Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04        
      
    रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

.
 आण्णा - हरी नाईक
आण्णा - हरी नाईक माई - इंदु हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक छाया  - छाया हरी नाईक
छाया  - छाया हरी नाईक माधव - माधव हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक दत्ता - दत्ता हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक सरिता - सरिता दत्ता नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक पांडु
पांडु वच्छी - वत्सलाबाई
वच्छी - वत्सलाबाई भिवरी
भिवरी शेवंता - पाटणकरीण
शेवंता - पाटणकरीण पाटणकर
पाटणकर
विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
 
 
DJ मस्त लिहिलंय .
DJ मस्त लिहिलंय .
वाह ! मस्तच !!!
वाह ! मस्तच !!!
डिजे. मस्तच!
डिजे. मस्तच!
DJ लय भारी फोटो सर्व.
DJ लय भारी फोटो सर्व.
@ मनिमोहर, Ajanbi, सुलू_८२,
@ मनीमोहर, Ajnabi, सुलू_८२, अन्जू धन्यवाद
DJ.....सहीच.
DJ.....सहीच.
मस्त DJ, आम्हालाही वाड्याची
मस्त DJ, आम्हालाही वाड्याची सैर घडवून आणलीत, तुमचे आभार
डी जे भारीच की राव... मस्त
डी जे भारीच की राव... मस्त वाट्लं तुमचे फोटो पाहुन. छान सैर करवलीत तुम्ही आम्हाला धन्यवाद !!
 धन्यवाद !!
@ स्वप्ना_राज, सान्वी,
@ स्वप्ना_राज, सान्वी, प्रसन्न हरणखेडकर - धन्यवाद..!
डीजे धन्यवाद. खूप छान
डीजे धन्यवाद. खूप छान वृत्तांत व सफर. फोटो पण छानच आहेत. काल फोन वरून वाचून काढले.
DJ, मस्तच एकदम!
DJ, मस्तच एकदम!
थँक यु अमा..!
थँक यु अमा अँड सस्मित..!
मुंबईतून आकेरीपर्यंत कसे
मुंबईतून आकेरीपर्यंत कसे जायचे? व्हिच इज द नि अरे स्ट बिग टाउन गाव वगैरे?
कालचा भाग अगदी पोटात तुटायला लाव् णारा होता. आबा व वच्छी शोधत फिरतात. चोंगट्या उगीचच काहीतरी शंका घेतो. वात्रटच आहे मेलं
शेवंताला ताप आला आहे. ती सोज्वळ व सदसद विवेक बुद्दी असल्याचे नाटक करते पण खूप लोकांच्या दुर वस्थेला तीच कारणी भूत आहे.
शोभाचे वैधव्य,
माईला मनस्ताप सवतीचा
छायाचे लव्हलाइफ रुइन्ड फॉर एव्हर.
राजग्याची फॅमिली घाबरून डिस्प्लेस्ड,
काशी चा त्रास व मृत्यू
पा टण कराचा खून
मधूनच आणा ला तुम्ही जा इथून सर्व परत घ्या स्पर्श करू नका म्हणते पण मग मधूनच जाळे टाकते. तुमचीच मुलगी सुसल्या इस्टेटीवर हक्क आहे तिचा. इत्यादी. दोघे अगदी लायक आहेत एकमेकांस.
सरिताची प्रेग्नंसी दिसत नाही अजून.
>>सरिताची प्रेग्नंसी दिसत
>>सरिताची प्रेग्नंसी दिसत नाही अजून.
अमा, मी पण तोच विचार करत होते. पांडगो इसरलंय बहुतेक
काल आबा आणि वच्छीला बघून खरंच खूप वाईट वाटलं. शोभाने आपल्या पायांवर धोंडा पाडून घेतला.
>>दोघे अगदी लायक आहेत
>>दोघे अगदी लायक आहेत एकमेकांस.
मायबोलीवर एक आयडी आहे....हडळीचा आशिक. हे नाव अण्णाला अगदी योग्य आहे.
