लहान मुलांना कसे बिझी ठेवता येईल?

Submitted by कटप्पा on 5 April, 2020 - 15:25

सध्याच्या कोरोना वर्क फ्रॉम होम वेळेत लहान मुलांना कसे बिझी ठेवता येईल? शाळा आणि डे केयर्स बंद आहेत आणि नवरा बायको दोघेही घरून काम करत असताना तुम्ही कसे मॅनेज करत आहात? तुमच्या अनुभव आणि सूचनांचा फायदा सर्वाना होऊ द्या |

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरारा मस्त व्हिडीओ... ते पर्मनन्ट मार्कर आहे का ज्याने बेडूक बनवला आहे बेसिन मध्ये कि सिम्पल मार्कर??

पर्मनन्ट मार्कर.
सिंक अगदी स्वच्छ व चिकण हवे. अन्यथा तो बेडूक तरंगणार नाही.

मस्त धागा!
ऋन्मेष, मस्त बाबा आहेस रे!

धन्यवाद देवकी, तेवढेच व्यवस्थित जमलेय आयुष्यात Happy

पाफा, आमच्याकडे म्यागी मीच करतो. दुसरया कोणी केल्याचे आठवत नाही. ना बायकोने ना आईने...

@ धागा,
अजून एक ऑप्शन - वॉल पेंटींग.. आमच्याकडे तसेही वर्षभर चालते. घरातली एक भिंत शिल्लक नाही जी रंगवली गेली नाहीये. आताही त्यातल्या त्यात शिल्लक भिंत शोधून मम्मी स्केच काढतेय, पोरगी रंगवतेय.

नुकतेच चालायला लागलेल्या मुलांसाठी एरव्ही रॅगिंग समजले जातील असे कामं:

गुळगुळीत फरशीवर रांगोळी/ धान्य वगैरे खेळायला देणे आणि ते भरून ठेवायला लावणे.. माझ्या भाच्याला एका दुपारी ह्या कामाला लावलं होतं, फक्त अधून मधून काहीतरी प्रतिसाद देत राहायचा.. मूठभर धान्य आरामात तासभर पुरतं!

आमच्याकडे online School सुरू झालं. मला अजिबात समर वेकेशन नाही असं डोळे पाणवून झालं. एवढ्यात, फोन/ninetendo इत्यादी काढून घेणार नाही असा वायदा करुन झालाय. यंदापासून आम्ही सकाळी उठवणार नाही हे गेल्यावर्षीच clear केलं होतं. तर शाळेत जाईन तेव्हा उठवू नका पण home school साठी तुम्ही उठवायला पाहिजे अश्या वाटाघाटी झाल्या आहेत. विघनसंतोषी पालकांनी फी भरल्या नव्हत्या. शाळा नाही तर कसली फी म्हणे! काय बोलायचं आता Sad

काही खेळ घेता येतील जसे,

- बाबांची ड्युआय आणि त्याचे पासवर्डसची डायरी लपवून ठेवणे.
- बाबांच्या मायबोली अकाउंटवरून लॉगिन होऊन विपूची प्रिंट आउट काढणे
- इथे विचारलेल्या कोतबो प्रश्नांचे वाचन घरात मोठमोठ्याने करणे
- बाबांची स्त्री स्वातंत्र्याबद्दलची उदार मतं आईला दाखवणे
इत्यादी

इथले कोतबो प्रश्न प्रौढांसाठी असू शकतात . तेवढा फक्त यादीतून काढा . बाकीचे उपक्रम छान वाटत आहेत .
बाई दवे तुमच्या आयडी चा अर्थ काय ? नाव आहे का तुमचं वर्णन ?

Pages