>>> पण मला अस का वाटतय की हे मोमो आणि मोहितच जुळवायला निघालेत. अगदी मोमोच्या मुम्बई एण्ट्रीपासून ते ' उपाशी' प्रकरणापर्यन्त.

काल त्या वहिनीने स्विटूचे फोटो परत नलूला दिले अन स्विटू जाड आहे तिला बारीक व्हावं लागेल असं सांगितलं तेव्हा नलू त्या वहिनीला हळू बोल हळू बोल असं खुणावते का तर आत स्विटू ऐकेल.. तसंही आत स्विटूने ऐकलेलं असतंच अन त्याबद्दल तिला आजिबात वाईट वाटलेलं नसतं. घरात आल्यावर शकूचा नलूला फोन येतो अन ती स्विटूच्या लग्नाबद्दल विचारते तेव्हा स्विटू मागेच उभा असतानाही नलू शकूला फोन वरून जाडगेपणामुळे लग्न जुळत नाही असं सांगते. मग शकु नलुला सांगून स्विटूची पत्रिका घेऊन त्यांच्या गुर्जींकडे बोलावते.

गुर्जींकडे स्विटूला घेऊन पोचलेली नलू शकू, ओम, रॉकी, मोमो आल्यावर जाजमावर सावरून बसते. ओम स्वीटूच्या जवळ बसू लागतो तेव्हा नलू उगिचच हात मागे करून स्विटूला तो चिकटून बसु नये म्हणुन कशीबशी स्विटूला हाताने आपल्या मागे सारते Biggrin
अशाप्रकारे काल स्विटू-ओम च्या पत्रिका गुर्जींकडे पोचल्या. आज निकाल लागेल. Bw

कालच्या भागात महामाठ काकाला एकदाची उपरती झाली. भरपूर दूध आणुन त्याचा पातेलंभर चहा करतो अन सावंतीण बाईंकडे थर्मास मागायला जातो. काल पहिल्यांदाच सावंतीण बाई बोलताना बघितल्या. अत्यंत कमी शब्दात जास्तीत जास्त झापणार्‍या चाळकरी(!) वाटल्या. महामाठ काकाचा अक्षरशः पाणौतारा करत त्या परोपकारी वृत्तेने त्यांचा थर्मास काकाला देतात. मग काका पातेलंभर चहा थर्मास मधे गाळून रस्त्यावर धावत-धावत विकू लागतो. गंमत म्हणजे त्याला गिर्‍हाईकंही मिळतात अन बरेचसे पैसे पण मिळतात (अर्थात चहासाठी वापरला गेलेला जामानिमा अन गॅस पहाता फायदा किती झाला कुणास ठाऊक..!). सावंतीण बाईंचा इंपोर्टेड थर्मास आता हा दळभद्री महामाठ काका फोडतो की काय असं वाटत होतं पण थर्मास वाचला Proud

मग ते पैसे काका त्याच्या भावाला म्हणजे बाबा साळव्यांना देतो. दादाच्या जीवावर ऐदी बनुन राहिल्याचा त्याला पश्चाताप होतो. रडत रडत तो त्याच्या दादाची माफि मागतो. आख्खं आयुष्य रेडिओ, मिक्सर वगैरे टिनपाट दुरुस्तीच्या फंदात वाया घालवली असंही सांगतो. चला... आता महामाठ चिन्यापाठोपाठ हा माठ काका देखिल सुधारला असं वाटु लागलंय. लगोलग माठ काकूचा मेंदुपण ताळ्यावर येवो म्हणजे साळव्यांच्या घराला लागलेलं दळिद्र लवकर फिटेल अशी आशा करायला हरकत नाही..!!

