मोबाईलवरून लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करायचा?

Submitted by मदत_समिती on 29 June, 2017 - 09:48

१) प्रतिसाद लिहिण्याच्या खिडकीच्या खाली लागूनच एक ओळ लिहिलीय. 'मजकुरात image किंवा link द्या.'
२) त्यातील image वर टिचकी मारा.
३) एक नवीन स्क्रीन उघडेल. ज्यात सर्वात वरच्या पट्टीवर 'Upload' 'Thumbnail' 'Delete' 'Insert file' लिहिलेलं दिसेल. त्यातील पहिल्या 'Upload' वर टिचकी मारा.
४) त्याच ठिकाणी एक नवीन खिडकी उघडेल. ज्यात लिहिलेलं असेल. 'Choose file' आणि खाली 'Upload'. तुम्ही 'Choose file' वर टिचकी मारा.
५) लगेच तुमच्या मोबाईलमधील फोटोंची गॅलरी उघडेल. तुम्हाला आवडेल तो फोटो सिलेक्ट करा.
६) तुम्हाला क्रमांक ४ मध्ये वर्णन केलेली खिडकी पुन्हा दिसू लागेल. पण 'choose file' च्या पुढे तुम्ही निवडलेल्या फोटोचं नांव दिसू लागेल. त्याखाली लिहिलेल्या 'Upload' बटणावर टिचकी मारा.
७) स्क्रीनच्या उजवीकडील भागात तुमच्या फोटोचं निळ्या पट्टीत नांव आणि त्याखाली तुमचा फोटोही दिसू लागेल.
८) आता स्क्रीनच्या सर्वात वरच्या पट्टीमध्ये सर्वात उजवीकडे लिहिलेल्या 'Insert file' बटणावर टिचकी मारा. त्या बटणाचा फक्त रंग बदलेल. बाकी काही हालचाल दिसणार नाही. इथे समजा तुमचे फोटो चढवायचे काम झाले आहे.
९) पुन्हा 'back' म्हणजे मागे या. तुमची प्रतिसाद देण्याची खिडकी पुन्हा दिसू लागेल. पण तुम्ही चढवलेल्या फोटोची लिंक तेथे लिहून आलेली तुम्हाला दिसू लागेल.
१०) आता आपला फोटो चढवायचा कार्यक्रम संपलेला आहे. प्रतिसाद तपासा आणि प्रसिद्ध करा.

( सोप्या भाषेतल्या या सूचनांबद्दल सचीन काळे यांचे आभार)

या पद्धतीत दोन अडचणी आहेत.
१) तुमचा फोनचा ब्रिउजर एचटीएमेल सपोर्टेड असावा लागतो तरच मायबोलीची खासगी जागा उघडून,फोटो अपलोड करून लिंक काढता येते. ओपरा मिनि चालत नाही. बटणवाले जुने फोन चालत नाहीत.
२) कुणी बरेच लेख फोटोंसह नेहमी देत असेल तर ही जागा(२०-४०एमबी?) पुढे अपुरी पडेल आणि काही फोटो तिथून काढावे लागतील. जुन्या लेखांतले ते फोटो गायब होतील.

उपाय- फेसबुक वापरणे फोटो शेअरिंगसाठी, लिंक इमिज ट्यागात अडकवणे.

लिमिट पूर्वीचं १३०केच आहे का? >>> मी काही दिवसांपूर्वी खाजगी जागेतून ९६६ kb चा फोटो अपलोड केला होता.

खाजगी जागेची साठवणूक क्षमता ७० Mb आहे.

फोटो 'Google drive', 'Flicker', 'Google images' वरूनसुद्धा (अगदी कुठ्ठुनही) टाकता येतात.

मेमरी वाढवली असेल तर उत्तमच.
मुद्दा १) मात्र आहेच. चिनपाट फोनातून चालत नाही.
३)इथल्या फोटोची लिंक दुसरीकडे चालते का?
४)फेसबुकवर एकदा फोटो टाकला की त्याची लिंक कुठेही चालते.
५)फोटोंच्या लिंका फेबुवरच्या एचटिएमेल टॅग्जमध्ये टाकून संपूर्ण लेखच फोनच्या नोट्समध्ये लिहून काढता येतो.

