तर मंडळी ... "अमानवीय" या धाग्यावर थोडी चर्चा झाल्यावर जरा आता इथे अंग झाडून चर्चा करू....
मिती (Dimention) बद्दल माझे समज / ज्ञान खालील प्रमाणे आहे ..चुकलो असेल तर सांगा....
१) आपण राहतो ती एक मिती आहे ... आणि याशिवाय अंतराळात अनेक मिती असतात पण त्याचा वापर करण्याचे ज्ञान अद्याप आपल्याला झालेले नाही...
२) UFO किवा Alien ज्या वाहनातून / यानातून प्रवास करतात ती वेगळी मिती आहे ... म्हणून आपण त्यांना कधीच गाठू शकत नाही ...
३) आपले सगळे भौतिक शास्त्राचे नियम (वेग /प्रकाशवर्षे / काळ) त्या मिती मध्ये चालत नाही ...म्हणूनच हजारो प्रकाशवर्षे दूर असणार्या ग्रहावर आपण काही मिनिटात पोहचू शकतो ...
४) मिती बदलाचे अनुभव काही व्यक्तींनी घेतेले आहेत आणि त्याचे उत्तर अजून देत आलेले नाहीत... बर्मुडा Triangle वरून जात असताना एका वैमानिकाला असा अनुभव आला कि .... नेहमीच्या रस्त्याने (आकाशातल्या) जात असताना अचानक एके ठिकाणी त्याचे विमान दाट ढगातून जाऊ लागले ..काही मिनिटानंतर (साधारण १० मीन) तो त्यातून बाहेर आला ... पण त्या दरम्यान त्याचे ठिकाण दाखवणारी यंत्रणा बंद होती .... ढगातून बाहेर आल्यवर जेव्हा त्याने पहिले तेव्हा यंत्र परत चालू झालेले... आणि तो जिथे पोहोचला होता त्या ठिकाणी येण्य्साठी त्याला ५ तास लागले असते (नेहमीच्या रस्त्याने) ... त्याने इंधन तपासले तर ते पण कमी नव्हते झाले... तो बधिर अवस्थेत खाली आला आणि... काही दिवसानंतर या प्रसंगाचे कारण "मितीप्रवेश" होते असे सांगण्यात आले.
५)जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टयन (type करता येत नाही ) यांनी एकदा सांगितले होते कि आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या वातावरण अशी बरीच छिद्रे / मार्ग आहेत ज्यांतून आपण दुसर्या मिती मध्ये प्रवेश करू शकतो...
तर मंडळी... आता तुमची वेळ आली आहे ... जरा तुमचे पण ज्ञान वाटा आणि वाढवा....
हो, पण माझ्या समजुती नुसार,
हो, पण माझ्या समजुती नुसार, त्या दोन्ही प्रकारात ते एक सांख्यीकी शक्याशक्यता दर्शवणारे अब्स्ट्रॅक्ट मॅथेमॅटिकल फन्क्शन आहे हे विसरुन ते प्रत्येक मापनानंतर इतर शक्य असणार्याही भौतिक स्थिती दर्शविते असे गृहीत धरलेय असे वाटते. या गृहीत धरण्याने एक तर सगळ्याच शक्यता प्रत्यक्षात अस्तित्वात असाव्या लागतात किंवा एका मापनानंतर वेव्ह फन्शन collapse तरी व्हावे लागते.
जर त्याकडे सांख्यीकी शक्याशक्यता दर्शवणारे अब्स्ट्रॅक्ट मॅथेमॅटिकल फन्क्शन म्हणुन बघितले तर दोन्हींची गरज उरणार नाही.
तसेच चौथ्या मितीत जगणाऱ्यांना
तसेच चौथ्या मितीत जगणाऱ्यांना सध्या आपण ज्याला "काळ" म्हणतो तो अस्तित्वात नाही. >>>
कसे ?
दीपस्त, माझ्या माहितीनुसार
दीपस्त, माझ्या माहितीनुसार थोडक्यात मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतोय.
(यात दुरुस्ती अथवा भरीचे स्वागत आहे.)
क्वांटम मेकॅनिक्स ही द्रव्य आणि उर्जा (matter and energy) यांची आण्विक आणि परमाण्विक पातळीवरील गुणधर्मांचा अभ्यास करणारी शाखा आहे.
मॅक्स प्लॅंकने, द्रव्य ज्याप्रमाणे सूक्ष्मकणांपासून बनले आहे त्याच प्रमाणे उर्जा ही सुद्धा सूक्ष्मकणांपासून (individual units) पासून बनली आहे असा सिद्धांत मांडला. त्या सूक्ष्मकणाला त्याने quanta हे नाव दिले.
आईन्स्टाईनने मग उर्जाच नव्हे तर किरणोत्सर्गात सुद्धा असेच सूक्ष्मकण (नंतर ज्यांना फोटॉन म्हटले गेले) असतात हा सिद्धांत मांडला.
तर पुढे लुई द ब्रॉई ने द्रव्य आणि उर्जा यांच्यात मूलभूत फरक नसतो, आण्विक आणि परमाण्विक पातळीवर दोन्हींच्या प्रवृत्ती(behaviour) कणांपासून बनलेल्या किंवा तरंगांपासून बनलेल्या असल्याप्रमाणे असू शकतात हा सिद्धांत मांडला.