मुंबईतून आकेरीपर्यंत कसे
मुंबईतून आकेरीपर्यंत कसे जायचे? व्हिच इज द नि अरे स्ट बिग टाउन गाव वगैरे?>> मडगावला जाणारी कोणतीही ट्रेन पकडा.. ट्रिप साठी जाणार असाल तर मालवण-सिंधुदुर्ग-तारकर्ली-देवबागवेंगुर्ला-सावंतवाडी-आकेरी असा प्लन करुन पुन्हा मुंबईत जा.
फक्त आकेरीच करणार असाल तर कुडाळ पर्यंत जा आणि तिथुन सावंतवाडीला जाणारा (आकेरीमार्गे) रोड पकडा... कुडाळ नाहीतर सावंतवाडी रोड ला थांबणारी कोणतीतरी भन्नाट ट्रेन घ्या - शक्यतो तेजस एक्स्प्रेस किंवा मडगाव डबल डेकर नाहीतर गेला बाजार जनशताब्दी पकडा.. रात्रीच्या प्रवासासाठी कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस बर्या आहेत पण ट्रीप साठी जाणाअर असाल तर तेजस नाहीतर डबल डेकर सही ट्रेन्स आहेत. आकेरी तिठ्यावरुन गावडेवाडीला जा. .तिथे कुणालाही विचारा वच्छीचं घर कुठे आहे ते..
आण्णाचा वाडा बघायचा असेल तर आकेरी तिठ्यावरुन सावंतवाडी रस्त्याने थोडे पुढे आले की उजव्या बाजुला जी सडक फुटते तीवर काही अंतरावरच झाडीत वाडा लपलेला दिसतो.
बाकी पांडबाला खणताना जी पेटी
बाकी पांडबाला खणताना जी पेटी लागली ती शोभाच्या प्रेताची का तिने आधी लपवलेली अण्णाच्या घरातली पैश्यांची??? आजके एपिसोडमे देखेंगे हम लोगा.
हो.. बहुतेक पैशाची असेल ती
हो.. बहुतेक पैशाची असेल ती पेटी..
शोभाला पोचवायला मदत केली म्हणजे चोंगट्याचं रिझर्वेशन झालं बहुतेक.. काही दिवसांचाच सोबती. त्याला खपवताना पोष्ट्या बघेल आणि स्वतःचं तिकीट क्न्फर्म करुन घेईल असं वाटतंय.
ती शोभा , शेंवताला का मारायचा
ती शोभा , शेंवताला का मारायचा प्रयत्न करते?
तिच्यामुळॅ कसा काय काशी मरतो?
कोणॅतरी प्लीज सांगा ना?
ती शोभा , शेंवताला का मारायचा
ती शोभा , शेंवताला का मारायचा प्रयत्न करते?
तिच्यामुळॅ कसा काय काशी मरतो?>>
शेवंतामुळेच काशी मरतो. काशी स्वतःला आण्णा नाईक समजत असतो. आण्णा नाईक जसे वागतो तसेच वागायचा प्रयत्न करत असतो. आण्णाचे शेवंता प्रकरण त्याला असेच एकदा अचानक समजतं.. मग तो शेवंताच्या मागे लागतो. तिच्या घरा पर्यंत पोचतो मग पाटणकरीण घाबरते. आण्णाला सांगते. त्यामुळे चिडुन आण्णा रघुकाका अन नेने वकिलांच्या मदतिने काशीचा काटा काढतो. त्याला सापळ्यात अडकवुन गावातील लोकांकडुन जीवे मारतो. हा सर्व प्रकार वच्छी, आबा अन शोभास माहित नसतो. त्यांना वाटत असते की काशीने गावात गोळीबार केल्यामुळे गाववाल्यांनीच काशीला ठेचुन मारले. येन्केन प्रकारे शेवंताच त्याच्या म्रूत्युला कारणीभुत असते. शोभास शेवंता कोण आहे ते माहित नसते.. फक्त एकदा काशीने शोभास ती शेवंता आहे असे समजुन जवळ घ्यायचा प्रयत्न केलेला असतो.. तिला शेवंता म्हणजे एखादी हडळ असावी असे वाटत असते. पण वास्तवीक प्रकार काय आहे हे शोभाला परवा कळाले.