साळवी पैशाने दरिद्री नाहीच्चेत तर अकलेने आणि वृत्तीने दरिद्री आहेत. घरातले सगळे कमवायला लागले तरी भिकेचे डोहाळे काही संपणार नाहीत. स्वीटू काय ती निर्लज्ज बनून श्रीमंत घरातली सून होणार आहे तरी ते दरिद्रीच राहतील कारण ते मुलीच्या सासरी पाणीही पिणार नाहीत.

काल त्या वहिनीने स्विटूचे फोटो परत नलूला दिले अन स्विटू जाड आहे तिला बारीक व्हावं लागेल असं सांगितलं >>>>>>>> ती वहिनी साळव्यान्च्या शेजारी राहते ना. मग ती स्विटूला येता जाता बघत असेल. तेव्हा तिला माहित नव्हत का तिच्या जाड असण्याबद्दल? फोटो बघितल्यावरच कळल का?

झी मराठी अ‍ॅवॉर्डसमध्ये शाल्व आणि अन्विताला बेस्ट डेब्यु नॉमिनेशन आहे वाटत.

काटेकोर, बबडया, देवमाणूसचा डॉक्टर, प्रज्ञा ह्याना निगेटिव्ह कॅरेक्टरचे नॉमिनेशन्स आहेत.

आसा आणि शुभ्राला बेस्ट एक्ट्रेससाठी नॉमिनेशन.

झी मराठी अ‍ॅवॉर्डसमध्ये शाल्व आणि अन्विताला बेस्ट डेब्यु नॉमिनेशन आहे वाटत >>> एरवी याना बत्थड अ‍ॅक्तिन्ग साठी साधे बत्तासे सुद्धा देणार नाहित त्याना अ‍ॅवार्ड देतात्,अर्थात घरचेच असल्याने लुटुपुटुचा सेरेमेनी,खोटे -खोटे अवार्ड सगळच बनावट.
माझी भाची याच क्षेत्रात आहे (म्हणजे स्ट्रगलर आहे अजुन मोठा असा ब्रेक नाही) पण ती सान्गत होती मोस्ट ऑफ मराठी कलाकार झी च्या सिरियलीत जाण्यासाठी जिव टाकतात कारण स्क्रिप्ट भन्गार असली तरी पैसा वेळेवर मिळतो शिवाय एक सिरियल ३-४ वर्श तरी ताणतातच ती सन्पली तरी दुसरीकडे वर्णी लागतेच लागते.

. सरू म्हातारीची नात. देवमाणुस मधली डिंपल. चांगली अ‍ॅक्टिंग करते. >>>>>>> ओ हो. देवमाणूस बघत नाही. पण इथे वाचून आणि झी ५ वरच्या व्हिडिओजवरुन कळत. पण ही डिंपल माहित नव्हती. मला वाटल मोहितबद्दल बोलताय की काय?

पिवळ्या साडीत स्वीटू छान दिसत होती. चिन्याशी बोलण्याच्या नादात आपण नवऱ्याशी बोलत होतो हे नलू विसरून जाते. उद्या स्वीटू सासरी गेली तर आपल्याला मुलगी आहे हेही विसरून जाईल, काहीच सांगता येत नाही नलू मावशीचं.

