मिर्झापूर २!

Submitted by अजिंक्यराव पाटील on 6 October, 2020 - 04:18

नुकताच रिलीज झालेला मिर्झापूर सिझन २ चा ट्रेलर बघितला.. आधीच असली कमाल सिरीज, त्यात धक्कादायक वळणावर संपलेला पहिला सीजन. भारतीय प्रेक्षकांनी #MS२W? चा ट्रेंड चालवून ऍमेझॉन प्राईमला भंडावून सोडलं होतं. २३ ऑक्टोबरला भौकाल होणार..! जुन्या आणि नव्या सीजनवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
आणि हो प्रतिसादात तुम्ही पाहिलेले धमाल मिम्स देखील टाका.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भौकाल = रुतबा/ हवा

गुड्डू भैया का देखो कैसा भौकाल है, हमारा भी होगा।

Po

पाहिला ट्रेलर .. मला पहिली पण चांगली वाटलेली तेव्हा हा सिझन पण पाहिनच. पंकज त्रिपाठी खूप आवडतो...मस्त अँक्टर आहे एकदम!

पहिल्या सिजन पेक्षा जास्त चांगला वाटला
लॉक डाऊन आल्याने कथा पटकथेवर विचार करायला वेळ मिळाला असावा
नैतर आधीच्या सिजन मध्ये नुसत्या गोळ्या आणि शिव्या होत्या

माझे नव्या सीझन चे २ भाग बघून झालेत काल. हा सीझन आधीच्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग वाटत आहे. पंकज त्रिपाठी तर आहेच भारी पण मुन्नाचं कॅरेक्टर पण मजा आणत आहे.

ग्रेट इंडियन फेस्टिवलने जितके छळले नाही तितके ह्या मालिकेने छळले आहे. संपलेले प्राईम रिन्यूव्ह करायचेच काय? Wink
भौकाळ मचा रक्खा हैI

. हा सीझन आधीच्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग वाटत आहे. पंकज त्रिपाठी तर आहेच भारी पण मुन्नाचं कॅरेक्टर पण मजा आणत आहे. -- येस.. मी कालच बघून संपवली.. भारी आहे हा सिझन.. अजून बरेच twist and turns आहेत पण तेही चांगले वाटतात.. कुठल्याही पात्रांना एकाच शेड मधे नाही दाखवलय.. ते बघायला मस्त वाटतं.
अजून नाही सांगत..Spoiler होईल.. Happy all in all मस्त जमलाय हा सिझन.

जबरदस्त सिरियल आहे. मला ह्यातले कुणी अभिनेते (कुलभूषण खरबंदा सोडून) माहितही नव्हते. पण जबरदस्त कामे आहेत एकेकाची.
एकदा एपिसोड बघायला घेतला की थांबवत नाही. स्टोरी, दिग्दर्शन, अभिनय, लोकेशन सगळे खरे वाटते. थोडा फिल्मीपणा आहे. पण तरी काही उत्तम इंग्रजी सिरियल पाहिल्यात त्याला तोडीस तोड आहे मिर्झापूर २.
कदाचित पहिल्यापेक्षा कणभर जास्त चांगली असेल. पूर्ण पाहिली नाही अजून. अर्थात पहिला सिझनही अफाट आवडला होता.

बघून संपवले सगळे एपिसोड. पहिल्या सीझनच्या मानाने अगदीच रटाळ आणि प्रेडिक्टेबल आहे. स्टोरीमधले काही ट्रॅक्स तर उगीचच १० एपिसोड्स भरण्यासाठी टाकलेले आहेत असे वाटले. Disappointed Sad
( पहिले २/३ एपिसोड बरे आहेत. नंतर काहीच नवीन नाही.)

दड्डा आणि त्याचे जुळे हा ट्रॅक अतिशय कंटाळवाणा आणि उगाच घुसडल्या सारखा वाटलं
त्यातून तो दड्डा कुठंही करारी, क्रूर वगैरे वाटत नाही
कॉमेडीच वाटतो

