कुंकू टिकली आणि टॅटू - नवीन मालिका

Submitted by anamika_दे on 26 May, 2018 - 08:16

Koni baghtay Ka hi Malika? Bari challiye ajun tari

Group content visibility: 
Use group defaults

अगदी व्हिलन नाहिये कोणी.. थोडे ग्रे शेड च्या व्यक्तिरेखा आहेत.. आणि सून ही उगाच अतिसोशीक वगैरे नाही दाखवली अजून तरी.. seems good till now

seems good till now >>> सिरियसली???
आता काय माहित नाही , सुरुवातीचे काही एपिसोड बघितलेले .. त्यांचे संवाद ऐकूनच डोक्यात तिडीक गेली .
आता लोक सुधारली असतील तर माहिइत नाही .

No no.. कुलकर्णी family बोगसच आहे.. मला रमा चा character आवडल होत. कसली मस्त फटाफट बोलते.. विभा पहिल्यांदा घरी आल्यावर बिनधास्त तिला स्वताचा schedule सांगते.. फक्त आता तिला किती बदलवतायेत संस्कारांच्या नावाखाली कोणास ठाऊक!!

मी पहीला अर्धा एपिसोड बघितला. मग रमाची बहीण दाखवलेली रेवती माझ्या ओळखीची आहे, तिच्यासाठी एक बघितला. बास. त्यानंतर डेरींग नाही. राधा प्रेम मागे बघत होते तेव्हा एकत्र काहीतरी लग्न वगैरे बघितला. आता राधा प्रेमला सोडचिठ्ठी देऊनही बरेच दिवस उलटले.

मी बिग बॉस पाहताना जे नजरेस पडते त्यावरून तरी विचित्र वाटते मला हि सिरियल Uhoh
एक तर अशी जबरदस्तीने लग्न होतातच कशी? Uhoh (रमा चे लग्न जबरदस्ती झाले आहे असे मानून चालल्ये मी)
तिने त्या मुलाशी लग्न नाही केले तर थोरल्या बहिणिच्या नवर्‍याचा छ्ळ होइल असे रमाचे वडिल सांगतात.. हे कसलं समीकरण? Uhoh
आपल्याकडे अ‍ॅलोपॅथी वापरत नाहीत, ७ वाजता वाड्याचे दरवाजे बंद --- या युगात? Uhoh

आपल्याकडे अ‍ॅलोपॅथी वापरत नाहीत, ७ वाजता वाड्याचे दरवाजे बंद --->> स्वयंपाकघरात एकही यंत्र नाही. अजून पाटा-वरवंटा वापरतात.
पिरियडच्या ३ दिवसांत वाड्याबाहेरच्या खोलीत राहायचं.. हे खरंच दाखवल वर समर्थन करत होते.
उत्सुकतेपोटी सुरुवातीचे काही भाग अधून मधून पाहिले होते.. पण आता कानाला खडा

नक्की काय दाखवायचं आहे हे अजुनी लेखक- दिग्दर्शकालाच समजत नाहीये.

एक तर अशी जबरदस्तीने लग्न होतातच कशी? Uhoh (रमा चे लग्न जबरदस्ती झाले आहे असे मानून चालल्ये मी) >>> होतात की आजही..
तिने त्या मुलाशी लग्न नाही केले तर थोरल्या बहिणिच्या नवर्‍याचा छ्ळ होइल असे रमाचे वडिल सांगतात.. हे कसलं समीकरण? Uhoh >>> हे काहीही आहे.. पण ती थोरली बहीण आणि तिचा नवरा अलका कुबल आणि male अलका कुबल च आहेत.. काइच्या कै..
आपल्याकडे अ‍ॅलोपॅथी वापरत नाहीत, ७ वाजता वाड्याचे दरवाजे बंद --- या युगात? .. this is too much..
Rama is the only hope.. बघू किती दिवस सहन होते..

मी बघते ही सिरियल. कुलकर्णी कुटुंबाचे विचार जरी मला आवडले नाही तरी रमाचा खणखणीतपणा मला आवडतो. शिवाय सिरियलची कॅरॅक्टर्स मस्त उतरली आहेत. प्रत्येक जण आपल्या जागेवरुन ठाम आहे. रमा हे घर बदलेल अशी आशा आहे

महादेव स्वतः योगी आहे असं दाखवतो आणि सुभद्रा चिडचिड करत असते की नवरा संसार सोडून फीरतो आणी आपल्याकडे दुर्लक्ष करतो. पण मला वाट्तं की महादेव खोटारडा असणार. आणि सुभद्रा काकू त्याला सामील असणार.