हाच तरंग-कण-द्वैतता (wave-particle-duality)सिद्धांत.
यामुळे आण्विक आणि परमाण्विक लांबीच्या रचनांच्या प्रवृत्ती आणि गुणधर्मांचा अभ्यास करणे शक्य झाले.
कारण यापूर्वीच्या क्लासिकल मेकॅनिक्सचे नियम जर अणुच्या रचनेला लावले, म्हणजे इलेक्ट्रॉन कण स्थितीत केंद्राभोवती फिरत राहिला (रुदरफोल्ड मॉडेल) तर वर्तुळाकार गतीमुळे किरणोत्सर्ग होवुन त्याची उर्जा कमी कमी होत तो केंद्रात जावून कोसळायला हवा. म्हणजे अणुची स्थायी रचना क्लासिकल मेकॅनिक्सद्वारे समजणे शक्य नव्हते.
क्वान्टम मेकॅनिक्स नुसार इलेक्ट्रॉन हा तरंग-कण द्वैततेत अनिश्चित वलयात फिरतो.
अशा आण्विक तरंग-कण रचनेत एखादा घटक तरंग केव्हा असतो आणि कण केव्हा, एखाद्या क्षणी त्याचे नक्की स्थान कोणते, त्याचा आवेग किती?
रचनेची अशी स्थिती दर्शविण्यास complex wave function आहे. पण यातून अमुक एका क्षणी अचूक एक निश्चित स्थान सांगता येणार नाही.
याचे कारण म्हणजे हाइजनबर्गच्या uncertainity principle प्रमाणे दोन पूरक गुणधर्म एकाचवेळी अचूकतेने मोजता येत नाही्त. एक जेवढ्या जास्त अचूकतेने मोजाल, तेवढी जास्त त्रुटी दुसरा मोजण्यात होईल.
उदा.: एखाद्या क्षणी केंद्राभोवती इलेक्ट्रॉन नक्की कुठे असेल हे अचूक सांगायला त्याचा अचूक आवेग मोजावा लागेल. हे दोन्ही एकाचवेळी अचूकपणे करणे शक्य नाही. तर त्याच्या स्थानाची एक श्क्यता (या ते त्या स्थानापैकी कुठेतरी) सांगता येईल.
अशा तर्हेने हे व्हेव फक्शन रचनेच्या (systemच्या) एखाद्या क्षणी ज्या काही स्थिती असण्याच्या शक्यत्या आहेत त्यांची सांख्यिकी शक्यता दर्शविते, कुठली अमुक एक स्थिती असेल हे निश्चितपणे सांगता येत नाही.
यात नील्स बोरची भर: कण हा एखाद्या क्षणी कण आहे की तरंग, तो नक्की कुठे आहे, हे फक्त जर त्यावेळी त्याचे मोजमापन केले तरच कळते आणि फक्त तेव्हाच त्यावेळेपुरता तो तिथे आणि त्या स्थितीत असतो. इतरवेळी त्याचे गुणधर्म सोडाच तो अस्तित्वात आहे की नाही हे सुद्धा सांगता येत नाही.
यातून मग सुपरपोझीशन तत्व आले: कुठली रचना कुठल्या क्षणी कुठल्या स्थितीत असेल हे सांगणे शक्य नसले तरी आपण जोपर्यंत मोजमापन करत नाही तो पर्यंत ती एकाच क्षणी शक्य असलेल्या सर्व स्थितीत असते. जेव्हा आपण मोजमापन करतो त्या क्षणी ती शक्य असलेल्या सर्व स्थितीतून एकच निश्चीत स्थिती प्राप्त करते.
आहे ना गंमत?
याचे उदाहरण देण्यास श्रॉडिन्जरने ड्ब्यातील मांजर ही क्ल्पना मांडली. (Schrodinger's cat).
मग आण्विक पातळीवरील ही थेअरी मोठ्या पातळीवर, भौतिक जगास लावण्यात आली. मोजमापन करणे म्हणजे एखाद्या(जीवा)ने बघणे / अनुभवणे असा त्याला अर्थ आला.
जर कुणी असे बघितले /अनुभवले त्याक्षणी जर वस्तूला एखादी स्थीती प्राप्त होते तर मग त्या व्हेव फन्क्शनचे काय ज्यानुसार वस्तु एकाच वेळी अनेक स्थितीत असायला हवी? तर ज्या क्षणी मोजमापन केले (वस्तुला कुणी बघितले / अनुभवले) त्या क्षणी ते फक्शन collapse होते.
हे आहे कोपनहॅगन इंटरप्रिटेशन.
यावर दुसरे तात्विक इंटरप्रिटेशन म्हणजे मेनी वर्ल्ड्स इंटरप्रिटेशन जे वर अतुल पाटील यांनी सांगितले आहे. यात व्हेव फक्शन collapse होत नाही तर सगळ्या शक्यता या अस्तित्वात असून प्रत्येक शक्यतेचे एक वेगळे विश्व असते.