गुगल इमेजमधून माबोवर फोटो अपलोड करण्याची रीत.

१) गुगल इमेज उघडा.
२) सर्च करून हवा तो फोटो निवडा.
३) त्या फोटोवर क्लिक करा.
४) तो फोटो उघडेल.
५) फोटोवर राईट क्लिक करा, मोबाईलवर असाल तर फोटोवर बोट दाबून धरा.
६) एक छोटी खिडकी उघडेल त्यात लिहिलेल्या Open image in new tab वर क्लिक करा.
७) तोच फोटो नवीन टॅब मध्ये उघडेल.
८) त्या टॅबच्या वर दिसत असलेली पूर्ण लिंक कॉपी करा.
९) img src=" " width="100%" height="100%" /
१०) ती पूर्ण लिंक वर सूत्रात असलेल्या " " ह्या दोन कॉमाच्या मध्ये कोणतीही स्पेस न सोडता पेस्ट करा.
११) आता लिंकसहित पूर्ण सूत्र प्रतिसादात <> ह्याच्या मध्ये पेस्ट करा.
१२) प्रतिसाद तपासा आणि प्रसिद्ध करा.
१३) झालं! हाय काय! नाय काय!

खालील फोटोची गुगल इमेज मधील लिंक पुढीलप्रमाणे आहे.

https://encrypted-tbn1.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQWnQ4PAp1l-_yAYjU-aKfp4NrkhJJn8fevAhi-HMUFsizrpqAO9BLKJrtT

ही लिंक मी खालील सूत्रात दोन कॉमाच्या मध्ये बसवली
img src=" " width="100%" height="100%" /
आणि सूत्र <> ह्या दोन चिन्हाने बंद केले. (परसेंटेज कमी जास्त केले की फोटो लहान मोठा होतो.)

आणि मग खालीलप्रमाणे फोटो दिसू लागला

टीप : गुगल इमेजमधील फोटो इतर कुठेही डकवताना ते प्रताधिकारमुक्त आहेत का याची खात्री करावी.

धन्यवाद. ह्या धाग्यावर दिलेल्या माहितीनुसार मी आताच तेनाली रामा चा फोटो दिला. मालिकेच्या धाग्यावर.. Happy Happy Happy
अगोदर फक्त मी दिलेली लिंक दिसत होती. फोटो ची साईज कमी केली आणि आता फोटो दिसतो .

खालील पद्धत मानव पृथ्वीकर यांनी लिहिली आहे, पिकासा होते तेव्हा मला गरज नसल्याने मी ही पद्धत समजून घेतली नव्हती. पिकासा गेल्यावर मात्र मला फोटो टाकणे अवघड झाले. माबोवर खाजगी जागेत फोटो चढवता येतात पण त्यासाठी फोटो किती जागा घेणार (kb) यावर मर्यादा आहे. मोबाईलवरून फोटो असे एडिट करणे कठीण नसले तरी वेळखाऊ आहे. त्यामुळे माझ्या एका लेखमालेसाठी मी व्हाट्सअप्पवरून फोटो पाठवून घेतले व त्यांना 'हलके' केले. नंतर आप्पानी खालील पद्धत सांगितली, ती समजून घेतली आणि हीच आता वापरते.

खाली गुगल ड्राइव्ह लिहिले आहे. गुगल फोटोवरचे फोटोही असेच देता येतात. मुळात अट ही आहे की फोटो कुठेतरी नेटवर असावे. माझे सगळे फोटो मी गुगलवर ठेवते. तिथून ही पद्धत वापरून फोटो माबोवर टाकते.

खाली मोबाईल फोन वरून माबोवर फोटो देण्याच्या स्टेप्स दिल्या आहेत.