वा वा क्या बात है डिजे !
वा वा क्या बात है डिजे ! तुम्ही जिद्दीने मंझील गाठलीत. मला पण एकदा तिकडे जायाचे आहे.  देखेंगे ! फोटो आणी वृत्तांत  अगदी कळस आहेत लेखनाचे. एवढा छान वृत्तांत आहे की सगळे नजरेसमोर आले. फोटो पण छान आलेत. अगदी प्रोफेशनल !
 मला पण एकदा तिकडे जायाचे आहे.  देखेंगे ! फोटो आणी वृत्तांत  अगदी कळस आहेत लेखनाचे. एवढा छान वृत्तांत आहे की सगळे नजरेसमोर आले. फोटो पण छान आलेत. अगदी प्रोफेशनल !
एक राहीलं की वो, जे माझ्या मनात आहे. तुम्ही जेव्हा अण्णुच्या खोलीचा जीना चढलात तेव्हा मध्ये एक दार लागते ते उघडुन बघीतलत का? नसेल तर ओके. तुमच्याजवळ वच्छी वा आबाचा फोन नं असेल तर विचारा त्यांना त्याबद्दल. मला फार कुतुहल आहे त्याबद्दल. परत एकदा.. फोटो सॉलिड्ड आलेत बरं कां.
@ थँक यु रश्मी वयनी
@ थँक यु रश्मी.. वयनी

तुम्ही जिद्दीने मंझील गाठलीत.>> मी म्हटलंच आहे शेवटी - ईच्छा असेल तर मार्ग सापडतोच
मला पण एकदा तिकडे जायाचे आहे. देखेंगे !>> आण्णा बाकी सर्वांना ढगात पाठवायच्या आधी जावा म्हणजे मिळवली..!
तुम्ही जेव्हा अण्णुच्या खोलीचा जीना चढलात तेव्हा मध्ये एक दार लागते ते उघडुन बघीतलत का?>> हो.. आम्ही गेलो तेव्हा ते दार उघडंच होतं. मी छोटासा जीना उतरुन तिथे जाऊन आलो. तिथे काही नाही. वापरात नसलेली खोली आहे ती. वाड्याच्या उजव्या बाजुची खोली (आण्णा झोपाळ्यावर झुलतो त्या बाजुची..!)
तुमच्याजवळ वच्छी वा आबाचा फोन नं असेल तर विचारा त्यांना त्याबद्दल. >> मी एस.टी.त असताना अॅक्टर नंदुंना त्यांचा फोन नंबर मागितला होता.. तिथे पोचल्यावर फोन करेन म्हणुन. पण त्यांनी सांगितलं शुटिंगला जाताना फोन नेत नाही कारण त्याची जबाबदारी घेणारं कोण नसतं वगैरे वगैरे.. मग कशाला मागु वच्छी अन आबांना त्यांचा नंबर. पण दोघेही बिचारे चांगले आहेत बरं का! दोन शॉट्स च्या मधे वेळात वेळ काढुन अगदी आगत्याने चौकशी केली आमची. फॉटॉ पण त्यांनीच काढायला लावला स्पॉट बॉयला. अगदी तोंडभरुन बोलले.
मागे एकदा कुणीतरी माई-माधव शॉट्स च्या मधे एकमेकांशी बोलत असताना त्यांना हाक मारली तर त्यांनी ढुंकुनही पाहिलं नाही असं याच धाग्यावर सांगितलेलं स्मरतंय.. शोभा पण तुसडेपणानं बोललेली असं सांगितलेलं होतं.. त्यामुळे मी जाऊ की न जाऊ अशा विचारात होतोच पण मनाचा हिय्या करुन ट्रिप आखली अन जाऊनच आलो
डीजे,भारी लिहिलय!
डीजे,भारी लिहिलय!