आपण विविध शक्यतांचे वेगवेगळ्या विश्वात साक्षीदार असतो. काही विश्वात मी जिवंत असतो,काही वि्श्वात मी मृत असतो, तर काही विश्वात मी जन्मालाच न आलेला असू शकतो
>> त्याकडे सांख्यीकी
>> त्याकडे सांख्यीकी शक्याशक्यता दर्शवणारे अब्स्ट्रॅक्ट मॅथेमॅटिकल फन्क्शन म्हणुन बघितले तर दोन्हींची गरज उरणार नाही.
गणितात तशी गरज नाही. पण भौतिकशास्त्रात अब्स्ट्रॅक्ट फोर्मुले निरर्थक आहेत. त्यामुळे त्यांचे वास्तव जगाशी संबंधित इंटरप्रिटीशन करून त्याची पडताळणी करणे महत्वाचे ठरते. मी वरती दिलेले द्विमितीय जगातला जीव त्रिमितीय जगातील वस्तूंचे कसे इंटरप्रिटीशन करेल याचे उदाहरण खूप बोलके आहे. झेड अक्षावर अनेक शक्यता त्रिमितीय जगात एकाचवेळी अस्तित्वात असतात. "घनवस्तू" च्या रूपाने आपल्याला त्या एकत्र दिसतात व अनुभवता येतात. पण एक्स आणि वाय अक्षातल्या प्रतलातच ज्यांच्या जाणीव बांधलेल्या आहेत त्या द्विमितीय जीवांना झेड अक्षावरील त्या सर्व शक्यता एकाच वेळी दिसू शकतील का? अर्थातच नाही. त्रिमितीय जीवांना मात्र त्या दिसतात. तेच तत्व त्रिमितीय आणि चौथ्या मितीच्या बाबत लागू करता येते.
>> तसेच चौथ्या मितीत जगणाऱ्यांना सध्या आपण ज्याला "काळ" म्हणतो तो अस्तित्वात नाही. कसे ?
कारण त्यांच्यासाठी काळ हा फक्त एक अक्ष असेल ज्याच्या मागे पुढे ते सहज पाहू शकतात (जसे आपल्या त्रिमितीय जीवांसाठी झेड अक्ष असतो. पण दोन अक्षातील जीव मात्र तो तसा पाहू शकत नाहीत)
(ता. क.,... मी वर अनेकदा द्विमितीय जीव, त्रिमितीय जीव असे काल्पनिक शब्दप्रयोग वापरले आहेत ते केवळ भौतिकशास्त्रातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठीच. जीवशास्त्रीय अर्थाने नव्हे)
@मानव पृथ्वीकर: तुम्ही क्वांटम मेकॅनिक्सची थोडक्यात पण अतिशय चांगली माहिती दिली आहे.
धन्यवाद अतुल.
धन्यवाद अतुल.
EPR quantum entanglement आणि क्वांटम व्हेव फन्क्शन्च्या पूर्ततेस लागणारा/रे अज्ञात चल, यांची खातरजमा होऊन खंडन झाले आहे का अद्याप?
धन्यवाद
धन्यवाद
परंतू जिथे "वेग" या स्थितीचा उल्लेख येतो तिथे "टाईम/वेळ" याचा उल्लेख यायला हवा. वेगाचे मोजण्याचे मापच "वेळ" या स्थितीवर अवलंबून आहे.
इलेक्ट्रोन. अणू प्रोटोन यांची स्थितीत बदल होत असतो. त्यांच्या बद्लाला कारणीभूत त्यांच्यातील उर्जा असते. त्याउर्जे मुळे स्थिर वस्तूमधे सुध्दा वेग असतो.
@मानव
@मानव
>> EPR quantum entanglement आणि क्वांटम व्हेव फन्क्शन्च्या पूर्ततेस लागणारा/रे अज्ञात चल, यांची खातरजमा होऊन खंडन झाले आहे का अद्याप?
मला हा प्रश्न नीट कळलेला नाही. "खातरजमा होऊन खंडन" म्हणजे काय? ओके. माझ्या माहितीनुसार EPR हे त्या काळी आईनस्टाईन आणि इतर दोघांनी क्वांटम थियरी ला केलेलं आव्हान होते. Quantum entanglement बाबत आईन्स्टाईनचे मत नकारात्मक होते. पण माझ्या वाचनात २०१५ साली quantum entanglement प्रयोगाने सिद्ध झाले आहे असे आले होते. हे विषय अजूनही संशोधन अवस्थेत आहेत. माझ्या नॉलेज नुसार hidden variables हि EPR Paradox वर उपाय म्हणून बनवलेली थियरी आहे . पण त्याविषयी अजून खोलात मला माहिती नाही.
@दीपस्त:
हो. वेग म्हणजेच त्यात वेळ आली हे तर झालेच. बर मग पुढे? नाही. मला नाही कळले तुम्हाला नक्की काय विचारायचे/सांगायचे आहे.
म्हणजे त्यावर पुढे संशोधन
म्हणजे त्यावर पुढे संशोधन होऊन ते proved/ disproved झालेय का?
