रोबोटिक वैक्युम क्लीनर विषयी माहीती हवी आहे.

Submitted by वत्सला on 6 August, 2016 - 11:43

रोबोटिक वैक्युम क्लीनर बद्दल माहिती/ चर्चा - उपयोगी आहे का, कोणता ब्रॅंड घ्यावा, काय काळजी घ्यावी लागते, फ्लोर बोर्डस (wooden floor) वर चालतो का वगैरे - करण्यासाठी धागा.
(या विषयावर मायबोलीवर याआधी चर्चा झाली असल्यास कृपया लिंक द्या.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुम्बा चान्गला आहे असे रिपोर्ट आहेत, मैत्रीणिकडे आहे ३ वर्ष,तिचा अनुभव चान्गला आहे.

मी रूंबा वापरलाय काही वर्षांपूर्वी. मोकळी जागा असेल तर सोपं आहे. पण फर्निचर मधून सफाई करणं किचकट वाटतं. सारखं त्याची फिरण्याची दिशा बघावी लागते, म्हणजे तो कुठे अडतंय का हे बघावं लागतं त्यापेक्षा आपला नेहमीचा वॅक्यूमच सोपा वाटतो. आता रूंबाने technology इंप्रूव केली असेल तर मला कल्पना नाही पण आठ, दहा वर्षांपूर्वी तरी तो खूप खास नव्हता.
पण घरी असलेला चांगला आहे कारण कधी आपल्याला बरं नसेल तर कामाचालाऊ सफाई साठी ठीक आहे.
थोडक्यात पारंपरिक वॅक्यूम क्लीनर ला पर्याय म्हणून नको पण तरीही अडचणीत कामाला येणारा पर्याय म्हणून चांगला आहे.

छोटीशी माहिती देतो:

"भारतात", फंदात पडू नका

त्या निष्पाप कोवळ्या जिवाच्या कप्यासिटी बाहेरची धूळ आपल्या घरात अस्ते.. इतर कचरा अलाहिदा.

वूडन फ्लोअर चे माहीत नाही. पण रूम्बा आम्ही अनेक वर्षे वापरतोय. सफाईला तेवढा एकच पर्याय म्हणून चालणार नाही (नेहमीचा व्हॅक्यूम किंवा झाडू/स्वीपर लागेलच) पण अनेकदा नुसता रूम्बा पुरतो. वरती पद्मावति यांनी लिहीले आहे ते खरे आहे - खूप मोकळा भाग नसेल, त्यात सहज जाण्यासारख्या/ किंवा अडकण्यासारख्या पण तशा जायला नको असलेल्या गोष्टी खाली असतील तर त्याला अनेक अडसर घालावे लागतात. साधारण दीड फूट व्यासाची गोष्ट सहज बर्‍याचश्या भागातून फिरू शकत असेल तर खूप उपयुक्त आहे. एरव्ही नुकत्याच रांगू लागलेल्या बाळाप्रमाणे लक्ष ठेवावे लागते :). बाकी जेथे धूळ्/कचरा आहे तो भाग सोडून इतरच कोठेतरी स्वच्छ भागात ओसीडी गिरी करत फिरत राहणे वगैरे मर्फीज लॉज सुद्धा तो पाळतो.

पद्मावति - आजकालच्या मॉडेल्स ना स्पॉट क्लीनिंग म्हणून ऑप्शन आहे (पूर्वी ही असेल कदाचित. पण कोणतेही उपकरण फॅक्टरी डीफॉल्ट अवस्थेच्या पलीकडे वापरायची फार सवय नसल्याने सापडले नसेल मला). एका ठिकाणी ठेवला की तेथेच गोल गोल फिरत मोठे होणारी वर्तुळे काढत सफाई करतो. त्या मोड मधे कचरा पुण्यात व हा मुंबईच्या उपनगरांत फिरतोय असे होत नाही Happy

धन्यवाद प्राजक्ता, पद्मावती आणि फा.
तुमच्या प्रतिसादांवरून फार महाग नसलेला रूम्बा घ्यावा असे वाटते आहे.

रूम्बाचा कार्पेटवाला वॅक्क्यूम क्लीनर खूप छाने! उसगावात माझी मदार त्यावरच होती.

हार्डवुड, सेरॅमिक टायल्स करता वेगळं माॅडेल निघालय असं वाटतं. त्याचा ॲल्गोरिथम साॅलिड आहे आणि त्याच्या सोबत येणारी ॲक्सेसरीज (सेंसर्स बॅरीयर) त्याच्या बाउंडरीज ठरवण्याकरता उपयोगी पडतात. बाकि अडथळ्यातुन मार्ग काढणे, जिन्याच्या टोकावरुन मागे फिरणे वगैरे बेसीक स्किल्स त्याच्यात आहेत.

त्याचा फक्त एकच विकनेस आहे तो म्हणजे त्याची पाॅवर, त्याच्या साइझमुळे मोटर स्ट्रेंग्थ मला वाटतं < १ ॲंप (ट्रडिशनल > १० ॲंप्स) खुप कमी आहे, आणि छोट्या ब्रशमुळे डिप क्लिनिंग हा प्रकार नाहि. परंतु ती उणीव कौतुकमिश्रीत समाधानाने भरुन निघते, एस्पेशली तेंव्हा, जेंव्हा तुम्ही तुमचं फेवरेट बेवरेज घेउन, रिक्लायनर वर पाय सोडुन, टिवीवर फेवरेट प्रोग्रॅम बघत असता आणि हा बाळ्या इमानदारीत सभोवतालचं फ्लोअर चकाचक करत असतो... Happy

"भारतात", फंदात पडू नका

एकदम सहमत.घरात लोकांनी फेकलेली कॅप्सुल ची चंदेरी रिकामी पाकीटं,कांद्याची उडालेली सालं,प्लॅस्टिक च्या खेळण्यांचे तुटलेले पार्ट,कागदाचे बोळे,मोबाईल च्या हेड फोन चं एका एयर प्लग चं रबरी कव्हर या स्वरुपाचा कचरा भरपूर असेल त्यांनी हा रोबो आणला तर आधी त्या रोबोला फिरायला जरा नीट वातावरण म्हणून स्वतः झाडू घेऊन जरा राबावं लागेल.
पसारा फ्री परदेश आणि फक्त धूळ असलेली छान कमीत कमी गर्दीवाली जमिन हे दोन अ‍ॅसेट असतील तर नक्की घ्या.

धन्यवाद.

पसारा फ्री परदेश Biggrin > पसारा (क्लटर) फ्री घर अशी जर त्याची अट असेल तर आमच्याकडेही कठीण आहे.
राज, तुम्ही फार मनोरम चित्र उभं केलत :).
बाजारात 50-1600 अशी भली मोठी रेंज उपलब्ध आहे. ट्रायल साठी एक (रूम्बा ब्रॅंड चे) साधेसे घेऊन बघणार आहोत.

We are using Milagrow (Made in India) for last one year in my house in Gurgaon. Overall performance in OK. We removed our maid after buying this cleaning robot. So far so good. Only problem is brush wear and tear is more.

आमच्याकडे एकदाचे "रामु चाचा" आले.
LG कंपनीचा आहे. एकंदरीत बरे प्रकरण वाटते आहे. जरा वापरुन झाला की सविस्तर लिहीते.