छ्या! आण्णा एव्हढे खून पचवून
छ्या! आण्णा एव्हढे खून पचवून त्याला नैसर्गिक मरण आलं ये बात कुछ हजम नही हुई. चोन्गटया ती पेटी उघडून बघणार असं मलाही वाटतंय. तो पण माठच आहे. पेटी जड लागतेय (तरी बरं त्यात बारक्या शोभाची बॉडी होती. पाटणकरणीची असती तर काय झालं असतं!) वर आतुन अत्तराचा वास येतोय तरी त्याला कळत नही. मला तर तो बेरकी वाटला होता.
@ देवकी, धन्यवाद...!
@ देवकी, धन्यवाद...!
शेवंता 'ताई' ला काय सांगणार
शेवंता 'ताई' ला काय सांगणार आहे म्हणे? अण्णाने शोभाला मारलं? मग ताई विचारणार की का बुवा मारलं? मग काय सांगणार? की मी शेवंता आहे आणि आमचं अफ़ेअर होतं आणि त्यापायी काशीचा जीव गेला? मग ताई विचारणार की कुठे मारलं. काय सांगणार? माझ्या घरी? कारण ताई विचारनार की ते तिथे काय करत होते. मग काय सांगणार? अंताक्षरी खेळायला आले होते??
Tai kon?
Tai kon?
डीजे, तुम्हाला धन्यवाद भाग
डीजे, तुम्हाला धन्यवाद भाग पुर्ण लिहिल्याबद्दल.
शेवंता 'ताई' ला काय सांगणार
शेवंता 'ताई' ला काय सांगणार आहे म्हणे? अण्णाने शोभाला मारलं? मग ताई विचारणार की का बुवा मारलं? मग काय सांगणार? की मी शेवंता आहे आणि आमचं अफ़ेअर होतं आणि त्यापायी काशीचा जीव गेला? मग ताई विचारणार की कुठे मारलं. काय सांगणार? माझ्या घरी? कारण ताई विचारनार की ते तिथे काय करत होते. मग काय सांगणार? अंताक्षरी खेळायला आले होते??>> 
  
 
@अमा, ताई म्हणजे माई... पाटणकरीण माईला ताई म्हणत असते.
>>पाटणकरीण माईला ताई म्हणत
>>पाटणकरीण माईला ताई म्हणत असते.
माई हिची ताई म्हणजे ही झाली अण्णाची मेहुणी. 'साली आधी घरवाली' ह्या संतापजनक उक्तिचा बरा वापर करुन घेताहेत शेवंता आणि अण्णा. खरं तर शेवंताच फुल घरवाली झालेय. माई आपला back office support आहे झालं आंधळी आणि बहिरी आहे माई. शेवंता भेदरून अण्णाकडे पहात होती ते तिच्या गावीही नाही. शेवंताछ्या धुडाला कोणी उचलून गादीवर ठेवलं म्हणे?? पांडगो जुने हिंदी सिनेमे पाहतोय काय? नाहीतर शोभाची लाश गायब होती ना. अर्थात हा अण्णुला भास पण होऊ शकतो म्हणा. हा शोभाचा खून करुन प्रेत पुरुन पार झाला तरी पोलिस काय करताहेत??? बाकी अण्णा किती तो झुलतो प्याल्यावर. एखाद्या लम्बकाला complex यायचा
 आंधळी आणि बहिरी आहे माई. शेवंता भेदरून अण्णाकडे पहात होती ते तिच्या गावीही नाही. शेवंताछ्या धुडाला कोणी उचलून गादीवर ठेवलं म्हणे?? पांडगो जुने हिंदी सिनेमे पाहतोय काय? नाहीतर शोभाची लाश गायब होती ना. अर्थात हा अण्णुला भास पण होऊ शकतो म्हणा. हा शोभाचा खून करुन प्रेत पुरुन पार झाला तरी पोलिस काय करताहेत??? बाकी अण्णा किती तो झुलतो प्याल्यावर. एखाद्या लम्बकाला complex यायचा
Pages