माझ्या माहिती आणि समजुती नुसार Einstein आणि दोघांनी quantum wave function अपूर्ण आहे हे दाखवण्यास quantum entanglement ची थेअरी मांडली. अर्थात quantum entanglement बाबत आईन्स्टाईनचे मत नकारात्मक होते, कारण ते आहे तसे मान्य केल्यास quantum formulation अपूर्ण आहे हे सिद्ध होते असे त्यांचे म्हणणे होते. entangled pair पैकी एका सूक्षकणावर काय मोजमापन केले ते दुसर्या सूक्ष्मकणाला कळते आणि तसे होण्यास दोघांमध्ये जी माहितींची अदलाबदल होते ती प्रकाशाच्या वेगा पेक्षा जास्त वेगाने व्हायला हवी जे शक्य नाही. त्यापेक्षा अशी माहितीची अदलाबदल होत नसून जेव्हा सूक्ष्मकण entanglement साठी विभक्त होतात तेव्हाच ती माहिती घेउन जातात आणि त्यासाठी hidden variables ची आवश्क्यता भासते, म्हणजेच quantum formulation अपूर्ण आहे. असे आइन्स्टाईनचेही मत होते (असे वाचल्याचे स्मरते. हे चूक असल्यास दुरुस्ती करावी).
यासाठी विचारले की हे आता सिद्ध अथवा असिद्ध झालेय का? म्हणजे क्वांटम थेअरीच्या तथाकथित(?) पूर्ततेसाठी अद्याप स्कोप आहे की ते आहे तेच पूर्ण आहे हे निर्विवादपणे सिद्ध झालेय?
४थी मितीत वेळ नाही तो स्थिर
४थी मितीत वेळ नाही तो स्थिर आहे असे काहीसे विधान आपण केले होते त्या संबंधात बोललो मी.
कि ४थी असो अथवा ५ वी त्यात वेळ हा महत्वाचा घटक असेल. त्याशिवाय मिती कशी तयार होउ शकेल ? हे मी तुम्हा दोघांच्या प्रतिक्रियांमधुन समजण्याचा प्रयत्न करत आहे.
दीपस्त, चांगला प्रश्न.
दीपस्त, चांगला प्रश्न.
मी माझे मत सांगतोय, अतुल त्यांचे सांगतील.
चौथ्या मितीत वेळ नाही तो स्थिर आहे असे नव्हे तर चौथी मिती म्हणजे काल. यात आपणास हवे तसे मागे पुढे जाता येईल अथवा स्थिर रहाता येईल का? माहित नाही. अवकाश-कालाच्या फॅब्रिकमध्ये आपल्याला फक्त अवकाश मिती किंवा फक्त काल मितीमध्ये मागे पुढे जाता येत नसावे, तर नेहमी आपण अवकाश-काल मितींमध्ये हलत असु
आपल्याला काल हा ठराविक वेगाने जाताना दिसतो. म्हणजेच आपण काल या मितीवर एका ठराविक वेगाने आणि एका दिशेने (एकाच नव्हे) जात आहोत.
माझ्यामते मेनी वर्ल्ड्स इंटर प्रिटेशन मध्ये आपण काल मितीत मागे पुढे जात नाही तर आपण काल या मितीत एक दिशा घेतो. म्हणजे जसे द्विमिती मध्ये x आणि y अक्ष आहे. त्यात फिरताना आपण फक्त x अथवा y अक्षाचीच दिशा घ्यायला हवी असे नाही तर आपण त्यातिल ३६० degree पैकी कुठलीही एक दिशा घेऊ शकतो. तुम्ही एका दिशेला जाउ शकता मी दुसर्या या प्रमाणे जवळपास अनंत दिशा असतील.
त्याच प्रमाणे क्वांटम मेकॅनिक्सचे जे मेनी वर्ल्श इंटरप्रिटेशन आहे की सगळ्या शक्यता अस्तित्वात असतात, म्हणजे प्रत्येक शक्यतेची काल या मितीवर एक एक दिशा असावी. म्हणजे काल या मितीवर आपण ठराविक वेगाने जातच असतो, फक्त प्रत्येक शक्यतेनुसार दिशा बदले. प्रत्यक घटने नंतर आपण काल मितीवर सर्वात जास्त शक्य (मोस्ट प्रोबॅबल) दिशा घेतो.
क्वांटम थेअरी मध्ये बघणे/अनुभवणे यामुळे वस्तुला एक स्थिती प्राप्त होते, इतर वेळी ती सगळ्या शक्य स्थितींमध्ये एकाच वेळी असते असे जे म्हटले आहे. ते बघणे / अनुभवणे म्हणजे एका conscious mind ने केलेले निरिक्षण.
Conscious mind ने निरिक्षण केल्यास अशी कशी काय एखादी स्थीती प्राप्त होते, हे समजण्यास, Double slit experiment आहे. (जो आधी Young ने प्रकाशावर केला होता, तो नंतर सूक्ष्मकणांवर-electrons वर करण्यात आला.). यातून दिसून येते की conscious mind निरीक्षण करत नसेल तर एक electron एकाच वेळी दोन्ही फटींतून जातो, पण जर conscious mind निरिक्षण करत असेल तर मात्र तो एकावेळी एकाच फटीतून जातो. त्याच्या बद्दल हा व्हिडीओ बघा.
https://www.youtube.com/watch?v=DfPeprQ7oGc
माझ्या समजुतीप्रमाणे conscious mind हाच काल मितीवर एका ठराविक वेगाने जात असतो, तो conscious mind चा गुणधर्म असावा, त्याला इलेक्ट्रॉन एकाच वेळी दोन्ही फटीतून जाणे बघणे शक्य नाही. म्हणजे त्याला काल मितीवर स्थिर होणे शक्य नसावे असा अर्थ काढता येउ शकतो.
