अँमेझॉन, बिग बझार, होम टाउन चा सेल कितपत उपयोगाचा? (संपादित)

Submitted by यक्ष on 10 August, 2017 - 00:49

(नवीन सेल जाहीर झाल्याने व त्यांचा थोडा review केल्याने माझी पुर्विची पोस्ट संपादित करित आहे. क्षमस्व!)

सध्या अँमेझाँन बिग बझार, होम टाउनचा सेल चालू आहे!

अँमेझाँन वरून मी तशी चार पाच वेळा खरेदी केली पण त्याही छोट्या छोट्या वस्तुंचीच (उदा. पुस्तके, चादरी वगैरे) मोठ्या वस्तू मला त्यापेक्षा बाजारतनं व्यवस्थीत व कमी किमतीत मिळाल्या.
अँमेझाँन ची वेबसाइट बघत बसण्यात वेळ मात्र फु़कट जातो.
आज मी ' हायड्राँलिक जँक' (कार साठी), 'एअर पंप'(कार साठी) 'प्रेशर कूकर' व 'इस्त्री' चा शोध घेत होतो. अँमेझाँन च्या वेबसाइटवर ५०% ते ७०% ह्या वर्गात एकही अशी वस्तु सापडली नाही. आता सरळ 'बोहरी आळी' चा रस्ता गाठतो. तिथे मला माझ्या आजवरच्या बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळालीत तशी ह्याही प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आशा आहे.

नुकतीच 'ग्राहक पेठेतून' गौरी - गणपती' सणांसाठी बर्‍यापैकी खरेदी झाल्याने आ़ज जाहीर झालेला बिग बझारचा नेव्हर बिफोर सेल किती फोल आहे ह्याची तीव्रतेनं जाणीव झाली. किमती 'अविश्वसनीय' वगैरे अजीबात नाही! असल्याच तर त्या वेगळ्या अर्थाने! उदा. काही 'इलेक्ट्रोनिक' वस्तू ह्या प्रथमदर्शनी स्वस्त वगैरे वाटतात पण त्या आहेत कुठल्याशा ' कायरो' वगैरे कंपनीच्या! ज्याच्या सर्विस बद्दल मला तरी खात्री वाटत नाही. आणी त्या वस्तुही साधारणतः त्याच दर्जाच्या वाटतात.

होम टाउन सेल ही तर निव्वळ धूळफेक वाटते! एक तर त्या 'डिस्कोउन्टेड' किमतीही ज्यास्तच असतात. आणी तिथे गेल्यावर काही काही वस्तू ह्या आउट ऑफ स्टॉक असतात. त्यापेक्षा आजकाल निघालेल्या (रस्त्यांच्या बाजुला) 'फर्निचर मॉल' मधे स्वस्त असतात. (हाही तोच मलेशिया / थायलंड चा माल असतो आणी तेही भरपूर नफा कमवून आपल्याला विकतात. (ठाण्याला एक जण ओळखीचा झाला आहे - त्याकडनं आजवर बरीच खरेदी केली आहे, त्याकडनं कळले.)

आजवर 'खरे' / 'विश्वसनीय' म्हणून जाणवलेले / अनुभवलेले काही मोजकेच ब्रँडः (वैयक्तिक मत):

१. ग्राहक पेठ (उत्तम दर्जा - उत्तम सेवा)
२. चितळे (उत्तम दर्जा - फक्त - पण खाने के लिए मजबूर म्हणून नाइलाज)
३. वेस्टसाइड (टाटा)
४. बेनेटॉन (उत्तम दर्जा - किमती जस्टिफाइड!)
५. कलानिकेतन (उत्तम दर्जा - किमती जस्टिफाइड!)
६. ईंडिगो एअर्लाइन्स (आंतरर्देशिय)- एमिरेट्स (आंतरराष्ट्रिय)
७. बजाज इलिआंझ - मेडिकल विमा (यल. आय. सी. चे प्रिमियम अजूनही आकाशात आहेत. आत्तापर्यंत राज्य केलं त्यांन्नी)

आपलेही विचार जाणून घ्यायला आवडतील!

Group content visibility: 
Use group defaults

आजच्या mumbai mirror मधे एक बातमी आली आहे. एका व्यक्तीने ३३००० रु कार्ड पेमेंट करुन अ‍ॅमेझोन कडे टीव्ही बुक केला. घरी आल्यावर त्यात १५" एसरचा मॉनिटर निघाला, तोही नादुरुस्त! २ महिने झाले , ती व्यक्ती पैसे परत मिळवण्यासाठी झगडा देत आहे.

गॅजेट्स ओके.
पण सेल मधले कपडे(स्पेशली कुर्ते आणि टॉप) इतके म्हणजे इतके हिडिस असतात की ते आपण ९०% डिस्काउंट ला तरी घेऊ का हा प्रश्न असतो.

सेल मध्ये नाही, पण बाकी आम्ही कायम अ‍ॅमेझॉन वरुनच खरेदी केलीय. १- २ अपवाद वाळता, ( मुलीसाठी मागवलेले कपडे जास्त साईज चे मिळाले, पण त्यांनी ते परत घेतले) कन्व्हेक्शन ओव्हन, फिलीप्सचा टिव्ही, छोट्या मोठ्या वस्तु, कपडे, कुर्तीज छान मिळालेत. आतापर्यंत कुठलीच तक्रार नाहीये.

मध्ये स्नॅपडीलचा हा प्रॉब्लेम झाला होता, भिवंडी गोडाऊनवाले मध्येच माल बदलुन व्यवस्थीत पॅक करत होते

पण अमॅझानचा माझा अनुभव चांगला आहे

अ‍ॅमेझॉनवर अर्ध्या तासापूर्वी प्रेस्टिजचाछोटा कुकर १४०९/-दाखवत होते.पण बाय करायला गेले तर १५९७/- येत होते.फ्री डिलिव्हरी होती,तरीही मग रद्द केले.

बातमीचे कंटेंट थाप हो!
1. Big appliances ला ओरिजिनल packaging वर amazon च लेबल असतं
2. समजा, उघडून monitor निघाला असं गृहीत धरू!? तर तो चालवून का बघावा? नादुरुस्त नसता तर टीव्ही ऐवजी monitor चालला असता का!
3. Packaging उघडतानाच कळाले नसेल का हा tv वाटत नाही!
दाल में काला नाही पूर्ण बातमीची दाल काळी!

तुम्ही दिलेल्या वस्तुसाठी पिंपरी मार्केट , लोहार चाळ चांगले (बोहरी आळी पण तसेच असेल) , जर अ‍ॅमेझॉन वर स्वस्त असेल आणि त्याना परवडत असेल तर ते price match करुन देतात.

Amazon चा आतापर्यंतचा अनुभव चांगला आहे.
महागड्या वस्तू घ्यायच्या असतील तर cash on delivery आॅप्शन आहेच.. शिवाय वस्तू आवडली नाही तर परतही करता येते. रिटनेबल आहे की नाही हे वस्तू आॅडर करण्या अगोदर खात्री करावी..

Aamazon वर नेहमी खरेदी करतो. वस्तू खराब किंवा न आवडल्यास परत घेतात. शक्यतो पार्सल उघडताना मोबाईल कॅमेराने चित्रण करावे.

Amazon खरेच चांगले आहे. आजच सुमीतचा मिक्सर ऑर्डर केला, COD ठेवलाय पेमेंट मोड.
आज बिग बाझार सेल होता म्हणुन गेले होते पण ईतके काही खास नाहीये असे मला वाटले. यापेक्षा डिमार्ट चांगलेय.