भन्नाट...........

Submitted by aishwarya2211 on 25 September, 2009 - 17:33

भन्नाट......
काय नाव आहे नाही?सुचलं होतं तेव्हा आम्हा सगळ्यांनाही असच वाटलं होतं...आम्ही सगळे म्हणजे मी,पक्या,रव्या,अन्या,आणि मन्या...सगळ्यांची नावे बिघडवून हाका मारल्या म्हणजे एक तर आपलेपणा वाटतो आणि दुसरे म्हणजे पूर्ण नाव उच्चारायचे कष्ट घ्यावे लागत नाहीत ...काय??हा हा...:)
असले pj मारणे हा आमच्या भन्नाट group चा आवडता छंद आहे ... आमच्यापैकी रोज सर्वांत कमी फाल्तू pj जो मारेल तो canteen चे बिल देतो..आणि हा अलिखित नियम होता...
तसे आमच्या ग्रुप चे बरेच नियम होते.त्यांपैकी आणखी एक नियम म्हणजे सारखं काहीतरी भन्नाट करायचं.
शेवटी ग्रुपचं नाव सार्थ करायला हवं ना...

मागच्या वेळेस सर्वात जास्त सिगारेट्स कोण फुंकतो ही पैज लावली होती.मी तर रोजचं ओढतो..पण बाकी लोकं कधी कधी ओढतात...मन्या मात्र आधी हात नाही लावायचा...घरचे संस्कार वगैरे...पण आता नॉर्मल झाला आहे आमच्यात राहून...त्याआधी bike racing,भर थंडीत उघड्या अंगाने पाण्यात उभारणे,
अमावस्येच्या रात्री एकटं स्मशानातं जाऊन येणं..वगैरे प्रकार आम्ही केले होते..हा स्मशानाचा बेत खास पक्यासाठी होता...असा तर खूप रुबाबात वावरायचां पण भूत,स्मशान वगैरे गोष्टींनी चळाचळा कापायचा...तर त्याच्यातील भितीचा नायनाट व्हावा म्हणून ही idea होतीं. नंतर तापाने फणफणला होता.त्याच्या उशाशी आम्हीच होतो २ दिवस्.बाकी एकमेकांना कितीही छळले तरी आपली दोस्ती पक्की.कधी एकमेकांना सोडणार नाही.."भन्नाट- भितीचा नायनाट्"आपला लोगो होता. हां हां...:) मला जरा जास्त हसायची सवय आहे..तर आता पुढची भन्नाट योजना काय असावी हे ठरवण्यासाठी आमची gang जमली होती..btw एक सांगायचे राहिलेचं...आम्ही engg students.असल्या सगळ्या आल्तू फाल्तू गोष्टी करेन exam time मध्ये अभ्यासपण करायचो.timepassकितीही करा पण..CAREER साठी NO COMPRO.

