जाऊ दे ..

Submitted by मिलन टोपकर on 2 November, 2017 - 09:15

पापण्या थकल्यात माझ्या
तेच ओझे साहुनी,
रोज जी मरतात स्वप्ने
प्रेत त्यांचे वाहुनी....

व्हा जरासे दूर तुम्ही
येऊ दे त्यांना पुढे,
पिंड माझा कावळ्यांना
जाऊ दे न खाऊनी ...

रक्तही थिजलेच आता
श्वास आहे थांबला,
थंड पडलेल्या शरीरा
आग दे तू लावूनी....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

राहुल, "शरीर" हा लेखनप्रमाद.
पण "शरीरी" किंवा "शरीरा" दोन्हीही चालतील असे वाटते. मी "शरीरा" निवडले.
अभिप्रायाबद्दल आभार.

पापण्या थकल्यात माझ्या
तेच ओझे साहुनी,
रोज जी मरतात स्वप्ने
प्रेत त्यांचे वाहुनी.... >>>
क्या बात है.... Happy