उगाच घुसडल्या सारखा वाटलं >> अगदी! दद्दूच्या घरच्या क्लायमॅक्सला जाम हसायला आलं. घरी जाऊन दद्दूच्या बायकोने त्याची चांगलीच तासली असेल. Biggrin
गोलू आणि गुड्डू हे मेन ट्रॅक वाटायला हवे होते. पण ते पण साईड ट्रॅक वरच चालतात. त्यांच्यापेक्षा रतिसंकर सुक्लाचा मुलगा आणि जेपी यादव मनावर जास्त ठसतात. जेपीचा गेम करतानाही धाडकन शॉक आवडला असता पण ते ही ताला सुरात घडतं. माधुरी यादवच्या आयुष्यातले टर्नसही दोन एपिसोड पूर्वीच आपले एक्स्पेक्ट करुन झालेले असतात आणि मग ते घडतात. स्टोरी लाईन आहे चांगली, पण पटकथा/ एक्झिक्युशन वेगवान हवं होतं. अनेक प्रसंगात आपल्या मनात विचार करुन झाल्यावर मग ते सावकाश घडतं.
पंकज तिवारी आणि मुन्ना मात्र फारच आवडले.

सिंहाचे फॅमीली लाईफ प्रवचन पण ऊत्तरोत्तर कंटाळवाणं होत गेलं. स्टोरीचा शेवट पहिल्या भागात ठरवुन मग जिगसॉ पिसेस हलवल्यागत झालं. जिगसॉ शेवटी झालेलं दिसलं की फक्त मजा येत नाही, तर छोटे छोटे भाग साकारत, आणि घडलेले भाग मोडत राहिलं आणि शेवटी भलते पीसेस जुळवुन चित्र दिसलं की त्याची जास्त भुरळ पडते. पहिले अनेकभाग काही शॉक बसतच नाही, किंवा बसेल अशी मनाची धारणा झाल्याने न बसणे जरा ऑड वाटत रहाते.

पण काहीही असो, वीकेंड मजेत गेला. Happy

अमित ला +१.
दद्दा इ. उगाच वाटतात. गुड्डू (अली फजल) ला पूर्ण बरा झालेला दाखवायला काय झालं नकळे आणि त्या दिव्येंदू ला ५ गोळ्या घालूनही तो खडखडीत बरा दाखवलाय! गोलू पण अगदीच साईडट्रॅक वर ना फारसे डायलॉगही तिला!
१० च्या ऐवजी ५/७ भागात केली असती तरीही चाललं असतं.

हो शरद यादव आणि मुन्ना याच व्यक्तिरेखा मनात ठसतात
शेवटी असं वाटलेलं की या दोघांना ठोकून शरद मिर्झापुर घेईल
फुल चान्स होता त्याला

आणि ते एक पिस्तूलात किती गोळ्या असाव्यात याचा काहितरी नियम करा आणि तो अंमलात आणा राव

आणि केवळ आपली भर्ती एक्स्ट्रा मध्ये झाली आहे म्हणून एके47 हातात असतानाही, ती चांगली चालत असतानाही सध्या रिव्हॉल्व्हर च्या लांबून मारलेल्या एका गोळीत मरणे हे लोकांनी सोडून दिलं पाहिजे
हा एक्स्ट्रा जमातीवर केलेला अन्याय आहे Happy

एका एपिसोडने फारच निराशा केली. अगदी मिथुन चक्रवर्ती छाप गोळीबार! दद्दा प्रकरणही हास्यास्पद झाले. आत्तापर्यंतचे एपिसोड खूपच चांगले होते. पण शमशान घाट प्रकरण फसले आहे. असो. फार तपशिलात जायला नको.

मजा आई! तिसऱ्या सिझनसाठी बऱ्याच व्यक्तिरेखा मुद्दाम टाकल्या गेल्यात जाणवतंय.

पण एकंदरीत झकास.

मुन्ना त्या ४ वाट्या खिर पिणार्‍या पंडीतला पण दम भरतो ते फारच फनी आहे Lol
पैर इधर ला Lol

पंकज त्रिपाठी बेस्ट

मुन्ना त्या ४ वाट्या खिर पिणार्‍या पंडीतला पण दम भरतो ते फारच फनी आहे >>> हो. आणी त्या स्पीड पोस्ट आणले म्हणून बक्षिस मागणार्‍या पोस्टमन ला पण असंच काहीतरी फटकावतो. "दात है! लगाने है तेरे मूह मे? " असं काहीतरी Lol

Happy खरंच..गुड्डू पूर्ण बरा झालेला दाखवायला काय झालं? आणि ती गोलु अगदी खेळण्यात ल्या सारखी पिस्तूल मारत पुढेपुढे जाते ..फार खोटं वाटलं ते..
रॉबीन बद्दल काय मत आहे? Happy

Pages