तर..रव्याच्या धूर्त आणि सुपीक डोक्यातून एक भन्नाट कल्पना आली.कॉलेजमधील पोरींना प्रपोज मारायचा.मनातल्या मनात मी टरकलो. ही भन्नाट योजना फक्त मला टरकावण्यासाठी आहे हे न कळण्याइतका मी काही हां नव्हतो.कारण कितीही भानगडी केल्या तरी पोरगी नावाच्या भानगडीपासून चिन्मय बोरगांवकर(ऊर्फ चिन्या) १किमी दूर असतो.आता पोरी आपल्याला भाव देत नाहीत असे नाही.२-३ फटाकड्या पोरींनी प्रेमपत्र का काय म्हणतात ते लिहीले होते मला."रोझ डे" ला फुले दिली होती.पण आपण जास्त भाव देत नाही.मग पोरीपण स्वतःला अतिशहाणा समजतो असे म्हणून नाक मुरडतात. मनातून मात्र खट्टू होतात.माझ्याबद्दल कॉलेजमधील पोरी काय विचार करतात हे मला माहीत होते. कसला हॅण्डसम आहे ना?,He is so cute,wowww..looks lika a hunk etc comment.ऐकले होते मी.असो..सांगायचा मुद्दा असा की आमच्या गँगने ठरवलेला नवीन प्लॅन आपल्याला पचण्यासारखा नव्हता.पण गँगच्या नियमाप्रमाणे majority ला प्लॅन मंजूर असेल तर मी काही बोलू शकणार नव्ह्तो आणि बाकीच्यांनी नामंजूर करावे असे काही नव्ह्ते.सगळयांना माझा सूड घ्यायचा होता..मी त्यांना खूप पिळले होते त्याप्रित्यर्थ... तर मी कोणत्या मुलीला प्रपोज करावे हेसुद्धा गँगने निश्चित केले होते."सु़कॄती "एक काकूबाई टाईप मुलगी होती.इंजिनियरिंग कॉलेजमध्ये जेथे सगळं मॉडर्न पब्लिक होते तिथे मॅडम सलवार कमीज घालून यायच्या.स्टेप्स कट,लेअर कटच्या जमान्यात वेणी वगैरे म्हणजे हद्द होती.आता मात्र मी वैतागलोच होतो.अरे लेकांनो कोणी फटाकडी पोरगी सांगा तिला प्रपोज मारता येईल..पण या सुकॄतीबाईंना कसे काय? मला चप्पल घेऊन मारेल नाहीतर प्रिन्सिपलकडे जाईल...पण माझ्या जिवावर उठलेल्या दुश्मनचा प्लॅन पक्का होता."सुकॄती" तिचं तुझं टारगेट आहे सगळ्यांनी एका वाक्यात दुजोरा दिला.आता माझा नाईलाज होता.पड खाऊन चालणार नव्ह्तं.त्याचं दिवशी कॉलेज संपल्यावर आपण तिला प्रपोज करणार होतो.क्लासमधून ती बाहेर पडली आणि मागच्या बाजूला आली..घराकडे निघाली होती.

मी तिला हाक मारली.(तिच्यापेक्षा जास्त भिती मला वाटत होती,मला ती चप्पल मारेलं का थोबाडीत??)
ती थबकली,थांबली आणि मागे वळली.
मी: एक मिनिट थांबता का?मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे.
ती :स्तब्ध(तिची नजर खाली झुकलेली होती बहुतेक..चष्म्यामुळे दिसले नाही तिच्या)
मी: Actually,I like you and I think I LOVE YOU.मी एका झटक्यात सगळे बोललो आणि पाय पळण्याच्या तयारीत...
ती:..................एकदम शांत.२ मिनिटं निशब्दतेत गेली...
तिने एकदा माझ्याकडे नजर उचलून पाहिले आणि झर्रकन वळून निघून गेली.
मला काही कळलेच नाही हिने थोबाडीत पण मारली नाही आणि काही बोलली नाही.हे जरा अनपेकक्षितच होते.एवढ्यात बाजूला लपलेली गँग आली.पैज पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले.तो विषय त्यांच्या मते तेथेच संपला.पण मला जाम टेन्शन आले होते.उद्या घरच्यांना घेऊन आली तर..??प्रिन्सिपलकडे तक्रार केली तर??तसे आपण कोणाला घाबरत नाही.पण उगीच घरच्यांना बोलवावे लागले तर नसते झेंगट..
म्हणूनच आपण पोरींच्या वाटेला अजिबात जात नाही.पोरगी असेल न की साध्या गोष्टी अवघड होऊन बसतात.graphics मधील unsolved problem सारख्या....