जे काही वाचले ऐकले त्यावरुन झालेले हे माझे आकलन / समजूत आहे, जे चुकीचेही असु शकते.
मानव, खूपच छान सांगितलेत. यंग
मानव, खूपच छान सांगितलेत. यंग चा Double slit experiment म्हणूनच प्रसिद्ध आहे.
>> जे काही वाचले ऐकले त्यावरुन झालेले हे माझे आकलन / समजूत आहे, जे चुकीचेही असु शकते.
मुळात हा विषयच खूप गहन आणि अजूनही संशोधन सुरु असलेला असा आहे. क्वांटम मेकॅनिक्स अद्याप परिपूर्ण नाही.
>> ४थी असो अथवा ५ वी त्यात वेळ हा महत्वाचा घटक असेल. त्याशिवाय मिती कशी तयार होउ शकेल ?
अगदी उत्तम प्रश्न. मानवनी सांगितले आहेच. सध्या आपण ज्याला काळ म्हणतो तो चौमितीत एक मिती बनून राहील. आपल्याला डोळे, कान, स्पर्श यातून तीन मितींचे ज्ञान होते. वेळ ह्या चौथ्या मितीत मागे पुढे पाहता येत नाही. मागे फक्त ज्या दिशेने आलो तितकेच जाणवत राहते. बाकीच्या दिशांना काय आहे (आपल्या भाषेत काय झाले असते) हे नक्की सांगता येत नाही. जर अमुक घडले असते तर काय झाले असते? अमुक केले तर पुढे काय होईल? मेनी वर्ल्ड इंटरप्रिटीशन नुसार काळाच्या मितीत ते ते सगळे तिथे तिथे अस्तित्वात आहे. फकत आपण त्या दिशेने आलो नाही म्हणून आपल्या इंद्रियांना ते अनुभवता आले नाही इतकेच.
पण समजा अजून एक इंद्रिय असते ज्याने चौथ्या (काळाच्या) मितीत मागे पुढे पाहता येते. तर काय झाले असते? त्या स्थितीत जीवन असेल का? असले तर कसे असेल? ते जगच मुळात वेगळे असेल. तेंव्हा कदाचित पाचवी मिती काळ म्हणून अस्तित्वात असेल. पण आपण त्याची कल्पना पण करू शकत नाही.
आणि स्ट्रिंग थियरीनुसार (जी क्वांटम थियरी मधील अनुत्तरीत प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मांडली गेली) अशा दहा मिती अस्तित्वात आहेत
ब्रह्मांडात किती मिती आहे
ब्रह्मांडात किती मिती आहे याची मोजदाद करता येणे शक्य नाही. अंदाजा लावू शकतो ते ही कल्पित केलेल्या गोष्टींवर
वेळ हा घटक मानव हा स्वतःच्या नियमानुसार गृहित धरत आहे. उदा. २४ तास. ७ आठवडे १ वर्ष इ. हे मानवाच्या कल्पित गोष्टींवर आधारीत आहे.
आणि पृथ्वीवर मनुष्य हा एकमेव जीव नाही आहे. बरीच जैवविविधता आहे. त्यातील प्रत्येक सजिव आपापल्या कल्पित गोष्टींवर आधारीत वेळ ठरवत असतील.
उदा.
मानवाच्या हिशोबात सकाळचे ९ वाजले आहे.
त्याच वेळेस त्याच्या घरात असणार्या पाळीव प्राण्याने फक्त "सकाळ" हा "वेळ" म्हणून गृहित धरलेला असेल कारण त्याने वेळेचे पार्ट्स केले नाही.
त्याच वेळेस उत्तर ध्रुवावर राहणार्या अस्वल, सील या प्राण्यांसाठी तो वेळ फक्त "उजेड" म्हणून असेल
त्याच वेळेस समुद्राखाली राहण्यांसाठी जे कधीच समुद्राच्या पृष्ठभागावर येत नाही त्यांच्यासाठी ९ वाजले हे अस्तित्वाच नाही. त्यांच्यासाठी काळ अमर्यादित आहे. याठिकाणी "काळ" चालू आहे. पण त्यांच्याना ठाऊक नाही. कारण सभोवताल नुसता गुडूप अंधार आहे.
(वरील प्रत्येक प्राण्यासाठी वेळेचे गृहितक वेगळे असेल. प्राण्यांसाठी उजेड आणि रात्र या दोनच वेळ आणि महिन्यांनी येणारे ऋतू हेच महत्त्वाचे असतील जसे आपण ९ वाजले ६ वाजले असे म्हणतो तसे ते वेगळे म्हणत असतील)
वेळ ही मिती हे कल्पित केलेल्या गृहितकावर अवलंबित आहे. असे किमान मी तरी मानतो. आपण जो काळ / वेळ जी मानत आहे ती इतरांसाठी अस्तित्वातच नसेल .