द्या स्वीटू सासरी गेली तर आपल्याला मुलगी आहे हेही विसरून जाईल, काहीच सांगता येत नाही नलू मावशीचं.>> दळभद्री म्हणतात ते काय उगीच होय Biggrin
--------------------------
मागच्या शनिवारी सावंतीण बाईने पिवळ्या साडीचा पदर तोकडा पडलेल्या स्विटुला भारी सल्ला दिला होता Biggrin ते ऐकुन नली अन सुमन काकीचा चेहरा बघणेबल झाला होता. मग ती पिवळी साडी घातलेली स्विटू हॉटेलात गेलेली दाखवली. तिच्या मागावर सुमनकाकुचा नवरा चमन काका गेलेला दाखवला. हॉटेलात स्थळाची वाट बघणार्‍य स्विटूला लै लै गरम होतं असं दिसलं. तिथं आपला ओम्या आधीच आलेला असतो. स्विटूला तिथे पाहिल्यावर तो वेटरला पटवुन हॉटेलच्या भटारखान्यात जाऊन स्विटूसाठी कॉफी घेऊन येतो (हॉटेल ला मालक/मॅनेंजर नसतोच वाटतं.. कस्टमरला कॉफी देण्यासाठी कोणीही बाहेरची व्यक्ती चालते असं दिसतंय. असो.. ओम्या सारख्या वेटरची सर्विस बघून गिर्‍हाईक वाढेल असं वाटलं असेल कुणाला तर त्यात गैर काहीच नाही..!!) . मग स्विटूसाठी कॉफी घेऊन आलेल्या ओम्याला बघून स्विटूची कळी खुलते अन मग लुटुलुटु मान हलवत ती कॉफी पीत पीत ओम्याचं फकान ऐकत बसते. शेवटी तिला बघायला आलेलं स्थळ आणि तिच्या मागावर आलेल्या काकाला वार्‍यावर सोडत लेखक्/दिग्दर्शक आपणाला स्विटू अन ओम्यापाठोपाठ रेल्वे स्टेशनवर अन तिथुन लोकल मधे घेऊन जातात.

त्या लोकलला लेडिज कंपार्टमेंट अन जेंट्स कंपार्टमेंट मधे सेपरेटर म्हणुन फक्त स्टीलच्या दांड्या असतात अन त्यातली एक दांडी ओम्याने हात लावला की गदागदा हलत असते. मग ओम्या, स्विटु, लेडीज कंपार्टमेंट मधल्या साळकाया-म्हाळकाया, जेंट्स कंपार्टमेंट मधले वेताळ अन मुजांबा यांच्यासहीत आपणही लोकलमधे गदागदा हलत हंबरणाथ स्टेशनवर पोचतो तेव्हा मध्यरात्रीचे १२ वाजलेले अस्तात वाटतं. एवढ्या गदागदा हलणार्‍या लोकलमधे स्विटूला मात्र छान झोप लागते अन हंबरणाथ आल्यावर ओम इतर लेडीजना "मावशी" असं संबोधत त्या स्विटूला उठवा म्हणुन सांगतो. आता ओम्याने आपली सर्वांदेखत "मावशी" केलेली कुठल्या लेडीजला आवडेल..? मग कोणीही मावशी त्या स्विटूला उठवत नाही.

प्रीकॅप मधे स्विटूला जाग येते तेव्हा सगळीकडे अंधार झालेला असतो अन फक्त तिच्या अन ओम्याच्या चेहर्‍यावर मंद प्रकाश पडलेला असतो. ते दोघेही यार्डात थांबलेल्या लोकल मधे असतात असं दाखवलं. आता आज बघुया एक चालीस की लास्ट लोकल चुकलेल्या ह्या दोघांमधे खानविलकर आणि साळवी कुटुंबात काय काय घडते ते.

सॉलिड सिक्सर , फोर मारलेत DJ .
काळोखात (वर्ल्ड फेमस )कोण हे कोण हे करणारी स्वीटू अनोळखी माणसाच्या हातात हात बरी देते हो म्हणजे ओम आवाज देण्या अगोदर हि समोरून आलेला हात मदतीचा आहे कि अजून काही हे न जाणताच हात देते .
ट्रेन च्या डब्यातल्या साळकाया म्हाळकाया त्या कानात हेडफोन घातलेल्या स्वीटू ला का उठवत नाही हे केवळ ओमला स्कोप मिळावा म्हणून डायरेक्टर ने योजले असेल नाहीतर हेरवी आम्ही साधे जोगेश्वरीला बसलो आणि बोरिवली पर्यंत जरासे डुलायला लागलो न लागलो तर बायका हीच शेवटची लोकल आणि झोपलेली बाई हि आता उद्याच उठणार कि काय या अविर्भावात गदगदून हलवून उठवतात

