"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंदूकाका आणि रागिणीची ओळख कशी झाली ते दाखवलं नाहीये ना ? बाबूची बायको जाते तेव्हा ते तिच्याशी बोलतात त्या आधी काही संपर्क दाखवला होता का ?

चंदूकाका आणि रागिणीची ओळख कशी झाली ते दाखवलं नाहीये ना ? बाबूची बायको जाते तेव्हा ते तिच्याशी बोलतात त्या आधी काही संपर्क दाखवला होता का ? >>> दोन तीन चान्सेस वाटतायेत. रागिणीपण थोडे दिवस अभिनय करत होती म्हणून असेल किंवा तो कार अ‍ॅक्सिडेंट झाला आणि बाबुने स्वतः जबाबदारी घेऊन जेलमधे गेला, तेव्हा माहीती घेतली असेल त्यांनी.

मला वाटते रागिणी मिठबावकराकडे जात असेल बहुतेक ! तो विग घालुन!

मिठबावकर चा पत्ता कुठून मिळणार तिला ? आणि एकच एक विग का ? चंदूकाका नक्कीचं तिला अजून वेगवेगळे विग बनवून देऊ शकतात की.

आणि एकच एक विग का ? चंदूकाका नक्कीचं तिला अजून वेगवेगळे विग बनवून देऊ शकतात की. >>> अगदी अगदी. हेच काल मनात आलं की ह्यापेक्षा वेगळा लुक देऊ शकतात की चंदुकाका. एकाच लुकमधे रिस्क का घेतायेत.

मिठबावकर चा पत्ता कुठून मिळणार तिला ? >>> प्रोमो मध्ये जर फोन चालु केलेले दाखवले असेल तर तीने त्याला फोन करुन घेतल असेल.

आणि एकच एक विग का ? चंदूकाका नक्कीचं तिला अजून वेगवेगळे विग बनवून देऊ शकतात की. >> हो ना.

आता रागिणी आणि धुरतने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.

रागिणी ह्या केसच्या मुळापर्यंत जाणार हे कि क ला माहीतेय मग त्याला काय इंटरेस्ट ह्या केसमधे. तो मेन बॉस आहे कि त्याच्या जुळ्या भावाला बिबट्याने मारलं नसून काहीतरी वेगळं घडलंय त्याच्याबाबतीत.

तो मेन बॉस आहे कि त्याच्या जुळ्या भावाला बिबट्याने मारलं नसून काहीतरी वेगळं घडलंय त्याच्याबाबतीत. >>>> रागिणीने सातवला मारले हे किका ला नक्कि माहिती आहे. . आता त्याला तीला खेळवायच आहे आणी ती शिकार करताना पाहायची मजा घ्यायची आहे असे वाटते त्या स्टोरी मधुन! म्हणुन ती त्याला डोळ्यासमोर हवी असावी. त्याचे हात पार वरपर्यत पोहिचले असल्याने हि त्याला आणी त्याच्या धंद्यांना फार काहि नुकसान पोहोचु शकेल असे त्याला वाटत नसावे. जर फार पुढे गेली तर मारुन टाकु नंतर असा विचार असावा.

चंदूदादा आणि रागिणी ओळख दाखवलीच नाही. ती बाबूच्या बायकोला भेटायला जाते तर तिचा आधीच मृत्यू झालेला. तर दादा हिला म्हणतात तुझ्यामुळे झाले हे. तो एपिसोड परत बघायला हवा. मला एवढेच आठवतेय. दादा हिच्यावर इतका जीव का टाकतात ते कळायला हवे. रागिणी शाळेत असताना शाळेच्या नाटकात काम करायची आणि तेही जमायचे नाही नीट. नंतर बाबांची इच्छा असते, पण ती करत नाही काही. लग्न आधी करत असल्यास मी उल्लेख ऐकला नाही, असेलही करत, ज्यामुळे ओलख असेल दादांशी.

लग्न झाल्यावर करत होती ती काही दिवस सिरीयल्समधे वगैरे काम, मग बाळ होणार म्हणून सोडलं आणि बाळात रमली. हा उल्लेख होता.

मी तर वाट बघतेय तिला आबा कोण ते कधी कळणार याची. अर्थातच त्यासाठीच छायाच्या मुलाला अनाथाश्रमात गेलेलं दाखवलं असावं. शेवटी आबा तिला त्या मुलाकडेच मिळेल असं वाटतंय.

