Need suggestions for farming on small plot

Submitted by प्रशान्तमि on 14 September, 2017 - 03:19

Mala marathi nit type karta yet nahi, sorry.

I have a small plot (around 16 gunthe) at my native (kokan) and I was thinking about utilizing it for farming. Can someone share me the information on idea of farming in small plots, govt scheme.

Maza, artharjan ha mukhya uddhesh sandhya tari nahi... pun bhavishyat, thithe aik bread breakfast accomodation suru karaych wichar aahe. My intention is to provide a comfortable accomodation for families/groups who are touring kokan.

Please suggest.

Group content visibility: 
Use group defaults

भात घ्या.जमत असेल तर शेवगा घेऊ शकता.मी घाटावरचा शेतकरी असल्याने कोकणातल्या पिकपाण्याविषयी जास्त ठाऊक नाही.पण १६ गुंठे म्हणजे अर्धा एकरही नाही.बघा बुआ फार फायदा होणार नाही.

Dhanywad SG..

Income source mahnun sheti kade pahanar nahi..haus aahe mhanun thod phar jamat asel te karaych praytna karen. Mukhya uddesh....rahanyasaathi aani tourist saathi rented accomodation asa aahe.

घर बांध् लेले आहे का ? अस् ल्यास त्यात थोड्यासो उपलब्ढ् करुन देता येतिल...झोपाळा अस्ल्यास उत्तम.
अननस, पेरु, शेवगा असे बागयति उत्प्न्न नक्कि घेउ शकाल.....

My intention is to provide a comfortable accomodation for families/groups who are touring kokan.>>>

the intentions for plot development is tourism rather than agricultural and with this regards u can start floriculture with suitable variety (ref guidance from nearest KVK) This will b banefecial for faster return on short term basis as well as good landscaping with natural beuty will b long-term income with specialize attractive accommodation for tourists.

aquaponics with 5 Ares(guntha) land is also having good potential for bulk income on shorter periods ...say half yearly crops of GIFT Tilapia species

@p_r_a_jo - Dhanyawad. Ghar nahi bandhalay. tyawar wichar chalu aahe. Zopala nakkich asanar.. Koknatlya ghara baher jya kahi wruksh-vanaspati astat tya tar asnarach.

@Ambdnya - floriculture aani aquaponics....aanki mahiti jamwat aahe. Thanks.

भाज्या लावता येतील. त्याच भाज्यांचा वापर करून पुढे रेस्टॉरंट चालविता येईल.
नवीन Submitted by सीमा on 15 September, 2017 - 10:11
>>
खुर्चीवरुनच पडायचा बाकी होतो हा सल्ला वाचून...

सफरचंद किंवा केशराची शेती करून बघा . केशरात तर खूपच फायदा होतो .
किंवा द्राक्षे लाऊन बघा , नंतर वाईनरी काढता येईल .

जरी 16 गुंठेच जागा असली तरी भविष्यातला ब्रेड अॅण्ड ब्रेकफास्टचा विचार करता संपूर्ण जागेचा तुमच्या गरजेनुसार मास्टर प्लॅन बनवून घ्या.
त्यामधे आता आवश्यक असलेली व नंतर लागणारी स्ट्रक्चर्स मार्क करा.
ड्राईव्हवे, पार्किंग मार्क करा.
घरांभोवती चारही बाजूंनी थोडी मोकळी जागा सोडा.
एखादा हिरवळीचा पॅच दर्शनी भागात असू द्या. पाण्याची टाकी, सेप्टीक टँक, ड्रेनेज, केबलींग यासाठी जागा सोडा.
किचन वेस्ट, जागेतला पालापाचोळा, बायोडिग्रेडेबल वेस्ट जैविक खतात रुपांतरीत करण्यासाठी कंपोस्ट खड्ड्यासाठी जागा सोडा.
कोंबड्या, कुत्रे पाळणार असाल तर त्यांच्या रहाण्याच्या व्यवस्थेसाठी छोटीशी का होईना जागा सोडा.
केअरटेकर-माळ्याच्या रहाण्याच्या जागेचा विचार करा
सूर्य पूर्वेकडून दक्षिणेच्या बाजूने पश्चिमेकडे पोहोचतो, हा मार्ग (Sun-Path) विचारात घेऊन या बाजूला दाट सावलीची, उंच, एव्हरग्रीन झाडे लावा..
कंपाऊंड लगत सरळसोट वाढणारी झाडे लावा. किचन सांडपाण्याच्या ओलाव्यावर केळी, कर्दळी, अळू वाढवा.
कुठलीतरी सिझनल भाजी कायम तयार असेल यासाठी किचन गार्डन प्लॅन करा.
या व्यतिरिक्त उरलेल्या जागेत काही फळांची आणि काही फुलांची झाडे लावा.
शेवगा, कडिपत्ता, लिंबू अशी तुलनेने कमी श्रमाची पण रोज उपयोगी पडणारी झाडे त्यात असू द्यात.
झाडं लावताना परदेशी वाणाची लावण्याऐवजी देशी वाणाची असू द्यात ज्यामुळे ती फुलपाखरं, पक्षी, कीटक या परिसंस्थेची योग्य काळजी घेतील आणि जमिनीलाही समृद्ध करतील.
आजीबाईच्या बटव्यातली नेहमी किरकोळ आजारावर उपयोगी पडणारी औषधी झाडंही असू द्यात.
भविष्यात ब्रेड अॅण्ड ब्रेकफास्ट केलंत तर उत्तमच, पण नाही केल तरी तुमच्या विकेंड/रोजच्या/निवृत्ती नंतरच्या आनंदी निवासा साठीही हे नियोजन उपयोगी पडेल..
शुभम् भवतु....

