घरगुती उपचार - किडनी स्वच्छ करणे, ह्रूदयरोग टाळणे. मर्दानी ताकत, सुंदर त्वचा इ. इ. (वेळोवेळी अपडेट्स)

Submitted by पुरूष हक्क समिती on 3 April, 2019 - 22:26

( इशारा : या धाग्यात जी माहिती दिली जाईल ती केवळ संदर्भासाठी आहे. या माहितीवर आधारीत आपल्या डॉक्टरांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही उपचार करू नये)

या धाग्यावर आपण गंभीर आजार होऊ नयेत यासाठी घरच्या घरी करायच्या उपायांची माहिती घेऊ / देऊ.
सुरूवात किडनी स्वच्छ कशी करावी यापासून

१. मक्याचे केस ( कॉर्न सिल्क) किंवा टरबुजांच्या बियांचा चहा पिल्याने किडनी स्वच्छ होते. विशेषतः मधुमेहाचे रुग्ण, प्रोटीन्सच्या डाएटवर असणारे यांनी माहीती घेऊन डॉक्टरांशी चर्चा करून घ्यावा असा उपचार
https://www.youtube.com/watch?v=OyxsUYbsWEo

२. टाच दुखी,भेगा,जळजळ, अंगाची खाज 1 दिवसात बंद , पापण्यांचे केस दाट करणे, मूळव्याध, स्तनांचा आकार, जननेंद्रियांची जळजळ वर जालीम उपाय
https://www.youtube.com/watch?v=OkpV5t9jWto

३. चेह-यावर काळे डाग, खड्डे, मुरूम, सुरकुत्या यावर उपाय
https://www.youtube.com/watch?v=GeO_q9qfHv8

४. गुदद्वाराचे आजार, मूळव्याध
https://www.youtube.com/watch?v=hopZnDVm9GA

५. मणक्यातील ग्याप,कंबरदुखी,गुडघेदुखी,कोलेस्ट्रोल,या पासून पाच दिवसत मुक्ती
https://www.youtube.com/watch?v=_Pp0Ki0yoQk

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याला हा धागा उपयुक्त वाटला तर आपणही असेच घरगुती उपचार इथे शेअर करावेत ही विनंती. इथे जे व्हिडीओज दिले आहेत त्याच्या आजूबाजूला संबंधित विषयांवरच्या व्हिडीओजची यादीच आहे ( माझ्या कडे जसे सेटींग्ज आहेत तसेच तुमच्याकडे दिसते का हे मला माहीत नाही). ते व्हिडीओज पाहून झाले आणि उपयुक्त असल्याचे आढळले तर इथे आपण द्या. ते वर धाग्याच्या विषयात अपडेट करता येतील. ( अपडेट होण्याची वाट बघण्याची गरज नाही ).

डॉक्टरांशी चर्चा करून " घरगुती" उपचार करा म्हणजे काय?

मिठाच्या पाण्याने गुळण्या करा, लहानशी जखम झाली तर हळद चेपा, पाय मुरगळला तर बर्फाने शेका,
हे घरगुती उपाय झाले,

घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तू ( रसायने) घेऊन केलेले उपचार म्हणजे घरगुती उपचार नव्हेत. विशेषतः किडनी स्वच्छ करणे (!!) वगैरे प्रकारासाठी तर नाहीच नाही.

घरगुती उपाय कशाला म्हणायचे याचं प्रमाणपत्र देण्याचे निकष कुठून घेतलेत ? घरात उपलब्ध असणारे उपाय हे घरगुती नाहीत हे समजल्याने आभार. तुमच्या मते हळद हे रसायन नाही पण इतर घरगुती पदार्थ (आजीबाईच्या बटव्यातले) रसायन आहेत. हे कसे ते समजावून सांगावे.

डॉक्टरकडे गेल्याने नुकसान होईल असे का वाटते ? तसेच अशी सक्ती केली आहे का ? ज्याप्रमाणे बाल की खाल तुम्ही काढली आहे त्याप्रमाणे मी जर हे लिहीले नसते तर कुणीतरी ती शंका नक्कीच उपस्थित केली असती.

जे व्हिडीज दोले आहेत ते उपयुक्त आहेत , नाहीत यावरचे अनुभव, मतं वाचायला जास्त आवडले असते.

मी या व्हिडीओजची (याच असं नाही पण अशाच) टिंगल इथेच (कुठल्या धाग्यावर ते आठवत नाही) एव्हढ्यातच केल्याचं फीलिंग येतंय.
हा धागा आल्याने योगायोगाबद्दल थोडी उत्सुकता वाटली इतकेच.