Preinvest चा फायदा काय ?

Submitted by मया on 20 June, 2016 - 02:51

थट्टा करा पण एखाधा चांगला मार्ग सांगा जेणे करून मला थोडी मदत होईल.

मी पनवेल मध्ये एक फ्लॅट घेतला तशी गरज न्हवती पण पैसे फालतू गोष्टीत उधळू नको काही तरी saving कर म्हुणुन घरातल्यानी फ्लॅट घेण्यास सुचवलं मी पण घेतला ११ लाखाचं loan काढलं GIC Housing Loan finance कढून. मला त्यातला काहीही माहीत न्हवत मी बोललो ११ लाख असेच देऊन टाकीन महिन्याला १५ हजार भरायचे एवढं माहीत होत २०१४-२०१६ पर्यंत रेगुलर भरले या महिन्यात १५०००० अधिक जमा केले आणि विचारले आता बाकी किती ते बोलले ९१३००० मी चाटच पडलो.

आता काही प्रश्न ज्यांना स्टोरी त इंट्रेस नसतो

१) Preinvest केली तर तिला सुद्धा इंट्रेस लागतो का
२) मी ही रक्कम लगेच भरून टाकली तर बार पडेल की आहे तशीच monthly १५००० ने भरू
३) loan साठी चांगला मार्ग सुचवा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोन आधी फेडणे फायद्याचे असते असे वाटते. तीन वर्षाचा इंटरेस्ट घेतील ना ते ! १० % धरले तरी तीन लाखाच्यावर इंटरेस्ट होईल.

११ + ४ = १५ लाख तुमची लायेबिलिटी होईल.

पैकी तुम्ही दोन वर्षाचे १.८ लाख गुणिले दोन बरोबर ३.६ लाख भरले आहेत. अधिक दीड .. बरोबर सुमारे पाच लाख.

म्हणजे दहा लाखाइतकी अजुन लायेबिलिटी शिल्लक आहे.

* हे सरळव्याजी हिशोबाने काढले आहे.. अगदी बरोबर असेल असे नाही. अंदाजे उत्तर आहे.

समजा तुम्ही दर महिन्याला १५००० भरत होतात..माझ्या अंदाजानुसार तुमचे काहीतरी चुकत आहे..
कृपया तुम्ही पहिल्यांदा हे सांगा कि तुम्ही fixed रेट कि फ्लोटिंग रेटने कर्ज काढले आहे...
जर फ्लोटिंग असेल तर १५००० हा हफ्ता साधारणतः १८० महिन्यासाठी ११ लाख साठी बरोबर आहे व्याज दर 14.५० जो २ वर्षापूर्वी होता... पण तुम्ही म्हणता २४ महिने भरले आणि अतिरिक्त १५०००० भरले तरी तुमचे मुद्दल ९१३०००/- शिल्लक आहे.. हे बरोबर आहे. कारण कुठली लोन देणारी कंपनी समजा तुमचा हफ्ता १५००० हजारचा आहे तरी सुरवातीला त्यतील साधारणतः १७००-१८०० रुपये हे मुद्दल पोटी जमा होतात व बाकीचे व्याजापोटी जमा होतात...
तुम्ही आत्ता जावून व्याजदर सद्य काय आहे तो check करून घ्या. व त्यांचे Take ओवर चार्जस काही आहेत का? साध्या सगळ्या बँकाचे base rate कमी झाले आहेत.. त्यामुळे जर ते ९.७५ पेक्षा जास्त असेल तर ते शिफ्ट करणे योग्य राहील..

मी ही रक्कम लगेच भरून टाकली तर बार पडेल की आहे तशीच monthly १५००० ने भरू>>>>>>>>>>

१. जर तुझ्याकडे ही रक्कम असेल तर भरुन मोकळा हो. (आणि पुन्हा फायनॅन्शियल अ‍ॅड्वाय्झर कडे गेल्याशिवाय अशी गुंतवणुक करु नकोस)

२.,जर रक्कम असेल तर अशी गुंतवणुक शोधावी लागेल ज्याचा परतावा तुला आता भराव्या लागणार्‍या व्याजापेक्षा जास्त असेल उदा. आता जर तु ९.५ % दराने कर्जावर व्याज भरत असशील तर गुंतवणुक अशी हवी ज्यात तुला किमान ११ ते १२ % परतावा मिळेल. परतावा = Returns. ते जर नसेल तर पर्याय १ उत्तम.