पाणी कायमस्वरुपी मिळावे याची सोय करा आणि हा पुरवठा शाश्वत आणि निरंतर रहावा यासाठी जल पुनर्भरण (Rain Water Harvesting)/ पाणी अडवा पाणी जिरवा याची सोय करा.
घर बांधाल तेव्हा त्याच्या दक्षिण बाजूच्या छपरावर किंवा गच्चीवर पाणी गरम करण्यासाठी सोलर पॅनलची व्यवस्था करा. सुरुवातीलाच गार्डन लाईट्स, फुट लाईट्स आणि स्ट्रीट/कंपाऊंड लाईट्स साठी सोलरचा विचार करा. सुरुवातीला हा खर्च किंचित जास्त वाटला तरी विजेचा वापर वाचल्यामुळे पाच/साडेपाच वर्षात ह्याचा परतावा मिळतो आणि त्यापुढे दहा/बारा वर्ष तरी हे टिकते...
कुंपणासाठी शेर, घायपात अशा जिवंत अथवा सजीव कडु, काटेरी कुंपणाचा वापर करा.
झाडं लावताना चुलीसाठी सरपण म्हणून बाभळीसारखी काही जळाऊ लाकडे देणारी झाडे लावा.
एखाद दुसरी गाय पाळू शकल्यास दुधाची आणि ते कमी मिळाले किंवा नाही मिळाले तरी अतिशय महत्वाच्या शेणाची/शेणखताची सोय होईल.
हे नियोजन झाल्यावर ह्याच्या अधेमधे लागवडीसाठी Cash Crop आंतरपिकांचा विचार करा.
लाखी बाग म्हणून एक Concept आहे, त्याची पुस्तके, आंतरजालावर माहिती मिळते का ते पहा...

निरु, ___/\___ . किती सुंदर मुद्देसूद प्रतिसाद. माझ्याकडे जागा असती तर तुमच्याकडुनच आराखडा काढून घेतला असता.

निरु,
मस्तं सल्ला. मला पण आता कोकणात जाऊन काही करावसं वाटायला लागलंय.

निरु, किती सुंदर, सर्व समावेशक आणि मुद्देसूद लिहीलय.
आर्किटेक्ट शोभताय !

16 गुंठे जागा आहे. त्यात पुढे ब्रेड अँड ब्रेकफास्ट काढणार आहात. माझ्या मते बी अँड बी चा आराखडा आत्ताच तयार करून घ्या. त्यात कुठे इमारत कुठे मोकळी जागा येते बघा. आणि 5 गुंठ्याची 3 पॉलिहाऊस उभारा. तुम्ही 5 गुंठे बांधकाम करणार असे ठरवले असेल तर त्या 3 पैकी 1 पॉलिहाऊस काढून तिथे बांधकाम करू शकाल अशी रचना हवी.
जागा रेल्वे/वाहतुकी पासून किती अंतरावर आहे त्यानुसार काय घ्यायचे ते ठरवा. म्हणजे रोज जर मुंबईला पाठवता येत असेल तर कार्नेशन, जरबेरा, गुलाब घेऊ शकता. रोज शक्य नसेल तर भाज्या घेऊ शकता. पूर्ण कवर्ड ग्रीन हाऊस खूप महाग आणि अनावश्यक आहे. आनंद कर्वे मेथड वापरून खाली एक 5 फुटाची पट्टी मारून तोच ग्रीन हाऊस इफेक्त येतो असे त्यांचे म्हणणे आहे. ते बघा जमतंय का. कोकणातल्या पावसाला वरती मोकळं असून उपयोग नाही. मांडव केला पाहिजे. हाय टेक स्टील अन प्लास्टिक पेक्षा कोकणात स्थानिक घरा घरात मांडव असतो तो पुरेसा होईल असा माझा अंदाज आहे.

निरु, किती सुंदर, सर्व समावेशक आणि मुद्देसूद लिहीलय. >>> अगदी अगदी. ग्रेट एकदम.

टवणे सरांनी पण चांगलं लिहिलंय.

Saglaynache aabhar..
@Niru - pharach uttam aani sawistar mahiti. "झाडं लावताना परदेशी वाणाची लावण्याऐवजी देशी वाणाची असू द्यात ज्यामुळे ती फुलपाखरं, पक्षी, कीटक या परिसंस्थेची योग्य काळजी घेतील आणि जमिनीलाही समृद्ध करतील." - agadi.. gharatle sagalech ya matache aahet.
@Tavne sir - dhanywad. wichar nakki kartoy pun ya saathi dusrayawar awalambun kahi jamnar nahi...aani mala swatahala aawad aahe pun anubhav athwa mahiti nahi. Tumhala ya wishayachya courses chi mahiti asel tar please share karal ka?

काडसिद्धेश्वर मठ, कोल्हापूर किंवा दिंडोरी आश्रम, नाशिक यांच्या कडे तुमच्या लहान जमिनीसाठी कुठल्या प्रकारची शेती करता येईल, याचे प्रारुप मिळेल.