बाकी हंबरनाथहून नेमकी कुठे आली होती स्वीटू ? म्हणजे हॉटेल नेमके कोठे दाखवले होते ?
तो बघायला आलेला मुलगा डोक्याला हात लावून निघून जातो आणि चायवाला साळवी काका लगेहात हॉटेलच्या बाहेर चाय विकून घेतो तिथेही त्याचे दळभद्री नशीब आडवे येते आणि हॉटेलचा सेक्युरिटी त्याला हाकलून देतो

हेरवी आम्ही साधे जोगेश्वरीला बसलो आणि बोरिवली पर्यंत जरासे डुलायला लागलो न लागलो तर बायका हीच शेवटची लोकल आणि झोपलेली बाई हि आता उद्याच उठणार कि काय या अविर्भावात गदगदून हलवून उठवतात>>> Biggrin

बाकी हंबरनाथहून नेमकी कुठे आली होती स्वीटू ? म्हणजे हॉटेल नेमके कोठे दाखवले होते ?>>> ते काहीच माहित नाही.. घरातून डायरेक्ट हॉतेल मधेच आली ती.

तो बघायला आलेला मुलगा डोक्याला हात लावून निघून जातो आणि चायवाला साळवी काका लगेहात हॉटेलच्या बाहेर चाय विकून घेतो तिथेही त्याचे दळभद्री नशीब आडवे येते आणि हॉटेलचा सेक्युरिटी त्याला हाकलून देतो>> हे कधी दाखवलं..? टाटा स्काय वाल्यांनी तो सीन कापला की काय..?? जाहिराती जास्त झाल्या की सीन कापत असावेत. बिचारे प्रेक्षक बसतात इथे लिंका जुळवर Proud
@Ajnabi : तुम्ही झी फाईव्ह तर नाही ना वापरत..?? अ‍ॅडिशनल सीन तिथे दाखवत असावेत बहुतेक..

@Ajnabi : तुम्ही झी फाईव्ह तर नाही ना वापरत..?? अ‍ॅडिशनल सीन तिथे दाखवत असावेत बहुतेक..
नाही Dj , आम्ही hathway केबल वर बघतो। .
ओम जेव्हा त्या कॅफेच्या वरच्या माळ्यावरून खाली स्वीटू चे निरीक्षण करत असतो तेव्हा त्याला एक मुलगा दिसतो जो स्वीटू ला पाठमोरी बघतो आणि हात हलवून जाडी आहे (मनातल्या मनात ) व डोक्याला हात मारून निघून जातो . इथे बाहेर तो चायवाला साळवी काका (त्याची ती प्यांट बघून किळस वाटते ) लगेहात सावंत काकांच्या थर्मासमधला चहा विकायला लागतो आणि दोघे तिघे कस्टमर घेतात सुद्धा तर त्या कॅफेचे गार्ड त्याला बघतात नि हाकलून लावतात

बाकी यांच्याकडे काहीच सेन्स नाही अजून किती दिवस त्या सावंत काकीचा थर्मास वापरणार आहे साधे सेफटीपिन सुद्धा ती नलू सवंतीणींकडून मागते
दुसऱ्यासारखा खरंच काही करून दाखवायचे आहे तर चहा विकून एक दीडशे / दोनशे रुपयांचा थर्मास विकत आणला असता आणि छोटीशी टपरी टाकून चहा विकू लागला असता पण याना फक्त गरिबीचे भांडवल करायचे आहे

साळव्यांना दळभद्री दाखवणं ही कथानकाची आत्यंतीक गरज आहे त्यामुळे ही लाचारी अंगात मुरलेली पात्रे बघून सर्वसामन्य माणसांचं रक्त उसळवत आहेत..!! Biggrin