मला त्यातला काहीही माहीत न्हवत मी बोललो ११ लाख असेच देऊन टाकीन महिन्याला १५ हजार भरायचे एवढं माहीत होत २०१४-२०१६ पर्यंत रेगुलर भरले या महिन्यात १५०००० अधिक जमा केले आणि विचारले आता बाकी किती ते बोलले ९१३००० मी चाटच पडलो. >>>>>>>>
मी थट्टा करत नाही आहे पण तुझा आर्थिक approach खुप Casual आहे. स्वकष्टाचे पैसे गुंतवत असताना अतिशय सावध असणे गरजेचे आहे. आता इंटरनेट वर आणि इतर बरीच साधने आहेत ज्यावर ही माहिती उपलब्ध आहे. समजा ती वापरायचा आळस असेल तर Paid Financial Advisors उपलब्ध आहेत. समजा तुझ्याकडे खुप पैसे असले तरी ते योग्य रितीने वापरले नाहीस तर ते फार काळ तुझ्याकडे राहणार नाहीत. आताच सावध हो.

Actually GIC is very expensive....

लोन घेताना निट चौकशी केली नव्हती का...

जिआयसी, डीएचफल मधुन लोन घेण्यापेक्षा एखाद्या बन्केतुन घ्यायचे ना.

आरबिआय ने आत प्रीपेमेंट आणी फोरक्लोझर चार्जेस वेव्ह केलेत.

तरी लोन सेटल करण्यापुर्वी आता तरी निट चौकशी करा नाहीतर काही हिडन चार्जेस असतील ते कळणार सुद्धा नाहीत.

@ हेमंत : तू सांगतो आहेस तेच बरोबर आहे कारण त्यांचा interest Rate १०.९५% असा काहीतरी आहे आणि तो ५ वर्षासाठी फिक्स आहे माझी एक चुकी झाली मला यातलं काही काळात न्हवत फक्त घरातले बोलले फ्लॅट घे मी घेतला आता १५०००० Pre - payment केलं तेव्हा डोळे उघडले नाहीतर फ्लॅट घेतलाच नसता भांडुप घर आहे माज हेमंत आताही खाली दिल्या प्रमाणे rate आहे.

Individual Housing loans – Interest rate starts from 10.25% onwwards

Mortgage Loans - Interest rate starts from 13.25% onwwards

Commercial Loans - Interest rate starts from 15% onwards

For fees and other details please refer to Tariff Schedule

@ मनीष : Pre - payment सॉरी - डोकंच चालत नाही आहे

@ मी मानिनी आणि mansmi18 : हा गोंधळ झाला सध्याच्या मुली मुळे त्यांना मुलाशी लग्न करायचं नसत तर मुलाच्या फ्लॅट शी म्हणून तो फ्लॅट घेतला आणि मी काही श्रीमंत नाही जास्त ज्या वेळी पासून कामाला लागलो त्या पासून जे जमवून ठेवलेलं ते या फ्लॅट मध्ये घातलं आणि बाकीचे loan घेतलं.

जवळच्या sbi / axis बँक मध्ये संपर्क करा कारण त्यांचे व्याजदर खूप कमी आहेत. ९.३० sbi आणि ९.५० axis चा आहे ते take ओवर करतात.. पण तुम्ही जर GIC चे online charge schedule बघितले तर असे लक्षात येईल कि त्यांचे २ % हे take ओवर चार्जस आहेत त्याचा विचार करा आणि त्याची खात्री करा.. जर तसेच असेल तर तुम्ही लवकर prepayment करून लॉन संपवून टाका हे योग्य राहील..
आणखी काही लागले तर जरूर सांगा..

@ मी मानिनी आणि mansmi18 : हा गोंधळ झाला सध्याच्या मुली मुळे त्यांना मुलाशी लग्न करायचं नसत तर मुलाच्या फ्लॅट शी म्हणून तो फ्लॅट घेतला आणि मी काही श्रीमंत नाही जास्त ज्या वेळी पासून कामाला लागलो त्या पासून जे जमवून ठेवलेलं ते या फ्लॅट मध्ये घातलं आणि बाकीचे loan घेतलं. >>>>>

हा हा हा काहिही......

म्हणजे स्वतः सारासार विचार न करता व्यवहार करायचा आणी खापर मुलींवर फोडायचे, तुम्ही तर आभार मानायला पाहीजे कि निदान यामुळे घर घ्यायची तरी बुद्धी झाली नाहीतर कळले ही नसते एक दिवस की सगळे पैसे कुठे खर्च झाले.

वर दोन वर्शात एकदाही स्टेट्मेंट चेक नाही केले तुम्ही ... धन्य आहात

@ मी मानिनी : शेवटी तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात ना मुलींचीच बाजू घेणार जाऊदेत २ वर्षात statement आली पण त्यावर कधी लक्षच नाही दिलं

त्याच कारण हेच होत पगार यायचं त्यात एकच लक्ष असायचं १५००० महिन्याला गेले पाहिजे.
आणि बाकीच्या पगारात मजा होत होती

म्हणजे सध्या मजा करायला पैसा शिल्लक राहत नसल्यामुळे हा सगळं उपद्याप आठवला का? काहीतरी चांगले झाले म्हणायचे...