१. हवा तो फोटो गुगल ड्राइव्हमध्ये नेऊन ठेवा.
२. गुगल ड्राइव्हमध्ये त्या फोटोची लिंक शेअरिंग एनेबल करा आणि मग कॉपी लिंक वर टिचकी मारून क्लिपबोर्डला लिंक कॉपी करून घ्या.
३. आता https://ctrlq.org/google/photos/ या साईटवर जा.
४. तिथे "Paste google photos link here" मध्ये ही गुगल ड्राइव्हची लिंक पेस्ट करा. आणि "Generate Code" वर क्लिक करा.
५. ती वेबसाईट आता आपोआप स्क्रोल डाऊन होईल (न झाल्यास तुम्ही करा) आणि तिथे "Direct Link (URL)" व "Image Embedded Code" या फिल्ड्स दिसतील. त्यातील "Image Embedded Code" आपल्या कामाचा आहे. त्यातील लिंक कॉपी करून माबोवर हवी तिथे पेस्ट करा.
झाले.

माबोवर फोटो दिसला की आता गुगल ड्राइव्हमध्ये लिंक शेअरिंग बंद करू शकता किंवा तिथून फोटो काढूनही टाकू शकता.

मायबोली या प्लॅटफॉर्मवर हिंदी लेखन करता येते का?>>>

मायबोलीच्या ओळखीतच 'मराठी माणसांना मराठी भाषेत व्यक्त होण्याचे व्यासपीठ' असे लिहिले असल्याने वरील प्रश्न गैरलागू आहे.

बदल!!!

----–
१) गूगल ड्राईव आणि त्याचा एक फोल्डर म्हणून गूगल फोटोज असं चार महिन्यांपूर्वी होतं त्यात बदल झाला आहे. लिंक्स वेगळ्या येतील. बाकी ctrl website वापरायची आहेच.
------------------
-माबोवर फोटो दिसला की आता गुगल ड्राइव्हमध्ये लिंक शेअरिंग बंद करू शकता किंवा तिथून फोटो काढूनही टाकू शकता.

. नाही. !! तिकडून फोटो काढू नका!!

SmartSelect_20220127-085824.jpg

तुम्हाला मोबाईलवरून इन्सर्ट हा पर्याय कुठे दिसतो? मला तो अजिबात दिसत नाही. अ‍ॅपवर जमले नाही म्हणून ब्राउझरवरून प्रयत्न केला, पण त्यातही वरीलप्रमाणे दिसते आहे. कृपया माझे काही चुकत असल्यास सांगा.

(वरील चित्र मोबाईलवरून अपलोड करून मग संगणकावर ब्राउझर उघडून त्यातून इन्सर्ट केले आहे. द्राविडी प्राणायाम)

<< तुम्हाला मोबाईलवरून इन्सर्ट हा पर्याय कुठे दिसतो? >>

मूळ इमेजचा साईज खूप मोठा असेल तर ती इमेज अपलोडच होत नाही आणि त्यामुळे इन्सर्ट हा पर्याय दिसत नाही. साईज मोठा म्हणजे नक्की किती ते माहित नाही, पण माझ्या अनुभवानुसार त्याच इमेजचा साईज कमी केला (अनुभवाने १ एमबी पेक्षा कमी), तर इमेज अपलोड होते आणि मग इन्सर्ट करता येते.

तिकडे दिलं उत्तर. तुम्ही हे माझे सदस्यत्व - खाजगी जागा मध्ये जाऊन करताय. इथे इमेज अपलोड किंवा डिलीट करता येते.
इन्सर्ट करण्यासाठी जिथे इमेज द्यायची आहे त्या धाग्यावर प्रतिसाद खिडकीखाली इमेज द्या वर टिचकी मारा. आधीच अपलोड केली असेल तर सिलेक्ट करून इन्सर्ट करा

अहो मी धाग्याच्या खाली प्रतिसादातूनच गेलो. तिथे 'मजकूरात image किंवा link द्या' मधल्या इमेज शब्दावर क्लिक केलं, मग इमेज अपलोड केली. तेव्हाचं चित्र वरती दिलं आहे.

मायबोली app मधून गेल्यास 'file name' column उघडत नाही. ( ब्राऊजर साइटवर सरकवून दिसतो.)
जर तो दिसला तर तर 'insert image' नसलं तरी काम होऊ शकेल.
फोटो साईज अपलोड लिमिट २ एमबी आहे.

SmartSelect_20220127-170540_Chrome.jpg

Srd, हे पहा. ह्यात 'file name' column उघडतो आहे, पण 'insert image' दिसत नाही. आता कशी इन्सर्ट करायची ती सांगाल का?

Pages