स्वीटू हॉटेलात येते, ओम तिला कॉफी देतो, जाताना स्वीटू त्याला काय काय ऐकवते (लुटूलुटू मान हलवत कॉफ़ी पिताना कुठे गेला होता हा शहाणपणा, काम झालं की वरून ओमलाच ओरडायचं हे नेहमी करते ही). कॉफ़ी पिऊन अति शिण आल्यामुळे स्वीटू ट्रेनमध्ये गाढ झोपते. एव्हडंच दाखवलं होतं. बाकीचं कुठे दिसलं तुम्हाला अजनबी.
पेपरमध्ये जाहिरात ज्याने दिलीये तो फोटो, बायोडाटा काहीच न बघता लगेच भेटायला कसं काय बोलावतो. बोलावलंय तर निदान भेटून तरी जायचं. जेव्हा भेटायचं ठरतं तेव्हा बहुतेक अंबरनाथच बोलली होती नलू, गोल देवळापाशी की काहीतरी. स्वीटू ट्रेनने कुठे जाते. ट्रेंनमधल्या बायका मदत करायला तत्पर असतात नेहेमी.

तूपारे मधील चाळीत राहणारी इशाची आई एवढी गरीब असूनही थोरामोठ्यांच्या घरातील रीतीभाती प्रमाणे कायम खांद्यावर पदर घेऊन असायची आणि हि नली कायम पिंजारलेले टारल घेऊन कंबरेला टॉवेल लावलेली .
यांची गरिबी म्हणजे एक टोक नि श्रीमंती म्हणजे दुसरे टोक

बाकीचं कुठे दिसलं तुम्हाला अजनबी. >>>>>मी हे सगळं कालच पाहिले.

प्रीकॅप मध्ये तो ओम, मावशी त्या मुलीला उठवा ना तिला उठवा ना असे म्हणतो व गाडी यार्डात गेली तेव्हा तो जेन्टस कमार्टमेन्ट मध्ये बसून स्वीटू उठायची आणि कोण हे कोण हे करत ओरडायची वाट पाहतो त्या जाळीतून तो हात बाहेर काढतो आणि ती हात पकडते हे सर्व दाखवल।

स्वीटू हॉटेलात येते, ओम तिला कॉफी देतो, जाताना स्वीटू त्याला काय काय ऐकवते (लुटूलुटू मान हलवत कॉफ़ी पिताना कुठे गेला होता हा शहाणपणा, काम झालं की वरून ओमलाच ओरडायचं हे नेहमी करते ही). कॉफ़ी पिऊन अति शिण आल्यामुळे स्वीटू ट्रेनमध्ये गाढ झोपते. एव्हडंच दाखवलं होतं. >>>>>>>>>>>

आणि ती मोमो कधी न खाल्ल्यासारखं काल त्या कॅफेमध्ये समोर ठेवलेले सगळंच टेस्ट करून व्वा छान वैग्रे कमेंट करते हे पण होत कि मध्ये तो मीटिंगला आलेला क्लायंट सुद्धा खुश होऊन म्हणून मला इथे यायला आवडते म्हणजे खाता खाता गप्पा होतात वैग्रे बोलतो हे हि दाखवले कि काल

अरे पण तो बाजूच्या डब्यात होता ना .
मग ट्रेन रिकामी झाल्यावर जायचं आणि गदागदा हलवायचं ना तिला.
यार्डात जाईपर्यंत कशाला थांबायच ???

हा भाग मग बघितला नसेल मी. पण मग काकापण चहा घेऊन ट्रेनने विकायला जातो का. चहा थंड होत नसेल का. ओमकडे तिकीट असतं का. फारच अपेक्षा असतात प्रेक्षक म्हणून आपल्या.
ओम तिला कॉल पण करू शकला असता. कानातच वाजला असता तिच्या. एव्हडी रात्र होते अंबरनाथ येईपर्यंत Uhoh आणि स्वीटूच्या घरच्यांना तिकडे वाटलं असेल की ती गेली परस्पर लग्न करून Proud

Pages