एन पी के

Submitted by सई केसकर on 28 July, 2020 - 01:06

माझ्या बाल्कनीतल्या कुंड्यांमध्ये खत घालायचे आहे.
काही झाडं आहेत ज्यांना फुलं येतच नाहीत. झाडं मात्र वाढताहेत.
सोनटक्का, एक गुलाबाचं झाड आहे आणि जुई. तर कुंडीत खत घालताना त्याचं डायल्युशन कसं करायचं?
मी एनपीके १९:१९:१९ असं मागवलं आहे. आणि गुलाबासाठी काहीतरी फ्लॉवरिंग बूस्टर का काय.
माझ्या मते प्लांट ग्रोथ रेग्युलेटरमध्ये पॅक्लोब्युट्राझोल वगैरे वापरतात नियमित. पण तो पुढचा प्रश्न आहे. आधी खत कसं घालावं याबद्दल सल्ला हवा आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांद्याच्या सालीचे पाणी जे वर म्हणताय सगळे ते म्हणजे वरचे लाल साल घ्यायचे की पांढरा भाग पण घ्यायचा कांद्याचा?

फुलांच्या झाडांनासुद्धा जास्त फुलं येतायत असं उगाचच वाटायला लागलं आहे....... मलाही तसेच वाटायला लागलेय.आता फुलझाडे ठेवलीच नाहीत.पण उरलेली झाडे तरारलेली वाटली.
2 वेळा कांद्याचे पाणी मारले तर मुगाच्या झाडांनी मान टाकली.जरा कापून घेतल्यावर ठीक झालीत .पक्षांसाठी लावलीत.कढीलिंबाची काळी पाने तजेलदार झालीत.अर्थात बरीच पाने उपटलीत.पण काळी बुरशी कमी झाली आहे.

@वावे मुंगळे जास्तच झाले असतील लसूण, मिरचीचे सौम्य द्रावण फवारावे.>
अच्छा. धन्यवाद. नेमकं काय करायचं? लसूण आणि मिरच्या पाण्यात भिजवून ठेवून ते पाणी फवारायचं का?

लसूण आणि मिरची यांचे वाटण करून त्यात पाणी टाकावे. रात्रभर ठेवून सकाळी गाळून पाण्यात द्रावण बनवून फवारावे.

पण त्यांनी पांढऱ्या रंगाची घरं (?) बांधली रोपांवर. शेजारच्या कुंडीत बटाटे लावले होते तिथेही हे मुंगळे गेले. >>>

मुंगळे मिलिबुग्सचा फडशा पाडतात हे पहिल्यांदा ऐकले. पांढऱ्या रंगाची घरे ही घरे नसून पांढरे ढेकूण किंवा मिलिबग्स असावेत आणि ही मंडळी मुंग्यांशी दोस्ती ठेऊन आहेत हे माझे निरीक्षण आहे. झाडांना ह्या पांढऱ्या किड्यांनी वेढले की मुंग्यांही वाढतात. वाढलेल्या मुंग्यांमुळे किड्यांना काहीही फरक पडत नाही. झाड मात्र मरते.

पण त्यांनी पांढऱ्या रंगाची घरं (?) बांधली रोपांवर. शेजारच्या कुंडीत बटाटे लावले होते तिथेही हे मुंगळे गेले. >>>

मुंगळे मिलिबुग्सचा फडशा पाडतात हे पहिल्यांदा ऐकले. पांढऱ्या रंगाची घरे ही घरे नसून पांढरे ढेकूण किंवा मिलिबग्स असावेत आणि ही मंडळी मुंग्यांशी दोस्ती ठेऊन आहेत हे माझे निरीक्षण आहे. झाडांना ह्या पांढऱ्या किड्यांनी वेढले की मुंग्यांही वाढतात. वाढलेल्या मुंग्यांमुळे किड्यांना काहीही फरक पडत नाही. झाड मात्र मरते.

https://www.orkin.com/other/mealybugs

ओह!!!.साधनाताई, बरोबर आहे तुमचं. ते मिलीबग्जच आहेत. मी मुंगळ्यांच्या भीतीमुळे खूप जवळ जाऊन पाहिलं नव्हतं. आत्ता नीट पाहिलं. खूपच झालेत मिलीबग्ज. Sad तुम्ही दिलेली लिंकही वाचली. त्यात लिहिलं आहे की
....ants protect mealybugs from predators and may move mealybugs from one plant to another, thus increasing the number of infested plants.
मुंगळे सामील आहेत मिलीबग्जना Happy
आता मी ती सगळी अंबाडीची रोपं उपटून टाकूनच देते. (दोनदा भाजी झाली हे समाधान Happy पैसा वसूल )
बाकी टॉमेटोच्या वगैरे रोपांवर वर पिंगू यांनी सांगितलेलं द्रावण किंवा कडुनिंब तेल वगैरे काही तरी फवारते.