उद्या माझ्याजवळ असणार्या कुत्र्याशी अचानक बोलता आले आणि मी त्याला म्हणालो की " आज ८ फेबृ २०१६ तारिख आहे आणि दुपारचे २ वाजले आहे"
तर तो मला वेड्यात काढेल. कारण त्याच्यासाठी तो "काळ" अस्तित्वात नाही आहे. त्याच्यासाठी "काल, आज, उद्या / सकाळ रात्र" हेच "काळाचे प्रमाण" असेल.
त्यामुळे आपण ४थी मिती म्हणुन वेळ याचा उल्लेख करतो तेव्हा "काळ" ही कल्पित केलेल्या गृहितावर अवलंबून असेल.
दीपस्त, विश्वात अथवा मुळात
दीपस्त, विश्वात अथवा मुळात काल अस्तित्वात आहे की नाही हा वेगळा प्रश्न असू शकतो.
पण तुम्ही जी उदाहरणे दिलीत त्यावरुन तुमचा प्रश्न वेगळा वाटतो.
प्राणीच कशाला जर आदिवासी मानव घेतले तरी त्यांच्यात आपण करतो तसे दिनांक, वेळ असे काल मापन नसेल.
आजची तारीख केव्हा किती वाजले हे अर्थातच आपण आपल्या सोयी नुसार घेतले आहे, तशात इंग्रजी, मराठी, तामीळ अशा वेगवेगळ्या दिनदर्शिकाही आहेत.
पण आपल्याला माहिती आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे. (किंवा पूर्वी लोक सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आहे असे समजत). सूर्य उगवला की दिवस सुरु मावळला की दिवस संपला. मावळला की रात्र सुरु उगवला की रात्र संपली. हे दिवस आणि रात्र यालाच आपण वेळ असे नाव दिलेले आहे. असा एक दिवस आणि एक रात्र मिळुन त्याला सौर्य दिवस हे शास्त्रीय नाव. (पण वापरात त्याला ही आपण दिवसच म्हणतो. ) पुढे याचे आपण वेगवेगळे प्रहर असे भाग केले, त्यानंतर घटका, मग पुढे तास वगैरे, ते अशा दिवसाचा संदर्भ धरुनच.
जरी प्राण्यांना हे का, कसे होते ते कळत नाही तरी दिवस आणि रात्र असतातच व ते पण हे अनुभवतात. आणि हे प्रमाण काल असतो हे दाखवण्यास पुरेसे आहे.
जसे त्यांना एक फूट, एक मिटर, एक फर्लांग, मैल वगैरे माहित नाही पण अंतर आहे हे माहित असते ते कापण्यास त्यांना चालावे / सरपटावे / धावावे / उडावे / पोहावे लागते. हे अनुभव अंतर अस्तित्वात आहे हे दाखवण्यास पुरेसे आहे.
Ha dhaga vachayla khup maja
Kharetar college mdhe ya theory aiktana bhari vatayach pn ata barech kahi dokyavarun jat ahe . Ha dhaga vachayla khup maja ali.. mala padlele prashna....
1. Sajiv prani trumitit jagato.. tyala ayushya ahe mhnje tharavik kalanantar to marto...samja ek virus jo atisukhsm ahe ani tyache life anant ahe jyala jagane marne hi sankalpana ch nahiye.. asha virus la apan freeze kele ani 100 years ne baher kadhle tar tyala kahich farak padnar nahi.. to ahe tasach rahil.... thodkyat apan tyachi miti. Ch badlun takli jithe VEL hi sankalpana ch nahiye....Sajiv pranyachi ashi miti badlta yeil ka.. jyala sharir ahe , jo JIVANT ahe ashachi.?
2. Prani marto mhnje fakt miti badlto.. dusrya vishwat to dusrya roopat asto ase kahi asel ka ?
मी फार पूर्वी (१०-१२
मी फार पूर्वी (१०-१२ वर्षांपूर्वी) एका जुन्या मासिकात एक कथा (अर्थातच काल्पनिक!) वाचली होती. आता सर्वच बारीक-सारीक तपशिलांसह आठवत नाही, पण साधारण आशय आठवतो आहे, तो सांगतो. त्याचा या 'मितीबदलाशी' काही संबंध आहे का ते कृपया सांगावे. (किंवा मितीबदल यालाच म्हणतात का?)