पण ती थोरली बहीण आणि तिचा नवरा अलका कुबल आणि male अलका कुबल च आहेत.. >>> चला, म्हणजे हया सिरियलमध्ये फक्त स्त्रियान्वरच अन्याय होत नाही, तर एका पुरुषालाही छळल जात आहे. Happy

चला, म्हणजे हया सिरियलमध्ये फक्त स्त्रियान्वरच अन्याय होत नाही, तर एका पुरुषालाही छळल जात आहे. >> हो.. कारण तो काहीच कमवत नाही.. रस्त्यावर चित्र काढताना दिसला होता..पण नंतर त्याला घर कामालाच लावला.. मेन हिरो राज तोही काहीच करत नाही...

त्या राजबद्दल सगळया सासवांसमोर रमा बोलून दाखवते. की ह्याला पण लावा ना चटणी वाटायला... हा काहीच करत नाही. तो सीन माझ्यामते बेस्ट होता

ह्यातला एक सीन आत्ता बघितला त्यात तो राज जेवता जेवता फोन येतो म्हणून उठतो, खरकटया हाताने फोन उचलतो. तो कोण शेजारचा भस्म लावलेला तो जाम भयानक वाटतोय, काहीतरी गूढ गूढ बोलतो. रेवती पण ह्याच घरची सून आहे का बाय द वे.

रेवती पण ह्याच घरची सून आहे का बाय द वे.>> प्लॅन तर तिलाच सून करायचा असतो.. पण फेल होतो since Raj is in love with Rama.. रेवती मेल अलका कुबलची(प्रसाद) बायको आहे

वाड्यात फोन आहे चक्क?>> हीही.. भंपक आहेत सोयीच नव तेवढ स्वीकारतात.. आणि यांचे संस्कार फक्त घरातल्या बायकांसाठी.. पुरूष फिरतात सात नंतर घराबाहेर.. बायकांवर हात उगारतात... आणि तरीही या बायका नवर्यांची बाजु घेतात.. असली नाती टिकवण्यापेक्षा नसलेली बरी..

चला, म्हणजे हया सिरियलमध्ये फक्त स्त्रियान्वरच अन्याय होत नाही, तर एका पुरुषालाही छळल जात आहे >>> त्याचे सासरे त्याला २ दिवस उपाशी ठेवतात .

रेवती मेल अलका कुबलची(प्रसाद) बायको आहे >>> मला समजलं नाही, तिचा नवरा दाखवलाय तो रड्या आहे का. मला वाटलं रेवती त्याचं घरात सून म्हणून आहे की काय मीन्स राजचा चुलत भाऊ पण आहे का एखादा असं.

राज रेवतीला बघायला येतो वगैरे तो सीन मी बघितलेला. रेवती माझी फेसबुक फ्रेंड आहे, माझ्या खास फ्रेंडची भाची आहे म्हणून बघितलं होतं थोडं तिच्यासाठी.

मला समजलं नाही, तिचा नवरा दाखवलाय तो रड्या आहे का.>> रेवतीला दुसराच मुलगा प्रसाद आवडत असतो आधीपासून.. ती राजला नाही म्हण अस सांगते.. पण असही राजला रमाच आवडत असते..So तो रमाला पसंत करतो.. रेवतीचा लग्न प्रसादशी लावल तरच राजशी लग्न करीन अशी अट रमा घालते.. so her dad has to agree. प्रसाद रस्त्यात चित्र काढताना दाखवल एकदा.. बाकी लग्न झाल्यापासून सासर्याची बोलणी खातो आणि घरकाम करतो.. आता बाहेर पडलाय वाट्टं.. but he is not a current focus for some time.. so dont know

रेवतीला दुसराच मुलगा प्रसाद आवडत असतो आधीपासून.. ती राजला नाही म्हण अस सांगते.. पण असही राजला रमाच आवडत असते..So तो रमाला पसंत करतो.. >>> हा सीन बघितला होता.

प्रसाद रस्त्यात चित्र काढताना दाखवल एकदा.. बाकी लग्न झाल्यापासून सासर्याची बोलणी खातो आणि घरकाम करतो.. आता बाहेर पडलाय वाट्टं.. >>> ओहह अच्छा असं आहे का, thank u. म्हणजे रेवती तिचे सासर असं दाखवलं नाहीये.

ओहह अच्छा असं आहे का, thank u. म्हणजे रेवती तिचे सासर असं दाखवलं नाहीये.>>> असं काय करताय.. सगळ्यांची घरं दाखवायला परवडायला तर पाहिजे प्रोड्यूसरला

Pages