Submitted by विस्मया on 20 September, 2009 - 07:37
एक कडवे देत आहे... या ओळींच्या अर्थाबरहुकूम पुढचे कडवे कुणी लिहू शकेल का ?
बघा ना प्रयत्न करून.. वेगवेगळ्या शैलीतल्या कडव्यांची एक माळ बनवूयात का ?
===========================================
पहाटे पहाटे ओघा'ळते ओले दव
रेंगा'ळते ओठांवर कशी, दुखरी ही चव
गेली लाजवून रात, शोधी उषेचा आडोसा
घनविरघळ होई , सोडी उर्ध्वित उसासा ..
Maitreyee Bhagwat
गुलमोहर:
शेअर करा
स्वप्ने अजून डोळ्यात, दिसे
स्वप्ने अजून डोळ्यात, दिसे उभा दिस
ओलांडून सीमा, उषा येई परसात
किरण क्षणांचे पसरी नवऊर्जा मनात
खाद्य विचारांचे मिळे होई सकाळ चविष्ट
अलका खूप छान लिहीलेय...आणखी
अलका
खूप छान लिहीलेय...आणखी कोण कोण येतंय ?
********************* रात
*********************
रात सरली तरी रेंगाळती अनुभव
भावमग्न होई .. हे श्वासांचे गुंजारव
देवुन कोण गेले तॄषा अन भरोसा
तॄप्त मी सर्वांगी..घेई अद्वैताचा कानोसा
**********************
बघा...जमलय का अन आवडत का ते
एक रात्र दोन जीवांचा मेळ
एक रात्र दोन जीवांचा
मेळ लावण्यात जाते,
एक रात्र श्वासांचा
खेळ खेळण्यात जाते...
रात्रभर लाजवते गोठवते रात्र,
अन पहाट होता
स्वतः लाजुन
होते गलितगात्र...
परेश आणि गिरीश खूपच सुंदर
परेश आणि गिरीश
खूपच सुंदर झालीयेत ही कडवी..
किलरव कुठुनसा येता कानीं होते
किलरव कुठुनसा येता कानीं
होते किती मी दंगच स्वप्नी
कधीच नाही का या सूर्याला
कळणार निशेच्या काय मनी
सुषमेची रंग बहार दिसे मनातला
सुषमेची रंग बहार
दिसे मनातला कवडसा
गुलाबी थंडीत वाटे
कुणी अजुनही हवासा
वाह सुन्दर विशेशत परेश, अल्का
वाह सुन्दर
विशेशत परेश, अल्का आणि गिरीश
तृषा ज्ञानाची तेजाचा
तृषा ज्ञानाची तेजाचा जागर
विश्वास मनीचा उषेचा वावर
भावविश्व गोंजारीत किरणे सादर
धुंद मन घाली तनाला भुरळ
इथे तर एकाहून एक छान छान
इथे तर एकाहून एक छान छान कडव्यांची बरसात आहे.वाहवा!
आर्द्र नयनांचे मन,कसे
आर्द्र नयनांचे मन,कसे जाणिनाहो कोण,
सार्या रातीचा पसारा,दीस पडेनाहो चैन...
चंद्र-चांदणे तिथेच,वाट पाहती खुलून,
किती आठव आठव,पण येईना साजण...
सह्ही आहे हे !
सह्ही आहे हे !
एकापेक्षा एक!!!!!!!!!
एकापेक्षा एक!!!!!!!!!
लोकहो प्रत्येकाने नवा बिबि
लोकहो प्रत्येकाने नवा बिबि उघडून हा खेळ खेळण्यापेक्षा
http://www.maayboli.com/node/2640 इथे खेळा हा चारोळ्यांचा खेळ.
अॅडमिन ने इथे चारोळ्यांसाठी खास सोय केलेली आहे.