मालिका लेखक हा धागा वाचतोय कि काय अशी शंका येतेय. दादांनी सेम शंका बोलून दाखवली. राला माघारी बोलवून घेतले.

मदत करा.
मी आजच्या भागात शोभा ताईचे आडनाव माखिजा असे ऐकले. (अंधुकसे ) तो मुली मारायची ऑर्डर देणारा शोभाच्या पार्लर मधे येताना फोनवर बोलत असतो.
रिपीट भाग बघणाऱ्यांनी सांगावे.

शोभा माकन म्हणाला तो, माखिजा नाही.

रागिणी फोन विसरली नाही तिथे म्हणजे मिळवलं.

जुना एपिसोड परत पाहिला. रागिणी चांदुदादांचा पत्ता मिळवून घरी येते नेमका तेव्हाच छायाचा मृत्यू झालेला व पोलीस जबानी घेत असतात. रागिणी खिडकीतून बघत असते इतर क्रावूड बरोबर. पोलीस बाहेर आल्यावर चंदूदादा बाहेर येऊन तिला हे सगळे तुझ्यामुळे झाले म्हणतात,व तीही मान्य करते. बहुतेक छायाने त्यांना सांगितले असणार की ती रागिणीला भेटली व तिथून सगळे सुरू झाले.

विसरली नसावी . पुढच्या भागात ती ते रेकॉर्डिंग केलेलं ऐकतेय असं दाखवलाय. आई तिला म्हणते पण वीस वर्ष संसार करून मी त्याला ओळखलंच नाही असं काही तरी काय बोलतेस ते मोबाईलवरच बघून असं काही तरी Wink

मुलींना मारलं नसावं. डाॅक म्हणाला की मी एक काॅपी माझ्याकडे ठेवतो, अनआॅॅफिशियली ना, मग हाॅस्पिटलमध्ये का. जर कोणाला माहितच नाही की तो एक काॅपी ठेवतो तर चोरी कोण करेल. माखिजा राच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बदला घेत असेल किंंवा रा कसा बदला घेतेे हेे त्याला बघायचंं असेेल. सदा का दारू पितो. पहिले वाटलं तो नाटक करत असेल. राने चांगलं कारण शोधलं असाच्या बायकोला भेटायचं. पण तिला पत्ता कुणी दिला असा प्रश्न असाच्या बायकोला पडला नाही.

पण तिला पत्ता कुणी दिला असा प्रश्न असाच्या बायकोला पडला नाही. >>> पत्रकार काहीही शोधून काढतात ह्यावर तीचा विश्वास असेल.

एक लिहायचं होतं पण बऱ्याच जणांनी बघितलं नसेल अजून.

हो ना.

झी युवावर रुद्रम सोडून सर्व मालिका आता शनिवारी पण दाखवणार बहुतेक नेक्स्ट विक पासून. रुद्रम का नाही ते काही कळत नाही मला.

मालिका लेखक हा धागा वाचतोय कि काय अशी शंका येतेय. दादांनी सेम शंका बोलून दाखवली. राला माघारी बोलवून घेतले.
> अगदी अगदी. मीहि हाच विचार केला कालचा भाग बघताना

पण तिला पत्ता कुणी दिला असा प्रश्न असाच्या बायकोला पडला नाही > ती धुरतलाअ भेटायला आली असे सांगते . सातवच्या बायकोला नाहि.

रागिणी घरी आल्यावर सायलीचा अभियान मस्त..
सदाला प्रश्न पडायला हवा.. रागिणीला त्याच्या घरचा पत्ता कसा माहित?
चंदुदादा ने रागिणीला परत बोलावून घेतलं ते बरं केलं.. तिने छान कारण शोधलं अभयच्या बायकोशी बोलायचं आणि स्पष्टीकरण पण पटेल असं दिलं बातम्यांचं..

रागिणीनी धुरतला नको त्या अवस्थेत बघितलं आहे. नशा केलेल्या. तेव्हा त्याच्या मनात नसलं तरी त्याला तिच्याशी थोडं नमतं घ्यायला लागेल.

रागिणीनी धुरतला नको त्या अवस्थेत बघितलं आहे. नशा केलेल्या. तेव्हा त्याच्या मनात नसलं तरी त्याला तिच्याशी थोडं नमतं घ्यायला लागेल.
>>> गुड पौइंट. आणी ती (फक्त) पत्रकार आहे असा त्याचा समज आहे.

Pages