एक शाळेत/ कॉलेजमध्ये जाणारी विद्यार्थिनी होती. एकदा ती तिच्या सायकलवरून कोठेतरी (बहुदा क्लासला) चालली होती. एका बसच्या मागून जात होती. अचानक त्या बसने करकचून ब्रेक लावला. त्यामुळे तिनेही आपल्या सायकलला ब्रेक लावला. परंतु तिच्यामागून पाण्याचा टँकर येत होता. त्याला आपल्या वेगावर नियंत्रण मिळवता न आल्यामुळे तो त्या सायकलवर व पर्यायाने सायकलच्या पुढे असलेल्या बसवर जावून आदळला. रस्त्यावरच्या सर्वच लोकांना वाटले की सायकलवरील मुलगी जागेवरच चिरडून गेली असणार. परंतु त्या धडकेने तिच्या शरीराला काही विशिष्ट झटके बसले आणि ती क्षणार्धात एका वेगळ्याच दुनियेत गेली! जेथील रस्ते, घरे, झाडे-झुडुपे सारे काही विलक्षण होते. ती एक एक झाड पाहत पुढे जात होती. पुढे एका घराच्या दरवाज्याला स्पर्श करताच त्यातून अत्यंत सुंदर दिसणारा एक मुलगा बाहेर आला. त्याने तिला व तिने त्याला पहिले. (कदाचित Love at first site असे काहीसे झाले असावे त्यांचे!!!) नंतर त्याने तिचा हात धरला का हाताचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. (नक्की काय ते आठवत नाही.) त्यासरशी ती घाबरून मागे झाली पण मागे जाताना पुन्हा तिच्या शरीराला मगाचसारखे झटके बसले आणि ती पुन्हा आपल्या दुनियेत, अपघातस्थळी आली. फक्त अपघात झालेल्या ठिकाणापासून थोडी दूर एका दुकानाच्या पायरीजवळ आली. गंमत म्हणजे तेव्हा तिला अपघातामुळे कोणतीही दुखापत झाली नव्हती. तिची सायकल मात्र पार चक्काचूर होऊन गेली होती. साऱ्यांनाच आश्चर्य वाटले.
तिला मात्र आताशा 'त्या' दुनियेची ओढ लागली होती. त्यामुळे लगेच त्यादिवशी का काही दिवसांनी रात्री सारेजण झोपले असताना ती मुद्दाम जागी राहिली आणि सारेजण झोपल्यावर मुद्दामहून शरीराला झटके देवून पहिले. काही वेळाच्या प्रयत्नानंतर तसा 'विशिष्ट' झटका बसला व ती पुन्हा त्या दुसऱ्या स्वर्गीय दुनियेत पोहोचली. पुन्हा तिथले सारे सौंदर्य पाहून झाल्यावर आणि 'त्याला' भेटून झाल्यावर तिने झटके देण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रयत्नातच यशस्वी होऊन ती पुन्हा आपल्या दुनियेत आली. फक्त जिथे झोपली होती त्या बेडरूममध्ये न येत हॉलमध्ये आली. पुढे तिला याची सवयच झाली. १-२ झटक्यातच ती त्या दुसऱ्या दुनियेत जाऊन येऊ लागली. पुढे घरच्यांना ही रात्री कुठेतरी गायब होते, आणि थोड्यावेळाने परत येते हे जाणवले. खडसावून विचारल्यावर तिने सारे खरे सांगितले व एकदा आपल्या आईलाही त्या दुनियेत घेऊन गेली. (आईला त्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी ती आईचा हात घट्ट धरून मग झटके देत असे, असा काहीसा उल्लेख त्या गोष्टीत होता.)
ही जरी काल्पनिक गोष्ट असली तरी यालाच 'मितीबदल' म्हणतात का???
कृपया मराठीत लिहावे
कृपया मराठीत लिहावे
विक्षिप्त_मुलगा, आपण
विक्षिप्त_मुलगा, आपण लिहिलेल्या कथेतील प्रसंगाला 'मितीबदल' म्हणायचे कारण काय?
.
.
Dusra Einstein by Laxman
Dusra Einstein by Laxman Londhe
हे विज्ञानकथा पुस्तक आहे.. लई भारी आहे. विज्ञान कथा जरी असल्या तरी मिती म्हणजे काय हे सोप्या शब्दात कळेल
तुम्हाला जे म्हणायचं ती दुसरी
तुम्हाला जे म्हणायचं ती दुसरी दुनिया होय. मिती म्हणजे लांबी, रुंदी,उंची /खोली, काळ. आणखीही असतील.
सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे निर्जीव गोष्टीपासुन सजीव कसा तयार झाला. चेतना नेमकी कशी तयार झाली. सजीव मरतो पण त्याचं पुनरोत्पादन होण्यासाठी सजीवच किंवा सजीवाचा अंश पेशी/ शुक्राणु/बीजांड लागतेच.
परकीय मितीतील प्राणी (यक्ष गंधर्व देव वगैरे ) यांना कदाचित आपले भौतिक शास्रातील नियम लागू नसावेत. काळ वेग वस्तुमान चुंबकीय बल त्यांच्यावर परिणाम करत नसावं.
आपल्यात विविध शरीरे /देह स्थुल,कारण,सुक्ष्म मानतात. योगसाधना करून सुक्ष्मावर जोर देत साधना करून ज्या प्राप्त होतात त्या म्हणजे अष्टसिध्दी. सिध्दीच्या बलाने काळ आकार वस्तुमान व द्रव्य (matter) यावर सत्ता चालवता येते.
आता दुसरी दुनिया म्हणजे देवलोक वगैरे. या दुसऱ्या मितीत आपल्या सापेक्ष काळ वेगळा म्हणजे slow असतो पण तोही एकप्रकारचा मर्त्यलोकच असतो. law of equilibrium नुसार किंवा जडत्वाच्या नियमानुसार गतीमुक्त अवस्था सर्व matter ला हवी असते त्यामुळे या स्थितीला मोक्ष म्हटले आहे.