दुसर्‍या दिवशी कॉलेजमध्ये गेलो,तर क्लासमध्ये सुकॄती आली नव्ह्ती.कॅन्टीनमध्ये आमचा गोंधळ चालला होता.पण आज माझे लक्ष नव्ह्ते.ती का आली नाही?जिवाचं काही बरंवाईट??तसं पण मुली खूप जास्त senti आणि अविचारी असतात.थंडीतपण मला चक्क घाम फुटला.२ दिवस झाले सुकॄती आली नव्ह्ती.आता मात्र मी फार घाबरलो होतों. नाही नाही ते विचार येत होते.काय केलं असेल पोरीनं?नसती पैज अंगाशी येईल?उगीच पैज लावली.तिने suicide वगैरे?नाही हे शक्य नाही.
कॉलेज संपले आणि होस्टेलवर गेलो.संध्याकाळचे ६ वाजले होते.एवढ्यात मोबाईल वाजला.तिकडून खूप गोड आवाज कानावर आला.
................: हॅलो चिन्मय?
मी :येस्,हू इज इट?
................:मी सुकॄती.
मी चाट्..(थँक गॉड ..पोरगी ठीक आहे.पण हिला माझा मोबाईल नंबर कसा मिळाला?मिळाला असेल कोठूनतरी,कॉलेजमध्ये बर्‍याचजणांकडे आहे माझा नंबर)
मी:ओह्,सुकॄती?या टेल..
ती:actually I want to meet you.Can you?
मी: अं हो ..tell me.
ती:उद्या ४वा.CCD near Walchand Street.OK?
मी: OK.
ती:Thank you so much!!Bye
मी:Bye
बराच वेळ शांततेत गेला.हिने फोन का केला होता?हिने आपले proposal seriously तर नाही ना घेतले?
देवा मला वाचवं रे.ही पैज फारच complicated होते आहे.जाऊ दे उद्या तिला भेटून सांगायचे बाई गं ती एक पैज होती.उगीच मनावर घेऊ नकोस्.सोडून दे तो विषय्.उगीच माझ्या नादी लागू नकोस.दुसर्‍या क्लास संपल्यावर मी तेथून सटकलो.गँग याबाबतीत अनभिज्ञ होती.उगीच मला हा विषय पब्लिक नको होता.

मी बरोबर ४वा. CCD च्या सोफ्यावर बसलो होतो आणि मी त्या फाल्तू पैजेत का सहभागी झालो याबद्दल स्वतःवर ओरडत होतो.एवढ्यात हॅलो असा मंजूळ आवाज आला.मी मान उचलून वर पहिले आणि जागच्या जागी उडालो.

पांढर्‍या रंगाची डिझायनर केप्री,त्यावर फ्लोरल डिझायनचा गुलाबी रंगाचा टॉप,त्यावर पारदर्शी गुलाबी रंगाचा स्टोल आणि त्याच्या झालरीला छोटे छोटे घुंगरू लावले होते.वार्‍याने ते मधून मधून हलत होते आणि त्यांचा मंजूळ स्वर कानी पडत होता.चॅनेलचा मादक सुगंध मोहवत होता आणि या सर्वांना परिधान केलेली एक नवीन सुकॄती माझ्यासमोर उभी होती.आज तिचे मऊ,रेशमी केस बेभानपणे उडत होते.तिने ते पहिल्यांदाच मोकळे सोडले असावेत किंवा ते मोकळे सोडलेले मी पहिल्यांदाच पाहिले असावेत.
गळ्यात एक बदामाच्या आकाराचे छोटेसे पेंडल होते ज्यामध्ये गुलाबी रंगाचा खडा होता,तसेच मॅचिंग कानातले होते.अनामिकेमध्ये तशीच गुलाबी रंगाची अंगठी होती.तिने नेलपॉलिश लावल्यामुळे नखे आकर्षक दिसत होती की नखांमुळे नेलपॉलिश हे नक्की सांगता आले नसते मला.(याआधी कधी तिच्या नखांकडे लक्षच गेले नव्ह्ते.)ओठावर हलकीशी लिपस्टीक लावली होती.तिला जास्त मेकअप आवडत नसावा.तशी तिला मेकअपची गरज नव्ह्ती,तिला नैसर्गिक सौंदर्य लाभले होते जे मला आज पहिल्यांदा कळत होते.तिचे डोळे चष्म्याआड लपलेले असत जे पहाण्याचे भाग्य मला आज मिळत होते.GOSH!!कोणीही तिच्या प्रेमात पडेल एवढे सुंदर तिचे डोळे होते.