सब मिले है जी..... Lol

झाडे उपटून ती नष्ट करा, नाहीतर मिलिबग्स उपटलेल्या झाडावरून बोड्याबिस्तरा उचलून नवीन घर म्हणजे झाड शोधतील. मुंगळे आहेतच मदतीला Happy Happy

वावे, झाड उपटू नका. अंबाडी दीर्घकाळ टिकते.

एखादी काडी घेऊन बग्सना खरवडा. पाण्याच्या पाईपने जोराचा फवारा मारला तरी ते निघतील, फक्त कुंडीत पडणार नाहीत एवढे बघा. उगीच रोप का वाया घालवायचे. माझ्याकडे येतात तेव्हा मी चुनचूनके निकाल देती हु Happy Happy

एखादी काडी घेऊन बग्सना खरवडा. पाण्याच्या पाईपने जोराचा फवारा मारला तरी ते निघतील °>> याच्या पलीकडे गेलंय ते प्रकरण. खूपच आहेत. रोपं उपटून टाकूनच देते. अंबाडी परत लावेन. बिया आहेत अजून माझ्याकडे.

सब मिले है जी..... Lol>> 'मिली'भगत Wink

झाडांना ह्या पांढऱ्या किड्यांनी वेढले की मुंग्यांही वाढतात. >>>> अशीच माझी दोन जास्वंदाची झाडे गेली.

वावे आणि देवकी >> शक्य असेल तर, मिलीबग्स झालेल्या झाडांवर साबणाचे पाणी फवारा , बहुतेक याचे प्रमाण १ लिटर पाण्यात १ चमचा असे आहे
पण मी ५०० ml पाण्यात एक चमचा भांडी घासायचं लिक्विड जेल घालते आणि फवारते सलग २ - ३ दिवस असे केले कि मरतील ते .
माझे apple चे झाड असेच मेले आणि जास्वदीं वर दरवर्षी येतात हे बग्स फक्त इथे ते काळ्या रंगाचे असतात. भयंकर दिसतं मग झाड त्यांच्यामुळे Sad

केस कापायच्या दुकानात स्प्रे मारतात ना केसांवर तसला असेल तर बेश्ट! मग जवळून फवारा मारता येतो ..

फुलझाडे वगैरे लावली की रोज लक्ष ठेवावे लागते. मिलिबग्सच्या केसमध्ये नुकतीच लागण झाली असल्यास
जास्वंदीची तेवढीच फांदी कापून कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून देऊन मूळ झाड वाचवता येते. पण थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी जास्वंद जाते. पपई सारख्या झाडांना किंवा अबोली/टोमॅटो यांना वेढा पडला तरी ती झाडे वाचवता येतात पण जास्वंद वाचवणे थोडे कठीण जाते.

अंड्याची सालं, चहाच पाणी, काही खरकट पाणी टाकते मी... कांदेसालीचा प्रयोग उपयोगी असावा कारण खुपच लिब लागली आहेत सध्या...दोन वर्षे एकही फळ नव्हतं...
पुढील काही गोष्टी कंपोस्ट मध्ये ढकलते - भाज्यांची देठ, केळाची, कोबी, फ्लॉवरची पान.... तसेच पानगळ होऊन पडलेली पानं, लॉन मोविंग नंतर जमलेलं गवत... tissue पेपर वगैरे

मी कांदेसालीच्या पाण्याचा उपयोग करून पाहिला पण का कोण जाणे झाडांची पानगळ सुरू झाली. अबोलीची पाने गेली आणि गुलाबाची पण पाने गळली, असे का झाले असावे?

FB_IMG_1598373561597.jpg

फायनली!! दीड- दोन वर्ष वाट बघितली फुलांची. मला वाटतं P कमी पडत होतं. हा धागा लिहिल्यानंतर लगेच फॉस्फरस दिलं. कांदा आणि खत असं दोन्ही. एक महिना झाला. त्यामुळेच असेल का?