म्हणूनच हिंदू धर्माचा सर्वात मोठा पुरुषार्थ मोक्ष मानला गेला आहे.
विश्वामित्राने प्रतिसृष्टि
विश्वामित्राने प्रतिसृष्टि बनविण्याचा प्रयन्त केला असे जे पुराणात उल्लेल्ख आहे
त्याचा व मितीचा काही संबंध आहे का. निदान ती कल्पना तरी हजारो वर्ष्यापुर्वी कुणीतरी कल्पली असे आपण म्हणू शकतो का
वर वि.मु. यांनी दिलेल्या
वर वि.मु. यांनी दिलेल्या कथेसारखीच एक कथा (म्हणजे वेगळी दुनिया या कल्पनेवर आधारित) जयंत नारळीकर यांनीदेखील लिहिलेली आहे. त्यामधे एक इतिहास संशोधक असतो त्याला एका किरकोळ अपघातामधे डोक्याला धक्का लागून तो बेशुद्ध होतो, मग तो शुद्धीवर आल्यावर अशा जगात असतो की जिथे मराठे पानिपतची लढाई जिंकलेले असतात आणि त्यांचेच राज्य चालू असते, इ. इ.
या कल्पनेचा मितीच्या चर्चेशी बराचसा संबंध आहे असे वाटते. एकाच वेळेस अनेक लेअर्समधे अनेक जगे/विश्वे चालू असतात, पण आपण त्या दुसर्या लेअरमधे जाऊ शकत नसल्याने आपल्याला कळत नाही. जर कधी जाऊ शकलो तर या कथांप्रमाणे होऊ शकेल.
समांतर विश्वे ही पण एक मिती मानली जावी का ? हा प्रश्नच आहे.
.
.
आइन्स्टयन (type करता येत नाही
आइन्स्टयन (type करता येत नाही )
>>
थोर लोकांची नावे टाईप करणे अवघड असते. उदाहरणार्थ...
..
आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या वातावरण अशी बरीच छिद्रे / मार्ग आहेत ज्यांतून आपण दुसर्या मिती मध्ये प्रवेश करू शकतो...
>>>>
हॅरी पॉटर, नार्निया अश्या चित्रपटांत दाखवले जाते ना हे?
बाकी माझा यावर विश्वास नाही असे नाही. पण आहे असेही नाही. रोचक माहिती मिळते ती वाचतो.
मागे एके ठिकाणी वाचलेले की रावणाची दहा तोंडे दहा मितींमध्ये होती. तो एकावेळी दहा मितींमध्ये जगायचा. आपण (म्हणजे रामाने) मारला तो एकच रावण होता. नऊ रावण आजही जिवंत आहेत. आणि ते कधीही बदला घ्यायला आपल्या मितीत प्रवेश करू शकतात.
यात रस असणार्यांनी
यात रस असणार्यांनी Interstellar हा चित्रपट नक्की बघावा..खुपच interesting आहे!
आपण (म्हणजे रामाने) मारला तो
आपण (म्हणजे रामाने) मारला तो एकच रावण होता. नऊ रावण आजही जिवंत आहेत >>>>> मी तर असे वाचले आहे की रामाने सर्व तोंडे धडावेगळी केली होती आणि तरीही रावण मरत नव्हता म्हणून तो उदास/हताश झाला होता तेंव्हा बिभीषणाने रामाला रावणाच्या मरण्याचे रहस्य सांगितले होते. रावणाच्या बेंबीत अमृत होते जे मंदोदरीने (रावणाच्या पत्नीने) रावणाला अमर करण्यासाठी चंद्रलोकातून चोरून अंगठीमध्ये लपवून आणले होते जे फक्त काही थेंबच होते म्हणून बिभीषणाने शल्यचिकित्सेने रावणाच्या बेंबीत स्थापित केले होते (हे रहस्य खुद्द रावणाला पण माहित नव्हते कारण बिभीषणाने मंदोदरीला याच अटीवर मदत करण्यास होकार दिलेला. हे रहस्य फक्त बिभीषण आणि मंदोदरी यांनाच ठाऊक होते). त्यामुळे रावणाला मारण्यासाठी बिभीषणाने रामाला बेंबीत बाण मारण्याचा सल्ला दिलेला ज्यामुळे रावण ठार झाला. बेंबीत बाण लागून ठार झाल्यामुळे त्याची ९ तोंडे बाकी असली तरी ती काय परत येणार नाहीत कारण ती एका धडालाच जोडली होती जे रामाने नष्ट केले.
रावण हा एक दशग्रंथी ब्राह्मण होता त्याला १० ग्रंथ अगदी तोंडपाठ होते व कोणतेही ग्रंथ तो कसेही कोठूनही म्हणू शकत असे. या स्किल मुळे त्याला दहा तोंडे होती असेही म्हणले जाते (खखोदेजा)
@विक्षिप्त_मुलगा तुम्ही
@विक्षिप्त_मुलगा तुम्ही सांगितला तसाच काहीसा अनुभव ज्योतिष सुहास गोखले सर यांच्या या ब्लॉग वर आहे.
http://blog.suhasjyotish.com/काहीसे-अमानवी-भाग-१/
http://blog.suhasjyotish.com/काहीसे-अमानवी-भाग-२/
Pages