डोहाळे जेवण

Submitted by सुशमापुणे on 28 April, 2014 - 02:00

पुण्यात डोहाळजेवन करायअचे आहे.डोहाळे जेवणात काय करतात? महिति हवि आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोहाळेजेवणासाठी हिरवी साडी, फुलांची वाडी, पाच फळे आणि ओटी हे लागतं, तसेच फराळ/ पंचपक्वान्न/ इतर खावेसे वाटणारे पदार्थ यांच एक ताट त्यात पाच वाट्यांमध्ये प्रत्येकी एका वाटीत एक याप्रमाणे पेढा, बर्फी, रूपया वै ठेवुन त्यावर पुरी झाकुन ठेवतात आणि ते उघडायला लावतात.
तुम्हाला काय माहिती अपेक्षित आहे?

१. हा कार्यक्रम सन्ध्याकाळी व

१. हा कार्यक्रम सन्ध्याकाळी व सुर्यास्ताच्या आधी करतात.
२. जिचे डोहाळजेवण आहे तिला हिरव्या रंगाची साडी/ड्रेस भेट म्हणून देतात (नव्-निर्मितिचा रंग हिरवा असतो म्हणून). हल्ली इतरही भेटवस्तू दिल्या जातात, उद. गर्भसंस्कार व. पुस्तके इ.
३. ओटी ५ प्रकारच्या फळांनी भरणे. फक्त सासूबाईंनी ओटी भरायची, इतर स्त्रियांनी ५ फळे हाती लावणे.
४. जेवणासाठी पंचपक्वान्ने - जिचे डोहाळजेवण आहे तिच्या आवडीची करावीत. यात गंमत म्हणून एक स्त्रिलिन्गी व एक पुल्लिन्गी पक्वान्न असावे. उदा. खीर व लाडू. अशा २ पदार्थांवर पुरी झाकून तिला एक पसंत करावयास सांगणे व त्यानुसार मुलगा/मुलगी हे ठरवतात.
४. फुलांची/चांदण्याची वाडी भरणे या गोष्टी ऐच्छिक व प्रत्येक घराण्याप्रमाणे वेगळ्या असू शकतात.

thanks harsha ji. मला सगलिच माहिती ह्वी आहे. return gift सुध काय देतात. which place is good for this function, any hotel, hall etc.

तुमचं बजेट, राहण्याचं स्थळ / तिथुन तुम्हाला सोयिस्कर असणारं ठिकाण तसेच तुमची आवड यांनुसार ठिकाण सांगण अवघड आहे. तुम्ही पुण्यात कुठे राहता? पुणे सिटीमध्ये / मध्यवर्ती भागात अनेक हॉल्स सांगता येतील जिथे झोका / झुला यांचीही सोय असते.
रिटर्न गिफ्टचंही तसचं तुमच्या बजेटनुसार वस्तु सुचवता येतील. तुम्हाला पुर्ण इव्हेंट अ‍ॅरेंज करुन हवा असेल तर तशी मेल करा संपर्कातुन त्यानुसार तुम्हाला सर्व सुचवेन मी Happy

हौस असेल तर चांदण्यातले, बोटीतले, बागेतले, कोवळ्या उन्हातले असे वेगवेगळे डोहाळेजेवण पण करतात.

आल्याबद्दल आभार म्हणुन छोटे ग्रिटिंग कार्ड त्यावर बाळाचा फोटो असावा. माझ्या मैत्रिणिने छोटी कलाकुसर असलेली डबी दिली होती, कानातले वगैरे ठेवायला.

आल्याबद्दल आभार म्हणुन छोटे ग्रिटिंग कार्ड त्यावर बाळाचा फोटो असावा.

कुठल्या आणि कोणाच्या बाळाचा?? माझ्या माहितीनुसार वरील कार्यक्रम बाळाच्या आगमनाआधी करतात Happy

होणार्या बाळाचा फोटो कसा म्हणेन मी? Happy एखादे चित्र म्हणा हवे तर, कार्डावर डकवुन आल्याबद्दल आभार मानु शकतात. मला मिळालेले कार्ड इथे टाकायला जमत नाहिये.

ठाण्यात डोहळजेवणासाठी भाड्याने झोपाळा कुठे मिळेल? सजावटीकरिता आयडिया पण सुचवाल का?