Hi,मला ओळखलं का?मी सुकॄतीच आहे.तिच्या बोलण्याने मी भानावर आलो.अजूनही पूर्णपणे सावरलो नव्ह्तो.ही तीच सु़कॄती आहे का?तिची जुळी बहीण तर नाही?मी जाम चक्रावलो होतो.
मग काय घेणार तुम्ही?चहा का कॉफी तिने विचारले?(CCDमध्ये चहा?मी परत चक्रावलो.)अहो,pj मारला मी..आणि ती खळाळून हसली...तेव्हा तिच्या गालावरची खळी निळ्याशार जलाशयात विसावलेल्या पौर्णिमेच्या चंद्रासाऱखी भासली..माझ्यासारख्या अरसिक माणसाच्या रसिकतेला साद घालणार्‍या त्या अमूर्त सौंदर्याला सलाम!!

माझ्या डोळ्यातील अनेक प्रश्न्नचिन्हे तिला दिसली असावीत्...सांगते तुमच्या सगळ्या प्रश्न्नांची उत्तरे मी.तुम्ही हाच विचार करत आहात ना?कि मी अशी कशी??नेहमीची ती वेगळी..आजची ही वेगळी..मग मी खरी आहे तरी कशी?खरं सांगू मी खरी अशीच आहे.पण एक बुरखा पांघरुण रहात होते.कारण माहितेय्..??तेही सांगते..मी खूप श्रीमंतीत वाढलेली मुलगी आहे.देवदयेने सौंदर्य पण आहेच.पण मी नेहमी विचार करायचे,माझा जो होणारा जीवनसाथी असेल त्याने माझी श्रींमती,रूप पाहून मला पसंत करू नये.तर माझ्यातील गुणांना पाहून मला पसंत करावे.आणि तुम्ही तेच केले म्हणून आज मी माझ्या खर्‍या रूपात तुमच्यासमोर आहे.

मनातल्या मनात मी कपाळावर हात मारला..पोरी खरच मुर्ख असतात ..आज खात्री पटली होती...

२ महिन्यानंतर

कॉलेजमध्ये जे अनेक couples होते त्यामध्ये चिन्मय+सुकॄती ची भर पडली...आणि हो ही नवीन सु़कॄती फार फेमस होती हा.आमच्या गँग ने पन पैजेची गोष्ट गुप्त ठेवली...मित्रप्रेम ना..:)
पण खरं सागू सुकू इतकी गोड मुलगी आहे ना की मी खरचं तिच्या प्रेमात पडलो आहे..ती काकूबाईसारखी राहिली ना तरीही मला तितकीच आवडते...I REALLY LOVE HER YAAR..THANKS TO OUR भन्नाट GROUP!!!JIYO MERE GROUP.....

गुलमोहर: 

ekhadi ashich katha asel tar i think dats jus a coincident.me maaybolichi navin member ahe.so this is my first story n i havent read this story anywhere b4.thanks

सही रे
धम्माल आली वाचताना
पहीलाच प्रयत्न मस्त जमलाय, नाहीतर काही लोक हजारवेळा लिहुन पण गोल गोल फिरवित बसतात आणि त्यांना वाटते की माझ्या पेक्शा चांगलं कोणीच लिहीत नाही ::हाहा::

सही रे
धम्माल आली वाचताना
पहीलाच प्रयत्न मस्त जमलाय, नाहीतर काही लोक हजारवेळा लिहुन पण गोल गोल फिरवित बसतात आणि त्यांना वाटते की माझ्या पेक्शा चांगलं कोणीच लिहीत नाही ::हाहा::

सही रे
धम्माल आली वाचताना
पहीलाच प्रयत्न मस्त जमलाय, नाहीतर काही लोक हजारवेळा लिहुन पण गोल गोल फिरवित बसतात आणि त्यांना वाटते की माझ्या पेक्शा चांगलं कोणीच लिहीत नाही ::हाहा::

thank you so much..tumha sarvanchya reply mule utsah aala..khup abhari ahe..:)

.घरचे संस्कार वगैरे...पण आता नॉर्मल झाला आहे आमच्यात राहून..>>>>:हाहा: आवडली गोष्ट. शेवट ऑब्व्हियस होता तरी.

Pages