एकदा पॉड/ कणीस आले की सोनटक्क्याचा फुलायचा काळ पावसाळा व नंतर हाच असतो. वाढायला एक ते दोन वर्षे लागतात. तो त्याच्या वेळाने फुललाय. ह्या आधी पण कणीस आले होते का?

सई, सोनटक्का मस्तच! जुई पण फुलली का? तू सोनटक्क्याबरोबर जुइचा पण उल्लेख केला आहेस म्हणून विचारते.

माझ्या बागेत पण स्टार जॅस्मिन चा व्ल आहे. ह्या स्प्रिंग मध्ये उशीरा लावला पण अजिबात फुलं येत नाहीत. त्याला कांद्याचं पाणी एकदा देउन झालं. विकत घेतलं तेव्हा त्या टिलू वेलाला पण २-४ फुले होती. पण मी बाहेर जमिनीत लावल्यावर काही ढिम्म फुलं नाहीत. त्या झाडाच्या मुळांशी मुंग्याचं वारूळ पण आहे :रागः
टर्मिनेक्सने येउन काय काय फवारलय पण..
कोणाला आणखी काही उपाय सुचताहेत का?

मंडळी, इथे वाचून झाडांना कांदा पाणी दिले, तर गुलाबाचे आणि अबोलीचे झाड जवळजवळ जळाले. पाने काळी पडली आणि बरीचशी गळून गेली. एकदाच पाणी दिले होते आणि ते पण पुरेसे dilute. इतरांना फळलेला उपाय माझ्यासाठी मात्र अपायकारक ठरला. कुणी कारण सांगू शकेल का?

@शैलजा
कणीस नंतर आलं. म्हणजे खत आणि कांदा पाणी घातल्यावर. कदाचित कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं झालं असेल. आता पलीकडच्या झाडाला पण कणीस आलं आहे.
@शुंपी
जुई मी बरीच छाटली. कारण बरेच महिने ती अशीच वाढत होती. गुलाबही छाटला. आता हळद मोठ्या कुंडीत ट्रान्स प्लांट केली आहे. आणि अशाच मोठ्या कुंडीत आता सोनटक्का लावीन अजून.

मंडळी, इथे वाचून झाडांना कांदा पाणी दिले, .........डायल्यूट करून दिले होते का? तसेच १०-१५ दिवसांनी परत द्यायचे असते.मध्ये गॅप हवा.

कांदापाणी दिल्यानंतर एका कुंडीतील गवती चहा सुकून गेला जो सुगंधी आणि गावठी होतो, तर दुसऱ्या कुंडीतील गवती चहाला काही विशेष फरक जाणवला नाही. हा नर्सरी मधून विकत आणला आहे.

प्रत्येक झाडाला कांदापाणी हे उत्तर नाहीये. काही झाडांना चालते, काहींना नाही चालत. पाणी डायल्युट करून घालावे. देवकी ह्यांनी म्हटलं आहे, तशी गॅप हवी दोन डोसमध्ये.

जुई मी बरीच छाटली. गुलाबही छाटला. >> जुईच्या जाड छाटलेल्या फांद्या लावल्या तर त्या रुजतील. गुलाबाच्याही डोळे असलेल्या जाडशा फांद्या असतील तर नक्की रुजतील. लावताना चिमूट दालचिनी पावडर आणि चमचाभर मध ह्याचे मिश्रण करून ते फांदीचा जो भाग जमिनीत खोचणार त्यावर लावा.

पुण्यात असाल तर एखादी जाड कापलेली फांदी असल्यास मला पण द्या(ल का?) Proud

सरसकट सगळ्या झाडांना कांदा पाणी का घालताहेत लोकं?
असीडीक आणि अल्कालाईन झाडं अशी विभागणी असते.
आणि त्यानुसार, एन पी के घालावं.
आणि त्यातही, ट्रोपिकल, सबट्रोपिकल, वगैरे प्रकार असतात.
अश्याने झाडं मरणार नाही तर काय होणार.

साधं चांगली माती, लो कॉन्सेट्रेशन ओफ नॅचरल एन पी के घाला. बस्स आहे. आणि जपा झाडांना.

>>>>पुण्यात असाल तर एखादी जाड कापलेली फांदी असल्यास मला पण द्या(ल का?) Proud
हो!! देईन की! मला नंबर कळवा. मी आधी फोटो पाठवते म्हणजे कुठून कपायचे वगैरे नीट कळेल.

Pages