कवी गिरिश यांची कवित हवी आहे

Submitted by अवल on 13 October, 2012 - 06:01

नमस्कार.
माझ्या आईला कवी गिरिश यांची खालील कविता हवी आहे. कोणाला माहिती आहे का? कृपया इथे देणे शक्य नसेल तर माझ्या संपर्कातून पाठवाल का? किंवा ती कोठे उपलब्ध होईल हे सांगाल ? धन्यवाद
- कवी गिरिश
पोर खाटेवर मृत्यूच्याच ...
कुण्या गरिबाचा तळमळे बिचारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल.....ही घ्या.....पूर्ण

अवल.....ही घ्या.....पूर्ण स्वरूपात ~

पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कुणा गरिबाचा तळमळे बिचारा;
दूर आई राहिली कोकणात,
सेविकेचा आधार एक हात !

ताप त्याने भरचा तडफडावे;
पाखराने एकले फडफडावे
ह़ळू गोंजारी सेविका दयाळू;
डाक्तराचे वच शांतवी कृपाळू.

कधी त्याने घ्यावे न मुळी अन्न,
कुठे डोळे लावून बसे खिन्न;
आणि डाक्तर येतांच गोंजराया
हाय ! लाए तो घळघळा रडाया !

एक दिन तो व्याकूळ फार झाला
आणि त्याने पुशिलेच डाक्टराला -
"अतां दादा, मरणार काय मी हो ?"
तोंच लागे अश्रुची धार वाहो !

हृदय हलुनी डोळ्यात उभे पाणी,
तरी डाक्तरची वदे करुण वाणी;
दोन गोष्टी सांगून धीर देई
पुन्हा गोंजारुन शांतवून जाई.

रात्र अंधारी माजली भयाण
सोसवेना जीवास अतां ताण
हळुच बोलावी बाळ डाक्तराला
तोहि धर्मात्मा धांवुनीच आला

अतां बाळाला टोचणार, तोच
वदे वासुन पांखरू दीन चोंच -
"नको आता ! उपकार फार झाले !
तुम्ही मजला किति...गोड...वागवीले !

भीत...दादा...मरणास...मुळी...नाही !
तु...म्ही...आई...!!" बोलला पुढे नाही !
झणी डोळे फिरविले बाळकाने
आणि पुशिली लोचनी डाक्तराने.

[अवल....मूळ कवितेत 'डाक्तर' असाच उल्लेख असल्यान इथे मी टंकताना नेमके तसेच केले आहे....]

अरे वा ! अशोकजी खुप खुप धन्यवाद. आई एकदम खुष होईल Happy तिच्याकडून आधीच धन्यवाद देते. अन इतक्या लगेच टाईपपण केलीत. म्हणजे नक्कीच पाठ असणार तुमची Happy

ओ...हो....! कविता पाठ नव्हती....मात्र माहीत होतीच...अन् कुठे 'लपली' आहे माझ्याकडील कपाटात तेही स्मरणात होतेच....बाकी टायपिंगची मला खूप सवय असल्याने टंकण्यात कसलीच अडचण येत नाही.....शिवाय 'कविता' त्या निमित्ताने बोटातून स्क्रीनवर झरझर उतरताना पाहणे हाही एक आगळाच आनंद असतो हे तुम्हीही मान्य करालच.

...अन् तुमच्या आईना माझा नमस्कार आवर्जून सांगणे.

बापरे, कसली टचिंग आहे. आई नहमी म्हणायची खुप हेलावून टाकणारी आहे ही कविता. अगदी पटलं. पुन्हा एकदा धन्यवाद अशोकजी
Happy

आईला वाचून दाखवली अशोकजी. फोनवरूनही मला कळले तिचा आवाज भरून आला होता. खुप खुप धन्यवाद. कृपया विपु पहाल Happy

"सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे, जे सुदूर जे असाध्य तेथे मन धावे" ही कविता हवी आहे. कुणाकडे असल्यास कृपया पोस्ट करावी.

झाली थकून आडवी
अर्ध्या चंद्राची सावली
पांद चिखलकाट्यांची
हळू मागे मागे गेली

शितळाईच्या ओढ्याच्या
हातातली घुंगुरकाठी
खुळखुळखुळ वाजे
बैल उताराने जाती.

कळकीच्या बेटातून
वारा अलगूज वाजवी
चांदण्याचा कवडसा
पाण्यामध्ये गातो ओवी

ही कविता कोणाला माहिती आहे का? बहुतेक बोरकरांची आहे.